Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंतचे धावबाद होणे आणि
पंतचे धावबाद होणे आणि एंज्युरी या गोष्टींनी दोन कसोटीत मोठे फटके दिले आहेत. > येस ! दुर्दैवाने असे झालेय खरे पण हा सांघिक खेळ आहे त्यामूळे पंतचा आदर्श समोर ठेवून बघायला हवे.
जिंकला असता तर काय केले असते
जिंकला असता तर काय केले असते ह्याबद्दलच्या त्याच्या विचारपद्धतीबद्दल आहे.
>>>>>
ते असे नंतर कोणी सांगत नाही ओ..
आणि गंमत ऐका - या मैदानाचा रेकॉर्ड असा आहे की टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेतलेला संघ इथे कधीच जिंकला नाही. त्यांनीही ढगाळ कंडीशन बघूनच तो निर्णय घेतला असणार पण ते सामना जिंकले नाही. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याबद्दल गिल साशंक असणे हे स्वाभाविक होते. पण टॉस जिंकलो असतो तर कदाचित गिलने देखील पहिली गोलंदाजीच घेतली असती. ते आपण सांगू शकत नाही. की तो आपल्याला खरे सांगणार नाही..
बाकी काय निवडावे हा निर्णय घ्यायची वेळ गिल आणि गंभीर वर एकदाही आली नसल्याने त्यांच्यावर ठपका ठेवणे पटत नाही इतकेच.
"ऋषभ पंतने फक्त २५ वनडे डाव
गावस्करशी सहमत
-------
"ऋषभ पंतने फक्त २५ वनडे डाव खेळलेत आणि त्यात त्याने पाच वेळा ७० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तरीही त्याला वनडे संघात का घेत नाहीत, हे मला कळत नाही. बेन स्टोक्स आणि ऋषभ पंतसारख्या खेळाडूंना फक्त आकडेवारीवरून न्यायलं जाऊ नये, त्यांच्या खेळाचा प्रभाव महत्त्वाचा असतो."
– सुनील गावसकर
ऋषभ पंतला आज रनर द्यायला हवा
ऋषभ पंतला आज रनर द्यायला हवा होता.
कसोटीत जर एखादा खेळाडू स्कॅन करून आपली इन्ज्युरी खरी आहे हे सिद्ध करत असेल तर रनर द्यायचा नियम हवा.
आयसीसीने यावर विचार करायला हवा.
ते असे नंतर कोणी सांगत नाही ओ
ते असे नंतर कोणी सांगत नाही ओ.. >> स्पीक फॉर युअरसेल्फ. गिल आत्तापर्यंत ओपनली बोलत आला आहे.
केले काय असते टॉस जिंकल्यावर
केले काय असते टॉस जिंकल्यावर हा प्रश्न आहे.
त्याचे उत्तर टॉस जिंकल्यावरच मिळाले असते.
बाकी वर जे म्हटले टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेतलेला संघ इथे आजवर कधीच जिंकला नाही त्यामुळे स्टोक्स ने घेतलेला निर्णय सुद्धा धाडसीच होता.
*त्यामुळे स्टोक्स ने घेतलेला
*त्यामुळे स्टोक्स ने घेतलेला निर्णय सुद्धा धाडसीच होता.* - तसं तर हा निर्णय धाडसी होता की वेडेपणाचा, ह्यांचंही उत्तर सामना जिंकल्या / हरल्यावरच मिळेल !!
निकालाला शेकडो फॅक्टर
निकालाला शेकडो फॅक्टर कारणीभूत असतात, त्यात टॉस हा एक. वेटेज दरवेळी कमी जास्त असते. पण पाच दिवसांची आणि दोन इनिंगची कसोटी टॉस हरल्यावर देखील प्रत्येकाला काही ना काही संधी देते..
आज आल्या आल्या दोन विकेट पडल्या तर लीड शंभरच्या आत रोखू आणि दुसऱ्या डावात लढायला पुरेसे टारगेट देऊ म्हणून आज पुन्हा नव्या दमाने सुरू व्हायचं.
काल रवी शास्त्री म्हणाला आहे,
जे ऋषभ पंतने संघासाठी केले ते जर तुम्हाला प्रेरणा देऊ शकत नसेल तर जगात कुठलीच गोष्ट तुम्हाला प्रेरणा देऊ शकत नाही..
Manjrekar: India batted in
Manjrekar: India batted in different bowling conditions from England
https://www.espncricinfo.com/cricket-videos/manjrekar-india-batted-in-di...
मांजरेकर समालोचन करत असताना
मांजरेकर समालोचन करत असताना कायम भारताच्या फलंदाजाना बाद करण्यासाठी प्रतिस्पर्धी गोलंदाजानी कशी गोलंदाजी करायला हवी आणि भारतीय गोलंदाजाना खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजानी कसे खेळायला हवे हे बर्याचदा बोलत असतो. काल शार्दूल फलंदाजी करीत असताना हे प्रकर्षाने जाणवले. किमान ७ ते ८ वेळा त्याने शार्दूल बाद करायचे असेल तर गोलंदाजानी ऑफस्टंपच्या बाहेर मारा ठेवायला हवा आणि शेवटी ठाकूर बाद झाल्यावर म्हणाला बघा मी म्हणलो होतो ना.
