मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत इतिहास संशोधन मंडळाचे गजानन मेहेंदळे यांचं व्याख्यान >>> हे ऐकते आहे. धन्यवाद अमित! इन्टरेस्टिंग आहे.
मुस्लिम सुलतानांनी हिंदू देवळे, मूर्ती, स्त्रीया यांच्यावर अत्याचार केले याच्यावर काहीशी रंगसफेदी करण्याच्या>>>> आश्चर्य म्हणजे अशी रंगसफेदी काही हिंदू इतिहासकारांनीदेखिल केल्याचे म्हटले आहे.

हपा, अरे सही! कुठे बघितलीस? इथे २३ मार्च म्हणजे कालच होता अशी जाहिरात दिसते आहे.
तू टीव्हीवरच पाहिलीस का? कुठे आहे का उपलब्ध?
या कार्यक्रमातील इतर भाग बघतो. बरेच दिग्गज लोक आलेले दिसत आहेत. धन्यवाद!

गरिबीमुळे लैंगिक शोषणास लहानपणीच सामोरे जावे लागलेल्या आणि पुढे बारबाला झालेल्या
वैशाली हळदणकर
वास्तवदर्शी. . .

https://www.youtube.com/watch?v=wn6EKQTY0oA

ही बारगायकेची मुलाखत जवळपास पाऊण बघितली. तिची देहबोली वेगळी वाटली. अस्वस्थता, सतत ओढणीशी चाळा, रुमालाने ओठ पुसत रहाणे.... बोलण्यात पण बरेच वेळा नेमकेपणा नाही. संदर्भ सोडून बोलत जाणे.
एकंदरीत ती थकलेली, आजारी (शारीरिक+मानसिक) वाटली. मुलाखत बघताना मलाच नंतर अस्वस्थ वाटल्याने बंद करून टाकली.

Submitted by अमितव on 23 March, 2025 - 07:43
ही आणि कुमार सरांनी दिलेली लिंक बघायला अजून मुहूर्त नाही मिळाला. बघेन पण सध्याचे फीडस मॅनेज करावे लागतील.

ऋतुजा भट या व्हॉईस ओव्हर कलाकाराची मुलाखत आवडली. या क्षेत्राबद्दल उत्सुकता आहेच.
तिने काही काही गोष्टी छान उलगडून सांगितल्या आहेत. मुलाखतकाराकडे दुर्लक्ष केलेले बरे.
https://www.youtube.com/watch?v=AT2X5ExQiYE&t=1100s

जोश टॉक हा टॉक शो आहे. म्हणजे एखादा येऊन स्वतःबद्दल बोलतो.
त्यामुळे या धाग्यावर ही लिंक दिली हे चुकलेच. काल वेळ मिळाला नाही यामुळे डिलीट करता आले नाही.

स्मिता पाटील आशा भोसलेंबद्दल बोलताना, जुनी मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=bftddoWTSpE

अद्भुत ! अद्भुत !! अद्भुत !!!
वयाच्या ७१ व्या वर्षी पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास. फक्त एव्हढंच नाही तर कुठल्या परिस्थितीत केला ते सगळंच अद्भुत, थक्क करणारं आणि प्रेरणादायी आहे.
https://www.youtube.com/watch?v=qh4L34IGcgk

हे सर मायबोलीकर असावेत असा अंदाज आहे. भेटायला नक्की आवडेल, पण त्यापूर्वी त्यांचा हा व्हिडीओ आमच्या सर्कल मधे शेअर करण्याची परवानगी द्यावी ही विनंती.

