लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
बघा लोकहो. अनुशेष भरून
बघा लोकहो. अनुशेष भरून काढताना पण कुणी कोकणचा विचार करत नाहीत
मला वाटते ज्येना बाबतीत
मला वाटते ज्येना बाबतीत प्रश्न फक्त भाषेचा नसावा. कधीच विमान प्रवास केला नाही, किंवा/आणि एवढ्या मोठया विमानतळावर गोंधळून जातात ही समस्या असावी. आणि त्यासाठी व्हीलचेअर ऐवजी असिस्टंट हा अगदी योग्य पर्याय वाटतो.
माझेमन, डोमेस्टिक एअरलाईन्सची व्हीलचेअर सुविधा मोफत आहे, पण बहुतेक मोठ्या एअरपोर्ट्सवर पेड व्हीलचेअर सुविधा आहे. हैद्राबादला चेक-इन काउंटर पर्यँत ५००₹ आणि बोर्डिंग गेट पर्यंत १२००₹ घेतात.
पैसे लावा आणि ते भरायला
पैसे लावा आणि ते भरायला आधारकार्ड लिंक करायला लावून त्याचे किमान चार ओटीपी पाठवा. अर्ध्या समस्या सुटतील Wink >>
Departure ला व्हील चेअर
Departure ला व्हील चेअर सर्व्हिस ओके असते पण कोणत्याही arrival ला काही ही ताळमेळ नसतो. आपली लोकं वाट्टेल तशी घुसतात , लाइन नसते. सगळा सावळा गोंधळ असतो. मला असं घुसणं वगैरे जमत नाही , एकदा आम्हाला चालण जमणार नव्हतं म्हणून व्हील चेअर घेतली. मागची फ्लाईट आली तरी आम्ही व्हील चेअरच्या शोधातच होतो, शेवटी एकाला दया आली आणि त्यांनी आम्हाला बसवलं त्याच्या कार्ट मध्ये. असो.
मी जनरली व्हील चेअर घेत नाही. बाण फॉलो केले की परफेक्ट पोचतो. किंवा मग आधी त्याचा यू ट्यूब व्हिडिओ बघून ठेवायचा त्याचा ही उपयोग होतो. व्हील चेअर घेतली की आंधळ्यासारखं त्याच्या मागे जातो आपण, एअरपोर्ट ची जरा ही आयडिया येत नाही.
मला वाटते ज्येना बाबतीत
मला वाटते ज्येना बाबतीत प्रश्न फक्त भाषेचा नसावा. कधीच विमान प्रवास केला नाही, किंवा/आणि एवढ्या मोठया विमानतळावर गोंधळून जातात ही समस्या असावी. आणि त्यासाठी व्हीलचेअर ऐवजी असिस्टंट हा अगदी योग्य पर्याय वाटतो.>>>+१००
दिल्ली विमानतळावर इंडिगो एअर लाइन्स असिस्टंट सुविधा देते ज्ये नागरिकांसाठी. पण तीपण बहुतेक फक्त चेक इन करवून सिक्युरिटी चेक पर्यंत पोहचवण्यासाठी आहे. खरं तर नंतरच गरज पडते कोणीतरी बरोबर असण्याची. गेटस् दूर असतात. किती लांब आहेत याचा अंदाज नसतो. बावरून जायला होऊ शकतं. चौकशी करत जावे तर नेहमीच अंगावर न खेकसता उत्तर मिळेल याची खात्री नसते. निदान डोमेस्टिक एअरपोर्टवरचा तरी माझा अनुभव असा आहे. त्यातूनही इंग्रजीतून विचारले तर उत्तर तरी मिळते. हिंदीतून विचारले तर 'कहांसे आये है' टाइप लूक मिळतो.
असा अनुभव १०% वेळा तरी आलेला आहे.
पैसे लावा आणि ते भरायला
पैसे लावा आणि ते भरायला आधारकार्ड लिंक करायला लावून त्याचे किमान चार ओटीपी पाठवा. अर्ध्या समस्या सुटतील
>>>
हो. पैसे घेण्यापेक्षा हा उपाय चांगला आहे. त्याहीपेक्षा उत्तम उपाय म्हणजे बायोमेट्रीक स्कॅन. भले तुमचं विमान उडून जाईल पण निम्मे लोक तिथेच गळतील. आणि जीवनप्रमाणची प्रॅक्टिसही होऊन जाईल. अजून एखाद स्टेप वाढवायची असेल तर बायोमेट्रिक लॉकच पाहिजे आणि आमच्यासमोर अनलॉक करा असा फतवा काढायचा.
