लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
हो ना आशु कुणीकडून तिथे
हो ना आशु कुणीकडून तिथे तब्येतीबद्दल कळवलं आणि लोकांना सावध केलं असं झालं मला.
आणि हो चांगली माहिती न शेयर करणारे कोते लोक मला पण आवडत नाहीत.
उबो च्या आयडीया तुफानी आहेत.
उबो च्या आयडीया तुफानी आहेत.
बाकी "आपल ठेवायच झाकुन आणी दुसर्याच पाहायच वाकुन" याचे खुपच अनुभव आलेत.
उबो, गंमत म्हणून ठीक. पण हे
उबो, गंमत म्हणून ठीक. पण हे डेंजरस आहे.
इतर विषयात ठीक आहे.
गंमत अशी की ज्या कुणाला (घरी,
गंमत अशी की ज्या कुणाला (घरी, नातेवाईक) लक्षण ऐकुन पाहुन आपण स्वतः योग्य त्या डॉककडे नेऊन, टेस्ट करवुन डॉकने सांगितलेली औषधे आणुन ती कशी घ्यायची आणि इतर जे काही करायला सांगितले ते समजावून सांगतो, ते लोक आपल्याला काही झालं तर मात्र भलते सलते, सल्ले देतात, सकाळी आधी दोन ग्लास कोमट पाणी पी, पाणी कधीही उभ्याने पिऊ नये बसूनच प्यावं, सकाळी उठुन जिलेबी खा, अमुक आणि तमुक एकत्र करून लाव, बेंबीला एरंडेल तेल लावुन छान चोळायचं...
वरून पुस्तकं वाचून, कुणाकुणाला फोन करून आणखी सल्ले पुरवतात.
बाहेरगावच्या नातेवाईकांच्या घराजवळ एक तरी परफेक्ट डेंटिस असतो तो अज्जिबाsत कळु न देता दाढ काढतो, रूट कॅनल करतो आणि ते ही आपल्याकडच्या मूर्ख डेंटिस्टच्या अर्ध्या फीस मध्ये. एक होमिओपॅथी डॉक्टर असतो ज्याने ४००+ जाणारी शुगर आणि २००+ जाणारे बीपी कायमचे ठीक केलेले असते, कार्टीलेज पार डॅमेज झालेल्या आणि चार पावलं चालताना डोळ्यात पाणी येणाऱ्यांना पोटात औषध देऊन सहा महिन्यात ठीक करून वणीचा सप्तश्रृंगी गड चढवला व उतरवला असतो.
मानव
मानव
नुसतं ऐकून घ्यायचं सोडून लोक
नुसतं ऐकून घ्यायचं सोडून लोक म्हणत बसतात "अगं मग मला नाही का सांगायचयं ?" >>> खरंय. अश्या बोलण्याने चिडचिड होते.
पण, माझ्या मते, असे शब्द हे बऱ्याचदा ऑटोमॅटिक रिस्पॉन्स असतात. ते काही फार विचार करून बोललेले नसतात.
अ) बऱ्याच लोकांना अश्या वेळी नेमके काय बोलायचे हे माहित नसते, सवय नसते, अवघडल्यासारखे होते. नेमके काय सांत्वनपर बोलावे हे समजत नाही. तसे बोलने हि आपली जबाबदारी आहे याचा दबाव स्वतःवर काहींनी घेतलेला असू शकतो.
ब) अश्या प्रसंगात आपण मदत करणे हे कर्तव्य आहे अशी एक भावना असते. व करू शकलो नाही याची थोडीफार का होईना टोचणी मनाला लागू शकते.
क) या संभाषणाच्या दुसऱ्या बाजूचा अनुभव काहींना नसतो. त्यामुळे आपल्या कोणत्या बोलण्याने त्या व्यक्तीची चिडचिड होऊ शकेल हे त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे असे प्रकार होत असावेत.
त्यामुळे अश्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेऊ नये असे मला वाटते.
दुसरे एक उदाहरण. काही वेळेस घरातील जेष्ठ मंडळी घरात लहान मुलांना लागले खुपले तर लगेचच त्या मुलांना किंवा त्यांच्या आईवडिलांना बोलतात. असे करून बऱ्याचदा ते नकळत स्वतःच्या मनातील अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात.
माबो वाचक अगदी बरोबर.
