निसर्गाच्या गप्पा (भाग ३५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10

Screenshot_20250330_173724_Photos.jpg

नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.

सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Markhamia

मस्तच रंग आहे हा.
तुमच्याकडच्या त्या शाई शिंपडलेल्या गोकर्णीचे फोटो सुंदर आहेत.

मस्त फोटो येत आहेत
ह्या रंगात गोकर्ण आणि।कोरांटी प्रथमच।पाहिले.
ह्या गोकर्ण च्या बिया कुठे मिळतील?
नेहमीचा पांढरा आणि निळाजांभळा भरपूर येउन गेलाय.

रंगाची कोरंटी पहिल्यांदा पहिली.
मस्तच एकदम....+१.

हळदीची फुले(?).
आधी वरच्या पाकळ्या पोपटीसर दिसत होत्या.हळूहळू पांढऱ्या झाल्या.
IMG_20251031_155547.jpg
..........
IMG_20251031_155706.jpg

अन्जू, श्रद्धा, देवकी, झकासराव धन्यवाद. माझ्याकडे १ महिन्यात होतील बिया तयार.

हिरवी अबोली म्हणुन या रोपाला हल्ली महत्व प्राप्त झाल आहे. पूर्वी ही रोप म्हणुनच ओळखल जायच. आजकाल ही खास लावतात.
Screenshot_20251031_185409_Photos.jpg

सुंदर फुलं. हळदीचं फुल पहिल्यांदाच पाहिलं.
हिरवी अबोली मस्तच दिसतेय, वेगळाच कलर आहे ग्रेईश.

गोकर्ण, गुलाब, ( एकदम पिक्चर परफेक्ट फुलला आहे ) कोरंटी हिरवी अबोली मस्तच.
हिरवी अबोली लहानपणी आमच्याकडे खूप होती पण ती आम्हाला आवडत नसे एवढी, आम्हाला नॉर्मल अबोलीच कौतुक कारण ती फार नव्हती. आज बघताना आवडली पण.
देवकी, हळदीच फुल मस्तच. हळद कुंडीत कशी लावायची ? आता मार्केट मध्ये जी ओली हळद येते ती लावू का एखाद्या कुंडीत ? रुजेल का ती लावली तर ? सूर्यप्रकाश खूप आहे आमच्याकडे, पाणी किती घालायचं कुंडीतल्या हळदीला ?

@मनिमोहोर
आम्ही कुण्डीत लावली आहे हळद आमच्या शाळेतल्या परास्बागेत
Did वर्ष झाले अजुन काढली नाही हळद..
ओल्या हल्दीचे कंद लावले होते..
छान आली आहे हळद

Pages