माझे मत असे की त्या व्हील
माझे मत असे की त्या व्हील चेअर ला एअर लाइन नी काहीही क्वालिफायिंग कन्डिशन दिलेली नाही, आणि ती सोय फुकट आहे. देसी लोक का नाही घेणार ती सोय?
एअरलाइन्स ना हा अब्यूज वाटत असेल तर एक तर त्यांनी क्वालिफाय करायला क्रायटेरिया लावावा किंवा पेड सर्विस म्हणूनच अव्हेलेबल करावी. सोप्पं आहे. म्हणजे आमचे ज्येना पैसे देऊन ताठ मानेने तरी घेतील व्हील चेअर 
व्हीलचेअर ही जनरली ज्यांना
व्हीलचेअर ही जनरली ज्यांना चालणं शक्य नाही त्यांनी वापरायची असते ना? अजून काय वेगळा क्रायटेरीआ पाहिजे? देसी ज्येनांना मोबिलीटीचे प्रॉब्लेम्स नसून इतर प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यावर सोल्यूशन वेगळं पाहिजे. नाहीतर तो अब्युजच आहे. भारतातून एक फ्लाईट आली तर एअरपोर्टवरच्या सगळ्या व्हीलचेअर तिथेच वापरायच्या का? मग इतर फ्लाईटस् मध्ये ज्यांना खरोखरी मोबिलिटी इश्यू आहेत त्यांनी काय करायचं? लिमिटेड रिसोर्सेसवर पहिला हक्क खऱ्या गरजूचा नको का? प्रश्न पैशांचा नाहीच. पैसे खर्च करा हा उपाय डिटरंट म्हणून सांगितला पण त्याने फार फरक पडणार नाही.
इतर नॉन इंग्लिश स्पीकिंग देशातून पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या लोकांनाही हे प्रॉब्लेम येत असतीलच की. पण ते रॅंडमली व्हीलचेअर वापरताना पाहिले नाहीत. अरब किंवा फारसीशिवाय कसलीही भाषा न येणाऱ्या बायकाही जमेल त्याला पकडून गेट नंबर, फ्लाईट नंबर सांगत प्रवास करताना पाहिल्यात. त्या मानाने आपल्याकडे बऱ्यापैकी इंग्लिश शिकलेले (भलेही रोज बोलत नसतील) लोक प्रवास करतात. त्यांना जरा कष्ट का घ्यायचे नसतात?
त्याच्यावर सोल्यूशन वेगळं
त्याच्यावर सोल्यूशन वेगळं पाहिजे. नाहीतर तो अब्युजच आहे.>>>
लिमिटेड रिसोर्सेसवर पहिला हक्क खऱ्या गरजूचा नको का?>>> १००% सहमत.
ज्येनांना कष्ट घ्यायचे नसतात
ज्येनांना कष्ट घ्यायचे नसतात असे नाही. पण ट्रांझिट मधल्या बर्याच गोष्टी सोप्या होतात. आता खरोखर ज्यांना मोबिलिटी च्या मर्यादांमुळे गरज आहे त्यांना प्राधान्य मिळायला हवे हे बरोबर.
यात एक नेहमी प्रवास न करणार्यांची गरज आहे - व कदाचित एक मार्केटही आहे- हे ओळखून त्यावर काहीतरी इतर उपाय तयार झाला तर देशी ज्येना तो वापरू शकतील. त्याकरता थोडे पैसे द्यावे लागले तरी बरेच लोक देतील. लॅण्ड झाल्यावर वरची बॅग काढणे, विमानातून बाहेर पडल्यावर पुढची फ्लाइट कोठे आहे ते गेट शोधून ते किती लांब आहे, तिकडे जायला पुन्हा सिक्युरिटी चेक करावा लागेल का ई माहिती त्यांना देणे, ज्यांना इंग्रजीतून बोलणे जमत नाही त्यांना ते समजेल असे सांगणे, तिकडे जाताना बॅग सांभाळणे, खूप लांब अंतर असेल तर ती टर्मिनलवरची गाडी वापरणे ई करता चार्ज घेउन एअरलाइन किंवा एअरपोर्ट्सनी ट्रान्झिट मधे पॅकेज सारखी सुविधा पुरवली तर तिकिटाला १०००+ डॉलर खर्च करणारे ४०-५० डॉ आणखी देतील त्यातून मिळणार्या फायद्या करता.
