लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
योगी ९ ० ० हो तुमचा पेट
योगी ९ ० ० हो तुमचा पेट पिव्ह सुद्धा मनापासून पटला .
आता १ मि. साठी वापरलेल्या गोष्टीसाठी तुम्ही टीप का म्हणून द्यायची ? >> हे तर इतकं खरं आहे .
माझ्याकडे कोणतीही गोष्ट पोष्टाने येत नाही . आलंच तरी ते खालच्या खाली बॉक्स मध्ये टाकले जाते. माझा पासपोर्ट आला तेव्हा मी घरी नव्हते, त्यामुळे मला पोस्टातून बोलावणे आले , तिथे गेल्यावर मला पोस्टमन बाजूला घेऊन गेला आणि मग पासपोर्ट दिला . आणि म्हटला इतकं महत्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला सही सलामत दिले , काहीतरी बक्षीस द्या . ती पहिली वेळ होती . मी दिले पण त्यानंतर , कधीही एकही डॉक्युमेंट पोस्टाने न येऊनही हा माणूस दिवाळी मागायला नियमित दारात. आता कशाबद्दल दिवाळी द्यायची?
२ ० २ ४ च्या दिवाळीच्या वेळेला तो येऊन गेला मी बाहेर गेले होते . अगदी दोन तीन दिवसातच पुन्हा मी बाहेरून सोसायटीत शिरताना दिसले तर मला म्हटला "काय म्हटलं ताई , येऊ का आता जरा भेट घ्यायला ? मी म्हटलं कसली भेट ? ? "दिवाळी" अगदी हसत म्हटला . .. मी पण फक्त हसले आणि निघून आले तरीही तो दारात आलाच .
२ ० २ ५ च्या दिवाळीत मात्र तो एक दिवाळी अंक द्यायला आला, मी घेतला आणि दरवाजा उघडच ठेवून सरळ बेडरूम मध्ये निघून गेले . सुदैवाने मैत्रीण बसली होती तिला त्याने मी कुठे गेले विचारलं तर ती म्हटली वॉशरूम ला गेली आहे ती बहुतेक . मग तो निघून गेला .
मला तो इतका चांगला वाटायचा , निव्वळ या एका गोष्टीमुळे मनातून उतरला .
मी काही दिवसांसाठी भारतात आलो
मी काही दिवसांसाठी भारतात आलो आहे आणि माझे कान आठवड्याभरातच एवढे किटून गेले आहेत. भारतात एक घर घेत आहे बॅकअप म्हणून परंतु " गाडीवाला आया घरसे कचरा निकाल " हे गाणे आयुष्यभर ऐकायला लागणार आहे रोज या कल्पनेनेच मला हा सर्व विचार टाकून द्यावा असे वाटते. कसला प्रचंड त्रास आहे राव. एकूण आवाज याबाबतीत एवढा सैल पणा मला तरी परवडणारा नाही.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावलोपावली अंधश्रद्धांना सामोरे जावे लागणार.
घरासाठी प्लॉट बघताना अनेक एजंट अगदी अभिमानाने एखादा प्लॉट पूर्वमुखी आहे किंवा उत्तरमुखी आहे असे सांगत असतात आणि त्यावरून थेट चार-पाच लाख रुपये प्रति गुंठा रेट कमी जास्त होतो. दक्षिणमुखी प्लॉट एम फॅक्टर असलेल्या भागात खपतात असे मला एक एजंट सांगत होता. एम फॅक्टर म्हणजे मुस्लिम वस्ती. आता गंमत म्हणजे याच एजंट ने मला माझ्या बजेटमध्ये बसतील असे अनेक दक्षिणमुखी प्लॉट दाखवले. मला याचं काहीच वाटत नव्हतं मात्र हे एजंट मला तो प्लॉट कसा चांगला आहे तोही दक्षिणमुखी असून हे पटवून देत. त्यांच्या लॉजिक नुसार दक्षिणमुखी प्लॉट घ्यायला काही हरकत नाही फक्त फ्रंटेज तीस फुटांच्या वर पाहिजे. हा हा.
