मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवराई स्किझोफ्रेनियावर होता का? बहुतेक. मी असे काहीतरी ऐकल्याचे स्मरते. त्यामुळे मी पहाण्याचे धाडस केले नाही. तेच इंग्रजी ब्युटिफुल माईंड चे ही. नाही झेपणार.

देवराईत तो बेडवरून उठतो आणि खाली पावलं ठेवल्यावर देवराईतला पाचोळा खाली दिसायला लागतो आणि तो पायाने चुरला जातो तो प्रसंग आठवला. भन्नाट आहे ते प्रकरण.

देवराई स्किझोफ्रेनियावर होता का? >>>
हो. हे, सगळेच सिनेमे कशाशी तरी जोडलेले आहेत. (क्लोजर, ॲक्सेप्टंस, अवेअरनेस) पण मी पाहिलेला नाही.
अल्झायमर विषयी पण फार सुरेख टिप्पणी केली आहे सुकथनकर यांनी (अस्तु) -
झेन तत्त्वज्ञानात जसे 'या क्षणात राहा' म्हणतात, तसेच अल्झायमरच्या पेशंटला भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतो, त्याला वर्तमानकाळातच राहावे लागते. मेंदूने सगळे पुसून टाकलेले असते. अस्तुत आगाशे स्मृतीभ्रंशांने हत्तीच्या मागेमागे जातात व हत्ती हे चांगल्या स्मरणशक्तीचे प्रतिक आहे. ते अजून बोललं असते तर ऐकायला आवडलं असतं.

सुमित्रा भावे यांच्या चित्रपटांवर व संहितांवर- त्यांची त्या मागची विचारप्रक्रिया यावर चर्चा असलेला भाडिपाचा पॉडकास्ट पाहिला>>> तो आल्याचं कळलेलं बघायचा राहिलाय.