वरती असिस्टंटचा उल्लेख आहे तो हे सगळे करतो का लक्षात नाही.
माझेमन च्या पूर्ण पोस्टला
माझेमन च्या पूर्ण पोस्टला +१०००
पैसे देऊन ज्या सुविधा द्यायच्या त्या द्या. पण त्याने मूळ व्हीलचेअर, जी मोबिलिटी इश्यू करता होती त्यातला एकही रिसोर्स वापरला नाही पाहिजे. म्हणजे पैसे मिळत आहेत म्हणून एअरलाईन कंपन्या पैसे भरलेल्या माणसांना पर्सनल असिंस्टंट सेवा देत बसतील अॅट द कॉस्ट ऑफ मोबोलिटी पॅसेंजर्स. ह्या दोन वेगवेगळ्या आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असलेल्या गोष्टी आहेत. हे लक्षात घेऊन काय ते करा.
हे म्हणजे अमेरिकेतील हेल्थकेअर सारखे व्हायला नको. याला अगदी कडाडून विरोध आहे. पर्सनल असिंस्टंट सर्विसेस या थर्डपार्टीनेच द्याव्यात. त्यात विमानकंपनीचा काहीही सहभाग नको.
ह्या दोन वेगवेगळ्या आणि
ह्या दोन वेगवेगळ्या आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असलेल्या गोष्टी आहेत. हे लक्षात घेऊन काय ते करा. >>> त्यात काही वाद नाही. ज्यांना मोबिलिटी च्या मर्यादांमुळे गरज आहे त्यांनाच प्राधान्य द्यायला हवे.
एक वेगळी पेड सर्विस एअरपोर्टने द्यावी ट्रान्झिट पॅकेज टाइप काहीतरी.
प्राधान्य नाही, तो डेटा सेट
प्राधान्य नाही, तो डेटा सेट एका एंटीटीने हाताळूच नये.
कारण एकदा एका एंटीटीकडे त्या दोन्ही गोष्टी गेल्या की पैसे भरलेल्याला सुविधा, एक्स्पेक्टेशन्स, बेसिक राईट इ. इ. सगळं होतं .पेईंग कस्टमर वि. प्राधान्य यात पेईंग कस्टमरच कायम जिंकतो. प्रायव्हेट इन्स्युरन्स वि. ऑल यु कॅन इट बुफे सारखंच होणार.
तो सेकंड क्लास सिटीझन व्हायला वेळ लागत नाही. ख्रिसमसला पर्सनल असिंस्टंट सर्विसला बुकिंग जास्त आलं, येत असलेल्या पैशाला नाही कोणी म्हणत नाही. मग ज्या मोबिलिटी स्टॅच्युटरी सुविधा आहेत त्यातुन रिसोर्सेस डबल पैसे देऊन मागवा हे होणारच जर ते सगळं एकच कंपनी हाताळू लागली तर.
असो. जे आडात नाही त्यावर आपण चर्चा करतो आहोत.