माझा एक एजंट आहे त्याला सर्वजण म्हणतात फादर. तर फादर मला म्हणाला साहेब, हा प्लॉट एका पीएसआय ला पाहिजे आहे. व्यवहार सगळे ब्लॅक. संपूर्ण कॅश. आणि त्या साल्याला हा दक्षिण मुखी आहे म्हणून रिजेक्ट करावा लागला. मी म्हणालो द्या टाळी.
मात्र त्याच दिवशी फादर संध्याकाळी जीजस कॉल्स नावाच्या एका टिपिकल प्रेयर फेस्ट ला गेला जिथे कॅन्सर पासून चामखीळापर्यंत सगळं काही प्रभू येशूच्या आशीर्वादाने बरे झालेले लोक टेस्टीमनी देत असतात आणि पॉल दिनकरन अशा थोरमंडळींचे इंग्रजी एकेका वाक्यानंतर मराठीत करून गर्दीला सांगितले जाते.
स्थळ सांगली वानलेसवाडी.
हा मग मी गावी आलो आणि तिथे तर वेगळाच प्रॉब्लेम. काकांच्या घरामध्ये भाडेकरू ठेवले आहेत. घरावरती पाण्याच्या टाक्यांच्या मागे कोणाचाही हात जाऊ शकणार नाही अशा खूप छान देशी मधाचं पोळ आहे. तर त्या भाडेकरूना कधी एकदा ते पोळे आम्ही हटवतो असं झालेलं आहे. घरावर मधाचं पोळ असलं की घरात काहीतरी वाईट होतं, मालकाला आणि भाडेकरूंना सुद्धा बाधतं असला काही अत्यंत डेंजर समज या भाडेकरूंचा झालेला आणि ते घर देखील सोडायला तयार झाले आहेत. नुकताच त्यांच्या घरात त्यांचा मुलगा अपघातात सापडला आणि त्याचं खापर त्यांनी मधाच्या पोळ्या वरती फोडून टाकलं.
आमच्या आज्याने कल्पना मांडली की ब्लीच पावडर टाकून आपण पोळ मारून टाकू. आज्याने आतापर्यंत हजारो प्राणी पशुपक्षी मारून फस्त केले आहेत. मी चिडलो आणि म्हणालो मधाचे पोळे इथून हलणार नाही काही झालं तरी चालेल.
आणि आता सर्वांच्या तोंडात त्या मधाच्या पोळ्याला कसा हटवावं याशिवाय काहीही दुसरा विषय नाही.
गड्या आपला परदेशच बरा.
पोस्टमनला दिवाळीत बक्षिसी
पोस्टमनला दिवाळीत बक्षिसी देणे पटले नाही, पण तुमची इच्छा म्हणून ठीक आहे. एकदा पोस्टमनची nuisance value कळली तर त्वरित बक्षिसी देऊ लागाल.
<< भारतात एक घर घेत आहे >>
<< भारतात एक घर घेत आहे >>
खूप अनुभव आहे मुंबईत. किंमत किती आहे ते कुणीच थेट सांगत नाही. फोन करा, प्रत्यक्ष भेटू, मग बोलू असं म्हणतात. भेटलो की इतर गप्पाच जास्त, सध्या कुठे राहता, काय करता इ. फाफटपसारा जास्त. तुमची औकात किती ते जाणून घेण्याचा प्रयत्न. मग ब्लॅक किती देणार, त्यानुसार किंमत. मी एक पैसाही ब्लॅक देणार नाही असे सांगितल्यामुळे आता पुढील त्रास वाचत आहे, तरी फोन येतच राहतात. Sq.ft. आणि अपेक्षित किंमत (जागा भाड्याने असो वा विकत) सांगणारी एकही वेबसाईट अख्ख्या भारतात मला सापडलेली नाही. एजंट हा प्रकार भयंकर त्रासदायक आहे.
घरावर मधाचं पोळ असलं की घरात
घरावर मधाचं पोळ असलं की घरात काहीतरी वाईट होतं मालकाला आणि भाडेकरूंना सुद्धा बाधतं असला काही अत्यंत डेंजर समज >> खरंच.... किती डेंजर.
