पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण परदेशात एअरपोर्टमधून बाहेर पडताना गांगरायला झालं होतं. टूर गाईड सोबत नसता तर सगळे सोपस्कार पार पाडून बाहेर पडता आले असते का हा प्रश्न पडला होता. (याचा व्हीलचेअरशी काही संबंध नाही.)

त्यामुळं आता गरीबी आली ते बरंच झालं असं वाटतं. Happy

बाकी हजार डॉलर खर्च केले तरी मला विमानातलं फुकट जेवण प्रचंड आवडतं
>>>> Rofl
फक्त ते भारतिय नसावं. ते बेचव आणि अनअपेटायझिंग करण्यासाठी लोक विशेष कोर्स करतात का असा संशय यावा इतपत ते वाईट असतं.

ते बेचव आणि अनअपेटायझिंग करण्यासाठी लोक विशेष कोर्स करतात का असा संशय यावा इतपत ते वाईट असतं. Lol

वैज्ञानिक कारण माहीत आहे पण कॉंटिनेंटल एवढं वाईट लागत नाही. कदाचित मुळात मसाले वगैरे कमी असल्यामुळे असेल.

प्रि-कोविड काळात, डेल्टा फ्लाइटच्या प्रिबोर्डिंगलाच ७०-८०% विमान भरायचं, कारण सगळेच स्काय प्रायॉरिटी (गोल्ड मडॅलियन अँड अबव). तसाच काहिसा प्रकार या व्हिलचेअर वॉरियर्सनी सुरु केलेला आहे. प्रिबोर्डिंगची पार खिचाट करुन टाकलेली आहे. खाली दिलेल्या बातमीतली क्लिप बघा, कल्पना येइल मी काय म्हणतोय ते. यावर उपाय एकच, जो किरण मजुमदार यांनी सुचवलेला. आता तो अंमलात येतो का ते पाहुया...

मी ही एक ज्ये ना आहे त्या दृष्टिकोनातून लिहित आहे. जो पर्यंत आपण व्हील चेअर घेतो तो पर्यंत आपण कधीच डोळे उघडे ठेवत नाही एअर पोर्ट वर. तसेच व्हील चेअरचा मार्ग हा चालण्याच्या मार्गाहून अगदीच वेगळा आणि लांबचा असतो त्यामुळे आपल्याला हे एवढं जमणारच नाही अशी भीती वाटते आणि व्हील चेअर सोडत नाही आपण.

डोळे उघडे आणि थोडा आत्मविश्वास हवा फक्त. कारण सगळीकडे बाण आणि चिन्हं असतात . जगातल्या सगळ्यांना इंग्लिश किंवा त्या देशाची भाषा येत नाही ह्याचा विचार करूनच ही आंतरराष्ट्रीय चिन्हं तयार केली आहेत. उदा बॅगे च चिन्ह म्हणजे दुसरी फ्लाईट नाही, तुम्ही बाहेर पडणार , काटे चमचे दाखवले असतील तर कॅन्टीन आहे तिकडे वगैरे वगैरे... त्यामुळे ती फॉलो केली तर बरोबर होतं सगळं. पण त्यासाठी मनातून इच्छा हवी, "कोण त्या फंदात पडणार , मी बाई व्हील चेअर घेते आणि मोकळी होते तो करतो सगळं " हा विचार नको. त्यासाठी आधी त्या विमानतळाचे व्हिडिओ बघणं, अभ्यास करणं वगैरे मार्ग ही आहेत. फक्त इच्छा हवी. व्हील चेअर घेतलेली भारतीय बाई सामानाच्या पट्ट्यावर आली की खूप ढकला ढकली आणि दांडगाई ही करते म्हणजे ती फिट असते फक्त व्याप नको म्हणून व्हील चेअर घेते.

आपलं गेट कोणत हे कळायच्या आधी आपण बसलेल्या लाउंज मध्ये जगभरातली लोकं असतात. आपली माणसं तुरळक दिसतात. पण गेट कडे जाताना मात्र हळू हळू आपल्या वर्णाची माणसं जास्त दिसायला लागतात. एक वेणी आणि पंजाबी ड्रेस घातलेल्या स्त्रिया दिसतात. क्वचित हिंदी कानावर पडते. किंवा भांडुप बोरिवली चा मराठीत रेफरेन्स येतो. कधी भूक लागली म्हणून बाकर वडी निघते पर्स मधून, आई कधी येनाल आपलं विमान हे ऐकायला मिळत वगैरे वगैरे.. हे त्या त्या फ्लाईट साठी माणसांचं एकत्र येणं बघायला खूप आवडत. असो.

विमानातल अन्न मला कधीतरीच आवडतं. मात्र एकदा पहाटे मुंबईला पोचत असताना दिलेला उपमा कायम लक्षात राहिल असा होता. तो माझ्यासाठी चवीचा आणि रंगाचा बेंच मार्क आहे.

