Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दगड
आणखी डाऊन अंडर म्हणजे नक्की कशी खेळणार आहे आता आपली टीम !!
भाउ मस्त कार्टून.
भाउ मस्त कार्टून.
चिंताजनक गंभीर परिस्थिती.
वा वा! शर्माच्या संघाने आणखी
वा वा! शर्माच्या संघाने आणखी काही विक्रमांना गवसणी घातली.
या वर्षात शर्माचे १११ फलंदाज फिरकी गोलंदाजीचे बळी ठरले. घरच्या मैदानांवर हा भारताचा उच्चांक आहे. याआधी १९६९ सालात ७० बळी होते.
१११ पैकी ६० इंग्लंड, ३७ न्यु झीलंड आणि १४ बांग्लादेशच्या फिरकीला बळी पडले.
शर्माचा संघ या वर्षी घरच्या मैदानावर ४ कसोटी हरला. १९६९ सालच्या विक्रमाची बरोबरी. आता देशात आणखी कसोटी नाहीत, त्यामुळे नवा विक्रम रचायची संधी हुकली.
एकही सामना न जिंकता ३ कसोटी हरण्याची भारताची ही तिसरी वेळ. याधी विंडिजकडून १९५८ आणि १९८३-८४ साली ०-३ अशी मात खाल्ली होती.
किमान ३ सामन्यांच्या मालिकेत गेल्या ४७ वर्षांतली भारतीय फलंदाजांची न्यूनतम सरासरी २१.५५ शर्माच्या संघाने नोंदवली. १९७६-७७ इंग्लंडच्या व्हॅसलिनमुळे गाजलेल्या दौर्यातला भारताचा विक्रम थोडक्यात वाचला.
भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत फिरकीला दिलेले सर्वाधिक बळी -३७
पाहुण्या फिरकी गोलंदाजांचा कसोटीतला सर्वोत्तम स्ट्राइक रेट ३३.८.
या आणि आधीच्या पोस्टमधल्या विक्रमांची नोंद शर्माबद्दलच्या धाग्यावरही व्हायला हवी.
आता भारत टेस्ट चँपियनशिप पॉइंट टेबलात दुसर्या क्रमांकावर आला आहे. आणखी खाली आला तर टेस्ट चँपियनशिपची लॉर्ड्सवर होणारी फायनल कसल्याही ताणाशिवाय पाहता येईल आणि नेमाने निराशा पदरी पडणेही टळेल,
"अश्या वेळी टॉप स्कोअरर
"अश्या वेळी टॉप स्कोअरर साधारण पंतच असतो"
या कॉन्फिडन्ससाठी तुमची दाद द्यायला हवी.
>>>>>
पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशीची पोस्ट होती.
आणि आज या खडतर मालिकेचा टॉप स्कोअरर (दोन्ही संघ मिळून) पंतच ठरला ना..
पंत संकटात कामाला येतो. पण जर तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा असेल तर याचा अर्थ संकटांचीच मालिका चालू आहे. ऑस्ट्रेलियात अशी वेळ येऊ नये. टॉप ऑर्डरने धावा बनवणे फार गरजेचे आहे.
या आणि आधीच्या पोस्टमधल्या
या आणि आधीच्या पोस्टमधल्या विक्रमांची नोंद शर्माबद्दलच्या धाग्यावरही व्हायला हवी.
>>>>
कोणीही तिथे पोस्ट करू शकते.
मला आपण जिंकल्यावर आनंद मिळतो मी त्या आनंदात त्या नोंदी करतो. कोणाला पराभवात आनंद मिळत असेल तर धागा त्यांच्यासाठी सुद्धा खुला आहे
आता पराभवात सुद्धा पंत टॉप
आता पराभवात सुद्धा पंत टॉप स्कोरर आहे हे उगाळलंच ना. इतर वेळी शर्माचे विक्रम भिंगातून शोधून शोधून नोंदवतोच ना? तसेच हेही विक्रम हवे.
आपण फक्त खेळाडूचे चाहते नसून (आधी ) खेळाचे चाहते असू तर खिलाडू वृत्ती असावी.
टॉप ऑर्डरने धावा बनवणे फार
टॉप ऑर्डरने धावा बनवणे फार गरजेचे आहे.