असंच समज गैरसमज आणि श्रद्धा अंधश्रद्धा बाळगणारं माझ्या एका कलीग चे कुटुंब आहे . त्याहून कहर म्हणजे दे हेट ऍलोपॅथी. २ महिने झाले कलीग ला खोकला झाला आहे. होमिओपॅथी होमिओपॅथी खेळताहेत पहिल्या दिवसापासून. काहीही उपयोग झालेला नाही , आता हि वेळ आलेली आहे घरात कि आई म्हणतेय "तुझ्यावर कोणीतरी करणी केली आहे".
>>>बकायदा म्हणजे - कायद्याला
>>>बकायदा म्हणजे - कायद्याला किंवा नियमाला धरून. योग्य पद्धतीने.>>
ते बा- कायदा आहे... बा म्हणजे नियमानुसार- बा अदाब, बा मुलाहिजा....
रॉय, त्या दिनकरन ची प्रेयर
रॉय, त्या दिनकरन ची प्रेयर मिट होती सांगलीत, काल, आज आणि उद्या. अनिस ने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली.
तुम्ही सांगलीचे काय?
त्या अलीबाबाच्या गोष्टीतल्या
त्या अलीबाबाच्या गोष्टीतल्या मार्जिना सारख्या फुल्या करतात हे पोष्टे आमच्या इथे दारावर.
माझे वडील त्याला म्हणायचे की पेन्शनरा़ंकडे पोस्त काय मागता? तुम्हालाच पाच/सात व्या वेतन आयोगामुळे वाढीव पैसे मिळतात ना. तुम्हीच देत जा आम्हाला दिवाळी.
मेधावि लय हसले.
मेधावि लय हसले.
रेव्यु पुढच्या वेळेला बोलताना आणि लिहिताना ब ला काना बा ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवीन.
>> रॉय, त्या दिनकरन ची प्रेयर
>> रॉय, त्या दिनकरन ची प्रेयर मिट होती सांगलीत, काल, आज आणि उद्या. अनिस ने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली. "<<
त्याचा आतल्या गोटातून अहवाल :
१. संबंधित जागा MIDC च्या मालकीची आहे. अशा पडून असलेल्या जागा लोकांना धार्मिक कार्यक्रमासाठी द्याव्यात असा GR आहे.
२. त्यानुसार ती निरंकारी सत्संग किंवा प्रेयर फेस्टिवल अशा गोष्टीकरता MIDC ने नियमाधीन राहून दिली.
३. हिंदू एकता संघटना आणि ते सगळे महान देशभक्त (अनिस चा सिलेक्टिव उपयोग करून) यांनी न्यायदंडाधिकारी, पोलीस आणि कलेक्टर यांना तक्रार दिली की पॉल दिनकरनच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा जोपासली जाते.
४. शिवाय देवाभाऊंनी तंबी दिल्यावर मग पोलिसांनी आणि कलेक्टरांनी ऐनवेळेस कार्यक्रमाची परवानगी रद्द करावी म्हणून बॉल MIDC च्या कोर्टात सरकावाला.
५. कायदा सुवव्यवस्थचा प्रश्न असल्याने MIDC काही करू शकत नाही ती फक्त भाडे घेण्यापूरती आहे ( भाडे : साडेतीन लाख रुपये ) म्हणून त्यांनी बॉल पुन्हा पोलिसांकडे आणि कलेक्टरांकड परतावला.
६. कलेक्टरांनी काहीही विशेष न करता टोलवाटोलवी केली. पहिला दिवस पार पडला.
७. पुन्हा वरून आदेश आल्याने पोलिसांनी परवानग्या नाकारल्या. कलेक्टरांनी MIDC ला परवानगी नाकारात असल्याचे पत्र संयोजकांना द्यायला लावले.
८. संयोजकांनी कार्यक्रम रद्द केला. आणि कोर्टात जाण्याची धमकी दिली.
