मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही मुलाखत बघितली. आजिबात आवडली नाही. संन्यास घेतला म्हणजे नक्की काय सोडलं? काय तत्व अंगिकारली वगैरे स्पष्ट झालं नाही. अत्यंत यशस्वी डॉक्टर, मग काय घरी राहून साधना. मग काय डी.वाय. पाटलांनी भेटण्यासाठी अर्धा तास वेळ दिली होती, पण म्हणे नऊ तास मिटींग चालली. (बऱ्याच मुलाखतीत मोठ्या व्यक्तीने थोडा वेळ कार्यक्रम ऐकेन किंवा भेटेन असं सांगून बराच वेळ देणं, हा कॉमन आयटेम असतो!) मग डी वाय विद्यापिठाचं काम, मग काय आश्रम.

मित्र म्हणे पॉडकास्टने ही मुलाखत नक्की का घेतली? असं वाटलं. त्या डॉक्टरांच्या प्रमोशनसाठी असेल, तर मग ते पॉडकास्ट बघायला नको.

मीही कुतुहलाने थोडा वेळ पाहिली ती मुलाखत, पण माझा भयंकर संताप झाला! एक नंबर भंपक दिसतो तो माणूस!

मी सकाळ पासून थोडी थोडी ऐकतोय ती मुलाखत. पॉईंट काय आहे तेच अजुन समजलेलं नाही. १५ ब्रांचेस होत्या हे ५० वेळा तरी ऐकलं.
एकुणच डोकं फिरलं माझं. भंपक! अजिबात आवडली नाही मुलाखत.

अभय देओल होस्ट करत असलेला ड्यूरेक्स पॉडकास्ट इन्टरेस्टिंग वाटतो आहे. सेक्स या भारतियांत काहीशा टॅबू असलेल्या विषयाबद्दल मोकळी चर्चा. मी देवदत्त पट्टनाइक आणि वरुण ग्रोवर पाहुणे आलेत तो एपिसोड ऐकला, चांगला आहे.

तसंच अनुपमा चोप्राने घेतलेली पंकज त्रिपाठीची मुलाखत चांगली आहे. त्याचे स्वच्छ सॉर्टेड विचार, शांतपणे आणि शुद्ध हिंदीत ते मांडण्याची हातोटी आवडते. कधीकधी वाटतं प्रोफेसरच व्हायचा हा माणूस!

पंकज त्रिपाठी बाबत अनुमोदन. स्वच्छ, शांत, शुद्ध हिंदी तर आहेच, शिवाय काही सिद्ध करायची धडपड नाही, भारावून जाणं नाही. कुणाला कमी किंवा जास्त लेखणं नाही. तरीही व्यवस्थित इंटरेस्ट दाखवतो समोरच्या माणसाच्या बोलण्यात आणि अकृत्रिम देहबोली आहे.

मी हजार पोस्टी झाल्यावर या धाग्याचा भाग दोन काढून त्यात मुलाखतींशिवाय ऑडिओ पॉडकास्ट, चर्चा आणि टेड टॉक यांचाही अंतर्भाव करणार आहे. आताही येऊ द्या पण ऑफिशयली. Happy

>>>>मी हजार पोस्टी झाल्यावर या धाग्याचा भाग दोन काढून त्यात मुलाखतींशिवाय ऑडिओ पॉडकास्ट, चर्चा आणि टेड टॉक यांचाही अंतर्भाव करणार आहे.
उत्तम संकल्प. इंग्रजी पॉडकास्टस आणि टेड टॉक जास्त आवडतात. मराठी नॅह!! समहाऊ नाही आवडत.

पंकज त्रिपाठीची मुलाखत फारफार आवडली. किती आरस्पानी व्यक्तिमत्त्व आहे. काहीही आडपडदा न ठेवता, प्रांजळ, इनोसंट, इट इज व्हॉट इट इज .. बॅगेज कॅरी न करणारी मुलाखत आहे.
मजा आली! Happy

मुलाखत म्हणजे एकाने विचारायचे आणि दुसऱ्याने उत्तरे द्यायची याचा कालांतराने कंटाळा येऊ शकतो. म्हणून एक वेगळा प्रयोग आदित्य ओक आणि मिलिंद जोशी यांनी केलेला आहे
https://www.youtube.com/watch?v=RPNAfeDWCh8&t=1193s

दोघेही एकमेकांशी गप्पा मारतात अशा स्वरूपात हा कार्यक्रम आहे. 1990 नंतर संगीत क्षेत्रात झालेले विविध बदल आणि त्यांचा रसास्वाद.

https://www.facebook.com/share/r/1DthvAXhu7/

कोण आहेत या मुली?
तुझं Childhood कसं‌ होतं? तू कुठे बॉर्न झाली?!
ही मराठीची गळचेपी म्हणायची की ईंग्लिशची..!


सचिन कुंडलकर

https://www.youtube.com/watch?v=Gy3kb1HabFY&t=81s
कोबाल्ट ब्लू पासून मोनोक्रोमपर्यंतचा लेखनप्रवास
पुस्तकांची अन्य भाषात झालेली भाषांतरे
पुस्तक भाषांतर यंत्रणा स्थापन करण्याचा मनोदय.

