क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*India and Australia's WTC final scenarios:*

If India win MCG Test but draw the series 2-2 with Australia's win in Sydney, India will finish their WTC cycle with a total of 126 points and a 55.26 PCT. Australia can, however, overhaul India with two draws or at least one win in Sri Lanka. The same case will be followed if Australia win in Melbourne but lose in Sydney.

If India draw MCG Test and win in Sydney, they will finish the WTC cycle on 130 points with a 57.01 PCT. Australia must then beat Sri Lanka 2-0 to qualify for the WTC final.

If India lose the Melbourne Test but manage to salvage a draw in Sydney, they Rohit Sharma and co will end up with 118 points. However, Australia would have overhauled this by the end of the series.

If India play out draws in both Melbourne and Sydney, they will finish with 122 points and a 53.50 PCT. Australia will then be required to beat Sri Lanka at least in one match to pip India and qualify for the final.

जिंकताहेत कसले?!
Draw केली तर नशीब.
शर्मा, रहुल, कोहली गेले! आता बघू पंत, जडेजा, रेड्डी, सुंदर काय करतात ते.

मेलबोर्नला भारताचा व त्याहूनही मोठा माबोवर भाऊचा पचका होणार असं लक्षण दिसतंय ! Wink

अहो, मॅच बघायला लवकर उठणार होता, ते मॅच बघतांच झोपलात कां !!!ajaari.JPG

*पंत ने पुन्हा विकेट फेकली.* - +१ ! समोर जयस्वाल इतकं छान समयोचित खेळत असताना, सामना वाचवायला प्रयत्नांची शर्थ करणं पंतची जबाबदारी होती. अक्षम्य ! तो गेला, जडेजा ..गेला ...!!

“ पंत ने पुन्हा विकेट फेकली” - एक संपूर्ण सेशन शहाण्यासारखं खेळल्यावर, ऑस्ट्रेलियाला थोडं बॅकफूटवर ढकलल्यावर इतका आततायी शॉट का मारला पंतने? तिथून पुढे तीन विकेट्स गेल्या Uhoh

गिल जुरेल सरफराज ⬅️ आत
शर्मा कोहली पंत ➡️ बाहेर

असा संघ सिडनी साठी निवडण्याचा विचार निवडसमितीने 'गंभीर' पणे केला पाहिजे !

Submitted by बोकलत on 29 December, 2024 - 13:57>>> साष्टांग दंडवत _/\_ Rofl

भारतीय संघ त्यांच्या फॉर्म नुसार आणि लौकीका नुसार खेळला, दुसरा परिणाम अपेक्षितच नव्हता. काही लोकांचा अपेक्षाभंग होऊ शकतो

वॉशिंग्टन सुंदर आणि जयस्वाल वगळता इतर सहा खेळाडूंनी बरोबर ११० चेंडू खेळलेत, जितके पंत ने खेळले आहेत.... भारतीय संघाने खेळलेल्या एकूण ४०५ चेंडूंपैकी ११० चेंडू...जवळपास २५%... एका चेंडूवर फटक्याची निवड चुकली असेल तरी इतर १०९ चेंडूमधे चांगल्या चेंडूंचाही सामना त्याने यशस्वीपणे केलाच ना? ज्यावर इतर रथी-महारथींनी नांग्या टाकल्या? त्याने निदान त्याचा वाटा उचलला, इतरांचे काय?? ते तिर्थटनाला गेले आहेत का ऑस्ट्रेलियाला? हीच ती भारतीय मानसिकता खरा कलप्रिट/ मूळ कारण शोधायच्या ऐवजी स्केपगोट पकडायचा प्रत्येक ठिकाणी...अगदी खेळापासून कॉर्पोरेट ऑफिसेस पर्यंत जो परफॉर्मन्स देतो त्याच्याकडूनच अधिकची अपेक्षा आणि त्यालाच खडे बोल. Angry

चिते की चाल, बाझ की नझर और बोकलत का क्रिकेट ग्यान कभी संदेह ना करो कभी भी मात दे सकते है.