>> व्हील चेअर घेतलेली भारतीय बाई सामानाच्या पट्ट्यावर आली की खूप ढकला ढकली आणि दांडगाई ही करते म्हणजे ती फिट असते फक्त व्याप नको म्हणून व्हील चेअर घेते.

++१ अगदीच!

आपल्याकडे खूप दवाखाना दवाखाना सुरु असला कि आपल्याला कोणाला कळवणे सुचत नाही . मग कधीतरी आपलं अमुक एका फ्रेंडशी फोन वर बोलणं होतं . मग आपण सांगतो गेले काही दिवस काय काय घडलं . नुसतं ऐकून घ्यायचं सोडून लोक म्हणत बसतात "अगं मग मला नाही का सांगायचयं ?" बाबा तू काय करणार होतास त्यात ? (मी लिटरली विचारलं ) "मी येऊन राहिलो असतो तिकडे . " म्हणजे मी तुझं आणि वरती करत बसू ?
कोणाच्या आयुष्यात काय घडलं हे फक्त ऐकून त्यावर , वाह ! छान ! किंवा अगदीच वाईट असेल तर अरेरे ! किंवा तत्सम प्रतिसाद देण्या ऐवजी लोक अतिरिक्त का बोलत सुटतात ?

आपण आपला काही हेल्थ इश्यू शेअर केला तर लोकांना असच का वाटतं कि आपल्याकडे जो सोर्स आहे (तो पण डॉक्टर नसतो , एक होमिओपॅथी चे दुकान चालवणारा दुकानदार ) तो जगात भारी आहे आणि तो दुनियेत कोणत्याही रोगाला औषध देऊ शकतो . वर ते लोक आपल्याला पटवून द्यायचा प्रयत्न करतात कि माझ्या अमुक ढमुक लोकांनी औषध घेतले आणि ते कायमचे बरे झाले वगैरे .

<मी येऊन राहिलो असतो तिकडे > पुन्हा अशी वेळ आली (न येवो, पण ) , तर तुलाच पहिल्यांदा कळवेन, अशी धमकी द्यायची.

दक्षिणा.. खरंय. पण काही खरेच धडपड करून मदत करतात, डबा देतात हे ही पाहिलेय.
काही उगाच बोलायचे म्हणुन बोलतात.

खरं आहे आशु पण कधी कधी नुसतं रोज टेस्ट ला जावं लागणं, किंवा व्यायाम करायला जावं लागणं, फक्त कंसलटेशन, कधी छोटी मोठी दुखापत यासाठी जावं लागलं असेल पण ही सलग घडलं असेल तर कोणाला काय सांगत बसणार? आणि त्यासाठी कोणाला कशाला बोलवायचं?

खूप मोठं आजारपण, आणि दवाखान्यात मोठा मुक्काम असेल तर ठीक, आणि ज्यांच्या बरोबर आपल्याला comfortable वाटेल, ज्यांच्याबद्दल हक्क वाटेल त्यांना आपण सांगतोच. उगीचच सोशल मिडियावरची ओळख असणाऱ्यांना कसं काय या मदतीला म्हणणार?

अश्या माणसांची खोड मोडायचा एकच उपाय त्यांना टर्न बाय टर्न ३-४ तासांसाठी येऊन पेशंटला रूटीन टेस्ट्स किंवा फिजिओथेरपीसाठी घेऊन जा असं सांगायचे किंवा आज मी पेशंटबरोबर बाहेर जाणार आहे आणि पेशंटला अमुक अमुक पथ्य आहे तर तुम्ही डबा द्याल का असं गोड आवाजात विचारायचे. भले भले, अगदी सख्खे म्हणवणारे पळ काढतात.

दक्षिणा तुमचे अलिकडचै धागे आणि या धाग्यावर च्या ज्या काही मोजक्या पोस्टी वाचल्या त्या बघता जागच्या जागी उत्तर न देता आल्याने कुठेतरी तै मोकळं व्हायचं असं वाटतं.

बरेच वेळा त्या क्षणी हा विचार मनात आलेला नसतो. नंतर येतो. मग आपण का नाही उत्तर दिले असे वाटते.

मी सरळ फोन केला असता आणि स्पष्ट शब्दात सांगितले असते. पण जर ती व्यक्ती खरंच मनापासून काळजीने सांगतेय असं वाटलं असतं तर मग हसून सोडून दिलं असतं. लोड नही लेनेका जी.

