हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
दूरदर्शन सह्याद्री - शोभना
दूरदर्शन सह्याद्री - शोभना समर्थ यांची अरुण जोगळेकर यांनी घेतलेली मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=Mu8RQABdneQ
ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी - दूरदर्शन सह्याद्री हे मराठी सरकारी टीव्ही चॅनेल
शोभना समर्थ सीतेच्या भूमिकेने प्रसिद्ध झाल्या. नूतन आणि तनुजाची आई आणि काजोलची आजी.
अरुण जोगळेकर स्वतः अभिनेता आणि बहुतेक दिग्दर्शक सुद्धा. सई परांजपेंशी विवाह. विनी परांजपे आणि गौतम जोगळेकर ही त्यांची मुलं.
बघतो..
बघतो..
जनहो परिसा रामकथा
चाळीची व्याकुळ विरह व्यथा!
याचे मूळ हे आहे तर!
She was such a badass woman.
She was such a badass woman.
दूरदर्शनवर ही मुलाखत जेव्हा कधी दाखवली असेल तेव्हा पाहिली होती.
त्यातलं काय लक्षात राहिलं असेल तर सीतेच्या भूमिकेत मला काय अभिनय होता ? मान एकदा अश्शी करायची आणि एकदा तश्शी करायची.
हिंदीत सहायक भूमिकेत असताना कॅमेरा कायम नायिकेच्या चेहर्यावर. माझी पाठच दिसायची. मग काय केलं ते त्यांच्याच तोंंडून ऐका.
अशी अनेक वाक्य आहेत त्या मुलाखतीत. सुंदर, मिश्कील , बिनधास्त स्त्री.
वडील लवकर गेले. मामांच्या आश्रयाला यायला लागलं. पण त्याबद्दल रडगाणं नाही. आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची नसली तरी पैसे मिळवण्यासाठी फुटकळ कामंही केली.
पाहिली, पाहिली. मस्त आहेत
पाहिली, पाहिली. मस्त आहेत शोभना अगदी. काहीच अभिनिवेश नाही, खूपच प्रामाणिक आहेत. मुलाखत दूरदर्शन सह्याद्रीची असल्याने अगदी अर्धा तासाची आहे. एकदम रिलॅक्सिंग आहे.
एकदा सीतेच्या रोलमुळे कश्मिर मधे कुणीतरी आपला फोटो देवघरात ठेवलेला पाहून आवडलं नाही, माणूस कुठे पूजनीय असतो वगैरे. शिवाय मी व्हिस्की, मटण घेते हेही बेधडक सांगितले तेव्हा. एका मोठ्या हिरोईन मुळे माझ्या वर कॅमेरा यायचा नाही, पाठीवर यायचा तर मी बॅक ओपन चोळ्या घातल्या सगळे माझ्याकडेच पाहायला लागले. भरपूर फ्लॉप दिले, मॉडर्न कपडे घालायचे, नलिनी जयवंतचे वडील मामा - त्यांच्या आश्रयाने राहताना काम करायला विरोध झाला म्हणून आईसहित वेगळे राहायला लागले. प्रभात, शांताराम, विजय भट, कुमारसेन समर्थ व सीतेच्या भूमिकेच्या आठवणी - छान सांगितले आहे सगळं. नूतन व तनू साठी दिग्दर्शन सुद्धा केले म्हणे. एकदम आधुनिक तरीही साध्या आणि प्रामाणिक वाटल्या. आत्मचरित्र लिहिणं अशक्य आहे म्हंटल्या कारण ते प्रामाणिक होऊच शकत नाही, सत्यच नसेल तर कशाला लिहायचे. हेही आवडले. त्या काळाच्या मानाने बिनधास्त वाटल्या.
सचिन पिळगावकर यांची एक हिंदी
सचिन पिळगावकर यांची एक हिंदी मुलाखत ऐकली आणि कधी नव्हे ते मला आवडली. दिग्दर्शक या अंगाने बर्याच गोष्टी, स्वतःची थॉट प्रॉसेस, कुठले कुठले सिनेमे बघावेत इत्यादी बर्याच गोष्टी ऐकायला आवडल्या. आतापर्यंत सचिन यांची अशी मुलाखत का बरं कुणी घेतली नाही!
सचिनने काही उत्तम काम केलेलीच
सचिनने काही उत्तम काम केलेलीच आहेत पण मी मी करत स्वत:च हस करुन घेतलय गेल्या काहि दिवसात.
मस्त आहेत शोभना अगदी. काहीच
मस्त आहेत शोभना अगदी. काहीच अभिनिवेश नाही, खूपच प्रामाणिक आहेत.>>>+१
त्यान्च्यातले सौन्दर्य , नजाकत, अभिनय गुण नुतन मधे आले...तनुजामधे तितकेसे आले नाही..पुढे काजोल वैगरे तर अगदीच ठोकळा. अभिनयाच्या नावाने नुसत फराफरा आणी टराटरा .
शोभना समर्थ यांची मुलाखत
शोभना समर्थ यांची मुलाखत आवडली. नो नॉनसेन्स बोलल्या आहेत. आणखी हवी होती वाटलं.
मी पण पाहिली, अमितव शी सहमत.
मी पण पाहिली, अमितव शी सहमत..
अमुक तमुक वर गिरिश कुलकर्णीची
अमुक तमुक वर गिरिश कुलकर्णीची मुलाखत मस्त वाटली.
अतिपूर्वी बघितलेली शोभना
अतिपूर्वी बघितलेली शोभना समर्थ यांची मुलाखत. परत बघायला हवी.
