लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

पण तो मायबोली लेखात टाकल्यावर गुगलमधून काढल्यावर लेखात दिसणार नाही.>>>
ओके.
मी हे टेस्ट केले होते. पण फक्त फायरफॉक्समध्ये.
आताही टेस्ट केले. गुगल ड्राइव्हमधून फोटो काढला तरी फायरफॉक्स मधून तो माबोवर दिसतो. लॉग आऊट करूनही आणि मोबाईल वरून फोटो दिला असताना, लॅपटॉपवरूनही दिसतो. पण क्रोमवरून दिसत नाही. तेव्हा एकदा फोटो माबोवर दिला तर गुगल ड्राइव्हमधून शेअरिंग बंद केले/फोटो काढून टाकला तर चालणार नाही.

फोटो जिथून शेअर केला आहे तिथूनच काढून टाकणे चूकच. कारण लेख उघडल्यावर तिथून तो इथे आणला जातो. डिवाइसच्या कॅशमधून एखादवेळेस तो दिसत राहिला असावा. पण काढल्यावर शेअरिंग लिंक गंडतेच.

मायबोलीची ७० एमबी ही अकाउंटला दिलेली मेमरी ही खूप फोटो( आणि एकेक एमबीचे) असलेले लेख वारंवार टाकणाऱ्यांना अपुरी पडेल म्हणून इतर शेअरिंग साइट्स शोधाव्या लागतात.

मला नेहमी उत्सुकता असते की हे इकडे आपल्या शब्दात लिंक कशी देतात. इमेज इन्सर्ट बरचसे सोप्पे वाटले आणि जमलेही.

पण ह्याविषयी कुठे धागा पाहिलेला नाही अन् ही निळ्या अक्षरातील किमया काही केल्या जमेना राव Sad
मदत प्लीज !

< a href="https://www.maayboli.com">ही मायबोली आहे< /a >

वर सुरवातीच्या < a आणि नंतर < / आणि a > मध्ये मुद्दाम स्पेस दिली आहे, syntax दाखवायला. या तीन स्पेसेस काढून पोस्ट केले की खालील प्रमाणे पोस्ट येईल.
ही मायबोली आहे

maayboli.com ऐवजी हवी ती URL द्या. आणि पुढे हवे ते वर्णन द्या. बाकी syntax तोच ठेवा.

टॅग मध्ये खालील लिंक दिली तर का नाही दिसतायेत फोटोस?
फोटो गुगल ड्राइव्ह वार वगैरे वर नसून खाजगी जागेत आहेत.

https://www.maayboli.com/user/71822/imce/PSX_20191231_174336.jpg आणि
width="600" height="800"

तुमचा फोटो

Link = https://www.maayboli.com/files/u71822/PSX_20191231_174336.jpg

फोटोची लिंक मिळवण्यासाठी एन्ट्रीवर हाईलाईट झाल्यावर खाली फोटो दिसेल त्यावर टिचकी मारुन मोठा फुल पेज दिसल्यावरच अड्रेस बारमधून लिंक कॉपी करणे.

<img src="https://www.maayboli.com/files/u71822/PSX_20191231_174336.jpg" width ="80%"/> अशी वापरा.

फोटोची लिंक मिळवण्यासाठी एन्ट्रीवर हाईलाईट झाल्यावर खाली फोटो दिसेल त्यावर टिचकी मारुन मोठा फुल पेज दिसल्यावरच अड्रेस बारमधून लिंक कॉपी कर>> हा ही स्टेप मिस झाली.
Thank u so much Sharad kaka.

साधारण महिन्यभरात लेखाचे संपादन बटण निघून जाते. मग एडिट नाही करता येत. प्रतिसादात नवीन बदललेला भाग देता येतो फक्त.

Pages