वैशाली हळदणकर यांची वुमन की बात मध्ये मुग्धा गोडबोलेने मुलाखत घेतली आहे.
वैशालीताईंनी बारबाला पुस्तक लिहिलंय आणि त्या बारबाला व्यवसायात होत्या. वेगळीच आणि डोकं सुन्न करणारी मुलाखत आहे. रिलेटच न करता येणारी पण काळिज हलवणारी. त्या एकुण जीवनाबद्दल इ. काय जे बोलतात त्याचा आपण आपल्या उच्चशिक्षित फ्रेम ऑफ रेफरंस मधुन विचार केला तर अनेक गोष्टी पटत नाहीत, न्हवे बाराच्या भावात काढू आपण! पण त्या जे बोलताहेत ते क्षण तो इनोसंस... त्या असं का बोलत असतील.. एक हुषार स्त्री आहे, ते बोलणे हेच त्यांचं कवच तर नसेल.. असे सगळे विचार आले आणि माझे डोळे पाणावले.
मुग्धा गोडबोलेने फार उत्तम मुलाखत घेतली आहे. जरुर ऐका.

छान पोस्ट अमित. मी ट्रेलर पाहिले होते. प्रत्येकाला स्पर्शाची भूक असते वगैरे असं म्हटलेलं ऐकलं. पण फार अंगावर येईल असं वाटून पाहिलं नाही.

मैत्र हे शब्द सुरांचे कार्यक्रमात डॉ राधिका जोशी हिची मुलाखत आली आहे. राधिका ओळखीची असल्याने जास्त आत्मीयतेने प्रतिक्रिया देत आहे.

अर्थशास्त्रात PhD आणि सामाजिक विषयात संशोधन करून पुढे त्यांचा अंतर्भाव शास्त्रीय संगीतात करणारी - ही राधिकाची विशेष ओळख आहे. तिने सामाजिक विषयांवर बांधलेल्या नवीन बंदिशी, त्याशिवाय लहान मुलांना शिकवता येतील अशी गाणी - जी बडबडगीते नाहीत आणि अवघड बंदिशीही नाहीत, वेगवेगळ्या थीम्स घेऊन त्यांवर आधारित शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम - असे वेगवेगळे प्रयोग राधिका करते. एकूण मुलाखत नक्की बघावी अशी आहे. मुलाखतकार विघ्नेश मला आवडतो. तो स्वतः गोविंदराव पटवर्धन यांचा शिष्य असला तरी त्याचं पूर्वज्ञान मुलाखतीच्या आड येऊ देत नाही. सामान्य प्रेक्षकांना पडतील असे साधे आणि नेमके प्रश्न विचारतो आणि त्यातले काही मिश्किल पण असतात. युट्यूबवर ही मुलाखत आलेली आहे.

वरच्या रेकोमुळे आधी टाळलेली बारबाला - वैशाली हळदणकर यांची मुग्धा गोडबोलेने घेतलेली मुलाखत पाहिली. हळदणकर यांना 'बारबाला' शब्द आवडत नाही म्हणून मीही कचरत होते पण हा कसा आला हे त्यांनीच मुलाखतीत सांगितले आहे. त्यांचे आत्मचरित्र ह्याच नावाने प्रसिद्ध आहे. आपल्यापेक्षा प्रचंड वेगळ्या, असुरक्षित आणि शोषित गटाशी आपण अजिबातच रिलेट होऊ शकत नाही. एक प्रिव्हिलेज्ड माईन्डसेट तयार होतो. असं कुठं असतं का ? किंवा बार बंद व्हायलाच हवेत, तेथे चांगल्या घरच्या स्त्रिया नुसतं बसायला सुद्धा जात नाहीत. अशा लोकांशी संबंध ठेवू नयेत ई ई. एकाच जगात छोटीछोटी जगं तयार होतात, त्यात इवल्याशा खिडक्या करून आपण 'त्यांना' दुरून बघतो. आपपरभाव फक्त जातीभेदानेच न येता प्रत्येक वेगळेपणातून येऊ शकतो. तो शोषित गट असुरक्षित होण्यामागे पांढरपेशा लोकांचीही जबाबदारी असते. त्याही ह्या शब्दात नाही पण असेच काहीसे विस्कळीत बोलल्या आहेत. विद्वान पण शोषित. अगदीच लहानपणापासून लैंगिक शोषणाच्या बळी, तेही पोटाची भूक भागविण्यासाठी कुणाच्या तरी विकृतीस बळी पडणं. आईवडिलांचे मुलीकडे पूर्ण दुर्लक्ष, वडिलांना आपली मुलगी अभद्र वाटणं, घरात हेळसांड. वडील गायक आणि वैशाली स्वतः गोड गात असूनही कसलेही प्रशिक्षण नाही. एखाद्या माणसाचे हाल तरी किती व्हावेत.

