लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा मात्रा दिला कि त्याचा अर्थ साहेब होतो या अर्थाने वापरणारे.
>>>
लहानपणी रस्त्यालगतच्या भिंतींवर राजकीय नेत्यांच्या नावातल्या साहेबच्या जागी असा तीन-काना-एक-मात्रावाला स दिसायचा, तेव्हा वाटायचं भिंतीवरची जागा पुरत नसावी म्हणून शॉर्टफॉर्मची आयडिया असावी.
लहानपणी रस्त्यालगतच्या
लहानपणी रस्त्यालगतच्या भिंतींवर राजकीय नेत्यांच्या नावातल्या साहेबच्या जागी असा तीन-काना-एक-मात्रावाला स दिसायचा >>> १००+
जीवाची घालमेल
जीवाची घालमेल
माझी अशी घालमेल , टेबलाच्या कडेजवळ पाण्याची glasses बघून होते. कडेला ठेवलेले पेले , जेवणाची भांडी आतल्या बाजूला सरकवणे ही माझी प्रतिक्षिप्त क्रिया आहे. बाकीचे कितीही confident असले की नाही पडणार , मी सरकवतेच.
हो हो. काना. चुकून काणाडोळा
हो हो. काना. चुकून काणाडोळा झाला आणि मात्रा पडली.
वाक्याच्या शेवटी वै वै असे
वाक्याच्या शेवटी वै वै असे लिहितात. >>>
जणू एखाद्या अफगाणी/पठाणी गाण्याच्या कोरस मधे गात आहेत.
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा मात्रा दिला कि त्याचा अर्थ साहेब होतो या अर्थाने वापरणारे. >>> हे कॉम्प्युटर/मोबाईलच्या मराठी टाइपरायटर्सवर कसे लिहीतात? पूर्वीच्या पुस्तकांत तसा वापर पाहिला आहे. स ला दोन काना व एक मात्रा असते त्याबद्दल म्हणताय ना?
ज्यादाचा काना? मात्रा दिल्यावर सौ होईल. >>>
हो ज्यादाचा काना म्हणायचे असेल. ज्यादाचा मात्रा वाचल्यावर "हा माझा बायको" आठवले 
>> वरच्या विषयाला धरुनच पण
>> वरच्या विषयाला धरुनच पण जरा अवातर भारतात आता मास्टर बेडरुम आणी अॅटेच्ड बाथरुम कन्सेप्ट रुळली आहे पण ते बाथरुम म्हणजे एक जोकच होवुन बसलाय...सिन्क्,कमोड आणी शॉवर सगळ एकाच लाइनित, त्यामुळे कमोड नेहमीच ओल असत ते एकाने शॉवर घेतल्यावर दुसर्याला कस वापरता येणार.. टॉयलेट पेपरचा वापर किवा उपलब्धता तेवढी दिसली नाही.
एक काचेची वॉल किवा शॉवर कर्टन टाकला तरी काम होइल पण कुठे ते फारस प्रचलित असलेले बघितल नाही. <<
पाणी ना वापरता फक्त टॉयलेट पेपर जिथे वापरतात आणि टब/शॉवर युनिट ला कर्टन/काचा वगैरे असतात तेव्हाच हा सेटअप नीट जमतो.
भारतीय बाथरूम संडास पाण्याच्या अतिवापराने अतिशय घाण झालेले असतात.
that said, एखाद्या
that said, एखाद्या व्यक्तीच्या घरचे कमोड आणि बाथरूम पाहून मी लगेच जज करतो. जर कमोड हे पांढरेशुभ्र कोरडे नसेल तर अशा व्यक्तीच्या घरीच जाऊ वाटत नाही. भारतीय संडास वगैरे असणाऱ्या लोकांना तर मी लांबूनच नमस्कार करतो. (त्यांच्याशी हँडशेक तसेही नैसर्गिकरित्या करवत नाहीच)
वाक्याच्या शेवटी वै वै असे
वाक्याच्या शेवटी वै वै असे लिहितात. >>> Lol जणू एखाद्या अफगाणी/पठाणी गाण्याच्या कोरस मधे गात आहेत. >>>
दगा दगा वै वै वै ... गाणे आहे
दगा दगा वै वै वै ... गाणे आहे ना?