९. संयोजकांनी MIDC ला तीन ओळीचा समन्स पाठवला ज्यात कोल्हापूर कोर्टात जाण्याची धमकी होती.
१०. दुसरा आणि तिसरा दिवस बहुतेक झाला नाही.
विशेष म्हणजे अनिस वाल्यांना देखील हिंदुत्ववाद्यांनी जवळ केले किंवा हायजक केले. हाच न्याय हिंदुत्ववादी बागेश्वर किंवा तशा बाबांना लावत नाहीत.
आणि गंम्मत म्हणजे अनिस जेव्हा जेव्हा या बाबांच्या हकीमच्या किंवा फादरांच्या विरुद्ध काहीतरी करते तेव्हा अनिस ला फक्त हिंदूच बाबा दिसतात म्हणून ओरड करायला ह्याच संघटना पुढे असतात.
एकंदरीत हे लोक प्रचंड भंपक, दंभ असलेले आहेत.
( तुम्ही या संघटनाचे sympthizer असाल तर क्षमस्व. आपला योग नाही असे मी म्हणतो. जर नसाल तर आपण अवश्य भेटूया. सध्या सांगलीतच आहे, मुख्यतवे करून)
अपडेट : शरदजी, तुमचे आधीचे लेखन वाचले त्यावरून आपल्या तारा लगेच जुळतील असे वाटले. तुम्हाला इच्छा असेल तर आपण आपलंच एक उस्फुर्त गटग करूयात काय?
वाचतोय हां मी. गुप्तहेर
वाचतोय हां मी. गुप्तहेर मागावर ठेवलेत.
लग्नकार्यात भेटवस्तू देताना
लग्नकार्यात भेटवस्तू देताना त्यावरची किंमत खोडून टाकणं - हे माझं पेट-पीव्ह आहे. किंमत खोडून टाकण्याचं कारण - केवढ्याचा आहेर केला हे यजमानाला कळू नये. कळलं तर काय होतं!
बंद पाकिटाचा आहेर करतो तेव्हा यजमानाला आहेराची किंमत कळतेच की.
बंद पाकीट दिलं तर किमान ५०० रुपये द्यावे लागतात (त्या त्या वेळच्या चलनमूल्यानुसार आणि यजमानाशी असलेल्या संबंधांनुसार ही रक्कम वेगवेगळी), वस्तू दिली तर २५०-३०० मध्ये येते, आणि मोठं गिफ्ट दिलंय असंही दिसतं - हे आणि वर लॉजिक.
डबल पेट पीव्ह!
हल्ली नेटच्या जमान्यात म्हटलं
हल्ली नेटच्या जमान्यात म्हटलं तर कोणत्याही गोष्टीची किंमत काढणं कठीण आहे का ? त्यासाठी खोडायला कशाला हवी किंमत ? असो.
आणि मुळात आहेर देणं आणि घेणं हीच मेजर डोक्यात जाणारी गोष्ट आहे माझ्यासाठी.
आहेराच्या म्हणून त्या typical
आहेराच्या म्हणून त्या typical विशिष्ट साड्या (माशागाळण्या, म्हणजे low quality ) , blous piece, टावेल टोपी (असंच असतंय ते, exact असाच उच्चार ), शर्टपीस पॅन्ट पीस हे प्रकरण च. मुळात पीव्ह आहे.
वरती तुला काही कळत नाही द्यावे लागते म्हणून ते सगळं घडताना पाहावे लागते.
त्यांचा साठा करून इकडे तिकडे फिरवले जातात.
.
ह्यावर उपाय म्हणून मी चांगल्या, नेसता येतील, कुणालाही आवडतील अशा classic design च्या साड्या wholesale मधून आणून स्टॉक करून ठेवते.
मिल्क कुकरचा जमाना गेला का?
मिल्क कुकरचा जमाना गेला का?
मिल्क कुकरचा जमाना गेला का?>>
मिल्क कुकरचा जमाना गेला का?>> त्या आधी मिरची कटर आणि स्टील ची वाडगी पण जोरात होती.