पिंट्याला बोलले चेंडू दे.
ऑस्ट्रेलिया खेळाडूंना वाटलं झालं मॅच ड्रॉ.
वर बघितलं. खाली बघून चेंडू आशीर्वादीत केला आणि पिंट्या स्टार्कला बोलले जा फेक.
आणि जसं फेकलं तसं हे विकेट फेकत गेलं.

आज टी ब्रेक पर्यंत सामना पाहिला आणि नंतर ऑफिसला गेलो. कामात बिझी झालो. थोड्यावेळाने पाहिले तर सहा विकेट झालेल्या. ज्यात पंत गेला होता. थोड्यावेळाने आठ विकेट पाहिल्या. थोड्या वेळाने नऊ आणि मग सर्वबाद पाहिला. जणू किती विकेट गेल्या हेच चेक करायला स्कोअर बघत होतो.

पंतने बेजबाबदार फटका मारला अशी चर्चा ऐकली. अजून पाहिला नाही तो. कारण हायलाईट बघायची इच्छा गेली आहे.
पण याचे आश्चर्य वाटले. कारण लंच नंतरच्या पूर्ण सेशन मध्ये त्याने एकही चुकीचा फटका मारला नव्हता. किंबहुना यशस्वी बरेच वेळा संयम सोडताना दिसला होता पण त्याने राखला होता. तरी सेशन संपता संपता दोन आक्रमक शैलीच्या खेळाडूंनी आज वेगळा खेळ केला म्हणून दोघांचे कौतुकच वाटले होते.

पण हा खेळ असाच आहे. एक चुकीचा फटका, किंवा एक चुकीचा टाकलेला चेंडू, किंवा एक सोडलेला झेल, किंवा एका चुकीने झालेला रन आऊट तुम्हाला हिरोचे थेट व्हीलन बनवतो.

पुढच्या सामन्याच्या आधी ३१st आणि न्यू इयर आहे हे खूप चांगले आहे.
तोपर्यंत आज खराब झालेला मूड चांगला होईल.
अजूनही मालिका संपली नाही. अजूनही तिचा निकाल लागला नाही.
अजूनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपण गमावली नाही.
अजूनही शेवटचा सामना जिंकून ती राखू शकतो.
फक्त सोशल मीडिया बंद करून या पराभवातून बाहेर येत परफॉर्म करायची गरज आहे. फ्लॉप खेळाडूंना परत फ्लॉप जाऊ द्या. ते पडतील संघाबाहेर आपल्या कर्माने. पण बूमराह यशस्वी रेड्डी यांच्या सोबत जे जे परफॉर्म करायची क्षमता राखतात त्यांनी पुन्हा नव्या जोमाने लढायला सज्ज होण्याची गरज आहे.

humne 5 aurton ke chehre pe dove lagaya aur 5 aadmiyon ko rohit sharma ke retirement ki jhoothi khabar di, aadmiyon ke chehre pe zyada rangat thi

Cp

सोशल मीडियावर कोहली आणि शर्मा याना ट्रोल करणाऱ्यांना सध्या ऊत आला आहे.

पर्सनली मला सुद्धा असे वाटते की रोहीत आणि कोहली दोघे जर पुढच्या सामन्यात खेळले नाही आणि त्या जागी गिल आणि सरफराज किंवा जुरेल आत आले तर ते संघासाठी योग्य राहील.

पण कदाचित तसे होणार नाही. कारण आपल्याकडे अशी पद्धत नाहीये.

पण जर असे होणार नसेल तर आता यांनीच आता या अपयशातून उठायला हवे. आणि इतर कोणाला उत्तर द्यायला नाही तर स्वताला सिद्ध करायला खेळायला हवे. अभी नही तो कभी नही असे समजून खेळायला हवे.