कुणी आधी लिहीलेली असेल तर
कुणी आधी लिहीलेली असेल तर सॉरी.
सध्या युट्यूब व्डॉडीओज पाहताना त्या व्लॉगचा सारांश सुरूवातीला दाखवतात. तो स्पॉयलरचं काम करतो. पण हा ट्रेण्ड बनला आहे.
दुसरा ट्रेण्ड म्हणजे व्लॉगचा विषय खूप छोटा असतो. म्हणजे जगातला सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे असा.
पण हे सुरूवात करतात वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला, मग रेल्वेमध्ये ते कसे वापरले. जगातली पहिली रेल्वे लाईन ते भारतातली पहिली रेल्वे. असं करत करत भारतात रेल्वेचं जाळं. रेल्वे बजेट. स्टेशनांची संख्या ही सगळी अनावश्यक माहिती देत देत मग शेवटी तो सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठेय ते सांगतात. हा function at() { [native code] }याचार इथे संपत नाही.
भारतातला सर्वात (श्रीमंत / लहान / बिझी / सुंदर) रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे या व्हिडीओत पुन्हा ही सगळी माहिती function at() { [native code] }हपासून इतिपर्यंत ऐकावी लागते.
एखाद्या विषयाचा व्हिडीओ असेल तर त्यात तीच तीच माहिती रिसायकल केलेली असते. वैताग असतो नुसता.
सध्या युट्यूब व्डॉडीओज
सध्या युट्यूब व्डॉडीओज पाहताना त्या व्लॉगचा सारांश सुरूवातीला दाखवतात. तो स्पॉयलरचं काम करतो. पण हा ट्रेण्ड बनला आहे.
>> व्लॉगचे माहीत नाही. पण एक ते दीड तासाचे पॉडकास्ट बघायचे तर सारांश मध्ये कोणकोणते topics / प्रश्न कव्हर केले आहेत हे hook सारखं काम करतं माझ्यासाठी. म्हणजे प्रश्नांची क्वालिटी कळली की त्यावरून चर्चेची/ उत्तरांची काय असेल याचा अंदाज लावता येतो आणि पॉडकास्ट बघायचा की नाही हे आधीच ठरवता येते. व्लॉग बघतच नसल्याने त्याविषयी काही कल्पना नाही.
एखाद्या व्यक्तीच्या घरचे कमोड
एखाद्या व्यक्तीच्या घरचे कमोड आणि बाथरूम पाहून मी लगेच जज करतो. जर कमोड हे पांढरेशुभ्र कोरडे नसेल तर अशा व्यक्तीच्या घरीच जाऊ वाटत नाही. भारतीय संडास वगैरे असणाऱ्या लोकांना तर मी लांबूनच नमस्कार करतो. (त्यांच्याशी हँडशेक तसेही नैसर्गिकरित्या करवत नाहीच)
Submitted by रॉय on 2 August, 2025 - 11:18
मुळात प्रत्येक माणूस समजून घेण्यासाठी त्याच्या घरातील संडास बाथरूम निरखणे हीच एक खूप खूप घाणेरडी सवय आहे, आता तुमचा घरगुती संडास सफाईचा व्यवसाय असेल तर तुमचा नाईलाज असेल.
भारतीय संडास वगैरे असणाऱ्या लोकांना तर मी लांबूनच नमस्कार करतो. (त्यांच्याशी हँडशेक तसेही नैसर्गिकरित्या करवत नाहीच) :
का? सर्वसाधारणपणे भारतीय व्यक्ती धुण्यासाठी डावा हात आणि हस्तांदोलनासाठी उजवा हात वापरतात, मग उजव्या हाताने हस्तांदोलन करण्यात नक्की काय घाण वाटते आपल्याला? का आपल्या मित्रपरिवारातील आप्तजनांतील कुणीही संडासला जाऊन आल्यावर हात धुवत नाहीत?
