मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण माझं निरिक्षण असं की बहुधा मराठी लोकांमधे थोडा संकोच असतोच मिठ्या मारण्यात, फोटो ग्राफर समोर रोमांस करण्यात >>> Happy
हो ट्रॅडिशनल मराठी लग्नात रोमान्सची परमावधी म्हणजे एका गोल्ड स्पॉट किंवा नंतर कोका कोलाच्या बाटलीत दोन स्ट्रॉ घालून पिणे.

हे मिठी मारायला संकोच वगैरे 15 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत का?आता कॉलेज फ्रेंड्स मध्ये पण भारतात हग्स कॉमन आहेत.

हे मिठी मारायला संकोच वगैरे 15 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत का?आता कॉलेज फ्रेंड्स मध्ये पण भारतात हग्स कॉमन आहेत.

Submitted by mi_anu on 16 December, 2022 - 20:51 >>> हो .....

त्यांची मिठी आपन लगेचच घेतली पण वयाने जास्त असलेला आणि आदर्श व्यक्ती भेटला तर पाया पडणे ही आपली पद्धत मात्र त्यांनी घेतली नाही.
त्यांचा पिझ्झा आपण घेतला पण आपली चपाती,भाकरी मात्र त्यांनी घेतली नाही

“ पण वयाने जास्त असलेला आणि आदर्श व्यक्ती भेटला तर पाया पडणे ही आपली पद्धत मात्र त्यांनी घेतली नाही.” - वयाने मोठं असण्यात एखाद्याचं असं काय कर्तृत्व असतं कि कुणीतरी (वयाने लहान असणार्यांनी) त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं?

मतितार्थ लक्षात घ्या.
पाश्चिमात्य ह्या मध्ये uk आणि अमेरिका ह्यांचा जबरदस्त प्रभाव भारतीय लोकांवर आहे.
अगदी आहार पासून कपड्या पर्यंत सर्व सर्व काही त्यांचे आत्मसात करने म्हणजे प्रगत राहणीमान अशी आपली एक प्रगत राहणीमान विषयी धारणा आहे
पण त्या देशातील लोकांनी एक पण भारतीय गोष्ट आत्मसात केली नाही.
ना भारतीय आहार,
ना भारतीय कोणती भाषा.
ना भारतीय सण.
ना भारतीय लग्न विधी .
ना भारतीय पेहराव काही म्हणजे काही स्वीकारले नाही.
पण आपण मात्र त्यांचे जे काही आहे ते स्वीकारण्यात मोठेपणा मानतो.
अगदी चीन,जपान,कोरिया,रशिया, ह्या आर्थिक बाबतीत प्रगत देशांनी पण स्वतःचीच संस्कृती जपली आहे .
चीन मध्ये मिठ्या मारायची पद्धत आहे का?
मॉडर्न

“पण त्या देशातील लोकांनी एक पण भारतीय गोष्ट आत्मसात केली नाही.” - भारताची तीन आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आहेत - ताज महाल, म. गांधी आणि योगा. (इंडियन फूडमधे बटर चिकन आणि नान).

त्यांची मिठी आपन लगेचच घेतली पण वयाने जास्त असलेला आणि आदर्श व्यक्ती भेटला तर पाया पडणे ही आपली पद्धत मात्र त्यांनी घेतली नाही.>> हे कुठे लिहिलंय की मिठी परदेशी आहे म्हणुन आणि आपण तरी कुठे दिसला जेष्ठ की पड पाया असं करतो ??

मिठी कुठे परदेशी आहे, राम-भरत भेटीचे चित्र आठवा. शिवाय महाभारतात युद्धापश्चात भीमाला मिठी मारून चुराडा करायचे स्वप्न बघणाऱ्या धृतराष्ट्राला आठवा. लग्नात या मिठ्या चालणार नाहीत Proud पण मिठी आपल्याच संस्कृतीतून चोरली आहे अशी कायप्पा पोस्ट करता येईल. रोमॅन्टिक मिठ्याही असतील , मला आठवत नाहीयेत. दुष्यंत शकुंतला, ययाती शर्मिष्ठा, नल दमयंती, यांचं माग काढला तर सापडतीलही.

नमस्कार करताना बायकांच्या पाठीवरून हात फिरवून चौफेर आशीर्वाद देणारे ठरकी म्हातारे बघितले आहेत. मनापासून आदर आणि विश्वास वाटत असेल तरच पाया पडावे.

पाया पडण्याचा इथे एक धागा होता. त्यावर शेकडो पोस्टी पडल्या होत्या, शेवटी कन्वेयर बेल्ट बसवून घेऊन आशीर्वाद द्यायचे ठरले होते. आशीर्वादासाठी एक यो-यो हातही रूखवतावर ठेवावा. असंही इतकं यांत्रिक असतं लग्नातलं पाया पडणं, ह्यूमन टच गेला तर गेला. Lol

अस्मिता Lol

ह्यूमन टच गेला तर गेला >> बहुत हार्ड!

