Submitted by कुमार१ on 12 June, 2025 - 23:20

भाग ४ इथे
मार्च 2021 पासून सलग चालू असलेल्या शब्दवेधच्या पाचव्या भागात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तास == साठ मिनिटे
तास == ६० मिनिटे
तासिका == शाळा-कॉलेजातला पिरियड == ३५-५० मिनिटे
मला तासिका हा शब्द योग्य वाटतो. सदनिका हा तसाच अजून एक शब्द.
आणि गणिताचा /ची तासिका
आणि गणिताचा /ची तासिका म्हणजे त्रासिका!
त्रासिका
त्रासिका
त्रासिका
त्रासिका
आणि जपानी शाळा म्हणजे याशिका
आणि जपानी शाळा म्हणजे याशिका !
हो ना. त्या जपानी याशिका
हो ना. त्या शाळेत गेलो होतो तर तिथल्या जपानी शिक्षकांनी माझे याशिका म्हणून स्वागत केले. आत गेल्यावर तिथले रशियन प्राचार्य मला म्हणाले, तू उभाकाबस्की!
>>> त्रासिका
>>> त्रासिका

तासिका तत्त्वावर नेमणूक हे
तासिका तत्त्वावर नेमणूक हे कितीदा वाचलंय. आमच्या वेळी मराठीचा तास असंच म्हणायचो. तासिका कधी आल्या माहीत नाही.
>>> तासिका तत्त्वावर नेमणूक
>>> तासिका तत्त्वावर नेमणूक
म्हणजे लेक्चररशिप का?
नाही. अर्धवेळ अध्यापक. ही
नाही. अर्धवेळ अध्यापक. ही नेमणूक कायमस्वरूपी नसते. आता शाळांमध्येही हा प्रकार सुरू झाला आहे.
होय.
+१
ओह ओके.
ओह ओके.
आमच्यावेळी तासच होता तासिका
आमच्यावेळी तासच होता तासिका नव्हती
पुरुष आणि स्त्रिया नेहमीच्या
पुरुष आणि स्त्रिया नेहमीच्या वापरातील उद्गार वाचक शब्दांचा संग्रह
उद्गार ( पुरुषांचे )
हात् तिच्या, यॅ:, आहे ब्बुवा, पूछो मत्,
हो, बहोत अच्छा, तर हो, बराय्, हुड़त् तेरी, छान छान, छट्, हा ऽ S हा,
छयाः छ्याः, म्हणतां काय ! अलबत् , अग ए, कर्म माझे, अरे ग्रहस्था !
भले बहाददर ! चांगलं, ध्या, अरे बापरे ! व्हौ S, अस्संक्का ! दे टाळी,
बास् झालं ! अरे.
उद्गार ( स्त्रियांचे )
इश्श, अय्याऽऽ, होक्काऽ, बाप्या, एहेरे, बरं बाई, अगबाई, अग्गोबाई, हॅत्तेरे, टाटाऽऽ, चल्ला चावट कुठले, किनई, गडे, शर्थ झाली !, छे बाई, हो ग बाई, खरंच गडे, बघा हो, जुलूम आहे, ऊः, हो पऽण, ब्बाई, होच्च मुळी, वाऽगवा !
==================शब्दकौमुदी वरून
छान.
छान.
* व्हौ:5 >> म्हणजे ? 5 हा अंक ?
ते पाच नाही. S आहे स्वे
ते पाच नाही. S आहे स्वे रिपीट केला आहे. एडीट करतो.
पूर्वीचं माहीत नाही, आता या
पूर्वीचं माहीत नाही, आता या शब्दांच्या बाबतीत (अय्या इश्श वगैरे सन्माननीय अपवाद
सोडले तर) भाषेत बऱ्यापैकी लिंगनिरपेक्षता येत चालली असावी असं वाटतं.
गडे म्हणणार्या स्त्रीया
गडे म्हणणार्या स्त्रीया नाटकाच्या रंगमंचाबाहेर असतात का? कुठल्या प्रांतात? मी कुठच्याच स्त्रीला गडे म्हणताना ऐकले नाहीये - अगदी २ पीढ्यांमागच्या स्त्रीयांना देखील.
नका गडे माझ्याकडे पुन्हा
नका गडे माझ्याकडे पुन्हा पुन्हा पाहू...
माधव हा एक शब्दकोशा सारखा शब्द संग्रह आहे. त्यामुळे प्रचलित अप्रचलित असे सर्व शब्द आले आहेत.
माधव हा एक शब्दकोशा सारखा
माधव हा एक शब्दकोशा सारखा शब्द संग्रह आहे. >>> हो ते माहीत आहे. मी त्या कोशाबद्दल नाही म्हणत. पण गडे हा शब्द नाटकांनी इतका प्रचलीत केला तेवढा तो प्रत्यक्ष वापरात होता का असे मला विचारायचे होते.
प्रत्यक्ष वापरात ( क्वचित
प्रत्यक्ष वापरात ( क्वचित अपवाद) वगळता नाही ऐकला.
गडे म्हणणार्या स्त्रीया
गडे म्हणणार्या स्त्रीया नाटकाच्या रंगमंचाबाहेर असतात का? >> चित्रपटात
.. चला ना गडे गाणं ऐकलं असेलच
गडे/ गाडे>>>> एक आडनाव आहे.
गडे/ गाडे>>>> एक आडनाव आहे. माझ्या हापिसात आहे एकजण.
त्याला आम्ही म्हणतो चला ना गडे.
मुळात गडे हे फक्त संबोधनासाठी वापरतात का? मूळ शब्द काय गड्या?
ते स्त्रियांच्या बाबतीत गडणी आहे.
माळ्याच्या मळ्यामंदी मधे आहे..... गडणी सजणी गडणी सजणी गडणी गं
गडे आणि इश्श... मीही नाही
गडे आणि इश्श... मीही नाही ऐकले....
अय्या, किनई वगैरे ऐकले आहे!!
ऋतुराज...तुमच्या त्या मित्राला किती कानकोंडे वाटत असेल !!!