सोबतच मिडल ऑर्डरनेही रन बनवले पाहिजे. फक्त गोलंदाजांनी विकेट घेऊन उपयोग नाही.
खिलाडीवृत्ती म्हणजे
खिलाडीवृत्ती म्हणजे जिंकल्यावर डोक्यावर घेणे आणि हरल्यावर पायदळी तुडवने नाही.
भारतीय संघाच्या ज्या चुका झाल्या त्या स्वीकारल्या आहेतच की. अपयश आले आहेच. पण सोबत पंत त्यातून सुद्धा खेळला याचेही कौतुक आहे.
पण आता तुम्ही पराभवाचे आकडे शोधून ते सुद्धा गावभर फिरवा अशी अपेक्षा धरत असाल तर ते चूक आहे.
आपला मुलगा पास झाल्यावर आपण पेढे वाटतो.
नापास झाल्यावर त्याची मार्क शीट तुम्ही गावभर फिरवता की त्याचा घरी आणखी अभ्यास घेता?
उत्तर सोपे आहे. पण प्रश्न इतका आहे की तुम्ही भारतीय संघाला आपल्या मुलाप्रमाणे बघता का?
मी बघतो
*...कोणाला पराभवात आनंद मिळत
*...कोणाला पराभवात आनंद मिळत असेल तर धागा त्यांच्यासाठी सुद्धा खुला आहे ..*. -
चाहत्यांना आवडत्या संघाचा दारुण पराभव झाल्यावर वाईट वाटलं नाही व ते वाईट वाटणं व्यक्त झालं नाही, तर त्यांना चाहते म्हणताच येणार नाहीं !
बरोबर वाईट वाटायलाच हवे. माझा
बरोबर वाईट वाटायलाच हवे. माझा तर २०२३ वर्ल्ड कप नंतर इतका मूड ऑफ झालेला की मी कित्येक दिवस क्रिकेट चर्चा टाळत होतो. अज्ञातवासात गेलो होतो.
मी वर म्हणत आहे ते वेगळे आहे.
पराभव झाल्यावर चिडवून आनंद घेणारे..
एक असूया असते मनात ती सुखावणारे..
फेसबूकवर तर जायलाच नको.
फेसबूकवर तर जायलाच नको.
तिथे तर आयपीएलछाप चाहत्यांचा इतका उच्छाद असतो की बस रे बस..
धोनी vs कोहली vs रोहीत यातच लागले असतात.
त्यात एक गट नाईंटीज नोस्टेलजियावाला असतो जे अजून सचिन दादा द्रविड मधून बाहेर पडलेले नसतात.
या सगळ्यांचे आनंद वेगळ्याच गोष्टीत असतात.
लोकांना कितीपण द्या लोकांचं
लोकांना कितीपण द्या लोकांचं मन काय भरत नाही. शर्माने १७ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकवलाय ते राहिलं बाजूला आणि एक सिरीज काय हारला तर नकली क्रिकेट पंडित जागे झालेत. कुठले कुठले रेकॉर्ड पोस्ट करत सुटलेत. स्वतः ने कधी बांधाच्या पलीकडे बॉल मारला असेल तर शप्पथ.
खरंय. एकेका खेळाडूने किती
खरंय. एकेका खेळाडूने किती वेळा नाक खाजवलं टाइप विक्रम शोधून टाकणार्या चाहत्यांच्या उच्छादामुळे त्या खेळाडूंबद्दलच अप्रीती उत्पन्न होऊ लागली आहे.
आता हेही विक्रम या संघाच्या आणि त्याच्या कर्णधाराच्या नावे लागलेत, वर्तमानपत्रे छापताहेत, तर सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ म्हणत त्यांचीही नोंद खिलाडूपणे केलीच पाहिजे.
खेळाडूने किती वेळा नाक खाजवलं
खेळाडूने किती वेळा नाक खाजवलं टाइप विक्रम शोधून टाकणार्या >>>
>>>>
सिरीयसली ब्रो??
उदाहरणार्थ रोहीत शर्मा,
तीन एकदिवसीय द्विशतक - जगात एकमेव
२६४ धावा - जगात सर्वाधिक
पाच ट्वेंटी ट्वेण्टी शतके - जगात सर्वाधिक
३१ चेंडूत शतक - जगात वेगवान
वर्ल्डकप आणि आयसीसी स्पर्धात सर्वाधिक शतके.