(त्यांच्याशी हँडशेक तसेही
(त्यांच्याशी हँडशेक तसेही नैसर्गिकरित्या करवत नाहीच)
<<
आपणास भारतीय लोकांत जेवणा व धुता हात वेगळा असतो याची कल्पना आहे असे वाटत नाही. पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय आपण उपजतच वापरात आणत आहात असे दिसते. तसेच "स्वच्छ" करण्यासाठी पाण्याचा वापरही करत असाल असे आपल्या लिखाणावरून दिसत नाही.
अश्या लोकांशी हँडशेक, बफे जेवण इ. शेयर करण्याच्या कल्पनेनेच प्राण मळमळला..
संपादन : वरचा प्रतिसाद न वाचताच मूळ उमाळ्याबद्दल प्रतिउमाळा टायपून मोकळा झालो.
ता. क. : हातही धुतले.
बोधीधर्म ( या नावाने ते
बोधीधर्म ( या नावाने ते प्रसिद्ध आहेत, मूळचे नाव लक्षात नाही) हे दक्षिण भारतातले बौद्ध विद्वान चीन मधे गेले असता तिथल्या लोकांनी त्यांच्याशी संपर्क टाळला होता. कारण वरचेच.
(पुढे चीन मधे त्यांच्या नावाने झेन हा पंथ स्थापन झाला. या पंथात कुंगफू शिकवले जाऊ लागले. त्यांनी तिथल्या भिक्खूंनी स्थापन केलेल्या मेडीटेशन टेंपल्सच्या ऐवजी शाओलीन टेंपल्स उभारली. )
ता. क. : हातही धुतले. >>> OP
ता. क. : हातही धुतले. >>> OP 🔥
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा मात्रा दिला कि त्याचा अर्थ साहेब होतो या अर्थाने वापरणारे.
>>>
मोडी लिपीत साहेब हा शब्द स ला दोन काने देवून दुसर्या कान्यावर मात्रा असा लिहिला जात असे. मोडी ही मराठी शॉर्टहँड लिपी आहे.
माझा एक मित्र हौशी मोडी अभ्यासक आहे त्याला विचारून अधिक सविस्तर माहिती मिळते का बघतो.
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा मात्रा दिला कि त्याचा अर्थ साहेब होतो या अर्थाने वापरणारे.>>>>>
हे गावाकडील लग्नपत्रिकेत अजूनही दिसून येते.
त्यामुळे जागा वाचत असावी.
रावसाहेब भाऊसाहेब देशमुख. असे लिहिण्यापेक्षा
रावसो भाऊसो देशमुख असे लिहिले जाते (सो ला अधिक काना देऊन)
(No subject)
ऋतुराजच्या पोस्टीनंतर खाली
ऋतुराजच्या पोस्टीनंतर खाली लग्नपत्रिका आल्यासारखं वाटलं
मोडी ही शॉर्टहँड लिपी आहे. स
मोडी ही शॉर्टहँड लिपी आहे. स ला दोन काने आणि मात्रा असे लिहिले असले तरी त्याचा उच्चार साहेब असाच करायचा आहे. साहेब या शब्दाचे ते लघुरूप आहे. Dr याचा उच्चार आपण डॉक्टर असा करतो, डी आर असा नाही त्याप्रमाणेच.
बाळासो असे न म्हणता बाळासाहेब असे म्हणणे अपेक्षित आहे.
समोरून येणारी प्रत्येक
समोरून येणारी प्रत्येक भिन्नलिंगी व्यक्ती फालतू आहे अशा आविर्भावात नाक मुरडणाऱ्या मुली. मग ह्यांचे स्वतःचे खायचे वांदे असोत. काही मुलं ही ह्यांच्यापेक्षा संस्कारी आणि सरळमार्गी असू शकतात हे त्यांच्या गावीही नसते.
ही लहान गोष्ट असली तरी पण अश्या वागण्याने डोक्यात जातात.
हा प्रतिसाद न राहवुन
हा प्रतिसाद न राहवुन जनहितार्थ/ फनहितार्थसुद्धा जारी आहे. पाश्चिमात्य पद्धतीबद्दल गैरसमज असलेल्यांसाठी -
जरी पाश्चिमात्य पद्धतीत टिश्यु पेपर वापरत असले तरी इथे डिस्पोझबल (फ्लशशेबल, डिस-इन्फेक्टंट आणि प्रचंड इफेक्टिव्ह वाईप्स मिळतात. ज्यांच्या वापराने स्वच्छ वाटते/ असते. बहुसंख्य लोकं ते वापरतात. कॉस्टकोत अनेक जण विकत घेतात. पाहीलेले आहे. ते पाण्याहूनही इफेक्टिव्ह आणि आरोग्यदायी रेजिम आहे.
