शब्दवेध व शब्दरंग (५)

Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे

मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सं. पथ् = चालणें
PIE root *pent- "to tread, go, pass" >>>>> path (इं) <<<<< Avestan patha = "way;"
Avestan ही जुनी इराणी भाषा असून तिथे वेदिक संस्कृतशी जवळचे नाते आहे.

असा हा गोतावळा !

प्रवासात तहानलाडू भूकलाडूही नेतात. भूकलाडू ठीक आहे. तहानलाडू म्हणून काय नेत असतील? त्यापेक्षा तहानगडू भूकलाडू बोलणं जास्त बरोबर ठरेल ना?

* तहानलाडू >>>
मूळ शब्द :
तानलाडू
तानलाडू tānalāḍū m A लाडू (a ball of coarse sugar made up with gram &c.) of fabulous story, given to a traveler to quench his thirst on the road: as भूक- लाडू was given to satisfy his hunger. Hence तान- लाडू भूकलाडू come (rather jocosely) to signify Viaticum.

मोल्सवर्थ शब्दकोश

मोल्सवर्थने तानचे ८ अर्थ दिलेत. त्यात सूर आणि तहान हे दोन्ही आहेत आणि
लाक्षणिक अर्थाने हा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे :
fig. Thirst after, itching, longing, hankering.

बेसन लाडवाने तहान कशी भागणार?>>>> उलट केलेय, बेसन घातलेला साखरेचा लाडु आहे तो. साखर तोंडात विरघळुन तहान भागत असेल.

बहुगुणं

मायबोलीवर पातेलं = भगुलं / भगुनं / बगुनं असा उल्लेख झाला आहे. त्या शब्दाचा वेध घेऊन त्याचे अर्थरंग उलगडून पाहुयात.

भगुनं, भगोनं, भगोना, बोघनं, बोघने हे शब्द बहुगुणं या शब्दाचे अपभ्रंश असावेत. चुलीवर चढवण्याची तवा, कढई, पातेले ही तीन भांडी असतात*. त्यापैकी पातेले हे सर्वात versatile म्हणजे बहुगुणी असते म्हणून बहुगुणं.**

* या भांड्याला अजून कोणती नावे असतात का?
** ही मीमांसा योग्य वाटते का?

Onomatopoeia
Onomatopoeia is a word which mimics the sound it represents.
म्हणजे असे शब्द जे एखादा आवाज दर्शवितात ते शब्द त्या आवाजाप्रमाणे असतात.
काही उदाहरणे देतो.
भु भु
हम्मा , हंबरणे, चिवचिव, कंकणांची किणकिण, भोंगा, काव काव, कावळा. पुटपुट, भोकाड, खणखणाट. ताशा, ढोल.
ढेकर. आक्च्छी, धूम धडाका, कुरतडणे, कुरकुरीत, कोरे करकरीत, गडगडात, टपटप, रिमझिम, झंकार, टणत्कार, खाकरणे इत्यादि.
अनेक शब्द असतील. पहा तुम्हाला काही आठवतात का?

फाडकन/काडकन, धप्पकन, कडाडणे, खळाळ/णे, गुणगुण/णे, चुकचुकणे, चपचपीत, पचपचीत. सळसळ/णे, खळ्ळकन, छुमछुम, म्यावम्याव, हुंकार, झंकार, फुत्कार, टपटप, टापा

ध्वनिजन्य शब्द! Happy
झुक झुक आगीन गाडी...
डमडम डमरु ये...
हे अजून दोन शब्द.

गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेही जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंटा वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाही ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

छान चर्चा. यातले बरेचसे शब्द विशेषणं किंवा क्रियाविशेषणं म्हणून आलेले दिसतात. काही नामं दिसली (चिवचिव, किलबिलाट इत्यादी, पण ते पण क्रियेशी संबंधित वाटले). ह्यात नामं शधूयात का?

सहा आसनी रिक्षाला 'टमटम' हे जे नाव आहे ते पण ओनोमॅटोपिआचं उदाहरण म्हणता येईल का?
तसंच तुणतुणं हे वाद्य?

(ढोल आणि ताशा हे ह्यात कसे आले कळलं नाही. ताशाचा आवाज 'ताशा' असा येत नाही.)

एकरावी किंवा बारावीला एक कविता होती.
त्यात चुळूक मुळूक सडा, काकणांची किणकिण असे बरेच नादमय शब्द होते. नीट आठवत नाही.

>>> ह्यात नामं शधूयात का?

खुळखुळा, छुमछुम, कडाकण्या, डग्गा, पिपाणी, टिपर्‍या, पापड, वाटाणे, फुटाणे, फतफतं

क्षमस्व मराठी शब्द किंवा भारतिय भाषांत शब्द हवे - हे लक्षात नव्हते. इथली इंग्रजी कवितेची, पोस्ट डिलीट केलेली आहे.

ढोल आणि ताशा हे ह्यात कसे आले कळलं नाही >>> ढोल बसतो असं वाटलं - ढ्म ढ्म वाजणारा तो ढोल. पण ताशा नाही बसत. कुरतडणे पण नाही पटले मला. बर्‍याचदा ती क्रिया आवाजविरहीत असते, आणि नसते तेंव्हा कुर्/तड/कुरतड असा काही आवाज नाही येत.

ताशावरून आता आपण एका संबंधित शब्दाकडे जाऊ :

ताशेरा
= ताशावरची झोड (मार)
= ( ल.) दणकारा
>>>>>खरडपट्टी , तासडपट्टी , नापसंतीदर्शक शेरा
ताशा नावाचं चर्मवाद्य असते. ते दोन काठ्यांनी तडम तडम वाजवतात आणि कर्कश्श आवाज येतो.
त्यावरून ताशेरे म्हणजे एखाद्याच्या डोक्यात हाणले असा अर्थ असावा !
+
( ताशेरे झाडणे = तांब झाडणे)
( ताशेरा = मोका; योग्य संधी)
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
. . .
‘ताशेरे ओढण्याचा’ एक वेगळा अर्थ (ऐकीव) :
चामडे कमावताना ते तासण्यासाठी ताशेरे म्हणून एक हत्यार वापरले जाते. त्याने चामडे जोरात घासून काढले जाते व गुळगुळीत होते. चामडे एका फळकुटावर ठेवून ते ताशेरे ओढले जाते.

. . . अर्थात याचा संदर्भ मिळालेला नाही.

ताशा शब्द अरबी शब्दापासून आला आहे.
ताशा [ अर. तासह्(= वाजवण्याचा काशाचा
वाटोळा पत्रा. अडीच घटकाची वेळ
दाखवण्यासाठी वापरत.)

लोम = केस
>>> अनुलोमपद्धती /प्रतिलोमपद्धती

* अनुलोम (अंगावरील केसावर सुलट हात फिरविला म्हणजे ते गुळगुळीत लागतात) = यथा- क्रम चालणारी रीति
* प्रतिलोम ( केसावर उलट हात फिरविल्यास केस विसकटतात व खरखरीत लागतात) = नैसर्गिक मार्गाच्या विरुद्धची

दाते शब्दकोश

Pages