पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीम्स मध्ये नुसताच hi असा मेसेज टाकणारे लोक. अरे काय काम आहे ते एका वाक्यात लिहा की म्हणजे प्रायॉरिटाइझ करता येईल.
Hi
Hi
(पाच मिनिटांनी) do u have a minute?
(अरे मुद्द्यावर ये की) yes
(आणखी पाच मिनिटांनी) (काहीतरी फुसकं काम)
त्यातही काही दिव्य लोक आपणच मेसेज केला आहे हे विसरून जाऊन दहा मिनिटांनी येऊन आपला hi पाहून उत्तरादाखल पुन्हा hi टाकतात.
Teams हाच इन जनरल एक मोठ्ठा वैताग आहे.

टीम्स मध्ये नुसताच hi असा मेसेज टाकणारे लोक.
अश्या लोकांसाठी मी टिमवर status message ठेवला होता की "Please Don't Just Say Hello In Chat" फार उपयोग झाला याचा..!!

असं का होतं ते माझ्या अनुभवावरून सांगतो.
हाय म्हणून धाडकन प्रश्न एकादमात विचारून टाकणं हे मला ही अनेकदा मॅनरलेस वाटतं. थ्री वे नाही तरी किमान टू वे हँडशेक झाला की आपला प्रश्न/ बडबड करावी त्यापूर्वी किमान नव्या व्यक्तीशी तरी बोलू नये अशी भीड मला बरेचदा वाटते.
मी हाय म्हणून त्या व्यक्तीने प्रतिसाद देई पर्यंत, काय काम आहे ते मी विसरून जाऊ शकतो, त्या कामाचे उत्तर मिळालेले असू शकते, मी तेव्हा दूर असू शकतो... किंवा ते चॅट खाली गेल्याने दुर्लक्षित होऊ शकते. इ. इ
ते लक्षात आल्यावर विसरलो असेन तर मी तसे लिहून टाकतो. पण कुणी पार विसरून जात असेल.
असं कोणी केलं तर मला काही वाटत नाही, उलट वेळ फुकट जाणार असेल तर तो वाचला असेच वाटते. सुंवाखोगे वगैरे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे

प्रत्यक्षात समोरासमोर भेटल्यावर व्हॉट्स अप चं ज्ञान स्वतःचं असं भासवून सांगणारे लोक भेटले कि काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. यातल्या अनेक गोष्टींचं खंडन झालेलं असतं. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. शाळेचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ओळखीचे काका काकू यांना दुखावणे जिवावर येते.

फटाफट गुगल करून लिंका देणारे वीर. कधी कधी त्या लिंकवर काय आहे हे वाचतही नाहीत. अर्धवट वाचून सर्च स्ट्रींगने मिळालेल्या पेजवर जेव्हढ्या लिंका आलेल्या असतीअ तेव्हढ्या देत राहतात. जणू काही एव्हढा अभ्यास आहे यांचा असे दाखवण्याचा प्रयत्न असतो.

होक्स, कंट्रोवर्सी किंवा सायंटिफिक आवरण देऊन गावगप्पा हाणणारे लोक.

आपण ज्या वातावरणातून आलोत ते सोडून अन्य प्रकारच्या लोकांबद्दल त्यांचा निर्वंश झाला पाहीजे, त्यांना गोळ्या घातल्या पाहीजेत, कडक शिक्षा केल्या पाहीजेत अशी अत्यंत इनसेन्सिटिव्ह आणि क्रूर मतं मांडणारे लोक.

यांच्याशी कसं डील करावं हे कळत नाही.

रानभुली भावना पोचल्या. दुर्लक्ष हाच उत्तम उपाय. विहिरीतले बेडुक प्रकार चे जग होऊन बसते काही लोकांचे. दुसरी मतं खपत नाहीत.
जसं की समलैगिक संबंध, घटस्फोटीता चे पुनर्लग्न वगैरे..

मायबोलीवरचे आपलेच प्रासंगिक धागे दर वर्षी ते ते दिवस आले की वर काढणे.

या ना त्या निमित्ताने आपल्याच धाग्यांच्या रिक्षा फिरवणे आणि ते वर काढणे.

याला आत्ममुग्धता self obesession म्हणावं का?.

