लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
यातील उद्गारचिन्हामुळे मी हे
यातील उद्गारचिन्हामुळे मी हे वाक्य आपोआप "ऐकले" >>> टोटली!
सगळ्या कॉफिन संवादालाच जाम हसतेय.
रील्स मधे पायात तारा अडकलेल्या पक्ष्याला मोकळे करतात तसे >>>
विठ्ठल पोजमध्ये म्हणजे कंबरेवर हात ठेवून उभे राहणाऱ्या >>> अगदी अगदी! ढिम्म हलत नाहीत.
मध्येच पुन्हा कर्णा फाटल्यागत
मध्येच पुन्हा कर्णा फाटल्यागत दुसर्याचा मुद्दा संपायच्या आत आपला पट्टा सुरू करायचा. >>>
ऑफिस कॉल्समधे असे अनेक लोक आठवले. विशेषतः भारतातील ऑफिसेस मधले लोक त्यांनी बनवलेल्या प्रेझेण्टेशन बद्दल बोलायला लागले, की पॉज नावाची गोष्ट माहीत नसल्यासारखे बोलतात.
मग आपल्यालाच एक्सेस ची भीक मागावी लागते. >>
बॉस लोकांनी अशा लिंक पाठवल्या की हे लोक परीक्षा घेत आहेत की काय असे वाटते - म्हणजे जे लोक अॅक्सेस मागतील त्यांनी किमान क्लिक केली लिंक, अशा अर्थाने
मी हे एकदोनदा केले आहे - की बघू किती कलीग्ज वाचायचा प्रयत्न तरी करत आहेत ते म्हणून
अमेरिकेत सतत कस्टमर फेसिंग रोल्स मधे असलेल्या भारतीय लोकांचा एक स्वतंत्र अॅक्सेण्ट तयार होतो बिझिनेसी भाषेत बोलण्याचा. तो ते एरव्ही आपल्याशी बोलताना वापरू लागले की डोक्यात जातो
कॉफिन वरून अफाट हसतेय. सेम टू
कॉफिन वरून अफाट हसतेय. सेम टू सेम मास्तर घडलय. आता सुधारणेला चान्स नाही. >>
लोकांचा एक स्वतंत्र अ
लोकांचा एक स्वतंत्र अॅक्सेण्ट तयार होतो बिझिनेसी भाषेत बोलण्याचा >> या शिवाय एक स्वतंत्र शब्दसंग्रह पण असतो. नॉर्मल गप्पा मारताना साध्या शब्दांऐवजी बिझनेसी शब्द कुणी वापरत असेल तरी ते आवडत नाही.
यू मीन जारगन?
यू मीन जारगन?
>>>>>>मग आपल्यालाच एक्सेस ची
>>>>>>मग आपल्यालाच एक्सेस ची भीक मागावी लागते.

की बघू किती कलीग्ज वाचायचा
की बघू किती कलीग्ज वाचायचा प्रयत्न तरी करत आहेत ते म्हणून << ह्या साठीच मी जस्ट क्लिक करुन ठेवते.
कॉफिन भारी होतं हाहा..
जेवणाच्या आग्रहाचा पेट पीव्ह्ज +++++
सगळे वर्क-प्लेस पे.पी.
सगळे वर्क-प्लेस पे.पी.
यू मीन जारगन? >>
यू मीन जारगन? >>
गर्दीच्या वाहत्या रस्त्यावर,
गर्दीच्या वाहत्या रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर बागेत फिरायला आल्यासारखे रमतगमत फिरणाऱ्या लोकांचा मला राग येतो.>>>> +११११
त्यातून आणि फुटपाथच्या मधून, उजव्या बाजूने रमतगमत चालणार! अरे रमतगमत चालायचे तर निदान डाव्या बाजूने तरी चाला, उजवी बाजू वेगाने चालणाऱ्यांसाठी मोकळी सोडा!
त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन अशा गडबडीच्या ठिकाणी एस्कलेटर वर उजव्या बाजूला उभे राहणारे लोक माझ्या डोक्यात जातात. मॉलमध्ये ठीक आहे, तिथे माणसे timepass करायलाच येतात पण रेल्वे / मेट्रो स्टेशनवर इतकेही भान नको???