माबो वाचक अगदी बरोबर.
काही गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. हा धागा अमानवीय मार्गाने चालला आहे. धागा आहे म्हणून "काय बरं लिहू पेट पीव्ह?" असं वाटतं.
बोकलतांचं लक्ष गेलं नाही का? धमाल पेट पीव्हज येतील मग.
मानव खूप हसले तुमच्या कमेन्ट
मानव खूप हसले तुमच्या कमेन्ट वाचून.
एले जाऊ द्या हो इतकं कुठे मनावर घेता? लोकांचं मन मोकळं होतं तेव्हढंच.
माबो वाचक, आपण त्रस्त असताना इतका सुज्ञ विचार करण्याची ताकद नसते आपल्यात काही वेळेला.
एखादी चांगली गोष्ट
एखादी चांगली गोष्ट मैत्रिणींना सांगावी आणि त्याचा फायदा त्यांना ही होऊ द्यावा ह्यात इतकं अवघड काय आहे?>>> aashu29 यांचा हा पेट पिव्ह आणि दक्षिणा यांचा पेट पिव्ह परस्पर विरोधी वर्तनाची अपेक्षा करणारं नाही आहे का? कारण ईथे एखाद्याने स्वतःहून सांगितले तरी, 'अरे पण तुला विचारलं कुणी?' असा विचार करणारे देखील असतातचं ना?? आणि जर तुम्हाला मी जशी माहीती घेतोय तुमच्या कडून तशी हवीय तर तुम्ही ही योग्य प्रमाणात उत्सुकता दाखवा शा प्रश्न विचारण्यात...असा कल असेल तर त्यात वावगं काय??
दक्षिणा मनावर नाही घेत.
दक्षिणा मनावर नाही घेत.
काही वर्षांपूर्वी आमच्या शाळेत वर्तमानपत्रातलं सदर लिहून आणायला सांगायचे. प्रार्थना संपली कि कुणालाही उभे करून वाचायला सांगत. त्या वेळी केसरी कि सकाळ मधे "काय खटकले?" असं सदर चालू होतं.
त्यात एका बाईने लिहिले होते (नक्की साठीच्या पुढे असणार) " आज काल बायका गाऊन मधे रस्त्यावर येतात. भाजीला येतात. दळण आणायला सुद्धा येतात. गाऊन कधी वापरतात एव्हढे सुद्धा डोके यांना देवाने दिलेले नाही. हे खूप खटकतं"
त्या वेळी असं ज्ञान देणारे भारी वाटायचे. "अरे बापरे! आपल्याला माहीतच नव्हतं हे." आम्हाला एकच गाऊन माहीत असायचा जो नेसून मुलीचा बापू चिरूट ओढत पाठमोरा उभा असायचा. त्याचे तोंड जिकडे असेल तिथून धूर यायचा.
" मालिनी तुम उस लफंगे के साथ गुलछर्रे उडा रही थी, और मुझे पता भी नही आज से इस घर के दरवाजे तुम्हारे लिए हमेशा हमेशा के लिए बंद हो गए"
मुलगी हंबरडा फोडायची " बापू मै आपकी बेटी हूं. अक्का बापू से बोलो ना"
तो हंबरडा ऐकूनही पाठमोरा रहायचा तो गाऊन.
मी ते लिहून घेतलं होतं आणि माझाच नंबर लागला. वाचून दाखवल्यावर मुजूमदार सरांनी जाहीर कान पिळला होता.
हा धागा वाचून त्याचीच आठवण होते.
त्या सदराबद्दल अजून किस्से आहेत. नंतर.
तर तुम्ही डबा द्याल का असं
तर तुम्ही डबा द्याल का असं गोड आवाजात विचारायचे. >> असा फोन मला एका दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी एका लांबच्या नणंदे कडून आला. नातं लांबच होतं पण तरी तिने गरजेला फोन केला म्हणून मला खूप बरं वाटलं. तिचे वडील हॉस्पिटल मधे होते. ते माझ्या नवऱ्याचे लांब लांबचे काका.
मी त्यांना चालेल असा डबा करून पाठवला. दुसऱ्या दिवशी अजून काय हवं ते बघायला स्वतःच गेले.
