हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. 
धन्यवाद 
अस्मिता.
जपानी लोक भारताबद्दल काय
जपानी लोक भारताबद्दल काय विचार करतात ?
एका जपानी मुलीने हिंदीतून दिलेली ही मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=_kwoWYI2MOY
सविता प्रभुणे
सविता प्रभुणे
"टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही! टीव्हीला मरण नाही".
पुन्हा मराठी नाटकांमध्ये येण्याची इच्छा
https://www.youtube.com/watch?v=0KHVu8g2mQI
गिरीश कुलकर्णी आणि आदित्य
गिरीश कुलकर्णी आणि आदित्य सरपोतदार यांची सकाळ ने घेतलेली मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=Dt11W4EoGB4
मराठी चित्रपटांच्या भवितव्याबद्दल दोघांची मतं.
एक जबरदस्त मुलाखत पाहिली.
एक जबरदस्त मुलाखत पाहिली. अतिशय परीणामकारक आहे. १९९० मधे काश्मिरमधला एक तरूण आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी इतर काश्मिरी तरुणांसोबत पाकीस्तानात जातो. पाकीस्तानात आणि मग अफगाणिस्तानात दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधे ट्रेनिंग घेतो. मनातून तो दहशतवादी नाहीये. हे जीवन त्याला खटकत राहतं आणि पुढे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. हे सर्व अनुभव, प्रसंग प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या तोंडून ऐका.
In this Body to Beiing episode, Captain Mushtaq shares his extraordinary journey from being a Pakistani spy to becoming a proud Indian soldier. A tale of courage, patriotism, and transformation, his story reveals the strength of character and resilience that define true bravery.
From the shadows of espionage to the honor of serving the nation, Captain Mushtaq opens up about the challenges, sacrifices, and life-changing decisions that shaped his path. His experiences shed light on the meaning of loyalty, identity, and what it truly takes to wear the uniform with pride.
Discover how he overcame fear, betrayal, and hardship to embrace a higher purpose, protecting the nation he now calls his own. With raw honesty and heartfelt reflections, Captain Mushtaq inspires us to see beyond borders and understand the deeper values of courage, sacrifice, and unity.
This episode is a must-watch for anyone seeking stories of resilience, patriotism, and the indomitable spirit of a soldier.
HE FOOLED WHOLE PAKISTAN | India's Double Agent | Capt. Mushtaq Ahmad Bhat - https://www.youtube.com/watch?v=mnFGEJtZqFg
स्मॄतीगंध -कविता कृष्णमूती
स्मृतीगंध -कविता कृष्णमूती
त्यांच्या प्रेमात पडलो मी! प्रेझेंन्स ऑफ माईंड, सेन्स ऑफ ह्युमर, आणि तीक्ष्ण बुद्धी! असंख्य किस्से आहेत, आणि प्रत्येकातून काय शिकल्या इ. काय भारी सांगितलं आहे! केवळ मजा आली! इतकी मोठी गायिका किती नम्र आणि सहज, अप्रोचेबल, खेळीमिळीत बोलते. ऐकाच! फुल रेको!
नोटेड.
नोटेड.
दिवाळीत मृदूला दाढे यांची
दिवाळीत मृदूला दाढे यांची राजीव खांडेकरांनी माझा कट्टावर मुलाखत घेतली आहे. गाण्यांतील सौंदर्यस्थळं त्यांनी फार छान उलगडली आहेत.
आरपार वुमन की बात मध्ये देवकी
आरपार वुमन की बात मध्ये देवकी पंडित.
मला देवकी पंडित फार आवडतात. एक सच्चा निखळ स्वर आणि अनअपोलोजेटिक खर्या व्यक्ती वाटतात. मुलाखतीतही अगदी प्रांजळ बोलल्या आहेत. ऐकुन छान वाटलं.
अमित +१. मी अर्धवट ऐकली, पण
अमित +१. मी अर्धवट ऐकली, पण सेम अनुभव.
