Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋत म्हणजे रास्त.
ऋत म्हणजे रास्त/उचित/सयुक्तिक/सुयोग्य.
)
मी बोलतो ते खरंही आहे आणि उचितही आहे.
(सत्य बोलणं प्रत्येक परिस्थितीत उचित असेलच असं नाही आणि व्हाइस व्हर्सा!
तुम्ही म्हणता त्या
तुम्ही म्हणता त्या 'निसर्गनियम' या अर्थानेच त्यावरून 'ऋतू' शब्द आला असेल का?
"रिच्छ" हा हिंदी शब्द त्या
"रिच्छ" हा हिंदी शब्द त्या ऋच्क्ष वरून आला असावा. त्याचा अर्थ अस्वलच.
कमळाबाबत - रात्री व दिवसा उमलणारे याप्रमाणे आहे का ते ? चंद्रविकासी व सूर्यविकासी.
सामो
विलासी नव्हे ओ, विकासी.
विलासी नव्हे ओ, विकासी.
म्हणजे रास्त/उचित. >>> समजले.
म्हणजे रास्त/उचित. >>> समजले. सत्याच्या पण दोन पायर्या असतात - साधे सत्य (कनिष्ठ) आणि दुसर्याला न दुखवता बोललेले सत्य (श्रेष्ठ).
हो. सत्यं ब्रूयात् प्रियं
हो. सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्!
ऋतं म्हणजे जे धर्मग्रंथात,
ऋतं म्हणजे जे धर्मग्रंथात, शास्त्रात सांगितले आहे ते.
सत्यं म्हणजे absolute truth जे कुणी मानवाने सांगायची गरज नाही, कुणी शिफारस करायची गरज नाही,
transcendent! जे स्वतः हून आहे ते,
धन्यवाद, केकू.
धन्यवाद, केकू.
सत्यं ब्रूयात् प्रियं
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्!
हा व्यावहारिक सल्ला आहे.
Dale Carnegie पद्धतीचा,
मला चि वि जोशींची "सत्याचे प्रयोग" ही कथा आठवते.
केकू. जिम कॅरीचा 'लायर लायर'
केकू. जिम कॅरीचा 'लायर लायर' सिनेमा पाहिला नसाल तर नक्की पाहा.
नाही बघितलेला, नक्की बघेन,
नाही बघितलेला, नक्की बघेन,
ओह "क्यू की मै झूट नही बोलता." गोविंदा मुव्ही.
रात्री व दिवसा उमलणारे
रात्री व दिवसा उमलणारे याप्रमाणे आहे का ते ? चंद्रविकासी व सूर्यविकासी >> हो
केकू, "जे आहे त्ते नरकाचे
मला चि वि जोशींची "सत्याचे प्रयोग" ही कथा आठवते.>>>
केकू, "जे आहे त्ते नरकाचे साधन" आणि "प्रामाणिकपणाविषयी आजीबाई" हे सुद्धा "सत्यं ब्रुयात्, प्रियं ब्रुयात्" चे एक्स्टेन्शन होईल.
"सत्यं ब्रुयात्, प्रियं
"सत्यं ब्रुयात्, प्रियं ब्रुयात्"
अशा वाक्यांना इंग्रकीत काय म्हणतात बरे. मला नेमका शब्द आठवत नाहीये . म्हणजे यापैकी एका वेळी एकच वचन सत्य होऊ शकेल. सत्य तरी बोला किंवा प्रिय तरी बोला.
मी समग्र चिं वि जोशीं अनेक वेळा पारायणे केली आहेत. पण "जे आहे त्ते नरकाचे साधन" नाही आठवत, बाकी "प्रामाणिकपणाविषयी आजीबाई" एकदम चपखल आहे.
आमचे संस्कृतीचे मास्तर
आमचे संस्कृतीचे मास्तर पुंडरिक म्हणजे ss कमळ..असे म्हणून फळ्यावर बऱ्यापैकी कमळाचे चित्र काढायचे...

हे पुलंचे वाक्य आठवले !
हो हो मलाही. बिगरी ते मॅट्रिक
हो हो मलाही. बिगरी ते मॅट्रिक.
ऋतं म्हणजे जे धर्मग्रंथात,
ऋतं म्हणजे जे धर्मग्रंथात, शास्त्रात सांगितले आहे ते. >>> पण म्हणजे प्रत्येक वेळेस ऋत आणि सत्य या दोघांना अनुसरून बोलणे शक्य होईलच असे नाही ना? मग ऋतं वच्मि, सत्यं वच्मि असे एकत्र का सांगितले असावे? (मी अथर्वशीर्षाचे झाड सोडत नाहीये कारण मला ऋत शब्द असलेला दुसरा श्लोक / वाक्य माहित नाहीये
)
माधव, ही एक इन्टरेस्टिंग लिंक
माधव, ही एक इन्टरेस्टिंग लिंक सापडली बघा.
आणि ही विश्वकोषातली एन्ट्री.
