हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
अभिजीत खांडकेकरhttps://www
अभिजीत खांडकेकर
https://www.youtube.com/watch?v=tZdO9oUY50s
इ. ११ वीत असल्यापासून म्हणून वृत्तनिवेदक असा कारकीर्दीस प्रारंभ. आज एक उत्तम निवेदक व अभिनेता.
अनेक रंजक किस्से. सुंदर आहे
किरण पुरंदरे यांची सुयश
किरण पुरंदरे यांची सुयश टिळकने घेतलेली मुलाखत. दोन भाग आहेत.
https://youtu.be/j22TUW8RWaU?si=iU3wmxjigwImkP4E
आणि
https://youtu.be/QfNaxKFrz6U?si=AFHO1u8WC_CXHCn5
अतिशय उत्तम मुलाखत.
थिंक बँक वरील डॉ.अभय बंग
थिंक बँक वरील डॉ.अभय बंग यांची मुलाखत चांगली आहे
त्याचं माझा साक्षात्कारी हृदयरोग वाचलं असेल तर आता त्याचे आरोग्य स्वराज्य नावाचं एक पुस्तक येत आहे. त्या निमित्ताने घेतलेली ही मुलाखत ! अर्थात मला आवडली.
दोन भागात आहे.
मी पहिला भाग ऐकला, दुसरा अजून बाकी आहे
https://youtu.be/HaXprCqXwvA?si=7sodkao8CIHUpmbn
नेत्रा फूड्सच्या नेत्रा
नेत्रा फूड्सच्या नेत्रा भालेराव यांची मुलाखत. चांगली आहे. यांच्याबद्दल माहिती नव्हते.
https://www.youtube.com/watch?v=MTIIS-gavXo
वावे थँक्स! किरण पुरंदरेंच्या
वावे थँक्स! किरण पुरंदरेंच्या मुलाखती केव्हाही ऐकू शकते.
व्हायफळ वर जितेंद्र जोशी मस्त
व्हायफळ वर जितेंद्र जोशी मस्त बोललाय!
https://www.youtube.com/watch?v=nZKokwXLrhM
एवढ्यातल्या एवढ्यात सर काही
एवढ्यातल्या एवढ्यात सर्व काही चॅनलवरच्या काही मुलाखती बघितल्या. डॉ. मंजिरी पुराणिक चांगले प्रश्न विचारतात असं लक्षात आलं आहे.
जनरली करियर माईंडेड बायका गेस्ट म्हणून आल्या की हमखास त्यांना वर्क लाईफ बॅलन्स, मुलांना वेळ देता का वगैरे प्रश्न हमखास विचारले जातात. पुरुषांना कोणीही विचारत नाही. ह्यात बदल व्हायला हवा.
@अस्मिता.
@अस्मिता.
ई-मेल मिळाली का ? इनबॉक्स किंवा spam?
विनायक रानडे
विनायक रानडे
ग्रंथ तुमच्या दारी हा उत्तम उपक्रम .
https://www.youtube.com/watch?v=twjjhac7BWA
India’s GDP Boom, Urban
India’s GDP Boom, Urban Crisis, Global Narrative Game & More | Sanjeev Sanyal | EP-375 : https://www.youtube.com/watch?v=u0TV6h2v2qE
संजीव सन्याल यांची स्मिता प्रकाश यांनी घेतलेली मुलाखत. फार स्पष्ट विचार आणि ते सहज मांडले आहेत. जुन्या ग्रंथातील वर्णनाप्रमाणे बनवलेल्या बोटीपासून ते देशाची, जगाची अर्थव्यवस्था संदर्भातली ही चर्चा फार उत्तम आहे.
जनरली करियर माईंडेड बायका
जनरली करियर माईंडेड बायका गेस्ट म्हणून आल्या की हमखास त्यांना वर्क लाईफ बॅलन्स, मुलांना वेळ देता का वगैरे प्रश्न हमखास विचारले जातात. पुरुषांना कोणीही विचारत नाही. ह्यात बदल व्हायला हवा. >>>> अगदी अगदी. यासंदर्भात एकदा सानिया मिर्झानं राजदीप सरदेसाईला असा प्रश्न विचारला म्हणून सडेतोड उत्तर दिलं होतं त्याची आठवण झाली. या भारतीय टेनिस सम्राज्ञीला "तू आता सेटल कधी होणार?" असा प्रश्न त्यानं विचारला होता.
ही मुलाखत नाही म्हणता येणार
ही मुलाखत नाही म्हणता येणार पण आज हे पाहिलं. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शाळांमध्ये नागरिकशास्त्रातही कचरा कसा वेगळा करावा, रिसायकलिंग वगैरे घालायला हवं असं वाटलं.
https://youtu.be/iLi76nuYYPw?si=uWEFkVHQXVQc2L3G
मित्र म्हणे वर संदीप रानडे
मित्र म्हणे वर संदीप रानडे यांची मुलाखत आली आहे. या चॅनेलवर मला आतापर्यंत सर्वात जास्त आवडलेली मुलाखत आहे ही.