एका वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक शतके.. धावा.. कर्णधार म्हणून विजय..
जिंकलेल्या सामन्यात सेना देशात सर्वाधिक शतके..
कसोटीत बारा शतके आणि बाराच्या बारा विजय..
तिन्ही फॉरमॅट सर्वाधिक षटकार.. जिथे कोणी त्याच्या आसपास सुद्धा नाही.
फुरसत मध्ये बसलो तर पानभर पराक्रम अजून निघतील. कर्णधार म्हणून विक्रम वेगळे लिहावे लागतील.
पण आता वेळ नाहीं. फक्त मुद्दा क्लिअर करायचा आहे.
की हे सारे तुम्हाला नाक खाजवले टाईप पराक्रम वाटत असतील तर......
तुमच्या मताचा आदर आहे
खेळाडूने किती वेळा नाक खाजवलं
खेळाडूने किती वेळा नाक खाजवलं टाइप विक्रम शोधून टाकणार्या >>>
>>>>
सिरीयसली ब्रो??
उदाहरणार्थ रोहीत शर्मा,
तीन एकदिवसीय द्विशतक - जगात एकमेव
२६४ धावा - जगात सर्वाधिक
पाच ट्वेंटी ट्वेण्टी शतके - जगात सर्वाधिक
३१ चेंडूत शतक - जगात वेगवान
वर्ल्डकप आणि आयसीसी स्पर्धात सर्वाधिक शतके.
एका वर्ल्डकप मध्ये सर्वाधिक शतके.. धावा.. कर्णधार म्हणून विजय..
जिंकलेल्या सामन्यात सेना देशात सर्वाधिक शतके..
कसोटीत बारा शतके आणि बाराच्या बारा विजय..
तिन्ही फॉरमॅट सर्वाधिक षटकार.. जिथे कोणी त्याच्या आसपास सुद्धा नाही.
फुरसत मध्ये बसलो तर पानभर पराक्रम अजून निघतील. कर्णधार म्हणून विक्रम वेगळे लिहावे लागतील.
पण आता वेळ नाहीं. फक्त मुद्दा क्लिअर करायचा आहे.
की हे सारे तुम्हाला नाक खाजवले टाईप पराक्रम वाटत असतील तर......
तुमच्या मताचा आदर आहे
ऑस्ट्रेलिया as good/bad as
ऑस्ट्रेलिया as good/bad as India. काळजी नसावी. पाकिस्तान बरोबरची वन डे हरायच्या मार्गावर.
काय ओ केशवकूल, जिंकले की
काय ओ केशवकूल, जिंकले की ऑस्ट्रेलिया..
फक्त 204 चे टारगेट होते. 33 ओवर मध्येच 6+ रनरेट ने मारले. धुतला की पाकिस्तानला.
जिंकले म्हणजे आठ विकेट टाकून
जिंकले म्हणजे आठ विकेट टाकून. पाकिस्तानने २० एक धावा जास्त बोर्डावर लावाक्या असत्या तर हरलेच असते. त्यातही नसीम शहाला ऐन मोक्याच्या वेळी परतावे लागले. फक्त इंग्लिस आणि स्मिथ बरे खेळले. ऑस्ट्रेलियाची टीम पण तीच -म्हातारी लोकांनी भरलेली आहे.
सॉरी, आठ विकेटवर लक्ष नव्हते
सॉरी, आठ विकेटवर लक्ष नव्हते गेले.
मला वाटले चारचा रनरेट हवे असताना सहाचा मारून जिंकले तर आरामात जिंकले असतील.
चरा चरात देव असतो
चरा चरात देव असतो त्याचप्रमाणे क्रिकेटच्या कणा कणात रोहित शर्मा वसतो. भरत ब्रो क्रिकेटबद्दल बोलायला लागले आणि आपसूकच त्यांच्या नावाच्या शेवटी रोहितचा रो जोडला गेला Bharat Bro . याला नुसता योगायोग म्हणावा की नियतीने साकारलेलं सूत्र रोहित=क्रिकेट म्हणावं. Amazing.
सर जोमात, ब्रो कोमात.