अस्मिता Lol

नाहीतरी इथे लग्नसमारंभाच्या आठवणी येतच आहेत तर आताच अनुभवलेल्या एका समारंभाविषयी. आपण बहुधा आपल्याच मर्यादित वर्तुळातले समारंभ, रीती इ. पाहत असतो, त्यामुळे वेगळं काही पाहताना, अनुभवताना आधी थोडा धक्का आणि मग मजा वाटू लागली
कार्यक्रम मुंबईत पार पडला. मुलीकडचे लोक देशावरचे. मराठा. मुलाला नोंदणी पद्धतीने विवाह करायचा होता, पण मुलीकडच्यांना पारंपरिक पद्धतीनेच सगळं हवं होतं. त्यांचे बहुसंख्य आप्तेष्ट गावांकडून येणार होते. म्हणून तसंच करायचं ठरलं. पाहुण्यांत मुलीकडचे लोक मुलाकडच्यांच्या दहा पट असावेत.
नवर्‍या मुलाने डोईवर जिरेटोप आणि त्याला अनुसरून इतर पोशाख केला होता. नवरी नऊवारीत. मुलाकडच्या जवळच्या बायका शिवलेल्या नऊवारीत. पुरुष मंडळींना शिवलेलं धोतर नाही पण सुरवार. सगळे विधी फोटोग्राफरसाठी करतोय असे चालले होते. ते सांगतील त्या स्पीडने, तेवढा वेळ थांबून, कॅमेर्‍याकडे पाहत चेहरा हसरा ठेवत, इ.इ.
जेवण पंजाबी इ.च होतं. पनीरची भाजी, पुर्‍या, पराठे , व्हेज बिर्याणी (की पुलाव?) जिरा राइस, गुलाबजाम.

खरी गंमत पुढे. स्वागत समारंभाला मुलाकडच्या आमंत्रण पत्रिकेत फोटो शूट असंच म्हटलं होतं. पत्रिका इंग्रजीत होती. वधुवरांची फक्त फर्स्ट नेम्स . बाकी कोणाचंही नाव नाही.
लग्न लागल्यावर वधूवर तयार व्हायला गेले तेव्हा रीतसर करमणुकीचे कार्यक्रम. त्या आधी सूत्रसंचालकांकडून पाहुण्यांचे नाव घेऊन स्वागत. हे पंधरा मिनिटं तरी चाललं असावं. वधुपित्याला कोण सुटलं तर नाही याचं टेन्शन. मग लावणी, चित्रपटांतील लोकगीतांवरचे नाच ( हे बहुधा व्यावसायिक कलावंत होते) दोन नाचांच्या मध्ये सूत्रसंचालक पाहुण्यांना पकडून उखाणे म्हणायला लावत होता. त्यांनी मिमिक्री केली. अमिताभ आणि राठा यांच्याकडून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. काही भागात यावेळी स्टेजवरून कोणी काय , किती अहेर केला हे अनाउन्स करायचीही पद्धत असते. इथे तुमचे शुभाशीर्वाद हीच भेट असं लिहिलं असल्याने ती भीती नव्हती.
वधूवर स्टेज कडे ग्रँड एन्ट्री घेताना कोळीगीतांवर नाच. जवळच्या लोकांच्या आधीच पाया पडून झालं होतं त्यामुळे स्टेजवर पाया पडणं नाही. (मला वाटतं ही पद्धत मोडीत निघत असावी. या वर्षी हजर असलेल्या तिन्ही लग्नांत पाया पडणे हा प्रकार नव्हता. मला तसंही कोणी पाया पडणं ऑकवर्ड करतं त्यामुळे ते नव्हतं हे बरंच वाटलं. नवर्‍यामुलाने सूट घातला नव्हता. जे काही घातलं होतं ते मूळ मराठी नसलं तरी आता झालंच आहे.
एकंदर मजा आली. लग्नातलं मराठीपणही टिकलं असावं.

मूळ लेखात दक्षिण भारतीय समारंभात त्यांच्या संस्कृतीची ओळख कशी करून दिली गेली याचा उल्लेख आहे म्हणून इथे युट्यूब वर सापडलेल्या एका व्हिडिओ ची लिंक देते आहे. या लग्नाच्या जेवणात पाणीपुरी, चाट, सामोसे आणि पावभाजी सुद्धा आहे. चायनीज नुडल्स पण.

https://youtu.be/KsCSwNqrces

त्यामुळे फक्त मराठी लग्नांतून मराठीपण हरवत चालले आहे हे दुःख थोडे हलके झाले Proud

जेवणात पाणीपुरी, चाट, सामोसे आणि पावभाजी सुद्धा आहे. चायनीज नुडल्स पण.