>> कोण आहेत या मुली?
तुझं Childhood कसं‌ होतं? तू कुठे बॉर्न झाली?!>> लोल. असंच मराठी आता चालवून घ्यायला हवं.

गुरिंदर चड्ढा (बेंड इट लाईक बेकहॅम, ब्राईड अँड प्रिज्युडाईज, ब्लाईंडेड बाय द लाईट इ.), मीरा नायर (मान्सुन वेडिंग, सलाम बाँबे, मिसिसिपी मसाला, कामसुत्र इ.) आणि दीपा मेहता (फायर, अर्थ, वॉटर, मिडनाईट चिल्डन इ.) यांची लंडन मध्ये घेतलेली मुलाखत ऐकली.
मुलाखत घेणारी अजिबात चांगली नाही, पण या तिघीजणी इतक्या दिलखुलास (दीपा मेहता तितकी नाही) बोलतात की मजा आली बघुन.
गुरिंदर चड्ढा फारच आवडली. त्यांच्या न बघितलेल्या फिल्म्स (आणि बघितलेल्या ही परत) बघेन आता.

https://youtu.be/sAHR3TxcTQ4?si=EVuzk-FmCSlrs8EA

यावर्षीच्या पुलोत्सवात सई परांजपे यांची दिलीप प्रभावळकर यांनी घेतलेली मुलाखत. त्यांना यावर्षीचा पु.ल. स्मृती सन्मान मिळाला. त्यांचं नेहमीचं दिलखुलास बोलणं ऐकायला मिळतं या मुलाखतीत. माझ्या बहिणीने ही मुलाखत पुण्यात प्रत्यक्ष बघितली होती.
२००६ च्या पुलोत्सवाच्या फार रम्य आठवणी आहेत माझ्या. त्या वर्षी गुलजारांना हा सन्मान मिळाला होता. त्या निमित्ताने त्यांची मुलाखत, त्यांचे चित्रपट (बहुतेक यातला फक्त इजाजत मी पाहू शकले होते), याशिवाय काही शॉर्ट फिल्म्स (गुलजारांच्या नव्हे, इतर) बघायचा आनंद घेतला होता.

हेच लिहायला आले होते वावे.
सई परांजपेंना ऐकणं फार उत्तम अनुभव असतो. त्या ८५ पुढे असाव्यात ना? किती सुस्पष्ट, शुद्ध मराठी. उत्तम स्मरणशक्ती.

वावे, सय मध्ये न आलेलं काही नवीन आहे का त्या मुलाखतीत? सईला कितीही वेळा ऐकता येईल म्हणा. पण आवर्जून आताच ऐकायचं तर नवं असलेलं बरं.

फिल्म फेअरने घेतलेल्या त्यांच्या मुलाखतींचे अंश फेसबुक रील्स म्हणून दिसत होते?

सयमधे न आलेला पुलंचा खांडेकरांसंबंधित एक विनोद आहे Happy आणि शेवटी त्यांनी 'नांदा सौख्यभरे' नाटकातले संवाद म्हटले आहेत. ते भारी आहेत!
बाकी सुरूवातीला दिलीप प्रभावळकरांनी पुलं आणि सई परांजपे यांच्यातली साम्यं छान सांगितली आहेत आणि सई परांजप्यांनी, काय वेगळं आहे तेही सांगितलंय.
फार मोकळं, दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे सई परांजप्यांचं. त्यांचं लेखन वाचतानाही जाणवतं. बारीकसारीक गोष्टींचं खूप मनापासून कौतुक करतात आणि त्याबरोबरच जे खटकतं, तेही सांगून टाकतात. स्वतःच्या, एकंदरीत असामान्य घरात झालेल्या जडणघडणीचा रास्त अभिमानही आहे, पण त्याचं काही दडपण त्यांनी कधी घेतल्याचं जाणवत नाही. जागतिक पातळीवरच्या सिनेमा-नाटकं-पुस्तकांचा व्यासंग आहे, पण मराठीचाही तितकाच आहे. अस्सल, दर्जेदार मराठी भाषा वापरतात बोलताना-लिहिताना.
वर्षा, हो. दिलीप प्रभावळकरच ८० चे आहेत आता. त्या ८५ + नक्कीच.

मुलाखत आवडली. ह्या मुलाखतीत "मला शाब्दिक कोट्यांचा विनोद आवडत नाही, अगदी पुलंचा असला तरी" हे परखडपणे मांडणं सईच करू जाणे. नाहीतर पुलं म्हटल्यावर कुठल्याही विनोदाला हसलंच पाहिजे असा नियम असल्यासारखे लोक वागतात.

Sai Paranjpye (born 19 March 1938)
Paranjpye!!
Dilip Prabhavalkar (born 4 August 1944)

शब्दिक कोट्या आवडत नाहीत " इथं पर्यंत ठीक, पण नंतर पुलंचे नाव घ्यायचे काय कारण. आपला विनोद त्यापेक्षा काही वेगळ्या दर्ज्याचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न.
बाकी पुलं बद्दल कोणीतरी नकारात्मक बोलत आहे तर आपणही हात धुऊन घ्यावेत असे काही लोक करतात.

Pages