माझी एक रिव्हर्स पेट पीव्ह
माझी एक रिव्हर्स पेट पीव्ह आहे अगदी मायनर. जेव्हा विमानातील स्टाफ काही द्यायला येतो तेव्हा ते एका रो मधल्या लोकांना कोणत्या क्रमाने विचारतात? जनरली सीट ए, बी, सी - अशा क्रमाने आपल्या दृष्टीने डावीकडून उजवीकडे विचारत जात असावेत. पण मला असे नेहमी वाटते की आपण कोठेही बसलो तरी आपल्याला शेवटी विचारतात
आपण अगदी चालू असलेला पिक्चर पॉज करून कानातले हेडफोन काढून तयार राहावे तर ते इतरांकडेच लक्ष देत बसतात 
विमान लॅण्डिंग बद्दलच्या पेट पीव्हज बद्दल ही धमाल क्लिप पाहा
"ये जीवन मे दो सेकण्ड बचाके क्या उखाडलिया तूने"
https://www.youtube.com/watch?v=4fOaW6A4j5E&t=169s
प्राधान्य नाही, तो डेटा सेट
प्राधान्य नाही, तो डेटा सेट एका एंटीटीने हाताळूच नये. >>> हो आले लक्षात, आणि बरोबर आहे. मी एअरपोर्टने पॅकेज द्यावे हे त्या अर्थानेच म्हणत होतो. व्हीलचेअर ही एअरलाइनची सुविधा असावी. पण जितके सेपरेशन होईल तितके चांगले.
भारतातून एक फ्लाईट आली तर
भारतातून एक फ्लाईट आली तर एअरपोर्टवरच्या सगळ्या व्हीलचेअर तिथेच वापरायच्या का? मग इतर फ्लाईटस् मध्ये ज्यांना खरोखरी मोबिलिटी इश्यू आहेत त्यांनी काय करायचं? लिमिटेड रिसोर्सेसवर पहिला हक्क खऱ्या गरजूचा नको का? >>> हे १००% मान्य आहे. आणि देशी ज्येनाच ही सोय अशा प्रकारे वापरतात, इतर देह्सातले ज्येना तसे करत नाहीत हेही बरोबर आहे.
पण मुद्दा एवढाच की हा प्रॉब्लेम सोडवायचा तर त्या सुविधेसाठी काही ना काही तरी फिल्टर/ क्रायटेरिया द्यायला हवा जेणे करून खरे गरजू आणि सोय / शॉर्टकट म्हणून वापरणारे यात फरक करता येईल. आत्ता म्हणजे सगळे वापर करणार्याच्या इच्छेवर आहे.
आपण अगदी चालू असलेला पिक्चर
आपण अगदी चालू असलेला पिक्चर पॉज करून कानातले हेडफोन काढून तयार राहावे तर ते इतरांकडेच लक्ष देत बसतात >> अगदी! मी ज्या रांगेत बसलेला असतो, त्याच्या मागच्या रांगेपासून मागे मागे जातात आणि पुढच्या बाजूने मागे येणारे २७ रो पुढे असतात.

त्यात ज्यांनी स्पेशल फूड ऑर्डर केलेलं असतं त्यांना आधी जेवण देऊन जातात. आपल्या आजूबाजूला हे नेमके हिंदू व्हेजी लोक आले आणि आपल्याला डोळा लागला तर होस्टेस सगळ्यांना देऊन गेली आणि आपलं जेवण मिस झालंय का ही गुज्जू व्हेजी जन्ता आहे हा खेळ बराच वेळ खेळत बसायला लागतं. परत बटण दाबून विचारण्याची मला प्रचंड लाज वाटते. बाकी हजार डॉलर जेवणावर खर्च केले तरी मला विमानातलं फुकट जेवण प्रचंड आवडतं. त्यामुळे बसलोय ताटकळत आणि परत डोळा लागू न देता ह्या अवस्थेत उगाच एखाद तास जातो.
बाकी हजार डॉलर खर्च केले तरी
बाकी हजार डॉलर खर्च केले तरी मला विमानातलं फुकट जेवण प्रचंड आवडतं. त्यामुळे बसलोय ताटकळत आणि परत डोळा लागू न देता ह्या अवस्थेत उगाच एखाद तास जातो. >>
बाकी हजार डॉलर जेवणावर खर्च
बाकी हजार डॉलर जेवणावर खर्च केले तरी मला विमानातलं फुकट जेवण प्रचंड आवडतं. त्यामुळे बसलोय ताटकळत आणि परत डोळा लागू न देता ह्या अवस्थेत उगाच एखाद तास जातो. >>>
डोमेस्टिक तिकिटाला ९०० डॉ देऊनही एक बिस्कोटी जास्त मागताना आपण डेल्टाला लुटत आहोत असे वाटते.