पाथेय
पाथेय
= शिदोरी.
दाते शब्दकोश.
त्याला पर्यायी शब्द बुत्ती, भुती, वाटगे हे आहेत.
प्रवासात जाताना बरोबर न्यावयाचे पदार्थ हा झाला शब्दशः अर्थ.
आता लाक्षणिक अर्थाने 'आयुष्यभराची शिदोरी' या अर्थी असे वाक्य वाचले :
. . . शालेय जीवनातील अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्यभराचे पाथेय होय.
आमच्या, मूळच्या विदर्भातल्या,
आमच्या, मूळच्या विदर्भातल्या, मराठवाड्यात लग्न करून आलेल्या वाहिनी "गडे" हा शब्द वापरतात. विचारलेली एखादी गोष्ट माहित नसेल तर "नाही गडे भाऊजी" असे म्हणतात.
मायबोलीवर पातेलं = भगुलं /
.
पाथेय
पाथेय
= शिदोरी.
प्रवासात जाताना बरोबर न्यावयाचे पदार्थ हा झाला शब्दशः अर्थ.
पण
path /păth, päth/
noun
A trodden track or way.
A road, way, or track made for a particular purpose.
"a bicycle path."
The route or course along which something travels or moves.
Path आणि पथ
काही संबंध आहे का?
संबंध आहे ना !
पथावरून मार्गक्रमणा करीत असताना जे बरोबर येते ते.
पथ = वाट म्हणूनच
वाटगे हा पर्यायी शब्द.
नाही. मी काय म्हणत होतो की
नाही. मी काय म्हणत होतो की पथ हा संस्कृत शब्द आणि Path हा इंग्लिश शब्द ह्यांचे काय नाते असावे?
Pages