धागा वाचून इंस्टाग्रामवर गेले
धागा वाचून इंस्टाग्रामवर गेले तर हे रील दिसले. https://www.instagram.com/reel/DMzbxnkJcBD/?igsh=MTcxZ3pyb2JuMWJ5MQ==
मोडी शॉर्टहँड पेक्षा कर्सिव्ह
मोडी शॉर्टहँड पेक्षा कर्सिव्ह म्हणता येईल. काही शॉर्ट फॉर्म्स जसे पाा म्हणजे पाटील, साो म्हणजे साहेब मोडी अन देवनागरी लिपीतही लिहिले जातात. ती. , ती.स्व., अन असेच अनेक प्रचलित आहेत..
>>
बाळा सो मधे आणखी एक ज्यादाचा मात्रा
<<
मात्रा नाही. वर लिहिला आहे तसा काना असतो जास्तीचा. दोन मात्रा दिल्या तर सौ होईल. सोो हे असेही कधीच लिहिले जात नाही.
ता.क.
अशुद्ध, बेशुद्ध भाषा, काळाची खिचडी, शब्द माहिती नसताना काहीतरी तत्सम ऐकू येणारा शब्द वापरून, किंवा त्या
ऐवनीऐवजी संपूर्ण चुकीचे रूप वापरून लिहिणारे ही माझी पेट पीव्ह म्हणता येईल.पेपरमधली, बातम्यांमधली भाषा प्रमाण भाषा समजली जाई. आजकाल वाचवत अन ऐकवतही नाही..
(No subject)
कॉस्टको फ्लशेबल वाईप्स
होय हा इश्यु काही जुन्या
होय हा इश्यु काही जुन्या बिल्डिंगजना आहे
पण सर्व नाही.
दुसरा ट्रेण्ड म्हणजे व्लॉगचा
दुसरा ट्रेण्ड म्हणजे व्लॉगचा विषय खूप छोटा असतो. म्हणजे जगातला सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे असा.
पण हे सुरूवात करतात वाफेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला, मग रेल्वेमध्ये ते कसे वापरले. जगातली पहिली रेल्वे लाईन ते भारतातली पहिली रेल्वे. असं करत करत भारतात रेल्वेचं जाळं. रेल्वे बजेट. स्टेशनांची संख्या ही सगळी अनावश्यक माहिती देत देत मग शेवटी तो सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठेय ते सांगतात.
>>>>
इंग्रजीमधली नॉन फिक्शन - विशेषतः राजकीय, सामाजिक विषय, विज्ञानाची सामान्य लोकांसाठी लिहिलेल्या बर्याच पुस्तकात एक टिपिकल फॉर्म आढळून येतो. पुस्तकाची सुरुवात एखाद्या चमकदार, डोळ्यात भरणार्या घटनेने केली जाते. मग एकदम ट्रॅक बदलून पुस्तक १८-१९व्या शतकात शिरते. मग तिथून आलटून पालटून एक चॅप्टर आजची परिस्थिती आणि एक चॅप्टर ऐतिहासिक संदर्भ असे विणत पुस्तकाच्या शेवटच्या १/४ भागात सलग नॅरेटिव्ह आणतात. हा अगदी फिक्स पॅटर्न दिसून येईल.
"अरारा"रारारा.. अलीबाबा
"अरारा"रारारा.. अलीबाबा तुम्ही फॉक्सन्युजची लिंक संदर्भ म्हणून दिलीत!!! कुफेहेपा?
विनोदी (तथाकथित) रील्सना
विनोदी (तथाकथित) रील्सना शेवटी तो एक ऑ/अॅ टाइप आश्चर्योद्गार असतो, आणि मग हसण्याचा आवाज -
ते दोन्ही माझ्या डोक्यात जातं.
ललिता प्रीति करेक्ट.
ललिता प्रीति
करेक्ट.
की गोडे!
ऑ
Pages