रोखठोक आहे संजय मांजरेकर.
रोखठोक आहे संजय मांजरेकर.
त्याचे जे काही मत आहे ते बिनधास्त मांडतो.
पण या नादात बरेचदा वाहवत जातो आणि हे विसरतो की आपल्याकडे असे चालत नाही.
वरच्या व्हिडिओत त्याने इंडियाला बॅक केले आहे.
पण हेच जर उलटे असते आणि भारताने चांगली फलंदाजी केल्यावर त्याने म्हटले असते की भारताला चांगल्या कंडीशनचा फायदा झाला तर त्याला लोकांनी ट्रॉल केले असते की याच्या काय पोटात दुखतेय वगैरे...
स्वतः तंत्रशुद्धतेसाठी ओळखला जात असला तरी ऋषभ पंतचे वारेमाप कौतुक करतो.
आज शेवटच्या ८-१० षटके फलंदाजी
जर इंग्रज आपल्या सारखे गडगडले नाही तर आज शेवटच्या ८-१० षटके फलंदाजी मिळणार आपल्याला असे दिसतेय एकंदरीत.
म्हणाला बघा मी म्हणलो होतो ना
म्हणाला बघा मी म्हणलो होतो ना
>>
ये बात किधर तो देखेला लगता है
ये बात किधर तो देखेला लगता है
ये बात किधर तो देखेला लगता है>>>
तज्ञ समालोचक आहे ओ तो!
“ ये बात किधर इधर ही तो
“ ये बात
किधरइधर ही तो देखेला लगता है”पिचचे वेदरमुळे बदलले स्वरुप
पिचचे वेदरमुळे बदलले स्वरुप बघता वेदर वगैरे गोष्टी फार फुटकळ धरायच्या नसतात हे परत उघड झालेय असे लिहून मी " मी म्हणलो होतो ना" म्हणू का ?
तुमचे भारतीय खेळाडू जेव्हडे
तुमचे भारतीय खेळाडू जेव्हडे रन्स बनवतात त्यापेक्षा जास्त कमेंट्स या धाग्यावर येतात. हे इंडियन्स बी रेडी फॉर ३-१
टी टाईम 75 लीड 6 विकेट हातात.
टी टाईम 75 लीड 6 विकेट हातात.
अडीच तास / 33 ओवर खेळ शिल्लक.
लीड 200 पार करून इंग्लंड आज थोडे तरी आपल्याला खेळायला लावू शकते.
रूट तोपर्यंत टिकला तर 200 च्या जवळ आला असेल.
शक्य तितके प्लान करून रन रोखायला हवे आता येत्या सेशनला..
<<<तुमचे भारतीय खेळाडू
<<<तुमचे भारतीय खेळाडू जेव्हडे रन्स बनवतात त्यापेक्षा जास्त कमेंट्स या धाग्यावर येतात. हे इंडियन्स बी रेडी फॉर ३-१>>>
एकूण भारत हरला की तुम्हाला आणंदाच्या उकळ्या फुटतात.
जर्मन भाषेत त्याला एक शब्द आहे - schadenfreude
असो. व्यक्ति तितक्या प्रकृति.
*जर्मन भाषेत त्याला एक शब्द
*जर्मन भाषेत त्याला एक शब्द आहे -* - मराठीत पण एक आहे - ' विघ्नसंतोषी ' !
लोकहो, बोकलत मजा करतात.
लोकहो, बोकलत मजा करतात.
त्यांच्यासाठी असे शब्द वापरू नका.
त्यांच्यासाठी असे शब्द वापरू
त्यांच्यासाठी असे शब्द वापरू नका.
>>
तूच का तो??
स्टोक्सच्या कॉल्सना इंग्लिश
स्टोक्सच्या कॉल्सना इंग्लिश टीम जितक्या वेळा यशस्वीपणे रिस्पाँड करते ते कौतुकास्पद आहे. पहिल्या टेस्टनंतर असामीने “ही टीम गिलची टीम व्हायला सुरूवात व्हावी“ अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यात बहुदा त्याला हे अपेक्षित असावं. (तोच सांगू शकेल).
बाकी इंग्लंड बेकार फोडतंय
बाकी इंग्लंड बेकार फोडतंय
सुंदरला च त्यातल्या त्यात कमी मार बसलाय
कुलदीप हवा होता यार...