मी ज्या रांगेत बसलेला असतो, त्याच्या मागच्या रांगेपासून मागे मागे जातात आणि पुढच्या बाजूने मागे येणारे २७ रो पुढे असतात >>>
ती भीती मलाही एक दोन वेळा वाटली होती पण ते लक्षात ठेवतात बरोबर 
हिंदू व्हेजी लोक >>> याला एक स्पेशल लोल
बाय द वे, त्या फूड पॅकेजिंगला किती खर्च वाया जात असेल. त्यापेक्षा आपली राजधानी बघा (ऑफ कोर्स फर्स्ट एसी मधे) - अगदी सर्व्ह करतात. प्राचीन काळी प्लेन्समधेही करत असे वाचले आहे.
फिल्टर/ क्रायटेरिया द्यायला
फिल्टर/ क्रायटेरिया द्यायला हवा जेणे करून खरे गरजू आणि सोय / शॉर्टकट म्हणून वापरणारे यात फरक करता येईल. आत्ता म्हणजे सगळे वापर करणार्याच्या इच्छेवर आहे. >> हे उपाय म्हणून मान्य आहे. पण काय क्रायटेरिया करणार? डॉक्टर सर्टिफिकेट? म्हणजे ही लाल फीत झाली, आणि आपले लोक! हे ही आणतीलच की.
ऑनर सिस्टिमने खरतर काम केलं पाहिजे. विदेशांत अनेक गोष्टी ऑनर सिस्टिमवर चालतात. आपण टॅक्स भरतो, लाँग टर्म कॅपिटल गेन मध्ये जी हजार गणितं करतो ती मोस्टली ऑनर सिस्टिमवर सीआरए अॅक्सेप्ट करतं. त्यात घोळ घालणारे महाभाग असतातच पण सम टोटल कमी असल्याने काम चालतं. इथे आपली लोकसंख्या जगाच्या एक पंचमांश आणि त्यातले ८० - ९० टक्के ज्येना हे असले. कसं करायचं कोण जाणे.
(८०-९०% हे आपलं मी कन्विनियंटली शिव्या द्यायला केलेलं सोयिस्कर गणित आहे. मी कुठे सर्वे करायला गेलेलो नाही.)
पॅकेजिंगचा गिल्ट हे एक वेगळंच प्रकरण आहे.
आपण प्रचंड प्रिव्हलेज्ड आहोत इतकंच खरं. बाकी त्यात काहीही बोलण्यासारखं नाही. फक्त गिल्टच वाढेल.
राजधानीत रियुजेबल प्लेटस, सिल्वरवेअर असेल तर _/\_ खरंच कमाल!
ज्या ज्येष्ठ नागरिकांना
ज्या ज्येष्ठ नागरिकांना एअरपोर्ट आणि हवाई प्रवासाशी रीलेटेड गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यासाठी बुकिंग त्यांची मुले, एजंट असे इतर लोक करतात.. म्हणजे हे शिकले सवरलेले आताच्या पिढीचे लोकच जास्त misuse करत आहेत. यातले बरेच ज्येना जसं सांगितलय, बुकिंग केलंय मुलांनी, एजंटने त्याप्रमाणे करतात फक्त ... पण ते बसतात त्या व्हीलचेअर मध्ये म्हणून ते दिसतात
धडधाकट असताना ज्येनांना
धडधाकट असताना ज्येनांना अपंगांसाठी सोय असणार्या चाकाच्या खुर्चीत बसायची शरम नाही वाटत? त्यांना स्वत:ची काही अक्कलच नाही का? अर्थात ज्यांचा जन्म व्हॉट्सअॅप फॉरवर्ड पुढे ढकलण्यात गेला त्यांना जगाचं, आजुबाजूच्या परिस्थितीचं भान वगैरे असण्याची अपेक्षा करणे म्हणजे!
मुलं आणि एजंट आहेत मंद तर आपण ऐकावं का त्यांचं? अॅडल्ट आहेत ना ते? त्यांच्यावर कशाला ढकलायचं? मी ज्येनांना 'मी आपली व्हीलचेअरच बुक करतो/ते' अशा फुशारक्या मारताना पाहिलेलं आहे. ज्यांना खरंच जमत नाही त्यांच्या बद्दल अर्थातच हे नाही. पण आपण सामान्य माणसासारखं जगावं, आपलं फुटप्रिंट मर्यादित ठेवावं हे अनेकांना कदाचित उमगत नाही. या निमित्ताने समजलं तर चांगलंच आहे.