आहेर देणं आणि घेणं हीच मेजर
आहेर देणं आणि घेणं हीच मेजर डोक्यात जाणारी गोष्ट आहे >> +1
कोणतीही वस्तू भेट देताना तिचं मूल्य नाही तर देणाऱ्याची भावना महत्वाची असते हा मूळ विचार आहे. त्यामुळे किंमत खोडून द्यायची असते. मग करोडोंची असो कि चाराण्याची असो. घेणाऱ्यानेही भावना स्विकारायची असते, मूल्य नाही.
नाही तर फणस - फुटाणे न्याय लागू होतो.
किंमत खोडली/स्टिकर काढलं हे
किंमत खोडली/स्टिकर काढलं हे कसं कळतं?
डबल पेट पिव्ह मधला पिव्ह नंबर
डबल पेट पिव्ह मधला पिव्ह नंबर दोन बरोबर आहे . खरंतर वस्तू ऐवजी पैसेच द्यावेत . ते जास्त उपयुक्त ठरतात आपल्याला हि काय देऊ काय देऊ अशी डोकेफोड करावी लागत नाही .
@मानव - समजा एखादी गोष्ट खोक्यात आली असेल तर त्यावर हमखास किंमत लिहिलेली असते . ती न दिसेल अशा पद्धतीने खोडणे, पेनाने /मार्कर ने . वर वर चिकटवलेले लेबल असेल तर फाडून टाकणे . टॅग असेल तर तो काढून टाकणे हे लक्षात येते . इतकंच काय आपल्याला आहेर परस्पर पुढे ढकलला आहे ते पण कळते .
आमच्या इथे तर ओतारी होते , त्यांच्याकडे अनेक लोक भांड्यावरचे नाव खोडून नवीन नाव घालायला यायचे . म्हणजे आपल्याला आहेरात आलेली , जपून ठेवलेली भांडी पुढे सरकवायची नाव खोडून. आणि ते व्यवस्थित लक्षात यायचं .
आहेर देणं आणि घेणं हीच मेजर
आहेर देणं आणि घेणं हीच मेजर डोक्यात जाणारी गोष्ट आहे >> +1
तीन महिन्यांपूर्वी तिरूपतीला गेले होते. तिथेही टॅायलेट साफ करणऱया बायका पैसे मागत होत्या. मी माझेच नियम मोडून खुशीने पैसे देत होते एवढ्या गर्दीच्या ठिकाणी भारतात स्वच्छ टॅायलेट मिळणे ही आनंदाची बाब होती…
एखादी गोष्ट खोक्यात आली असेल
एखादी गोष्ट खोक्यात आली असेल तर त्यावर हमखास किंमत लिहिलेली असते . ती न दिसेल अशा पद्धतीने खोडणे, पेनाने /मार्कर ने...... पण कोणाला नवीन गोष्ट विकत घेऊन भेट देतो(द्यायचो) त्यावेळी किमतीचे लेबल काढूनच देत असू.
ज्यावेळी सोने चांदी दिली त्यावेळी बिल नव्हते ठेवले वस्तुसोबत.
सगळ्यात उत्तम रोख रक्कम देणे.
<<त्यांच्याकडे अनेक लोक
<<त्यांच्याकडे अनेक लोक भांड्यावरचे नाव खोडून नवीन नाव घालायला यायचे>> आरारा
<<सगळ्यात उत्तम रोख रक्कम देणे.>> +१
मंजूताई , खरंतर गर्दीच्याच
मंजूताई , खरंतर गर्दीच्याच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ टॉयलेट्स हि आपली गरज आणि हक्क आहे .
बघा ना आपण किती सरावलेले आहोत अस्वच्छतेला , जिथे जे गरजेचं आहे तिथे ते न बघण्याची आपल्याला प्रचंड सवय झाली आहे , त्यामुळे ती गोष्ट निदर्शनास आली कि आपल्याला प्रचंड कुतूहल आणि कौतुक वाटते.
>>>>>जिथे जे गरजेचं आहे तिथे
>>>>>आपण किती सरावलेले आहोत अस्वच्छतेला
हे अवाढव्य लोकसंख्येमुळे असावे. आणि लोकांत शिस्त नसणे हेही असावे.