उद्याचे लेखक घडताना-
उद्याचे लेखक घडताना- कार्यशाळा; गणेश मतकरी, निखिलेश चित्रे |
https://www.youtube.com/watch?v=xdUIgDeICdA
उद्याचे लेखक घडताना ही लेखकांसाठीची कार्यशाळा लोकसत्ता अभिजात लिटफेस्टमध्ये पार पडली. कथालेखक आणि चित्रपट समीक्षक गणेश मतकरी आणि कथालेखक व चित्रपट समीक्षक निखिलेश चित्रे यांनी या कार्यशाळेत होतकरू लेखकांना मार्गदर्शन केले
* संदीप रानडे यांची मुलाखत >
* संदीप रानडे यांची मुलाखत >>>> अ प्र ति म
आणि
शेवट तर अतिसुंदर . . . !!
शोभा डे एक्स्क्लुझिव्ह
शोभा डे एक्स्क्लुझिव्ह
जबरदस्त आऊटस्पोकन आणि सॉर्टेड बाई आहे. विचारांची क्लॅरिटी आहे. तिचे मला वाटते स्टारी नाईटस मी पूर्वी वाचलेले. ७७ वर्षांची वाटत नाही.
नुकतीच बीबीसी ने घेतलेली ए आर
नुकतीच बीबीसी ने घेतलेली ए आर रहमान याची मुलाखत पाहिली. ए आर रहमान हा अत्यंत बुद्धिमान संगीतकार आहे आणि त्याने संगीत देताना विशेषतः जगाच्या पातळीवर आपण भारताला मी प्रेझेंट करत आहोत याचे नेहमी भान बाळगले आहे. त्याने मुलाखतीत हा विचार अनेकदा बोलून दाखवला. किंबहुना त्याला त्याच्या वेशभूषा बद्दल सुद्धा प्रश्न विचारले गेले आणि त्यामध्येही त्याचा हाच एटीट्यूड होता. तरीही दुर्दैवाने आज त्याला त्याच्या धर्मावरून ट्रोल केले जाते आणि त्याने तो व्यथित झालेला आहे हे जाणवत होते मात्र तो कॅन ऑफ वम्स उघडण्याचा त्याने प्रयत्न केला नाही आणि मुलाखतीमध्ये खूप पॉलिटिकली करेक्ट उत्तरे दिली. त्याच्या बोलण्याचे परिणाम इतर संगीतकारांवर होऊ शकतात याचे भान त्याला असावे त्यातून त्याची नैसर्गिक मॅच्युरिटी दिसली. ए आर रहमान म्हणजे साचेबद्ध संगीताच्या चिखलामध्ये उमललेले नाविन्याचे प्रयोगाचे फुल. छवा या चित्रपटासाठी त्याला का विचारण्यात आले होते हे खरे तर मला कळाले नव्हते परंतु त्याला आपण ट्रोल होऊ याची जाणीव असावी आणि तरीही त्याने हा चित्रपट केला याबद्दल त्याचे कौतुक करावेसे वाटते. खरे तर अनेक मराठी जनांना या चित्रपटाचे संगीत अजय अतुल सारख्यांनी करायला पाहिजे होते असं वाटले आणि ए आर रहमान याने खूप अंडरवेलमिंग संगीत दिली आहे असेही. नंतर या मुलाखती मधले अतिशय सिलेक्टिव्ह रिल्स व्हायरल होताना अनेकांनी त्याला पुन्हा धर्मांतर करण्यास सांगितले आहे. मात्र संपूर्ण मुलाखतीमध्ये त्याने विवेकाचा पाया अजिबात सोडला नाही आणि तेवढ्यातून सुद्धा लोकांनी त्याला ट्रोल करण्याचा उद्योग केला. सुमारांची सद्दी सगळीकडेच आलेली आहे तरीही त्यांना पुरून उरून ए आर रहमान म्हणतो की त्याचा माणसातल्या विवेकावर आणि सर्वांच्यात दडलेल्या ह्युमिलिटीवर विश्वास आहे. हे तो मनापासून बोलतोय असं वाटत होतं. आणि सध्या तो वैश्विक संगीतामध्ये भारतीय संगीत आणि भारतीय संगीतामध्ये वैश्विक आणायचा त्यांना सांधण्याचा सतत प्रयत्न करत आहे किंवा स्वत्व न सोडता संगीतातली वैश्विकता शोधायचा प्रयत्न करत आहे. मुलाखत अतिशय आवडली. मुलाखत घेणारा ब्रिटिश भारतीय माणूस देखील अत्यंत मुद्देसूद नेमके आणि अभ्यासू प्रश्न विचारत होता त्यामुळे कुठेही टांगळमंगळ दिसली नाही.
Pages