घरातील वातावरणामुळे पंधराव्या वर्षी प्रेग्नंट होऊन लग्न होणं. नवराही मारझोड करणारा, संशय घेणारा. पदरी विशीच्या आत दोन मुलं. उत्पन्नाचा कसलाही आधार नाही. मग कुणी कुणी - पुरुषांनी परिस्थितीचा फायदा घेऊन उपभोग घेत रहाणं. अन्नपाणी नसल्याने गोड गळ्यापायी बारमधे गायला लागणं. बारबाला शिक्का बसणं. पुढे तिथले राजकारण, ओशोंची दिक्षा, मस्कत मधे जाणं, मुलाचा ऑटीझम आणि दुर्दैवाने दोन्ही मुलांचा मृत्यू. हे सगळं पाहूनही कुणालाच दोष न देता समाजाला जबाबदारीची जाणीव हवी एवढंच म्हणणारी. सगळे आनंद मी मानत होते फक्त गाण्याचा आनंद मला मानावा लागत नाही तो आपोआपच होतो हे त्यांचे वाक्य अतिशय भिडले.

मला नवीन कळालेल्या गोष्टी म्हणजे - डान्सबार बंद झाले तेव्हा डान्स बार वेगळे होते. माझा समज म्हणजे सिनेमात आयटम नंबर बघून झालेला होता. ह्या फक्त तेथे गायला जायच्या. ते बंद झाल्याने अशा प्रकारच्या सर्व्हिसेस देणाऱ्या सर्व मुलींना देहविक्रय करून उदरभरण करावे लागले. डान्सबार मधे चांगल्या घरच्या स्त्रिया बघायला सुद्धा यायच्या नाहीत. प्रत्यक्षात तिथल्या मुली साध्याच होत्या. हे सगळं बघून आपण मुलगी म्हणून किती प्रोटेक्टेड आणि प्रेमाच्या वातावरणात वाढलो आहोत, नशीबाने जे मिळते ते नसते मिळाले की किती दुर्दशा होऊ शकते हे लागले/ भिडले. चांगल्या घरच्या मुलींना सगळा समाज थोडाफार प्रोटेक्ट करत असतो, तेच नसेल तर कुणीही तिचे शोषण करू शकते. जे हेल्दी समाजाचे लक्षण नाही.

छान पोस्ट अमित. मी ट्रेलर पाहिले होते. प्रत्येकाला स्पर्शाची भूक असते वगैरे असं म्हटलेलं ऐकलं. पण फार अंगावर येईल असं वाटून पाहिलं नाही.>> +१
अस्मिता पोस्ट वाचली, बघेल मुलाखत..

गुलझार यांच्या नजरेतून लता आणि तिची गायकी. गुलझार मस्त दिलखुलास बोलले आहेत. त्यांच्या मार्मिक बोलण्याने कधीकधी मुलाखतकार थोडासा गोंधळून जातो पण त्याने कमी बोलून गुलझार यांना बोलते केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=Wtoz95TCPPU