भरत +१
हे सहज स्वाभाविक पद्धतीने (ऑरगॅनिक) न होता ठरवून आणि वारंवार होताना दिसलं की, खरंतर उगाचच, पण चिडचिड होतेच. असे आयडी इतर चर्चांत सहभागी होत नसतील, इथला एकूण अनुभव वृध्दिंगत व्हावा अशा मानसिकतेचा त्यांचा वावर नसेल तर हे जास्त होतं का असं वाटतं. कारण आपले धागे वर रहावे असं इथल्या प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात वाटतंच. पण मला काहीच आयडींच्या बाबत असं का वाटतं ह्याचं थोडं विश्लेषण केलं तर हे कारण असेल वाटलं.
+ सेन्स ऑफ ह्युमर चा अभाव + आत्ममुग्धता+ आत्मप्रतिवाद. Lol

हा आत्मू डांबिस आहे. हा जोक न करणे हा फाऊल आहे. Proud
हा विनोद करता यावा म्हणून ही पोस्ट लिहिलेली नाही.
खरंच! Proud

या विषयावर न बोललेलं बरं.
आपला तो बाब्या अशी गत आहे. Proud

ही माझी पेट पीव्ह आहे.
https://www.maayboli.com/node/28431?page=6#comment-5141572
एका धाग्यावर शब्दार्थ लिहीला आहे. पण तिकडे फारसं कुणी फिरकत नाही.

विमानप्रवासातल्या पेट पिव्हस्ज बाबत यापुर्वी लिहीले आहे. (विमान उतरून थांबले की लगेच कसे लोकं उठून आपल्या बॅगा घेऊन उभे रहातात, जरी त्यानंतर १० मि. नंतर विमान ब्रीजला लागणार असते तरी...)
अजून एक गोष्ट जाणवली म्हणजे बर्‍याच वेळा हवाईसुंदरी जेव्हा खायच्या गोष्टी वाटत असते तेव्हा काही सिट्स पाशी खूप वेळ थांबते. अश्या रो मध्ये बर्‍याच वेळा डिमांडींग कस्टमर खूप असतात. दोन दोन दा पाणी मागतात, मेनू फुल काय तो विचारून घेतात. अर्धा तासात हवाईसुंदरींना त्यांच्या १० ते १२ रो मधल्या सर्वांना खाणे द्यायचे असते पण त्यातले १०-१२ मि. एक-दोन रो खाऊन टाकतात. मग ती हवाई सुंदरी उरलेल्यांना फास्ट वाटप करते. खरं म्हणजे पटकन सर्वांना त्यांनी जे बुक केले ते वाटून तिला नंतर डिमांडीग कस्टमर कडे जायला हवे पण तसे ह्या करत नाहीत. बर्‍याच वेळा शेवटच्या रो कडली लोकं ही केव्हा आपल्याकडे येते याची वाट पहात बसतात. मला तर एकदा अगदी लॅडींग घोषणेच्या एक मिनीट आधी खाणे मिळाले होते. पण ती घोषणा झाल्याने चहा दिला गेला नाही. नंतर पटकन खाऊन घ्या अशी विनंतीही झाली होती. मी त्या बयेला तू आधी फार टाईमपास केलास असे सुनावले होते. माझ्या बाजूच्या दोन-तीन जणांनीही तिला मग सुनावले. ही गोष्ट फार डोक्यात जाते.

>>जरी त्यानंतर १० मि. नंतर विमान ब्रीजला लागणार असते तरी<<
विमान टॅक्सिइंग करताना सिटबेल्ट साइन ऑन असल्याने सगळ्यांनी (इन्क्लुडिंग क्रु मेंबर्स) सिटवर, बेल्ट लावुन बसणं कंपल्सरी आहे. शायद इंडियामे सब चलता है...

विमान टॅक्सिइंग करताना सिटबेल्ट साइन ऑन असल्याने सगळ्यांनी (इन्क्लुडिंग क्रु मेंबर्स) सिटवर, बेल्ट लावुन बसणं कंपल्सरी आहे
>>>>
१०० दा ही सूचना दिली जाते पण लोकांना बहुतेक सुप्रीम कोर्टात साक्ष द्यायला जायचं असतं त्यामुळे प्रचंड घाईत असतात. विमान लॅन्ड करताना उठून सामान काढत नाहीत हे आपलं नशीब समजावं.

हो हे तर नेहमीचच आहे.
कुठल्याही सुविधेचा गैरफायदा घेण्यात भारतीय एकदम आघाडीवर आहेत.