पहिल्या टेस्टनंतर असामीने “ही
पहिल्या टेस्टनंतर असामीने “ही टीम गिलची टीम व्हायला सुरूवात व्हावी“ अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यात बहुदा त्याला हे अपेक्षित असावं. >> हो काहिसे तसच. इंग्लंड टीम बाबत सिलेक्टर, कप्तान नि कोच ह्यांच्यामधे अॅप्रोचमधे एकवाक्यता आहे. आपण बरेचदा डीसजॉईंटेड असतो नि स्टान्स सतत बदलता असतो. आगरकर आल्यानंतर सिलेक्शन बर्यापैकी स्ट्रीमलाईन झाले आहे काही अपवाद वगळता. त्यात पुढे जाऊन , जशी धोनी ची टीम , कोहलीची टीम , रोहित ची टीम झाली होती - त्या त्या कप्तानाची छाप त्या टीमवर असायची - फॉर बेटर ऑर वर्स - धोनीच्या वेळी डीफेंसीव्ह अॅप्रोच नि सामना शेवटपर्यंत नेत राहायचा. कोहलीच्या वेळी फिटनेस नि फास्ट बॉलिंग वर भाग, रोहितच्या वेळी रीलॅक्स नि आक्रमक अॅप्रोअच टाईप्स. गिलची छाप तशीच पडावी अशी आशा ! पहिल्या तीन सामन्यांमधे तरी बॅटींग एक जिद्द दाखवून खेळली आहे. ( लोअर ऑर्डर कोलॅप्स नि काही वेळा बोनहेडेड डिसमिसल वगळता) कदाचित तो गिल चा प्रभाव असावा का ?
' काय घडतंय त्यावर बारीक
*गिलची छाप तशीच पडावी अशी आशा ! * -
' काय घडतंय त्यावर बारीक लक्ष ठेवणारा ' व ' कांहीतरी घडवायला उत्सुक असणारा ' असे मी सर्वसाधारणपणे कर्णधारांचे दोन गट पाडतो. गिल लवकरात लवकर पहील्या गटातून दुसऱ्या गटात यावा, अशी अपेक्षा आहे !!
“ गिल लवकरात लवकर पहील्या
“ गिल लवकरात लवकर पहील्या गटातून दुसऱ्या गटात यावा, अशी अपेक्षा आहे” - +१
गिल (का माहित नाही), आक्रमक कॅप्टन असेल असं वाटलं होतं. पण आश्चर्यकारकरित्या तो बराच डिफेन्सिव्ह आहे. प्रतिस्पर्ध्याने चूक करायची वाट बघतो. (हे करायचं असेल तर फार स्ट्राँग बॅटिंग असायला हवी). हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे.
भारत हा सामना जिंकायची शक्यता
भारत हा सामना जिंकायची शक्यता कमीच वाटते,
जबरदस्त फलंसाजी करून शावांचा डाँगर उभारायचा नि पाचव्या दिवसाच्या शेवटपर्यंत खेळायचे नि सामना अनिर्णित ठेवायचा हे शक्ता अहे - पण पंत नाही नि गिल गेल्या दोन तीन डावात काहीच करू शकला नाही.
मॉर्केलची मुलाखत वाचल्यावर
मॉर्केलची मुलाखत वाचल्यावर थिंक टँक कडे फारशी उत्तरं नसावी असं निराशाजनक चित्र उभं रहातंय. तसं असेल, तर भारतीय चाहत्यांनी ‘अब के सावन‘ आणि ‘ओ पालनहारे‘ आळवायला घ्यावे.
पाचपैकी चार टेस्ट्स झाल्यावरही जर थिंक टँकला आपला प्रिमियम स्पिनर कसा खेळवावा हे “ट्रायिंग अवर बेस्ट“ फेज मधे असेल तर अवघड आहे.
*आपला प्रिमियम स्पिनर कसा
*आपला प्रिमियम स्पिनर कसा खेळवावा हे “ट्रायिंग अवर बेस्ट“ फेज मधे असेल तर अवघड आहे * -
व एक प्रेक्षक म्हणून ( तज्ञ नव्हे ) मला असंही वाटलं - जे स्पिनर संघात आहेत, त्यांचाही खुबीने वापर करायची कल्पकताही दिसली नाही. काल इतक्या सहजतेने इंग्लिश फलंदाज आपली फास्ट गोलंदाजी झोडत होते, तेंव्हा निदान जडेजा, सुंदर यांचा एका बाजूने अधुन मधून वापर करून पाहणं योग्य ठरलं असतं. त्यांना खूप उशीरा आणलं व चार पैकी तीन विकेट त्यांनाच मिळाल्या ! ( अजित वाडेकरच्या संघात चांगले फास्ट गोलंदाज नव्हते. त्याने तिसऱ्या ओव्हारपासून दोन्ही बाजूंनी फिरकीचा खुबीने वापर व आक्रमक फिल्डींग लावून इंग्लंडमध्येच विजय मिळवला होता ! )
केवळ टीका म्हणून नाही, तर काल मला तीव्रतेने हे सतत जाणवत होतं म्हणून लिहिलं, हेही नम्रपणे नमूद करतो.
Pages