अमुकतमुकचे टॅबू विषयांवरील चर्चेसाठी खुसपुस नावाचे वेगळे सदर(?) आहे. त्यातली डॉ शिरीषा साठे आणि ॲड शाहीन शिंदे यांची विवाहबाह्य संबंध आणि लग्न संस्था यावरील चर्चा पाहिली. सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला आहे, काही गोष्टी सोप्या पद्धतीने उलगडून सांगितल्या आहेत. हिंदू कायद्याप्रमाणे ॲडल्टरी (विवाहबाह्य/ चोरटे संबंध) आणि बायगामी (एकापेक्षा जास्त विवाह एकाच वेळी)म्हणजे नक्की काय , ते का होऊ शकतात. त्या सगळ्याच्या बदललेल्या व्याख्या. परिस्थितीनुसार बदलत गेलेली आयाम चर्चिले आहेत. मला इंटरेस्टींग वाटली, बऱ्याच वेळा आपल्याला समाजात नक्की काय घडत आहे ते एका वकीलाच्या आणि एका मनोविकारतज्ज्ञाच्या दृष्टीने माहितीच नसते.

लग्न ही संस्था आधीपासूनच एक deficit पद्धतीचे मॉडेल आहे. सर्वजण, सर्वकाळ सुखी होतील किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील असे ते कधीही नव्हते. त्याचा कणा पितृसत्ताक कुटुंबपद्धतीतून आला आहे. त्यामुळे स्त्रियांना जास्त तडजोड करणे व आजीवन करत रहाणे या पायावर तो उभा आहे. माणूस टोळीने शेती करायला लागून, माझं मूल नक्की माझंच असावं या सिस्टीम पायी लग्नसंस्था तयार झाली. ज्या क्षणी हे कृत्रिम कुंपण तयार झाले, त्या क्षणी कुंपणाबाहेरचे जगही तयार झाले. कारण मनुष्यप्राणी मुळात मोनोगॉमस नाही, त्याचा मेंदू, मन व शरीर हे एक पॉलिगॉमस मॉडेल आहे.

सुरवातीला कर्व्यांनी म्हटलं तसं लग्न म्हणजे "बऱ्याच स्त्रियांसाठी उपजीविकेचे साधन" होते. आता परिस्थिती बदलली तशी अपेक्षा बदलल्या व सध्याच्या काळात जे प्रचंड एक्स्पोजर सोशल मीडिया मुळे मिळतेय, त्यामुळे या आधी स्त्री- पुरुष कधीही अशा प्रकारच्या प्रॉक्झिमिटीत आलेले नव्हते. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. एकुणच अव्हेलेबिलीटी, ॲक्सेसेबिलीटी याने घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विवाहबाह्य संबंधांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात व्हर्चुअल सेक्स किंवा इन्टिमसी सुद्धा येण्याची शक्यता असते. हे सगळे प्रतारणेचेच प्रकार असले तरी याला चारित्र्याशी न जोडता, स्वीकार वाढवून ही एक सुधारणेला भरपूर वाव असलेली सिस्टीम आहे. तुम्हाला याचे फायदे हवे तर कमिटमेंट करणं आणि नियम पाळणे अध्याहृत आहे. मला चर्चा आवडली, रिअलिस्टीक आहे व काळाशी धरून आहे. त्या स्वतः म्हणाल्या 'सोवळे ठेवले उतरवून आणि ओवळे सापडेना' अशी समाजाची अवस्था आहे. त्यामुळे संस्कृतीशी न जोडता सद्यस्थिती नुसार काय करणं योग्य असायला हवं याचा उहापोह आहे.

अस्मिता छान ओळख करून दिलीस. मी ऐकणार नाही पण एका वाक्यातलं सार आवडलं.
-- तुम्हाला याचे फायदे हवे तर कमिटमेंट करणं आणि नियम पाळणे अध्याहृत आहे.

मित्र म्हणे :
जोरदार आर्थिक प्राप्ती असलेल्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी घरी राहून बारा वर्षांसाठी संन्यास (?) घेतला आणि आता यातून पुन्हा 'बाहेर' येऊन आश्रम चालू आहे. गोंधळात टाकणारी आणि वादग्रस्त मुलाखत.
मुलाखतकाराचे प्रश्न डॉ च्या उत्तरांपेक्षा अधिक आवडले.

https://www.youtube.com/watch?v=0UVvYv9bGy

Pages