https://youtu.be/HbiSoMie8R4?si=Exh9j0zaOXLuW0Ar

ज्येष्ठ रसायन शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर यांची दिलखुलास मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी बोल भिडूच्या 'वन टू वन' या सदरात घेतली आहे.
एक सुंदर मुलाखत.
जवळ जवळ दोन तासांची आहे. पण इतके विषय मांडलेत की वर्थ पाहणं.
अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व!
१. साताऱ्यात १९५० च्या सुमारास आपली तत्व म्हणून मं सू. कुंकू न लावताही छान संसार करणारी; १० मुलांना वाढवणारी बाई
२. त्या काळात पूर्ण आस्था असणारा अगदी वर्षातून दोनदा पारायण करणारा अत्यंत आस्तिक नवरा अन पूर्ण नास्तिक बाई यांचा अतिशय गुण्यागोविंदाचा संसार. अन मुलांना वाढवतानाची अत्यंत मोकळीक
३. एक भाऊ वैद्यकीय डॉक्टर असून वेद अन आधुनिक फिजिऑलॉजीतले साम्य जगभर सांगणारा. अन दुसरा अंधश्रद्धा निर्मुलन करणारा. अन तरीही दोघांच्यातला एकमेकांना आहे तसं स्विकारायचा समंजसपणा
४. हे सगळं सांगणारा तिसरा भाऊ- ज्याची ही मुलाखत
५. नेहरु आणि भाभा आणि सुरुवातीच्या सगळ्यांचे अथक अन जेन्युईन प्रयत्न प्रत्यक्ष घेतलेले अनुभव
६. बहिणींचे पीएचडी डॉक्टर होणं
७. अनेक भाचे- पुतण्यांचे प्रतिथयश होणं
८. टेक्स्टाईल रिसर्च अन प्लान्ट मधले अनुभव
९. रिसर्च सेंटर्स मधली सुरुवातीची परिस्थिती अन आता त्यात माजलेल् सावळे गोंधळ
१०. कोटा मधले ट्रान्सफर ऑफ इंडस्ट्रीयल चेंजेस
११. इथल्या IITज ची उभारणी, वाढ अन आताची परिस्थिती - कारणं
१२. पेटंट्स मिळवणे आणि टिकवणे
१३. भारतातील एशियाड - तेव्हाची आपली स्थिती अन आताचा दर्ज
१४. पहिला उपग्रह अन तेव्हाचा किस्सा
१५. इथली औषधे निर्जंतुक करणे - श्रीराम इंडस्ट्री
१६. स्वत:च्या नावावर १० पेटंट आहेत हे इतक्या सहजी सांगणं
१७. अंटार्टिकात भारताने रिसर्च का सुरु केला याची कारणं
१८. अनेक बाबतीत शंकास्पद विवादास्पद बाबतीत चर्चा वाद न घालता त्यावर उपाय शोधणं अन पुढे होणं - अंटार्टिकातील घरांचे पेंटस तयार करणे. तिथे जाऊन काम रिसर्च करणे. तिथले अनुभव.
१९. एक वेगळे पेटंट पहाडी विभागातील लाकूडकाम करणाऱ्या कलाकारांसाठी तयार केलेली लेअर
२०. पेटंटस ची बेसिक तपशीलवार माहिती - पेटंट लिटरसी- जाताजाता सहज देणं. अन त्यातल्या धक्कादायक गंमती
२१. पारंपरिक समाज जीवनाचे फायदे तोटे. अन विवेकानंदांचे विचार (हिंदु धर्मावरची मतं) तपशीलांसह
२२. दिल्लीतले जीवन, वातावरण
२३. वेगळ्या वाटेवरच्या काही लोकांची उदाहरण म्हणून दिपक गद्रेंची माहिती - पुन्हा धक्कादायक
२४. बहिणी -धनंजयराव गाडगीळांच्या हाताखाली २४ व्यी वर्षी पीएचडी. रयतमधे. २६ व्या वर्षी पहिली कॉमर्स कॉलेजची पहिली स्त्री प्रिन्सिपल. पण लग्नानंतर बाय चॉईस प्रिन्सिपलसिप सोडली
खेळणं, शिक्षण सगळ्यात पुढे
एक एस एन डिटीत प्रिन्सिपल
अजून एक बहिण प्रचंड हुषार वक्तृत्व
२५. कुटुंब व्यवस्थेवर मत, कुटुंब ट्रस्ट कल्पना. कुटुंबातील विश्वास अन मोकळेपणा. घर उभं करायचं तर एकमेकांचे वेगळे विचार सहजी स्विकारणं
२६. बदलत्या जीवनपद्धतीबाबत सजगता.
२७.अन हे सगळं करून लेखनही केलं - तेही किती विविध नावावरूनही समजेल : प्रमुख पुस्तके 'शोध स्वामी विवेकानंदांचा', 'संघ समजून घेताना', 'प्रकाशवाटा', 'न उजवीकडे न डावीकडे' आणि 'दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कविता', 'ढगांमागून गडगडत' (बालगीतसंग्रह)

२८. अन हे सगळं सांगताना अत्यंत साधेपणाने सोपं करून सांगणं. हसतखेळत, नर्म विनोद अन मोकळे ढाकळेपणा.
२९. मुलाखतकर्त्यानेही अतिशय तारतम्य पाळलय. गरज तितकच बोलणं
३०. शेवटाकडे एक संदर्भ जरा कळला नाही.

एकदम डिटेल माहिती Happy मुलाखत इंटरेस्टिंग दिसते.

"नर्मदे हर" हे पुस्तक यांनीच लिहीले ना? त्याबद्दल आहे का काही?

अरे हो की! थॅंक्स

दत्तप्रसाद दाभोळकरांचेही नर्मदा परिक्रमेबद्दल काही आहे का? डोक्यात ती लिंक बसली आहे.

हो फा. त्यांनी नर्मदेवरही लिहिलय, फक्त वेगळा अँगल
'समग्र माते नर्मदे' (नर्मदा बांधविरोधी आंदोलनावरील पुस्तक)
अमित अरे इतकी सुंदर मुलाखत पण इतकी मोठी तर सहसा बघणार नाहीत. म्हणून तपशील लिहित गेले तर जरा जास्तच लिहिलं

अवलताई _/\_ मुलाखतीचा इतका सुंदर तपशीलवार आढावा घेतला आहेस. नक्की ऐकणार आहे मुलाखत.
मुलाखतकाराच्या तारतम्याविषयी वाचून विशेष बरे वाटले.