क्रिकेट खेळाडूना सुपरस्टार
क्रिकेट खेळाडूना सुपरस्टार बनवणे, त्यांना रोल मॉडेल समजणे, अगदी मंदिरे नाही बांधली तरी देवाचा दर्जा देणे, हे आधीपासून चालत आले आहे.
जेव्हा जिंकत असतो तेव्हा यावर कोणी आक्षेप घेत नाहीत. हरले की मात्र खेळाडूंच्या जाहिराती, पैसे, आयपीएल हे मुद्दे चर्चेत येतात.
जर वेगवान गोलंदाजांची फळी उभारण्याचे श्रेय बीसीसीआय घेत असेल तर फिरकीसमोर भारतीय फलंदाजांना येत असणाऱ्या अपयशाची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी.
पण अशा परिस्थितीत ऋषभ पंत जो मृत्यूच्या दाढेतून परत आला आणि आणि दीड वर्षाने पुन्हा कसोटी खेळायला उतरला आहे तो आल्या आल्या बांगलादेश आणि न्यूझीलंड या दोन्ही मालिका ऐन गरजेच्या वेळी खेळून गाजवतो तर त्याचे कौतुक करायला हात आखडता घेऊ नये.
तरी ते न जमल्यास किमान जो कौतुक करतोय त्याला तरी रोखू नये.
भारत हरला तर त्याचे खापर अपयशी खेळाडूंवर फोडा. जो खेळला त्याचे कौतुक न करण्यात काय अर्थ..
आंतरजालावर फिरत असताना मला
आंतरजालावर फिरत असताना मला एका नवीन विक्रमाची नोंद मिळाली.
दुसऱ्या महायुद्धा नंतर, ह्याचे नाव "रो "ने सुरु होते आणि "त"ने संपते. आडनाव "श'ने सुरु होते आणि "मा"ने संपते, जो भारताच्या तीनही format चा कप्तान आहे, जो सचिनच्या आसपासही रहात नाही. .... असा जगातील पहिला आणि बहुतेक शेवटचा एकमेव माणूस म्हणजे रोहित शर्मा !
हा बऱ्यापैकी क्रिकेटही खेळतो असे ऐकिवात आहे.
भरत ब्रो कुठे गेले?
भरत ब्रो कुठे गेले?
धोनी vs कोहली vs रोहीत यातच
धोनी vs कोहली vs रोहीत यातच लागले असतात.
>>
नुसतं इतकंच नाही...
सोशल मीडिया वर काही लोकं तर सतत जय धोनी, जय रोहित, जय ऋषभ पंत वगैरे आरत्या गाण्यात मग्न असतात.
जसा सध्या आपला संघ सिच्युएशन न बघता एकाच प्रकारे खेळ करतोय तसंच हे लोकंही हार-जीत, टीम परफॉर्मन्स, चॅलेंजेस वगैरे न बघता भाटगिरी करतात. आपल्या लाडक्या खेळाडूंच्या चुका होऊ शकतात, त्यावर त्यांनी मेहेनत घेऊन मात करणं आवश्यक आहे वगैरे यांच्या गावी ही नसतं. कारण मुळात एक तर लाडके खेळाडू काहीही चुकीचं करतंच नाहीत, जे काही करतात त्याच्या मुळाशी काहीतरी मास्टर्रस्त्रोक असतो यावर यांची गाढ अंधश्रद्धा असते. यांच्या चुका झाल्या असं खुद्द त्यांनी मान्य केलं तरी त्या फ्लूक असून पुढच्या खेपेला हे काहीही विशेष मेहेनत घेता यशस्वी (जयस्वाल नाही) होणारच यावर या लोकांचा खेळाडूंचा ही स्वतः वर नसेल इतका विश्वास असतो...
रोहित ला कर्णधार म्हणून
रोहित ला कर्णधार म्हणून जेव्हढी काही नशिबाची साथ मिळायची होती ती वर्ल्ड कप पर्यंत मिळून गेली. लॉ ऑफ अव्हरेजेस किवीज्विरुद्ध लागला. डाऊन अंडर मधे काय होईल ते कळेलच. आम्ही व्हेरी व्हेरी स्पेशल कामगिरी करू हि डरकाळी फोडायची खरच गरज होती का ? अशाने स्वतःवरच नि पर्यायाने टीमवर अधिक टेंशन (त्यात परत पहिले १-२ सामने स्वतः नाहिये) का लादून घ्या ? ऑस्ट्रेलिया आधीच आधीच्या दोन सिरीजमूळे ट्रिग्गर्ड आहेत.