बाई, पहिली लिंक तर प्रबंध
बाई, पहिली लिंक तर प्रबंध निघाला. दुसरी वाचली थोडी, आवडली. वर केकूंनी म्हटलं होतं तसं ऋत् चा अर्थ वैश्विक सत्य असं दाखवलं आहे. ऋत् ह्या अखंड चालणाऱ्या वैश्विक सत्याप्रमाणे अविरत आणि त्याच्याशी समांतर ( किंवा त्याचे डोळ्यांसमोर असणारे आदर्श रिप्रेझेन्टेशन) म्हणजे निसर्गक्रम/ ऋतुचक्र - बाकी कुणीही इतके अविरत/ नित्य नाही म्हणून सत्यही नाही व त्यामुळे ऋतू शब्द त्यावरून आला आहे हे कनेक्शन कळाले किंवा मलाच वाटले.
हे वाक्य शब्दात मांडताना थोडी कसरतच झाली.
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव |
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवा: || 14||
श्रीमद भगवदगीता. दहावा अध्याय चौदावा श्लोक.
माधव, इथे ॠत शब्द आला आहे.
केकूंनी म्हटलं होतं तसं ऋत्
केकूंनी म्हटलं होतं तसं ऋत् चा अर्थ वैश्विक सत्य असं दाखवलं आहे
नाही मी असे म्हणत नाहीये. माधव ह्यांनी बरोबर लिहिले आहे.
सत्यं म्हणजे absolute truth
सत्यं म्हणजे absolute truth जे कुणी मानवाने सांगायची गरज नाही, कुणी शिफारस करायची गरज नाही,
>>> हे वाटलं मला.
ऋत, सत्य, ऋतू - शिवाय सत्य - नित्य आणि "ऋतं वच्मि, सत्यं वच्मि" हे सगळं जोडलं.
आता मला काय वाटतंय ते लिहितो.
आता मला काय वाटतंय ते लिहितो.
संपूर्ण अथर्वशीर्शात गणपती देवतेचे वर्णन आहे.
मग मधेच "मी ऋत बोलेन , मी सत्य बोलेन असा नाही. "
तर "हे देवा, तूच ऋत आहेस असे मी म्हणतो, तूच सत्य आहेस असे मी म्हणतो"
असा अर्थ घेतल्यास विरोधाभास होणार नाही.
ही माझी अल्प मति आहे.
स्वाती, दोन्ही दुव्यांकरता
स्वाती, दोन्ही दुव्यांकरता खूप खूप धन्यवाद. पहिली लिंक सावकाशीने वाचतो. विश्वकोशातले विवेचन वाचले आणि एकदमच पटले.
तूच ऋत आहेस असे मी म्हणतो >>> केकू, हे परफेक्ट आहे. 'तू ऋत आहेस' हे कळीचे शब्द आहेत. म्हणजे मी ऋत बोलत नाही तर तू ऋत आहेस असं मी म्हणतो. हे त्या विश्वकोशातल्या अर्थाशी जोडले की सगळा अर्थ लागतो.
स्वाती आणि केकू, you guys made my day!
तूच ऋत आहेस असे मी म्हणतो >>>
तूच ऋत आहेस असे मी म्हणतो >>> केकू, हे परफेक्ट आहे. 'तू ऋत आहेस' हे कळीचे शब्द आहेत
>> अनुमोदन. हे सेन्स करतेय. छान चर्चा.
>>> तूच ऋत आहेस असे मी म्हणतो
>>> तूच ऋत आहेस असे मी म्हणतो
हा इन्टरेस्टिंग टेक आहे!
>>> you guys made my day!
Pleasure!
स्वातींनी लिहीलेला अर्थ मला
स्वातींनी लिहीलेला अर्थ मला पटला.
योग्य (तेच) बोलतोय, खरं बोलतोय.
ऋतचे अनेक अर्थ आहेत.
इथे ते विशेषण असले पाहिजे. आणि ते नपुंसकलिंगी वापरलेय म्हणजे बोलतोय ते हे विशेष्य असले पाहिजे, वापरलेल्या लिंगामुळे गणपती विशेष्य असु शकत नाही. तेच सत्यम् बद्दल.
ऋतम् विशेषणाचा अर्थ सत्य असाही आहे आणि योग्य/उचित असाही इथे योग्य /उचित अर्थ असावा.
बाकी कुणीही इतके अविरत/ नित्य
बाकी कुणीही इतके अविरत/ नित्य नाही म्हणून सत्यही नाही व त्यामुळे ऋतू शब्द त्यावरून आला आहे >> केकू म्हणताहेत की त्यांनी ऋत शब्दाचा हा अर्थ सांगितला नव्हता. तो सत्य चा होता. आता वरचे लॉजिक लावायचे झाल्यास ऋतूला ऋतुऐवजी सत्यू असं नाव असायला पाहिजे होतं.
नीट वाचले नाही की मी ही 'अशी'
हे देवा, तूच ऋत आहेस असे मी
हे देवा, तूच ऋत आहेस असे मी म्हणतो >> हे पटलं नाही. तिथे ऋतम् इति वच्मि असं असतं तर पटलं असतं. गणपतीला तू काय काय आहेस हे सांगताना इतर ठिकाणी त्वं अमुकतमुक असि (ज्ञानमयो असि, ब्रह्मासि) अशी रचना असताना मधूनच वच्मि वापरायचं कारण नव्हतं. काहीतरी वेगळा अर्थ असणार.
Pages