आहेर द्यायची पद्धत वाईटच.
आहेर द्यायची पद्धत वाईटच.
एक तर काय आहेर द्यायचा हे समजत नाही. वस्तू मोठी दिसली पाहिजे आणि उगीच काहीतरी दिलंय असंही वाटू नये म्हणुन भिंतीवरची घड्याळं, पिंप, हंडे दिले जातात. भांडी देणारे सगे सोयरे असतात. घड्याळ देणारे ओळखीचे, मित्र किंवा कामातले सहकारी असतात. आता बॅगा पण देतात. काही ठिकाणी आधी विचारतात. पण बरेच ठिकाणी याला शिष्टाचार मानत नाहीत.
मग भिंतीवरची ९०० घड्याळं, १२ पिंप, पन्नासेक हंडे येतात. याचं करायचं काय?
जर पुढे सरकवले तर वाईट काय त्यात? वापरलेले तर नाहीत ना?
विकत आणून दिला पाहिजे का? त्याने फरक काय पडतो?
एखाद्याला जर शंभर हिरे (समजा) आहेर म्हणून आले आणि त्याने त्यातला एखादा हिरा डबीवरच स्टीकर बदलून तुम्हाला दिला ( समजाच) तर नाही म्हणाल का? चिडचिड कराल का? हा फिरवलेला हिरा मला नको म्हणाल?
मग इतर वस्तूंना वेगळा न्याय का?
लग्नात धोतरावरून भांडण होत नाही पण साडीवरून हमखास होते. साड्या ठेवूच नयेत यासाठी.
अजून एक
अजून एक
कधी कधी ज्याला आहेर द्यायचा आहे त्याची पत महत्वाची ठरते. यामुळे पण तिढा निर्माण होतो.
आमच्या कडे कामाला असलेल्या बाईने एकदा अशाच एका प्रसंगात घरातल्या बायकांना महागातल्या साड्या घेतल्या ज्या तिच्या परिस्थितीच्या मानाने खूप खर्चिक होत्या. तिला शैवटी ओरडावं लागल. एक तर तिने काहीही आणणे अपेक्षित नव्हतं. पण तिला खूप इच्छा होती. ती नेहमी तिच्या नात्यात वगैरे जी साडी घेईल तीच घेतली तरी चालली असती. पण रोजची गाठ असल्याने तिने घेतलेली साडी नेसली नाही तर असं तिला वाटलं असेल. आमचं तेच सांगणं होतं कि नेहमी आपण ज्या किंमतीची वस्तू घेतो तेव्हढीच घ्यावी किंवा घेऊ नये. तिला केव्हढा मोठा खड्डा पडला असेल हा विचार कसा जाईल?
याच्या उलट एक नातेवाईक आहेत. भरपूर श्रीमंत आहेत. त्यांच्या बायकोने मात्र सूरतला सर्वात स्वस्तात मिळणाऱ्या साड्या घेतल्या होत्या. त्यांच्या दृष्टीने आमची हैसियत तीच. पण उलट झाले तर आम्हाला विचार करावा लागेल कि शोभून दिसेल असं काय घ्यावं?
यापेक्षा सरळ पुष्पगुच्छ किंवा रिकाम्या हाताने जावे. लग्न म्हणजे काही हॉटेल नाही कि जेवणाच्या ताटाच्या किंमतीइतके तरी गिफ्ट द्यावे. जेवण पण बंद झाले पाहिजे. आता इराणचे कारण देता येईल.
आणखी एक भयाण प्रकार म्हणजे आलेले गिफ्ट्स उघडायच्या आधी लिहून ठेवणारे. मग रेसिप्रोकल प्राईसचा खेळ होतो. असल्याच्या लग्नात जाऊच नये.
एखाद्याची ऐपत नसताना हातावर पोट असताना तो आला आणि शंभर रूपयांची भेटवस्तू आणली म्हणून त्याला आपली ऐपत असताना शंभर रूपये आहेर करणे हे करंटेपणा आहे. उलट गरीबाला मदत होईल असे वाटले पाहिजे.