मला नूतन, तनुजा, काजोल तिघी आवडतात. प्रत्येकीचे आपलं वैशिष्ट्य आहे. अभिनयात नूतन उत्तमच, आवाजही चांगला तिचा, matured. तनुजात अवखळपणा, अल्लडपणा जास्त होता. तशा भूमिकेला ती योग्य न्याय द्यायची. नूतनची अवखळ भूमिका तेरे घर के सामने मध्ये होती, छान केलीय तिने पण तिला जास्त अशा मिळाल्या नाहीत.
काजोल पण अवखळ, अल्लड. मी फार थोडे चित्रपट पाहिलेत तिचे पण त्यात अभिनय चांगला केलाय तिने.
अजून एक चतुरा नावाची मुलगी आहे शोभना यांना, ती या क्षेत्रात नाही पण सेम तनुजा सारखी दिसते.
मला त्यांच्या घराण्यातला मोहनिश बहल आणि त्याची बायको एकताही आवडतात.
झिम्मा पुस्तकातही विजया मेहता यांनी या सर्वांचा उल्लेख केलाय बहुतेक. या फॅमिलीशी आणि नलिनी जयवंत यांच्याशीही त्यांचं नात होतं काहीतरी.
मला पूर्वीचा सचिन आवडतो. महागुरू झाल्यापासून मी मी जास्त झालं, मग कंटाळा येऊ लागला.
नलिनी जयवंतचे वडील मामा होते
नलिनी जयवंतचे वडील मामा होते म्हणे यांचे. तरीही त्यांनी सिनेमात काम करायला आडकाठी का केली कळाले नाही. कारण त्यांची स्वतःची मुलगीच होती की याच क्षेत्रात.
अ. ल. भागवत म्हणून एक आध्यात्मिक विषयांवर लिहिणारे जुने लेखक होते. आता त्यांची पुस्तकं छापली जात नाहीत इतके जुने. त्यांची तीन पुस्तकं माझ्याकडे होती. त्यापैकी एक बहुतेक मनोबल व स्वसंमोहन यावरचे, त्यात शोभना समर्थ यांची धाकटी मुलगी बरीच आजारी होती, सगळे उपाय चालू होते व यांना संमोहनशास्त्र वापरून बरं करायला बोलावले होते असा उल्लेख आहे. तनुजा असावी, नावं नव्हती कारण तेव्हा त्या फारच लहान होत्या. पण शोभना समर्थ यांच्या घरी जायचे दडपण आले होते कारण नट्यांचे वागणे, दारू पिणे वगैरे उच्छृंखल वाटते पण प्रत्यक्षात त्यांना फार चांगला अनुभव आला, घरातील वातावरण खूप चांगले होते. लोक आदराने बोलत होते, घरात तत्त्वज्ञान व अशाच सखोल विषयांवरची पुस्तकं मोठ्या शेल्फवर मांडून ठेवली होती. त्यामुळे त्यांचे मत बदलले व हे पाहून छान वाटले असे लिहिलेले वाचले आहे.
छान पोस्ट अस्मिता.
छान पोस्ट अस्मिता.
अस्मिता, एकच मामा असतील असं
अस्मिता, एकच मामा असतील असं नाही ना?
विजया मेहतांचं आधीचं आडनाव
विजया मेहतांचं आधीचं आडनाव जयवंतच होतं असं मला आठवतंय.
भरत हो. समहाऊ तो उल्लेख तसाच
भरत
हो. समहाऊ तो उल्लेख तसाच वाटला मुलाखतीत.
थॅंक्यू अन्जूताई, तू लिहिलेल्या चतुरा बद्दल अजिबात माहीत नव्हते.
हो, वावे.
वावे हो. विजया जयवंत, खोटे,
वावे हो. विजया जयवंत, खोटे, मेहता.
अस्मिता खूप वर्षांपूर्वी ई (आता कलर्स मराठी नाव) tv वर नूतन बद्दल एक कार्यक्रम होता त्यात आलेली चतुरा, मी एकदम अवाक इतकी तनुजा सारखी दिसते.
थॅंक्यू अन्जूताई, तू
थॅंक्यू अन्जूताई, तू लिहिलेल्या चतुरा बद्दल अजिबात माहीत नव्हते.>>> त्याना मुलगा पण होता/आहे जयदीप.
हो मुलांचं वाचलेलं कुठेतरी,
हो मुलांचं वाचलेलं कुठेतरी, विसरले होते. थँक्स प्राजक्ता.
>>>>>>>पुढे काजोल वैगरे तर
>>>>>>>पुढे काजोल वैगरे तर अगदीच ठोकळा. अभिनयाच्या नावाने नुसत फराफरा आणी टराटरा .
काजोल अति एक्स्ट्रोव्हर्ट वाटते. शी नीडस टु टोन डाउन. फार फ्लॅशी रंग आहे तिच्या व्यक्तिमत्वाला. त्यामुळे इतर लोकं फिके पडतात विच इज नॉट ऑलवेज गुड. सर्व सूरांचा मिळुन ऑर्केस्ट्रा असतो. एकच सूर वाढुन बसला तर कॅकोफनी होते, विरस होउन बसतो.
नूतनचे डोळे फार सुंदर आहेत. विशेषतः सीमा मधील, 'तू प्यारका सागर है' मधील डोळ्यांतून तिने केलेला अभिनय.
नूतन समर्थ यांची मुलगी होती
नूतन समर्थ यांची मुलगी होती आणि बाकी दोन मुली आणि एक मुलगा दुसऱ्या नवऱ्यापासून होते असे वाचलेले आठवतेय. नूतन आणि बाकी भावंड यामध्ये वयाचे अंतरही असावे कदाचित.
माझी फार फार आवडती शोभना
माझी फार फार आवडती शोभना समर्थ. तशी सीता कधीच झाली नाही पुढे. मुलाखत नक्की पहाणार. थँक्स भरत.
नुतन देखील फारफार आवडती.
Pages