अवल, इथे सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद. नक्की बघेन. दत्तप्रसाद दाभोळकरांचं विवेकानंदांबद्दलचं लेखन आणि वादविवाद गेली काही वर्षे दिवाळी अंकांत आणि वृत्तपत्रांत वाचतोय.
---
ललित प्रभाकरचा पॉडकास्ट

मला सुमित्रा भावे आणि सुकथनकर यांचा एकही सिनेमा आवडत नाही. वास्तुपुरुष जरासा बरा वाटला पण इतर सगळे यथातथाच आहेत.

दत्तप्रसाद दाभोळकरांनी जर तिसऱ्या वाक्याला विवेकानंदांचे नाव काढले नाही तर तो फाऊल धरतात. परंतु हा माणूस ऐकायला अतिशय लाघवी आहे. स्पष्टवक्ता आहे. कोहेरेंट बोलणे सगळ्यांनाच जमत नाही मात्र दाभोलकर अगदी सहज बोलतात.

त्यामुळे त्यांच्या मुलाखती आवडतात. विवकेकानंद थोडे शॉर्ट करून घ्यावे लागतात.

>> अस्तुत आगाशे स्मृतीभ्रंशांने हत्तीच्या मागेमागे जातात व हत्ती हे चांगल्या स्मरणशक्तीचे प्रतिक आहे. <<

असला बटबटीत काँट्रास्ट आणायचा अतिशय बेकार हट्ट असतो त्यांचा. शिवाय तो का आणला हे लिहून देखील सांगतात त्यामुळे ते आणखी डोक्यात जातात.

https://youtu.be/4qD-Do2yWq4?si=BDwclMNRxXfIc0X7

हा एक शाहू पाटोळे यांचा पॉडकास्ट ऐकला.

सुरुवातीला काही लोकांबद्दल आदर वाटतो. तुम्ही त्यांचे एक लॉयल फॉलोवर होता आणि त्यांची पुस्तके विकत घेऊन वाचता कारण तुम्हाला काहीतरी नवीन मिळत असते, मराठीत तशा परस्पेक्टिवची वानवा असते ती कसर कुणी भरून काढत असेल तर फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही थोडीफार मदत करू इच्छिता म्हणून.

नंतर तोच माणूस आपले मातीचे पाय दाखवून सोशल मीडियावर कचकचून हगतो एखड्यावेळेस. तेव्हा तुम्हाला बेनिफिट ऑफ डाउट सुद्धा देता येत नाही इतका वाईट हगतो. मग तुम्ही त्यांचा सगळा दंभ किंवा मुखवटा खूप काळजीपूर्वक तपासता आणि त्यांचे कडवट टीकाकार बनता. शिवाय त्यात मत्सर देखील मिसळतो.

या पाटोळेंच्या बाबतीत माझे तसे झालेले आहे.

मुळात पुस्तक लिहिणे ही एक कष्टप्रद गोष्ट आहे आणि पाटोळे डॉक्युमेंटेशन देखील करू शकतात आणि खरोखर त्यात eye opening कंटेंट आहे.

माझ्या घरासमोर रस्त्यापलीकडे मोठी मांग वस्ती होती.

मांगांची दुरपदा आमच्या घरी कायम परडी घेऊन यायची आणि कोरडयास घेऊन जायची. तिच्या घरी खायची प्रचंड वानवा होती हे आता कळते. शिक्षणाबद्दल प्रचंड अनास्था. शाळा वगैरे सगळे फुकट असून, प्रबोधन वगैरे होत असूनही त्यांच्यात तशा अपवर्ड व्ह्यायच्या प्रेरणाच नसत हे मात्र मला स्पष्ट पणे आठवते. माझी आजी बऱ्यापैकी वट राखून होती त्यामुळे दूरपदेला स्वयपाकघरातदेखील बाजूच्या दाराने प्रवेश होता म्हणजे तिचा विटाळ केला जात नसे. ती अतिशय मायाळू होती आणि तिच्या तोंडून कधीही काहीही 'वंगाळ' बाहेर पडले नाही. तिचा काळा कुळकुळीत चेहरा आणि पांढरेशुभ्र भरघोस केस अजूनही आठवतात.

मला जेव्हापासून कळते तेव्हापासून त्यांच्यातल्या कुणाला मी जनावर ओढताना पाहिले नाही. त्यांनी काठवटे करायचा पारंपरिक व्यवसाय करताना मात्र पाहायचो. त्यानंतर तागाचे दोरखंड करणे. नंतर सेंट्रिंगची कामे करणे. अतिशय कष्टाळू लोक. आणि व्यवसायासाठी लवचिक.