सर्रास आणि अपवाद ह्या मध्ये फरक असतो.
सर्व धातू कडक असतात para हा धातू कडक नसतो.
तो अपवाद आहे.

मुळात दुसऱ्याच लग्नात लोक जातात ते फक्त हजेरी लावण्यासाठी .
बाकी event शी त्यांना काही देणेघेणे नसते आणि इंटरेस्ट पण नसतो.
फक्त लग्न लागताना हजार होणे हे कर्तव्य समजून लोक जातात.
लग्न लागले की जेवण काय आहे ह्या मध्ये पण न पडता सरळ निघून जातात.
ह्या विविध प्रकारचे जबरदस्ती चे बळी हे फक्त घरातील,जवळचे नातेवाईक,आणि जवळचे मित्र इतकेच असतात.(मनात हजारो शिव्या देत असतात)
बाकी पसार होतात.
उगाच वेळ वाया कोणी घालवत नाही.

मराठीच नाही तर भारतभरच्या लग्नसमारंभांची प्रोफाइल झपाट्याने बदलत आहे. वर मंगल कार्यालयात साधेपणाने होणाऱ्या 'पारंपरिक' मराठी लग्नाचे वर्णन आहे तशी लग्ने आता फक्त जेष्ठांनाच पसंत आहेत, तरुण मंडळींना नाही. सगळे भव्य-दिव्य करणे आता commonplace आहे.

मागील काही दिवसात वेगवेगळ्या शहरात बऱ्याच लग्नसमारंभांना हजेरी लावली. मराठी+मराठी, मराठी+गुजराती, तेलगू+तेलगू, तमिळ अय्यर + राजस्थानी, मराठी+ बिहारी, अशी विस्तृत श्रेणी. काही कॉमन मुद्दे :-

१) वर-वधूच्या तरुण मित्रमंडळींचा जल्लोष आणि समारंभात सगळीकडे बिनधास्त वावर, हळद आणि मंगलाष्टकांच्या वेळी दंगा.

२) मुख्य लग्नविधी साठी सगळ्या परिवाराचा कपडेपट आपापल्या प्रथेप्रमाणे फारच, अती पारंपरिक. मराठीजनांचे नऊवारी, शालू-शेले, धोतर-उपरणे, पेशवाई पगडी-पागोटे-मुंडासे इत्यादी तर दाक्षिणात्यांचे मुंडू-वेष्टी, कांजीवरम वगैरे. सगळ्यांचे कलर कोडेड कपडे. नथी-दागिने पारंपरिक.

३) सोहळा कव्हर करण्यासाठी अनेक फोटोग्राफर+कॅमेरे, झुळझुळणारे ड्रोन, लाईव्ह स्ट्रीमिंग, सगळ्या इव्हेंटचे इन्स्टा-पेज वगैरे. एक किंवा अधिक 'सेल्फी/फोटो पॉईंट' - मँडेटरी.

४) लग्नविधी दोन्हीकडच्या पुरोहितांच्या आग्रहाप्रमाणे, अनेकदा दोन-दोनदा थोड्या फरकाने सारखेच विधी. त्याबद्दल दोन्हीकडच्या लोकांनी आधीच ठरवलेले दिसले, त्यामुळे गोंधळ नाही. सगळे सुंदर कोरियोग्राफ केल्यासारखे.

५) मुख्य लग्नविधीनंतर एक ब्रेक आणि मग रेसेपशनला वेस्टर्न क्लासिक थीम. एकेजागी एकजात सर्व दक्षिणकन्यकांनी राजस्थानी/पंजाबी स्टाईल घागरा-चोली परिधान करण्याची हौस भागवली.

६) मेजवानीत साधारण ३० ते ४० पदार्थ. सबगोलंकारी मेन्यू. काही ठिकाणी १० पर्यंत लाईव्ह काउंटर - चाट, पाणीपुरी, डोसा, इंडो-चायनीज, पास्ता इत्यादी. एका ठिकाणी बाजरीच्या भाकऱ्या आणि भरीत असा लाईव्ह स्टॉल. तमिळ लग्नात छोले-भटुरे Happy

७) पुण्या-मुंबईत होणाऱ्या मराठी लग्नांमध्ये काही मराठी चवींचे पदार्थ दिसले - मोदक, मसालेभात, छोट्या पुरणपोळ्या, अळूवड्या, बटाटेवडा वगैरे. त्यांना मागणी होती. बाकी मेन्यू आवड आणि ऐपतीप्रमाणे.

Pages