एका हिंदीभाषिक व्यक्तीची ही
एका हिंदीभाषिक व्यक्तीची ही मुलाखत फार रोचक आहे. प्रश्नकर्ता पण चांगला आहे. काहीही अघळपघळ न बोलता योग्य तितकाच बोलला आहे. ज्याची मुलाखत आहे तो नमन जैन तर मस्तच कुठेही न अडखळता बोलला आहे.
https://youtu.be/jDmFQVRwJqc
नेहेमीप्रमाणे नंदु मुलमुलेंचा
नेहेमीप्रमाणे नंदु मुलमुलेंचा उत्तम पॉडकास्ट!
https://www.youtube.com/watch?v=yFWUXTbDlZ4
https://youtu.be/N4unT8YRk58
https://youtu.be/N4unT8YRk58?si=xLhhxeoUSUOboj4H
अवश्य बघा, निखिल टिपणीस म्हणून एक केटरर आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, अंबानी, विधान भवनातले सरकारी कार्यक्रम तसेच लग्न समारंभाची जेवणाची व्यवस्था ते बघतात. एवढ्या लोकांची मॅनेजमेंट, मेन्यू प्लॅनिंग, सादरीकरण वगैरे बाबत खूप विचार करून केटरिंग करतात. नक्की बघा. एक मराठी माणूस ह्या क्षेत्रात एवढा पुढे गेला आहे, महाराष्ट्रीयन पदार्थांना लोकप्रिय करतोय म्हणून खूप अभिमान ही वाटला.
नक्की बघा.
ममो, विकेंडलाच पाहिली आणि
ममो, विकेंडलाच पाहिली आणि भयंकरच आवडली.
रीटा चौधरी यांनी घेतलेली
रीटा चौधरी यांनी घेतलेली झूबिन गर्ग ची शेवटची मुलाखत पाहिली.खरे तर मुलाखत म्हणता येणार नाही ईतके अनौपचारिक संभाषण होते ते. English subtitles आहेत. झुबिन खूप ओपन अप झालाच नाही. पण जितके बोलला ते ऐकून आवडले
निखिल टिपणीस म्हणून एक केटरर
निखिल टिपणीस म्हणून एक केटरर आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, अंबानी, विधान भवनातले सरकारी कार्यक्रम तसेच लग्न समारंभाची जेवणाची व्यवस्था ते बघतात.
>>>> मी याचे शॉर्ट्स पाहिले आणि आवडले. एकदम अनझयुमिंग शैलीत बोलला आहे तो.
एकदम भारी धागा आहे हा.
एकदम भारी धागा आहे हा.
इथे वाचून मी ते पॉडकास्ट बघते.
इथे reco देणाऱ्या सर्वांना धन्यवाद
निखिल टिपणीस म्हणून एक केटरर
निखिल टिपणीस म्हणून एक केटरर आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, अंबानी, विधान भवनातले सरकारी कार्यक्रम तसेच लग्न समारंभाची जेवणाची व्यवस्था ते बघतात. एवढ्या लोकांची मॅनेजमेंट, मेन्यू प्लॅनिंग, सादरीकरण वगैरे बाबत खूप विचार करून केटरिंग करतात. नक्की बघा. एक मराठी माणूस ह्या क्षेत्रात एवढा पुढे गेला आहे, महाराष्ट्रीयन पदार्थांना लोकप्रिय करतोय म्हणून खूप अभिमान ही वाटला.>>+१ ममो मलाही मुलाखत आवडली. मुलाखत घेणारी मात्र कधीकधी डोळे मोठे करत विचित्र एक्सप्रेश्न देते असं वाटलं
बर्याच दिवसांनी रणवीर चा
बर्याच दिवसांनी रणवीर चा पॉडकास्ट पूर्ण पहिला https://youtu.be/eL-zU-XMNB4?si=mVHB-d5DwDWcg7qo पोरगी छानच बोलते Ai बद्दल जे बोलली ते पटले.
>>>>निखिल टिपणीस म्हणून एक
>>>>निखिल टिपणीस म्हणून एक केटरर आहेत
कौतुक आहे. पहाते. आमचे आडनावबंधू दिसतात.
सोनाली नवांगुळची मुलाखत.