कॄष्णा यांचा एक वर्क्प्लेस
कॄष्णा यांचा एक वर्क्प्लेस पेपि वर धागा आहे का? मला असे वाटते तो ही एक धागा फार विनोदी आहे
रस्त्याने जाताना एका रेषेत
रस्त्याने जाताना एका रेषेत जाणारे, डाव्या बाजूने राँग साईडने न चालवणारे, सतत हॉर्न न वाजवणारे ....
मोबाईलवर तासन तास घरगुती फोटो दाखवत राहणारे
नवीन घर दाखवताना संडास बाथरून न दाखवणारे
कानाला मोबाईल न लावता मान तिरपी न करता चौकात सुसाट टर्न न मारणारे
असे लोक डोक्यात जातात.
रस्त्याने जाताना एका रेषेत
रस्त्याने जाताना एका रेषेत जाणारे, डाव्या बाजूने राँग साईडने न चालवणारे, सतत हॉर्न न वाजवणारे ....
नवीन घर दाखवताना संडास बाथरून न दाखवणारे
कानाला मोबाईल न लावता मान तिरपी न करता चौकात सुसाट टर्न न मारणारे
असे लोक डोक्यात जातात.
Submitted by रानभुली on 25 July, 2025 - 19:57
ARE YOU SURE????????
रस्त्याने जाताना एका रेषेत जाणारे - डोक्यात जातात, म्हणजे लोकांनी झुरळासारखे वेडेवाकडे जाणे अपेक्षित आहे का? (रिक्षावाले तसेच चालवतात, म्हणून काहीजण रिक्षाला झुरळ म्हणतात!)
डाव्या बाजूने राँग साईडने न चालवणारे - डोक्यात जातात, म्हणजे राँग साईडने चालवणे अपेक्षित आहे का?
सतत हॉर्न न वाजवणारे - डोक्यात जातात, म्हणजे सतत हॉर्न वाजवणे अपेक्षित आहे का?
नवीन घर दाखवताना संडास बाथरून न दाखवणारे - डोक्यात जातात, म्हणजे घर दाखवताना संडास, बाथरूम दाखवणे अपेक्षित आहे का? (पुलंचे कथानक आठवले!)
कानाला मोबाईल न लावता मान तिरपी न करता चौकात सुसाट टर्न न मारणारे - डोक्यात जातात, म्हणजे कानाला मोबाईल लावून, मान तिरपी करून चौकातून सुसाट टर्न मारणे अपेक्षित आहे का???
रानभूली, तुझ्या विनोदाचे भजे
रानभूली, तुझ्या विनोदाचे भजे झाले....
मी आता अध्यात्मिक होणार आहे.
मी आता अध्यात्मिक होणार आहे.
Empathy च्या पथावर चालायचंय.
नवीन पेट पीव्ह् आत्ताच अॅड
नवीन पेट पीव्ह् आत्ताच अॅड झालाय. अगदी सरळ धोपट सरकॅज्म देखील न समजणारे लोक
नवीन घर दाखवताना संडास बाथरून
नवीन घर दाखवताना संडास बाथरून न दाखवणारे>>> रानभुली हेराफेरी आठवला...बाबूभैया आप खोलो (टॉयलेट दार), तो म्हणतो- छ्या छ्या, वो क्या खजाना है दिखानेको?
विमु डुड, चिल..
विमु डुड, चिल..
छ्या छ्या, वो क्या खजाना है
छ्या छ्या, वो क्या खजाना है दिखानेको?
पुढचं 'गाना आता है क्या' हे पण आठवलं.
>>>
छ्या छ्या, वो क्या खजाना है
छ्या छ्या, वो क्या खजाना है दिखानेको? >>
आता विषय निघाला आहेच तर
आता विषय निघाला आहेच तर टॉयलेट सीट ओली ठेवून बाहेर येणे हा माझा पेट पीव्ह नाही तर मोठाच डोक्यात जाणारा इश्यू आहे. टॉयलेट पेपर असतात, सगळ्या सुविधा असतात तरी लोक सीट कोरडी करून बाहेर येत का नाहीत ? आपल्या मागे कोणीतरी हे वापरणार आहे त्याला ही स्वच्छ , कोरडी टॉयलेट सीट मिळायला हवी एवढी साधी संवेदनशीलता ही बहुसंख्य जणांकडे का नसते ?