एकदा मी गच्चीवर दुपारी खुर्चीवर बसून कसले तरी पाठांतर करत होतो. समोर बदामाच्या झाडाखाली गचपणात एक दोन अडीच वर्षांची मुलगी नाग चावून तडफडून तोंडात फेस येऊन मेली. ती तिथे खेळत होती तेव्हा मी तिला बदाम खाऊ नको पोट दुखेल असे म्हणून वरती बसलो. अर्ध्या पाऊण तासात ती गतप्राण होऊन पडली होती. तिला नाग/नागाचे पिलू चावले हे नीट कळले देखील नव्हते. तसेच अजून एका लहान मुलीचाच मृत्यू समोरच्या एका छोट्या घरात पाहिला. मुलीला ताप आला होता म्हणून ती खेळून आता झोपायला गेली. तिचा ताप खूप वाढत होता मात्र तिच्या आईला काय करावे सुचत नव्हते. दवाखान्यात देखील तिला घेऊन जायचे तिला शक्य झाले नाही कारण काहीच वाहन नव्हते आणि समोरच्या एका नालायक रिक्षा वाल्याने नकार दिला होता. इतर कुणी तिला मदत करेल अशी अपेक्षा नव्हती. ताप उतरेल असे तिने तिच्या बुद्धीने काही तरी केले असावे मात्र संध्याकाळी चारच्या सुमारास तिच्या घरातून किंचाळ्या ऐकायला आल्या. ती अस्तिशय कोवळी चुणचुणीत चारेक वर्षाची पोर तापात निघून गेली होती. या घटनेने मला प्रचंड धक्का बसला होता. पण मीही तेव्हा खूप लहान होतो/

मी त्यांना वयाची ३० वर्षे पाहत आलो पण ते काय खातात हे मला कधीही कळले नाही.

आता त्यांच्यातले खूप जण आरक्षण आणि इतर चांगल्या गोष्टीमुळे नोकरी, प्राथमिक शिक्षकी, डॉक्टरकी करत आहेत आणि थोडीफार सुबत्ता त्यांच्यात आली आहे. मात्र त्यांचे मूळ खाणे त्यांनी कधीच टाकून दिले आहे असे दिसते.

मला आठवते त्याप्रमाणे त्यांच्या लग्नात रेडकू वगैरे असायचे त्यामुळे आमच्यातले कुणी लग्नात खायला जात नसे मात्र लग्न अटेंड करत असत. येऊन अंघोळ करत. त्यांचे खाणे असे सगळे ऐकीव आहे. त्यामुळे पाटोळे यांचे पुस्तक मला महत्त्वाचे वाटते.

अर्थात आमच्या घरी घोरपडीपासून, रानडुकरे हरणे आणि मोरापर्यंत सर्वकाही शिजले आहे. मासे तर आठवड्यातून चार दिवस असत आणि फ्रीजमध्ये कंदूरीला येणाऱ्या बोकडांच्या काळजाचे तुकडे कायम असायचे. (कारण आमच्याकडे ग्रामदैवत असलेल्या एका मोठ्या पिराची पूजा होती!!) तरीही त्यांच्या खाण्याविषयी आमच्या लोकांना बरीच अढी होती.

पाटोळे यांच्या पुस्तकाबद्दल सायली राजाध्यक्षांचा लेख वाचला होता. तेव्हापासून कुतूहल होते.
जिथे शाकाहार की मांसाहार यावरून भ्रामक श्रेष्ठत्वाच्या कल्पना असतात तिथे मम वर्गात गावकुसाबाहेरच्या वस्तीचा आहार हा तिरस्काराचा विषय ठरल्यास नवल नाही. फार पूर्वी प्रा. वैजनाथ कळसे यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकातून आणि उर्मिला पवार यांच्या आयदानमधून थोडीशी कल्पना आली होती. त्यामुळे शाहू पाटोळे यांचे पुस्तक महत्वाचे डॉक्युमेंटेशन ठरेल असे वाटायचे. अजूनही पुस्तक वाचायचे आहेच.

पण कधी कधी असे वाटते की समाजाला एखादा मोठा धक्का बसेल असे लिहिणारे स्वप्रतिमेत गुंतत जातात आणि रिलेव्हंट राहण्यासाठी उगीचच काहीतरी प्रक्षोभक वागणे/बोलणे याचा आसरा घ्यावा लागतो. असे काही झाले नसावे अशी अपेक्षा.