सोनाली नवांगुळची मुलाखत. नक्की बघा आणि दिव्यांग हा शब्दप्रयोग थांबवा.
https://youtu.be/FuBAChGH3Zs?si=RjBw4CJpeQ9amG7Y
मिपावरती एक सोनाली नवांगुळ
मिपावरती एक सोनाली नवांगुळ होत्या ज्यांची एक कविता मला अफलातून आवडते. त्या याच आहेत का?माहीत नाही.नात्यांना नाव द्यायचं नसतं. काही नाती अनामिकच असतात आणि त्यांना तसेच राहू द्यावे या अर्थाची कविता होती. सॉरी त्यांचे नाव - सोनल कर्णीक वायकुळ होते.
मुलाखतीचे अंश पाहीले. जबरदस्त मुलाखत दिसतेय.
बघतो.
बघतो.
दिव्यांग शब्द मला ही आवडत नाही. ती कोणाची ओळख कशी असेल आणि कुणाला संबोधताना त्या व्यक्तीच्या शारीरिक चेकलिस्टने काय संबोधतात असं वाटतं. जसं लंगड्या, काण्या म्हणणे (किंवा म्हणत नाही) तसेच दिव्यांग. फक्त संस्कृतोद्भव इतकाच फरक. त्या काय म्हणाल्या आहेत ते ऐकतो. त्यांचं ऑस्कर पिस्टोरिअसचे आत्मचरित्र ( ऑलिंपिक कॉन्ट्रोव्हर्सी आणि मग खूनी बनण्यापूर्वी) वाचलं होतं. मध्यरात्रीनंतरचे तास आणलं आहे पण अजुन वाचलेलं नाही.
मुलाखत ऐकतो.
(No subject)
दिव्यांग शब्द >>

हो दिव्यांग हा शब्द खटकतोच.
हो दिव्यांग हा शब्द खटकतोच.
फाविदडी, परत युद्ध मंत्रालय
फाविदडी, परत युद्ध मंत्रालय झालं हो!
मला मंत्रालय हा शब्दच खटकतो.
मला मंत्रालय हा शब्दच खटकतो. मंत्री+आलय अशी संधी करायची तर ई चा य व्हायला पाहिजे, म्हणजे मंत्र्यालय. मंत्रालय म्हणजे मंत्राचं घर - हे म्हणजे वेदपाठशाळा, मंदिर वगैरे गोष्टींचं नाव झालं.
अरेच्चा, हा मुलाखतीचा धागा आहे होय! चुकून इथेच पेट पीव्ह पडला.
हॉगवर्टसला किंवा प्रो.
हॉगवर्टसला किंवा प्रो. फ्लिटविकच्या चार्म क्लासला मंत्रालय म्हटलं पाहिजे का?
और एक चुकून
(No subject)
फाविदडी, परत युद्ध मंत्रालय
फाविदडी, परत युद्ध मंत्रालय झालं हो! Lol>>> Defence ministry चे नामांतर झाले?? कधी?? 😲
सोनाली नावांगुळ ची मुलाखत
सोनाली नावांगुळ ची मुलाखत feed मध्ये आलीं होती. बघायची आहे.
मी त्यांचं लिखाण कधी वाचल नाही (मिळालं नाही): पण fb वर बऱ्याच वेळेला (सत्कार वगैरे होताना चे फोटो बघितले होते).
त्यांचा बरोबर अजून एक नाव असाच समोर आलं. एक अतिशय सुंदर आणि भिडणारा लेख वाचून त्या लेखकाची माहिती मिळवली.
सचिन वसंत पाटील साधारण तिशीतील लेखक, शेतकरी कुटुंबातील शेती करणारा मुलगा - वयाच्या १९ व्या वर्षी पाठीवर नगर पडून पाय निकामी झाले. त्यानंतर काही काळातच त्याने सर्व एनर्जी / लक्ष लेखनाकडे वळवलं. आज त्यांची अनेक पुस्तकंही आहेत. मला वाटत पाठ्यक्रमात/BA la वगैरेही आहेत.
आपल्या दुःखावर फक्त मातच नाही केली तर एक स्फूर्तिदायक जीवन घडविले आणि जगतायत.
Pages