ज्येनानां इंग्लिश येत असलं तरी एकंदर वातावरणात बुजून जायला होतं किंवा कुठून कुठे जायचे हे समजत नाही म्हणून एकटे जात असतील तर मुलंच व्हीलचेअर बुक करतात आणि मग खरंच गरजू लोकांना मिळत नाही. या कॅटेगरीतल्या लोकांसाठी थोडे अधिक पैसे भरून असिस्टंट वगैरे सुविधा करून दिली पाहिजे. अर्थात पैसे भरण्याची तयारी किती लोक दाखवतील हा ही मुद्दा आहे.

अलीकडे डोमेस्टीकसाठी बुकिंग असलं तरी एअर लाईनचे कर्मचारी ऑन द स्पॉट एक फॉर्म भरून घेतात. त्यात व्हीलचेअरची नेमकी का गरज आहे त्याच्यावर टीक करायचं असतं. माझ्या साबांना सीव्हीअर आर्थ्रायटिस आहे तरी कधी कधी मिळायची नाही व्हीलचेअर. कारण ऑलरेडी बुक्ड असायच्या. अर्थात त्यांना चालताना बघून एअर लाईन स्टाफला समजायचे मग ते दुसऱ्याकडून मागवून देण्याचा प्रयत्न करायचे पण कधी कधी त्यांचाही नाईलाज असायचा.
यावेळी मात्र फॉर्म भरून दिल्यावर मिळाली.

मला तर एअर होस्टेसला हवाई सुंदरी म्हणणं विचित्र वाटतं. का म्हणून जबरदस्ती कुणालाही सुंदरी म्हणायचं? बरं होस्ट पुरुष असेल तर त्याला काही हवाई सुंदर किंवा हवाई देखणा, हवाई मदनाचा पुतळा वगैरे म्हणत नाहीत. मग स्त्रियांवर का बरे हा अन्याय!

आमच्याकडे विमानाचा शोध पुराणकाळातील असला तरी भाषेवर त्याचा ढिम्म फरक पडला नाही. Lol हवाई यजमान चालत असेल तर बघ. किंवा लेबर डिसप्युट वगैरे असेल तर हवाई कर्मचारी... पार जमिनीवरच आणलं एका शब्दात.

व्हिलचेअरची गरज सगळ्यांनाच नसते पण एकएकटे प्रवास करणारे ज्येना ज्यांना इंग्लिश समजत नसेल, ह्या टर्मिनलवरुन त्या टर्मिनलवर धावपळ करायला जमणार नसेल तर व्हिलचेअरची सोय बरी असं वाटून घेत असतील. हातीपायी धडधाकट ज्येनांकरता दुसरा काहीतरी उपाय असायला हवा. असिस्टंटसारखा. जेणेकरुन व्हिलचेअरचा दुरुपयोग होणार नाही.

व्हील चेअर वर बसून इंग्रजी समजत असेल तर शाळाशाळात चाकाच्या खुर्च्यांचा प्रसार झाला पाहिजे. Lol
टर्मिनल समजत नसेल, इकडून तिकडे कसं जायचं याची अक्कल नसेल तर विचारा. त्याचीही लाज वाटत असेल तरी घरी बसा. व्हील चेअर फक्त विमानातून बाहेर काढायला ठेवावी. ती सुविधा मोफत ठेवू नये. आणि पैसे आयत्यावेळी द्यायला सांगावे. प्रवास करणारे प्रिव्हलेज्ड देसी ज्येना!

तुला कळलं नाही मला काय म्हणायचं आहे ते. पण असो.
पैसे लावायला हरकत नाहीच. नव्हे लावावेतच.

घरी कशाला बसवा? मी तर म्हणते हवी ती भाषा बोलणारे असिस्टंट ठेवा. अगदी फ्रंट डेस्कपासून विमानात चढेपर्यंत आणि उतरल्यावर पर्सनली एस्कॉर्ट करा आणि पैसे घ्या. भारतात डेमोग्राफीचा असाही डिव्हिडंड घ्या म्हणाव.

व्हीलचेअरचेही पैसे लावा आणि संख्या वाढवा.

कळलं कळलं. पण ... Lol

हवी ती भाषा बोलणारे ठेवलेत की ते शुद्ध बोलत नाहीत म्हणून माबोवरचे रडतराव पिव्हळातील. किंवा विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून काढा, फक्त पुण्यामुंबईची ब्राह्मणी मराठी चालणार नाही, करत निवडणुका लढवतील. Lol
पैसे लावा आणि ते भरायला आधारकार्ड लिंक करायला लावून त्याचे किमान चार ओटीपी पाठवा. अर्ध्या समस्या सुटतील Wink

Pages