पुढच्या मॅच साठी माझा संघ:
इस्वरन, पड्डिकल, गिल (c), सर्फराज, नीतीश, जुरेल (wk), कोटियन, सुंदर, हर्षित, आकाश दीप, प्रसिध

*पुढच्या मॅचला बुमराहला बाहेर बसवायला हवं …………. उगाच अपेक्षा वाढवून ठेवतो* - Wink
खरंच त्याची दया येते, आपले फलंदाज त्याचे मौल्यवान बळी असे पायदळी तुडवताना बघून !! Sad

*पण जर असे होणार नसेल तर आता यांनीच आता या अपयशातून उठायला हवे* -
गेल्या कसोटीतील माझा भाबडा वाटणारा आशावाद नेमका रोहित व विराट यांच्या याच संभाव्य वृत्तीवर आधारित होता व अजूनही आहे ! हे दोघे महान फलंदाज स्वतःवर विजय मिळवून , स्वतःचा खरा क्लास दाखवल्याशिवाय पडद्याआड जाणार नाहीत, ही रास्त आशा आहे !! अर्थात, सर्व नवीन फलंदाजाबाबत तर मी खूप आशावादी आहेच !!

डिसेंबर १९८४ ला ईग्लंड च्या विरुध्ध संदिप पाटिल आणि कपिल देव यानी असेच बेजबदार फटके मारले होते. संदिप पाटिलने तर पंत सारखा लॉग ऑन ला कॅच दिला होता. त्यावेळी दोघावर करावाई केली होती. संदीप पाटिल ची ती शेवटची मॅच होती तर कपिल देव ला एका टेस्ट साठी बाहेर ठेवले होते. पंत ला पण एखादा मॅच साठी बंदी केली पाहिजे.
रोहित आणि विराट ने निव्रुत्त व्हावे किंवा बोर्डाने त्याना संन्मानाने नारळ द्यावा.

The Indian Express report states that the team management has been forced to consider dropping Pant for the final Test and give Jurel another game although he scored only 11 and 1 in the first Test in Perth in November.
पंत आउट जुरेल इन?

"अफवातून"
"ये खबर फैला दो बाजारमे."
ये खबर फैला दो संसार में ढिंढोरा पिटवा दो बाजार में

Rohit Sharma to be dropped for 5th Test?
India coach Gautam Gambhir declined to confirm that captain Rohit Sharma would play the fifth test against Australia, committing only to naming the team before the toss on Friday.

रोहित आणि पंत उद्याच्या टीम मध्ये नाहीत. खर तर कोहली सुद्धा बाहेरून चीयर करताना छान दिसला असता.

<<इस्वरन, पड्डिकल, गिल (c), सर्फराज, नीतीश, जुरेल (wk), कोटियन, सुंदर, हर्षित, आकाश दीप, प्रसिध>>
१०० टक्के अनुमोदन. पण त्यांना दाढ्या नसतील, तर खोट्या दाढ्या तरी लावा, भारतीय संघात दाढीखेरीज खेळणे म्हणजे कसेसेच वाटते. जेंव्हापासून सगळे भारतीय खेळाडू दाढी वाढवायला लागले तेंव्हा पासून भारत जिंकत आलेला अहे.

<<*पुढच्या मॅचला बुमराहला बाहेर बसवायला हवं …………. उगाच अपेक्षा वाढवून ठेवतो* - Wink
खरंच त्याची दया येते, आपले फलंदाज त्याचे मौल्यवान बळी असे पायदळी तुडवताना बघून !! >>
अनुमोदन. त्यापेक्षा स्टार्कप्रमाणे विकेटवरच्या बेल्स बदलून चांगला फायदा होईल. ऑस्ट्रेलियाने तश्याच विकेट्स घेतल्या. स्टार्कने बेल बदलल्यावर जैस्वालने लगेच बद;न बदलल्या, म्हणून जैस्वाल टिकला, बाकीचे गेले.

Pages