तर तुम्ही डबा द्याल का असं गोड आवाजात विचारायचे. भले भले, अगदी सख्खे म्हणवणारे पळ काढतात.
असा प्रकार आम्ही एकदा केला होता. फक्त पेशंट कोणी नव्हता. जेव्हा आम्ही ज्युनिअर इंजिनिअर म्हणून चेन्नाईला काम करत होतो तेथे एक वरीष्ठ उगाचच आम्हाला माझ्या घरी या, माझ्या घरी या असे जर त्याच्या घरा जवळ आम्ही दिसलो तर म्हणायचा. तो चेन्नाईच्या टिनगर भागात रहायचा. आम्ही तरूण मुले नेहमी त्याभागात हिंडायचो. त्यामुळे कधी ना कधी दिसायचाच (त्याला मोडके तोडके हिंदी येत होते, त्यामुळे तो "चलो घर चलो" असे हात पकडून बोलायचा). त्याच्या बोलण्यात तितकी आत्मियता जाणवायची नाही. म्हणून आम्ही टाळायचो.
एकदा त्याने कंपनीत सर्वांसमोर आम्हा पोरांचा अपमान केला. वर म्हणाला की ही हल्लीची पिढी आमच्यासारख्या सिनिअरला काहीच रेस्पेट देत नाही, मी इतक्यावेळा बोलावतो पण घरी कधी येत नाही वगैरे वगैरे बोलला. तेव्हा ठरवून आम्ही काही जणांनी प्लान केला. मुद्दाम एका रवीवारी आम्ही पाच जण तो रहात असलेल्या भागाजवळ संध्याकाळी थांबलो. तो माणूस आम्हाला भेटला आणि सवयीने चलो घर असे म्हणाला. आम्ही लगेच सर्व त्याच्या घरी गेलो. बाटल्या वगैरे आधीच तयार होत्या. पत्त्याचा कॅट काढला. त्याच्या फॅमिलीला "वहिनी आज आम्ही इथेच जेवणार" असे सांगितले (त्या माऊलीने मात्र सर्वांसाठी स्वयंपाक केला). मग अगदी रात्री २-३ पर्यंत त्याच्याघरी टाईमपास करून घरी परत आलो. त्यानंतर तो कधीही आम्हाला चलो घर असे बोलला नाही. पण आम्ही त्याच्या घरी गेल्यावर त्याने उत्साहाने पत्ते खेळणे, खाणे-पिणे, गप्पा यात भाग घेतला. कुठेही चेहर्‍यावर झक मारली आणि यांना बोलावले असा भाव दाखवला नाही. आम्ही त्याच्या बोलण्याचा बदला घेत आहोत हे त्याच्या लक्षात आले होते.

लोकांना कधी कधी "आधीच का नाही संगीतलस"? असं म्हणून मोठेपणा मिळवायचा असतो ही खरं आहे.
योगी तुम्ही छान केलंत. खोड मोडल्याशिवाय लोक ताळ्यावर येत नाहीत.

आता माझा नवीन पेट पीव्ह ऐका.

मी नुकत्याच माझ्या मेडिकल टेस्टस केल्या. बाकी सगळं नॉर्मल आहे पण बी 12 आणि डी 3 चे लेवहलस खूपच कमी आहेत. त्यामुळे अचानक दवाखान्यात अॅडमिट होऊन मला iv मधून आयर्न आणि बी 12 चा एक शॉट घ्यावा लागला अचानक. आणि अजून दोन घ्यायचे आहेत. (माझं रीडिंग बी 12 - 92 आणि डी 3 - 8 आहे.)

हे सगळं मी आमच्या ऑफिसच्या च्या ग्रुपवर शेयर केलं आणि सगळ्यांना सांगितलं की सगळ्यानी काळजी घ्या, माझ्यासारखा हलगर्जीपणा करू नका.

रात्री माझ्या मॅनेजर चा फोन, एक तास माझ्या कान खाल्ला. तू उन्हात उभी रहा, तू चालायला जा, चालायला जाताना विष्णु सहस्त्र नामच ऐक. मग अजून वीस मिनिटं अजून काहीतरी सांगितलं. काय खा, काय औषध घे सगळं. मग ऑफिस वर घसरून "तू फार सेनसीटिव्ह आहेस, तुझ्या मनाला गोष्टी लागतात, लावून घेऊ नको, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, तू मस्त रहा. तुला कोण गाढव म्हटल तर अरश्यासंमोर उभी राहून बघ कान कुठे आहेत तुझे? मग तू लगेच गाढव होतेस का वगैरे. मी तिला टोमणा मारला की मी उगीचच डॉक्टर कडे गेले तुलाच कन्सल्ट करायला हवं होतं.

ती लेक्चर देण्यात इतकी मग्न होती की तिने ते ऐकलेच नाही की ऐकून इग्नोर केले कळलंच नाही मला.

