दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी iPTV वर पाहिला. Not on regular OTT platform>>>>

तेच तर...
कारण २०१८ मी शोधला होता hotstar, zee5,Netflix, prime वर सापडला नव्हता..

Dude : तमीळ नेटफ्लिक्स हिंदी डब आहे..
रोमँटिक कॉमेडी आहे...
चांगला आहे सिनेमा..
यातला हा hero धनुष चा लहान भाऊ वाटतो.. चांगली acting करतो.. त्याचे love today, dragon आणि lik पण चांगले आहेत सिनेमे.. हलकेफुलके कॉमेडी...

Level Cross: मी iPTV वर पाहिला. मलयालम psychological सिनेमा आहे. रक्तरंजित नसतानाही gripping आहे. आवडला कारण खराच psycho movie आहे. नेहमीप्रमाणे खुनाची मालिका वगैर typical कथा नाही. एका ओसाड ठिकाणी lonely असे level crossing असते. हे एकदा फार विचार न करता मान्य केले की पुढचा सिनेमा आवडू शकतो. तेथे एकटाच कर्मचारी असतो. एक दिवस passing train मधून एक मुलगी खाली पडते आणि मग जे घडते ते...... सुरुवातीला तसा slow वाटला तरी क्लायमॅक्स चांगला आहे. पूर्ण सिनेमात फक्त 3 व्यक्ती आहेत. इतर दोघे आहेत त्यांना 30 सेकंदांचा सीन आहे. आसिफ अलीचे काम मस्त आहे.

Officer o Duty: एक सणकी / तिरसट पोलिस इन्स्पेक्टर निलंबनानंतर परत कामावर रुजू होतो त्याच दिवशी साधी Chain snatching ची केस येते. ती शोधताना एका दुसर्‍या गुन्हेगारी घटनेशी तो जोडला जातो. ते शेवटी त्याच्या कुटुंबाच्या जीवावर बेतत. क्लायमॅक्सचा मारामारीचा सीन south प्रमाणे लांबवला आहे आणि मला तरी अ आणि अ वाटला. त्यापेक्षा त्यानंतरचा भाग चान्गला आहे.

गुन्हेगार दाखवलेल्या कलाकारांची कामे जास्त natural वाटली. अंजाम Pathira आणि Take Off मध्ये soft भूमिका करणार्‍या Kunchacko Boban ने तिरसट इंस्पेक्टर चान्गला केलाय.

Pages