अमित, ही अपेक्षा जुगाडू
अमित, ही अपेक्षा जुगाडू भारतीय लोकांकडून ठेवणं जरा अती नाही वाटतं?
बर माझेमनचं जे पोस्ट आहे त्याच्याशी सहमत. जास्त पैसे भरायला लावा ज्यांना व्हिलचेअर हवी आहे त्यांच्याकरता. खरंतर ज्येनांना गेटपर्यंत सोडेल अशी सुविधा पैसे भरुन देता आली तर कदाचित व्हिलचेअर अब्युज कमी होऊ शकेल.
हो! हे होणे नाही याची कल्पना
हो! हे होणे नाही याची कल्पना आहेच.
कुणाला चालता येत नाही दिसत असून आपल्या मुला/ लीने, जावयाने, सुनेने व्हील चेअर बुक केली आहे म्हणून ही लोकं त्यांना मागे टाकून आपल्या पिशव्या व्हीलचेअर वर टाकून येतील.
धडधाकट असताना ज्येनांना
धडधाकट असताना ज्येनांना अपंगांसाठी सोय असणार्या चाकाच्या खुर्चीत बसायची शरम नाही वाटत? त्यांना स्वत:ची काही अक्कलच नाही का? <<< हो, ते ही आहेच. पण हे ही आहे की, त्यांच्या पुढची पिढीही असे जुगाड करण्यात मागे नाही
मी ज्येनांना 'मी आपली
मी ज्येनांना 'मी आपली व्हीलचेअरच बुक करतो/ते' अशा फुशारक्या मारताना पाहिलेलं आहे >> तेच तर. कारण त्यात काही गैर आहे हे त्यांना कळतही नसेल. त्यांना ही त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली सोय आहे असेच वाटते. "वैष्णवदेवीला जाताना घोडा केला " असं सांगावं तसंच हे त्यांच्यासाठी!
* हे समर्थन नव्हे तर असे का? ची कारणे शोधणे आहे
हो. शक्य आहे.
हो. शक्य आहे.
पैसे भरले की 'वी कॅन अफोर्ड' फुशारक्या मारून ज्यांनी अजून यात उडी घेतलेली नाही ते पण स्टेटस सिंबल, आहे सोय, त्याचा दाम देतोय तर उपभोगू करत ती पण सेवा पार कोलमडून टाकतील. काही सांगता येत नाही. एअरपोर्टवर चाकाच्या खुर्च्यांची रांग लागेल..
कारण त्यात काही गैर आहे हे
कारण त्यात काही गैर आहे हे त्यांना कळतही नसेल. त्यांना ही त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली सोय आहे असेच वाटते. " >>> हे बरोबर असावं. आपल्याला इथे हे आजच कळलं नाहीतर मायबोलीवर याची चर्चा झाली असती आधीच. कधी डोक्यातच आलं नाही. पण त्या लिंकमधे म्हटलं आहे की पन्नाशीची लोकं पण व्हीलचेअर घेतात. सायोचं पटलं, माणसं नेमावीत चालत पोचवायला.
माझी एक बहीण तिच्या
माझी एक बहीण तिच्या सासूसासऱ्यांना घेऊन परदेशात गेली तेव्हा मुंबई विमानतळावर तिला अशी असिस्टंटची सुविधा दिसली (अर्थात पैसे भरून) आणि तिने ती घेतली. अत्यंत उत्तम अनुभव आला तिला.
'प्रणाम' की काही तरी नाव होतं बहुतेक कंपनीचं.
फक्त भारतीय ज्येनाच हे करतात
फक्त भारतीय ज्येनाच हे करतात असं नाही.
नुकत्याच अमेरिकावारीत बोस्टन, शिकागो विमानतळांवर हे पाहिलं.
घरातल्या पुढच्या पिढीने त्यांना नीट सूचना समजावून दिल्या तर चाकाच्या खुर्च्यांची संख्या अर्ध्यावर येईल.
Pages