तेव्हा तिच्याशी बोलतांना कळलं पहिला फोन तिने तिच्या जवळच्या एका नातेवाईक बाईंना केला होता. त्यांनी परस्पर त्यांना वेळ नाही पण शर्मिला रिकामीच असते तिला सांग असं सांगून तिला माझ्याकडून डबा मागवायला सांगितला होता.
तेव्हा प्रचंडच राग आला. तिचा नाही. त्या मधल्या नातेवाईक बाईंचा. नंतर पण त्यांच्या बोलण्यात कधीही तो उल्लेख पण आला नाही.
फा वि द डी सिंपल आहे ना.
फा वि द डी सिंपल आहे ना. वेळप्रसंगी आपले पीव्हज बदलतात.
थोडक्यात मन:स्थिती वर सर्व काही अवलंबून असते.
कमाल आहे शर्मिला काय एकेक
कमाल आहे शर्मिला
काय एकेक लोक असतात!
असे प्रसंग माझ्यावर आलेले मला
असे प्रसंग माझ्यावर आलेले मला फार आवडतात. नंतर गप्पा मारताना काहीतरी विषय मिळतो.
आम्ही डॉक्टरकडे अगदी जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होईलसं वाटलं तरच जायचा विचार सुरू करतो. भारतात फोन झाला आणि मुलाना ताप आहे दोन दिवस शाळेत गेली नाही विषय निघाला की हमखास डॉक्टरकडे जाऊन आलात का औषधे वेळेवर घ्या... असा संवाद होतोच होतो. त्यावर 'हो हो', औषधे चालू आहेत असंच उत्तर देतो. ते लोक प्रेमाने विचारत असतात, शिवाय भारताची संस्कृती वेगळी आहे. तिकडे लोक सारखे डॉक्टरकडे जातात, त्यांना मी शिकवायला जात नाही. ते मला शिकवू लागले तर माझा हो ला हो बाणा! आईबाबाना कळून चुकले आहे की मी डॉक्टरकडे गरज असेल तर जाणार आणि गरज आहे का नाही आम्हीच ठरवणार, त्यामुळे ते बोलत नाहीत. पण बाकी लोक काळजीपोटीच विचारपूस करत असतात. तुम्हाला त्रास द्यायला कशाला कोण मदतीचा हात पुढे करेल? मदत नको असेल तर तो हात जमेल तसा थोपटावा, भापो आहे ते कन्वें करावं आणि आपले आपण बघावं.
इथे कोणी मदत देऊ केली तर मी हक्काने घेतो, आणि ते करतातही. मी ही मदत कायम ऑफर करतो. न विचारता ही ऑफर करतो. मदत ऑफरच करायची नाही की कसली माणुसकी?
इथे आमच्या परिचयाच्या काकू आहेत, त्या काही झालं की स्वामी समर्थ ते आयुर्वेद ते जेवण पाठवते ते झाडं कुंड्या काय काय सांगत देत असतात. कधीकधी अती होतं पण त्या बिचाऱ्या प्रेमाने विचारत करत असतात. तोच त्यांचा विरंगुळा आहे. आपण हो म्हणावं. शिकवायला जाऊ नये.
>>>>परस्पर
>>>>परस्पर
आयजीच्या जीवावर बायजी उदार.
मदत ऑफरच करायची नाही की कसली
मदत ऑफरच करायची नाही की कसली माणुसकी? >>> कदाचित हे त्यांचं डिफेन्स मेकॅनिझमही असू शकते ना? म्हणजे आधी कुणाला तरी मदत ऑफर केली असावी आणि त्यांनी त्याचा गैर अर्थ काढला असावा, अथवा पाली सारखं झटकलं असावं, अथवा त्याचं तमच्या मदत ऑफर करण्या विषयीच विषयीचं मत तुम्हाला दुसऱ्या कुणाकडून तरी समजलं असावं...म्हणजे अशा प्रसंगांतून गेल्यावर एखाद्याची 'उगीच हात दाखवून अवलक्षण कशाला' अशी एखाद्याची भावना झाली तर त्याला 'माणुसकीच नाही' असं लेबल का लावावं नाही का?
पेट पीव्हज, काकाफॉ, काही
पेट पीव्हज, काकाफॉ, काही वाहते धागे यामुळे मायबोलीकर वेगाने पुणेकर होऊ लागले आहेत. जगात अन्य कुणाला काही समजत नसल्याने ते जे आपल्याशी वागतात त्यात शंभर टक्के चुकीचे काही तरी असतंच. ते इथे येऊन डिस्कस केलं कि स्मशानभूमीत बसून चर्चा केल्याचं समाधान मिळते.