हो, एले असे होते.
हो, एले असे होते.
वरवर भेट नको नको म्हणत, आल्यावर ती केवढ्याची असेल याची अगदी कसुन चौकशी, खातरजमा करणारी मंडळी आमच्याकडेही आहेत. इकडून आलेली भेटवस्तु तिकडे भेट देणे आमच्याकडेही केले आहे पण आपल्याला तशीच आली असताना त्रागा व्यक्त करण्यात आलेला आहे.
कशाला देता घेता, सगळं काही सुरळीत चाललेलं असताना हे विकतचे दुखणं कशाला असे होते.
त्यातल्या त्यात बरा प्रकार म्हणजे आलेले ड्रेस वगैरे प्रसंगी इतरांना देण्यास काढुन ठेवणे आणि मग ते असे आले आहेत यातील कुठला पसंत पडतो क ते विचारून पसंत असल्यास देणे / अशा प्रकारे घेणे.
यातील कुठला पसंत पडतो क ते
यातील कुठला पसंत पडतो क ते विचारून पसंत असल्यास देणे / अशा प्रकारे घेणे. >>>+ १
आहेर घेतला तर तो circulate
आहेर घेतला तर तो circulate होणे ह्यात मला फार गैर वाटत नाही. एखाद्या बाईला जर पंचवीस तीस द्यायच्या घ्यायच्या सुमार क्वालिटी च्या साड्या आल्या किंवा अगदी चांगल्या जरी आल्या तरी ती त्या सगळ्या स्वतः वापरेल ही अपेक्षाच करणे गैर आहे. शहरात जिथे घरं लहान असतात तिथे ह्या सगळ्या वस्तू वापरणे दूरच पण स्टोअर करणे ही कठीण आहे त्यामुळे पास ऑन किंवा कामवाल्या बायकांना देणे किंवा काही वर्षांनी अक्षरशः भंगार मध्ये देणे हेच पर्याय उरतात.
म्हणून आहेर न घेणे आणि न देणे हेच सर्वात उत्तम आहे. आपण कार्याला हजर राहून आपला अमूल्य वेळ दिलाच आहे असा विचार करायचा आणि आहेर द्यायचा घ्यायचा नाही.
आहेर पासावन ( आमच्याकडे हाच
आहेर पासावन ( आमच्याकडे हाच अपभ्रंश वापरतात,
... पास ऑन) ला नावे ठेवणारी लोक सेव्ह द अर्थ, कार्बन फूट प्रिंट, काटकसर, उधळमाधळ प्रकाराचे बीबी निघाले तर कोणती बाजू घेतील? ते सोडा, इथेच कुणी पीव्ह लिहिला की लोक किती अन्न फुकट घालवतात, उगाच शॉपिंग करून रिसोर्सेस चा खेळ खंडोबा करतात तर काय लिहितील असा विचार आला!
इथे मी कुणाला गिफ्ट देताना आवर्जून गिफ्ट रिसिट घेतो. त्यावर किंमत नसते. कुणाला दिलेली गोष्ट आवडली नाही तर ते त्या दुकानात ती परत करून त्याच किमतीचे काही इतर घेऊ शकतात. किंमत समजते, पण ती ममो म्हणताहेत तशी अशीही समाजणारच असते. आपल्याला आलेली गिफ्ट पासवान आहे का कसं हे बघायचे संस्कार झाल्याने ते बघितले जाते पण ते काहीही असो, आलेली गिफ्ट मी आवर्जून वापरतो. वापरणे अगदी शक्यच नसेल तरच रीपर्पज करायचा विचार करतो. त्यात मी अर्थ सेव्ह करतोय असा लार्जर डॅन लाईफ.... बोलेतो ... उदात्त वगैरे विचार असल्याने काहीच वाटत नाही.
दानम भोगो नाश: तिसरो गतयो भवंती वितस्य... हे गिफ्टला लावतो. लवकरात लवकर आलेल्या गोष्टीचा वापरून किंवा कुणाला देऊन वापर होईल ते बघतो.
Pages