मात्र त्यांचे मूळ खाणे त्यांनी कधीच टाकून दिले आहे असे दिसते.
>>>>
त्यांचे मूळ खाणे अभावग्रस्ततेतून आलेली कोंड्याचा मांडा करण्याची प्रवृत्ती होती ना? आर्थिक सुबत्ता आल्यावर अभिजनांचे अनुकरण करणे ही सहज प्रवृत्ती आहे ना? शिवाय समाजात वावरताना तुमच्या आहाराचा तिरस्कार होत असेल तर तो लपवण्याकडे कल असणार.

ज्येष्ठ रसायन शास्त्रज्ञ दत्तप्रसाद दाभोळकर यांची दिलखुलास मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी बोल भिडूच्या 'वन टू वन' या सदरात घेतली आहे. >>> बघितली.
आवडली.
अवल इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

दत्तप्रसाद दाभोळकरांचे लेख आवडायचे. बरेचसे 'अंतर्नाद'मध्ये वाचलेले. 'समग्र माते नर्मदे' ही वाचलंय. आवडलं होतं तेही खूप. 'राजधानी इंद्रप्रस्थ' बहुतेक संपूर्ण वाचून झालं नाही. पण इंदिरा गांधी हत्येनंतर उसळलेल्या दिल्लीतल्या दंगलींचं वर्णन अंगावर काटा आणणारं होतं.हे आठवतंय. मुलाखत ऐकायला हवी. अवल, धन्यवाद इथे लिंक दिल्याबद्दल. गोषवारा वाचला नाहीये. मुलाखत ऐकल्यावर वाचते Happy

Screenshot_20250909_180409_WhatsApp.jpg

नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244

मलाही कुतुहल होतं पाटोळ्यांच्या पुस्तकाबद्दल.

>>> अभिजनांचे अनुकरण करणे ही सहज प्रवृत्ती आहे ना? शिवाय समाजात वावरताना तुमच्या आहाराचा तिरस्कार होत असेल तर तो लपवण्याकडे कल असणार.
दुर्दैवी आहे, पण खरं आहे. आर्थिक परिस्थितीच्या प्रभावाबद्दल मी साशंक आहे - कोंड्याचा मांडा करून खाण्याची निकड तथाकथित सर्वर्णांतही होतीच. पण त्यांना एकतर सामाजिक उतरंडीत मानाचं स्थान होतं आणि शिक्षणामुळे डॉक्युमेन्टेशनचं महत्त्व कळलं. वर आलंय तसं ते छापवून आणणं वगैरे तर अधिकच दुरापास्त बाब.

गजेंद्र अहिरेला प्रतिभावंत म्हणणे हे प्रचंड धाडसाचे काम आहे. .
अत्यंत टुकार दर्जाचे भिकार आर्टसी सिनेमे, प्रामुख्याने अनुदान लाटण्यासाठी केलेले असे वाटतात. म्हणजे आव काहीतरी आर्टसी समांतर केल्याचा आणायचा मात्र लो बजेट शीट कुठल्यातरी फिल्म फेस्टिव्हला डायव्हर्सिटी साठी डायव्हर्सिटी म्हणून निवड होतील असे चित्रपट.

हा आणि तो अनंत महादेवन एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा.

मित्रम्हणे वर अमिर खान चा जावई नुपुर शिखरे ची मुलाखत ऐकली.
फार मस्त माणूस आहे. तो आणि त्याची आई फेमस आहेत इन्स्टा वर. एकदम मस्त ममव रिल्स असतात. नुपुर सुद्धा एकदम डाऊन टू अर्थ वाटला. अमिरचा जावई होण्यात त्याला मिरवण्यासारखं काहीच नाहीये याची त्याला जाणीव आहे. मजेशीर किस्से सांगितले आहेत. तो लग्नाला बनियन, शॉर्ट्स वगैरे घालून पळत गेला याची स्टोरी पण मस्त. मुलाखत अशी नाही म्हणता येणार, गप्पा वाटल्या. सौमित्र त्याला प्रश्न विचारत होता पण हा एकदम कॅज्युअल बोलत होता.

https://www.youtube.com/watch?v=yKtqZQ68vBQ

Pages