जर या अज्ञ लोकांशी सौहार्दपूर्ण डील करण्याची वेळ आलीच तर १५ दिवसांचा मायबोली इफेक्ट रिहर्सल प्रोग्राम (डिटॉक्सिफिकेशन) सुरू व्हावा. (त्याचा वृत्तांत लिहून कृतांत करून सोडू नये).
^^^आयजीच्या जीवावर बायजी उदार
^^^आयजीच्या जीवावर बायजी उदार.^^
मला या म्हणीचा पुढचा भाग फार आवडतो..
" सासऱ्याच्या घरात जावई सुभेदार "
>>>>" सासऱ्याच्या घरात जावई
>>>>" सासऱ्याच्या घरात जावई सुभेदार "
अरेच्या हा भाग माहीत नव्हता.
असं लेबल का लावावं नाही का? >
असं लेबल का लावावं नाही का? >> नाही, लेबल नाहीच लावते. पण पूर्वग्रहाचा बेनिफिट ऑफ डाऊट वजा करता मदत ऑफर न करणे हे माणुसकी नसण्याचे लक्षण आहे यावर एकमत होत आहे म्हणायचं का?
>>>" सासऱ्याच्या घरात जावई
>>>" सासऱ्याच्या घरात जावई सुभेदार "
अरेच्या हा भाग माहीत नव्हता.>> मला पण माहित नव्हता.
मदत गोष्टीवर माझे 2 आणे,
मदत गोष्टीवर माझे 2 आणे,
भवती भवती बोलून , "मी मदत करू का?" असे आपल्याकडून वदवून घेणाऱ्या लोकांची एक कॅटेगरी आहे.
म्हणजे , समजा लग्नाला जायचं आहे,
तर यांचा फोन येतो, कितीला जाणार? कुठल्या रस्त्याने जाणार, कोण कोण येणार आहे.. इतके झाल्यावर आपण विचारतो मग, तुम्हाला वाटेत पीक करू का?
आता तुम्ही विचारल्यावर , ते controlling पोझिशन मध्ये येतात,
"आम्हीं ना किंचित उशीरा निघणार होतो,"
"आम्ही दोघे आहोत, तु मोठी गाडी घेऊन येशील का? "
"आपण पहिल्या पंगतीला जेऊन लगेच निघूया हा,"
आणि आपण मदत ऑफर केली असल्याने (बऱ्याचदा) adjust करत बसतो.
So the policy is, if you want my help, ASK,
Reading between the lines, guess work, hint घेणे वगैरे खेळ मी खेळणार नाही. सरळ विचारलेत तर माझा प्रोग्राम सांगितला जाईल, तुम्हाला पटला तर या, मी तुमच्या फार प्रेमात असेन तर काउंटर ऑफर देईन.
एक लेखक, फार फार वर्षांपूर्वी
एक लेखक, फार फार वर्षांपूर्वी म्हणजे साधारण २००५-१० दरम्यान मायबोलीवर एक रॉबिनहुड नावाचे आयडी होते. ते मायबोली करांवर विशेषतः मायबोली वरील त्यांच्या काही 'लाडक्या' बाबींवर वावरणाऱ्या मंडळींच्या वावरावर अशा विटी बट सार्कास्टिक टिप्पण्या करायचे.तुमची इथली लेटेस्ट पोस्ट पाहून त्यांची आणि त्या दिवसांची आठवण आली. ड्यु आयडी वगैरे आरोप नाही पण एक परंपरा पुनरुज्जीवित झाली हे खात्री ने म्हणावेसे वाटते.
पर्णीका, रॉबीनहुड यांनी नंतही
पर्णीका, रॉबीनहुड यांनी नंतही आयडी घेतले. त्यातला एक कुणाशीतरी वादविवाद करतांना भाषा घसरल्याने उडाला. त्यांना अक्षरश: भरीला पाडलं होतं. वाद अगदीच क्षुल्लक ( की शुल्लक?) कारणावरून होता.
आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक
आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक डॉक्टरांची जे लोक सतत रेकमंडेशन देत असतात त्यांना एकदा शहरांतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात रात्री १० नंतर बोलवायचे. आणि त्यांना एक खिळा मारलेला लिंबू भेट म्हणून गिफ्ट रॅप करून द्यायचा.
जर समजा मी बॅन्शीज ऑफ इनशेरीन हा चित्रपट लिहिला असता तर एक होमिओपॅथी डॉक्टरचे रेकमेंडेशन दिले म्हणून ब्रांडन ग्लिसन आपल्या मित्राशी मैत्री कायमस्वरूपी तोडतो आणि कापलेली बोटं एक त्या डॉक्टरला आणि एक आपल्या मित्राला धाडतो असाच लिहिला असता. काय साला वैताग असतो त्यांचा
एकमेकांना मदत करण्यात
एकमेकांना मदत करण्यात माणसांचा चांगुलपणा असतो हा एक फार मोठा गैरसमज इथे काही लोकांना झालेला आहे असं वाटतं.
भारतीयांच्या सर्व गोष्टींप्रमाणे या गोष्टीतही ट्रांजेक्शन्स असतात. आपण इतरांच्या उपयोगी पडलो तर ते पुढे कधीतरी आपल्याला तशीच मदतीची परतफेड करतील असा ट्रांजेक्शनल विचार मदत करताना केला जातो. लग्नामध्ये आहेर देताना अहेरच्या वह्या मेंटेन करणे आणि हे यांच्यात काही क्वॉलिटेटिव्ह डिफरन्स नाही. दिल्या घेतल्याचे हिशोब भारतीय फक्त लग्नाचा आहेर, कठीण प्रसंगी मदत अशा बाबतीतच पाळतात असे नव्हे तर आपल्या देवांशी सुद्धा असेच व्यवहार ते करतात.
आणि समजाच असा ट्रांजेक्शनल विचार जरी नसला तरी भारतीय अध्यात्म मनावर कर्म सिद्धांताचा खूप मोठा पगडा असतो आणि केल्याने चांगले आपल्या बद्दलही चांगलेच होईल अशी एक आध्यात्मिक धारणा देखील असते. म्हणजे एकूणच मदत करणे हे मल्टीलेयर्ड असते. आणि केलेल्या मदतीच्या नोंदी देखील नीट केलेल्या असतात. अगदीच खूपच मोठे वाजले नसेल तर परतफेडीची अपेक्षा कायम असते
एक पेट पिव्हज्स.. :
एक पेट पिव्हज्स.. :
विमानतळावरच्या बाथरूम मध्ये (पुरूषांच्या) एक कर्मचारी असतो. तो कायम येणार्या जाणार्यांना सलाम करून त्यांच्याकडून टीप मिळेल अशी अपेक्षा ठेवतो. आता १ मि. साठी वापरलेल्या गोष्टीसाठी तुम्ही टीप का म्हणून द्यायची ? मुळात तिथे टीप का बरे द्यावी? विमानतळाने प्रवासांच्या सोयीसाठी केलेली व्यवस्था आहे ती...
बंगलोर व मुंबईच्या विमानतळांवर ही असली माणसे दिसतात. चेहर्यावर एवढी लाचारी दाखवतात की ती लोकं फारच डोक्यात जातात. हल्ली त्या लोकांच्या नजरेला नजर द्यायचे टाळतो व मनस्ताप वाचवतो.
फा वि द डी >>> नाही माझा पेट
फा वि द डी >>> नाही माझा पेट पिव्ह विचारले असता देखिल सांगायचे नाही आणि गंमत बघत दुसर्यांकडून माहिती खोदायची असा आहे.
दक्षिणा ने चांगुलपणा ने माहिती शेयर केली त्याचा कीस पडला. असो.
आपण इतरांच्या उपयोगी पडलो तर
आपण इतरांच्या उपयोगी पडलो तर ते पुढे कधीतरी आपल्याला तशीच मदतीची परतफेड करतील असा ट्रांजेक्शनल विचार मदत करताना केला जातो. >>> रॉय, तसं असलं तर काय गैर आहे? आपण माणुस आहोत.. बर्याचदा आपल्या ला रस्त्या वर चालता ठेच लागली तर एखाद्या/एखादी ने येऊन विचारावं/हात द्यावा असं वागणं होतंच ना. विशेष करून कोणी ओळखीचं बाजूने जात असलं तर..
Pages