ममो तुम्ही पब्लिक रेस्ट्रुम्स
ममो तुम्ही पब्लिक रेस्ट्रुम्स बद्दल बोलताय?
हाहाहा ज्या स्तरातून, ज्या स्वच्छतेचे संस्कार असलेले लोक येतात ना त्यांच्याकडून या अपेक्षा करणे म्हणजे ..... आता काय बोलणार! त्यांनी फ्लश केले तरी खूप.
टॉयलेट सीट ओली ठेवून बाहेर
टॉयलेट सीट ओली ठेवून बाहेर येणे हा माझा पेट पीव्ह नाही तर मोठाच डोक्यात जाणारा इश्यू आहे. >>> +१०००००००
कमोडच्या आसपास पाणी ओतणे पण डोक्यात जाते
वरच्या विषयाला धरुनच पण जरा
वरच्या विषयाला धरुनच पण जरा अवातर भारतात आता मास्टर बेडरुम आणी अॅटेच्ड बाथरुम कन्सेप्ट रुळली आहे पण ते बाथरुम म्हणजे एक जोकच होवुन बसलाय...सिन्क्,कमोड आणी शॉवर सगळ एकाच लाइनित, त्यामुळे कमोड नेहमीच ओल असत ते एकाने शॉवर घेतल्यावर दुसर्याला कस वापरता येणार.. टॉयलेट पेपरचा वापर किवा उपलब्धता तेवढी दिसली नाही.
एक काचेची वॉल किवा शॉवर कर्टन टाकला तरी काम होइल पण कुठे ते फारस प्रचलित असलेले बघितल नाही.
>>>>सिन्क्,कमोड आणी शॉवर सगळ
>>>>सिन्क्,कमोड आणी शॉवर सगळ एकाच लाइनित,
शॉवरला बाथरुम कर्टन्स वापरले तर?
एखाद्या पुस्तकावर सिनेमा/वेब
एखाद्या पुस्तकावर सिनेमा/वेब सीरीज आली की पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत कव्हरवर त्यातल्या कलाकारांचे फोटो/त्यातला एखादा सीनचा फोटो असतो.
हा माझा मोठा पेट पीव्ह आहे.
मूळ कव्हरला धक्का न लावता कोपर्यात 'आता यावर सिनेमा/वेब सीरीज' आली आहे इतकं लिहिलं तरी बास असतं.
बरेचदा नवीन लोकांचं लक्ष
बरेचदा नवीन लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कलाकारांचं चित्र उपयोगी पडतं. ज्या पुस्तकाचं मुखपृष्ठ फार विचारपूर्वक केलं असेल तर वैताग येणे साहजिकच आहे. पण आजकाल पुस्तकांच्या मुखपृष्ठाकडे फारसे लक्ष जात नाही. आणि जुन्यांतीलही 2-3 च लक्षात आहेत. अर्थात हा माबुदो.
तुम्ही म्हणताय तशी मुखपृष्ठ प्राईड अँड प्रेज्युडाइसची आहेत. आवडतात मला.
कोणीतरी आपल्याकडे १५ मिनिटे
कोणीतरी आपल्याकडे १५ मिनिटे टू व्हीलर चालवत आले आहे आणि सोफ्यावर किंवा अगदी बेड वर पाय वर घेऊन बसणार असतील तर मी घरून धुवूनच आलोय म्हटले तर मला त्यांना तिथल्या तिथे सडकावे वाटते .
बाहेरून येऊन बचकन खाद्यपदार्थात हात घालताना सुद्धा ओरडल्यावर "हे बघ स्वच्छ आहेत " म्हणून दात दाखवणाऱ्यांचे दात पाडावे वाटतात .
दक्षिणा ऑन फायर.
इंग्रजी शब्द देवनागरीत
इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिताना ‘व्ह’ चा ‘व’ करणारे लेखक.
कव्हर, लिव्हर, लव्हर - कवर, लिवर, लवर
Pages