अश्विन बॉलर म्हणून जवळजवळ नि बॅटसमन म्हणून पूर्ण पणे फेल गेला तीन कसोटींमधे नि आपण तीन-शून्य हरलो. अश्विन रिटायर झाल्यावर येणार्या काळाची हि नांदी असेल का ?
भाऊ व्यंगचित्र आवडले.
भारत हरला तर त्याचे खापर अपयशी खेळाडूंवर फोडा. जो खेळला त्याचे कौतुक न करण्यात काय अर्थ.. >> तुला भरत किंवा अँकीचा मुद्दा कळत नाही असे मला अजिबात वाटत नाही. नेहमीप्रमाणे पिव्हेटींग सुरू केलेस
मी पुन्हा एकदा सांगतो,
मी पुन्हा एकदा सांगतो,
दहा वर्षापूर्वी रोहीत ओपनर म्हणून चमकयच्या आधी जेव्हा स्ट्रगल करत होता तेव्हा फक्त त्याच्यातील टॅलेंट ओळखून....
ऋषभ पंतची गाबा इनिंग यायच्या आधी जेव्हा तो अपयशी ठरून संघाबाहेर गेला होता तेव्हा फक्त त्याच्यातील देखील टॅलेंट ओळखून....
मी या दोघांवर मायबोलीवर धागा/फॅन क्लब काढला होता.
ऋषभ पंत धाग्यावर तर बरेच जणांनी त्याच्या सोबत माझी सुद्धा खेचली होती. पण मला विश्वास होता त्याच्यावर आणि तो त्याने सार्थ ठरवला याचा अभिमान आहे मला.
स्ट्रगल काळात एखाद्या खेळाडूच्या पाठीशी त्याच्यातील टॅलेंट ओळखून उभा राहणारा आणि खेळू लागल्यावर त्याची आरती ओवाळणारे यात जो जमीन अस्मानाचा फरक असतो तोच इथे आहे.
माझ्यावर आणि ऋषभ पंत वर पिक्चर बनेल.
रोहित ला कर्णधार म्हणून
रोहित ला कर्णधार म्हणून जेव्हढी काही नशिबाची साथ मिळायची होती ती वर्ल्ड कप पर्यंत मिळून गेली
>>>>
नशिबाची साथ

बर
स्ट्रगल काळात एखाद्या
स्ट्रगल काळात एखाद्या खेळाडूच्या पाठीशी त्याच्यातील टॅलेंट ओळखून उभा राहणारा >> किती ती स्वतःची प्रौढी मिरवायची माणासाने ? काय आनंद मिळतो ह्यातून देव जाणे ! तुला खरच वाटते कि लोक तू कुठला बाफ कधी उघडला होता ह्याची नोंद ठेवतात ?
नशिबाची साथ > >तुला पटावे असा माझा आग्रह नाही पण प्रत्येक खेळाडू नि कर्णाधाराला नशिबाची साथ कुठे ना कुठे तरी लागतेच. तेव्ह्ढीच गुणवत्ता असूनही नशिबाची साथ न मिळाल्यामूळे पुढे येऊ न शकलेल्या खेळाडूंची रास इतिहासाने पाहिली आहे. ह्यातून नशिबाची साथ हाच एक भाग रोहित ला लागू होतो असे नेहमीचे पिव्होटींग करून तुला आनंद मिळत असेल तर अँकी नि भरत चा मुद्दा सिद्ध होतो.
असामी मला अंधभक्त म्हटले
असामी मला अंधभक्त म्हटले म्हणून ते वरचे स्पष्टीकरण होते.
मुद्दा नसेल कळले तर जाऊ द्या तुम्हीही
आणि हो नशीबाची साथ जिंकल्यावर
आणि हो नशीबाची साथ जिंकल्यावर..
आणि हरल्यावर स्वतः चे अपयश..
कमाल लॉजिक आहे..
दोन्ही ठिकाणी एक न्याय असू द्या...
Pages