हे असं सगळं ज्ञान झाडताना इतक्या सुशिक्षित लोकांचा सुज्ञपणा आणि शहाणपणा कुठे केळी खायला जातो? मी क्लियरली लिहिलं होतं की मी हॉस्पिटल मध्ये जाऊन बकायदा सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित घेते आहे तरी ही बाई अशी बोलत होती जणू काही तिला त्या डॉक्टरपेक्षा जास्त कळते. कमाल वाटली मला. मला म्हणते प्रिस्क्रिप्शन वाचून दाखव तुला मॅग्नीशियम दिले का बघू, दिलेच नसणार, डॉक्टर लोक मूर्ख असतात वगैरे. मी म्हटल लाईट गेलीये आत्ता दिसत नाहीये वाचायला. नशीब मला पाठव म्हटली नाही.

i am like - न जाने कहा कहा से चले आते है ऐसे लोग ?

मस्त आहेत पेट पिव्ह्ज.....पण याच्या उलट वागलं तरी खट्टू होणारे पुष्कळ असतात.....उदा. मी समोरुन मागितल्याशिवाय स्वतःहून कुणाला हेल्प ऑफर करत नाही आणि कुणी जवळचा नसेल तर कुणाच्याही हेल्थ विषयी टेक केअर/ गेट वेल सून च्या टेम्प्लेट शिवाय अधिक काही लिहीत बोलत नाही. पण मोजक्या असलेल्या मित्रांकडून कधी मधी लोकांचा फीडबॅक ऐकायला मिळतो की लोकांना मी भलताच तोऱ्यात असलेला वाटतो... Biggrin

<<<< मी हॉस्पिटल मध्ये जाऊन बकायदा सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित घेते आहे >>>>

आधी चुकून बेकायदा वाचले आणि विचारात पडलो...

रच्याकने : बकायदा म्हणजे काय?

दक्षिणा, खरे आहे.
' अगं, मला कळवायचंस ना ' असे खूप जण म्हणतात.
यांनी नक्की काय केले असते? बाहेरगावी असलेल्यांनी विशेषतः?

दक्स, Lol कुठुन दुर्बुद्धी सुचली & ऑफिस ग्रूप वर शेयर केलं असं झालं असेल तुला.
मी तिला टोमणा मारला>>> ते फुल्ल फॉर्मात असतात त्यांना इतकुश्या टोमण्याचं काय होत नाय बघ

माझी १ मैत्रिण आहे, ती इतरांना सर्व काही विचारत असते पण स्वतः कडे काही इनफॉर्मेशन असेल तर मुळी कळू देत नाही.
जसे, व्यायामा बद्दल बोलताना तुम्ही काय करता विचारते.. स्वतः काय करते, हे गुलदस्त्यात! एकदास१ विशिष्ठ योगा क्लास चांगला आहे असे म्हणतात चुकून तिच्या तोंडातून निघाले, मी वर्ष भरा पासून करतेय.. Wink
एखादी चांगली गोष्ट मैत्रिणींना सांगावी आणि त्याचा फायदा त्यांना ही होऊ द्यावा ह्यात इतकं अवघड काय आहे? त्यात कोणाचं काय नुकसान? असा कोतेपणा करून काय मजा येत असेल लोकांना?

मी समोरुन मागितल्याशिवाय स्वतःहून कुणाला हेल्प ऑफर करत नाही आणि कुणी जवळचा नसेल तर कुणाच्याही हेल्थ विषयी टेक केअर/ गेट वेल सून च्या टेम्प्लेट शिवाय अधिक काही लिहीत बोलत नाही. >> या आरोपाला घाबरूनच कदाचित लोक ओव्हर डू करतात. कारण बोलताना लिमिटेशन्स नसले तरी चुकून समोरच्याने हो म्हटलं तर कृतीला लिमिटेशन्स येऊ शकतात हे तरी लक्षात घ्यायचं बोलताना. त्याही पेक्षा बरेचदा "मला का कळवलं नाही?" हा मुद्दा ठळक असतो.

ती इतरांना सर्व काही विचारत असते पण स्वतः कडे काही इनफॉर्मेशन असेल तर मुळी कळू देत नाही. >>
अशा लोकांना नकळतपणे चुकीची किंवा विचित्र माहिती देण्याचा खेळ खेळावा. उदा: मी डाळिंबाच्या दाण्याचा रस डोक्याला लावते, त्यामुळे केस दाट होतात. बसू दे डाळिंब सोलत.

मस्त आयड्या उबो Lol

स्लीम वाटत आहेस, फिटनेस साठी काय करतेस?
मी: काहीच नाही उलट बाहेरचं खाणं वाढलय.. सांग ना काहीतरी काय करू मी? Wink

स्लीम वाटत आहेस, फिटनेस साठी काय करतेस? >>
मी रोज किवी फळ खाते (किंवा एखादे महागडे/सहजासहजी न मिळणारे). मी फक्त मशरूम सूप पिते रोज, शेपूची भाजी खाते भरपूर त्याने रक्त शुद्ध होते....

Pages