मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतका वेळ कोण देत .
अक्षदा टाकली की निघा असेच लोक विचार करतात..
फक्त नवरा नवरी चे घर चे,आर्थिक संबंध असणारे,मित्र असणारे ,इतकेच ह्या प्रकार मध्ये असतात..
पिणे,खाणे हे फुकट मिळत असेल तर काही मोजकेच थांबत असतात.
बाकी सर्व फक्त formality असतात.
मनापासून कोणालाच aawdat नाही.
ही रिॲलिटी आहे.

आवडतं आवडतं तरुण लग्नाळू मुले-मुली, छोटी छोटी हुंदडणारी मुले, मिरवणार्या बायका, परगावाहून आलेली मंडळी - उत्साह असतो की. खस, मोगरा अत्तरांचा मंदसा घमघमाट. हा सुगंध मी खतरनाक मिस करते. आताचे सिथेटिक , केमिकल पर्फ्युम्स ... नॅह!!!! ती मजा नाही. वधूच्या आईच्या मैत्रिणींची, वरमाईच्या मैत्रिणिंची लगबग असते. सनईमुळे function at() { [native code] }इशय प्रसन्न वातावरण असते. नाश्त्याला खिचडी, कॉफी, उपमा असे पदार्थ असतात. एकंदर खाणे पिणे, रेलणे, मिरवणे. अर्थात या माझ्या बालपणातील लग्नांच्या आठवणी आहेत.
मठ्ठा, जिलबी, मसालेभात, पापड - कुरडया वरण-भातावरती तूपाची धार, असाच मेनू पूर्वी असे.

आता २० वर्षात लग्न अटेंडच केलेले नाही त्यामुळे माहीत नाही.

बाकी सर्व फक्त formality असतात.
मनापासून कोणालाच aawdat नाही.
ही रिॲलिटी आहे.>>> आवडतं मला, माझ्या असंख्य मत्रिणींना आणि ओळखी पाळखीतल्या अनेकांना ही! तुम्हालाच आवडत नसेल.

आता २० वर्षात लग्न अटेंडच केलेले नाही त्यामुळे माहीत नाही.
>>>>

अश्या पोस्ट या धाग्यावर खूप पाहिल्या. बरेच जणांनी बरेच वर्षे आपल्यातील लग्न अटेंड केली नाहीयेत.
हे म्हणजे मराठी चित्रपटांसारखेच झाले. मराठी माणसेच मराठी माणसांच्या लग्नाला जाणार नाहीत तर त्यातील मराठीपण कसे जपले जाणार. मराठी लग्नांना चांगले दिवस कसे येणार ;.

सगळ्यांनी एक वचन द्या मला आज. दर दोन महिन्यांनी ते किमान एक मराठी लग्न तरी अटेंड करणार. तर वर्षाला किमान चार साखरपुड्यांना हजेरी लावणार.

सगळ्यांनी एक वचन द्या मला आज. दर दोन महिन्यांनी ते किमान एक मराठी लग्न तरी अटेंड करणार. तर वर्षाला किमान चार साखरपुड्यांना हजेरी लावणार.>> पुढच्या ५० प्रतिसादाची सोय

आम्हा एनाराय लोकांना तिकिटाची काय ती सोय करून दी बाबा. तश्या उठ सुठ सुट्या ही मिळत नाही रे. कर काहितरी. मराठी संस्कृती धोक्यात आहे. तूच तारणहार आहेस!

सगळ्यांनी एक वचन द्या मला आज. दर दोन महिन्यांनी ते किमान एक मराठी लग्न तरी अटेंड करणार. तर वर्षाला किमान चार साखरपुड्यांना हजेरी लावणार
>>>>>>
Lol Lol पण खरा विनोद हा नाही. खरा विनोद हा की वरचे वाक्य विनोदानेच लिहिले आहे अशी खात्री देता येत नाही Lol

ते डेन्मारक चे पाव्हणे लग्न होते ना ते पार पडले. एकदम इन्स्टाग्राम वेडिन्ग होते. पुण्यात ऑक्स्फोर्ड गोल्फ रिझॉर्ट मध्ये लग्न. ५.५६ चा वरमाला मुहुर्त कारण तेव्हा एक्झॅक्ट सनसेट होता. फोटो अप्रतिम आले. पन मुलगी फुलांच्या चादरी खालुन येणे वगैरे पंजाबी प्रकार होते. व सर्व विधी फोटोत छान कसे दिसतील असे योजले होते. मुलीचे आईबाप पण गेस्टच. ह्या सर्व नादात जेवण रात्री ते फार उशीरा लावले. त्यामुळे आम्च्या नात्यातली माझी बारकी नात दोन वर्शाची भुकेजली व किरकीर करु लागली. मग ते नातेवाइक तिला घेउन घरीच निघून गेले. जेवलेच नाहीत.
ही चुलत नात्यांची कथा. आम्हीतर दूरचे नातेवाईक बोलवणेच नव्हते. शुद्ध वैताग. आणि सातविक संताप.

गावी वेगळीच समस्या असते.
आळी मधील मुल, भावकी मधली मुल,जीव तोडून सर्व कामात मदत करत असतात.
पत्रिका वाटण्या पासून जी पडेल ती काम करत असतात.
पण लग्नाच्या वेळी सत्कार कोणाचा तर.
कोणी युवा नेता .जो पाच मिनिट येणार आणि फोटो काढून निघून जाणार.
मग प्रतिष्ठित नागरिक( ह्याचा अर्थ अजून मला कळलं नाही.गुंड,पुढारी,लहान सहान सरकारी नोकर ही सर्व ह्या मध्ये असतात)त्यांचा सत्कार .
ते हजेरी लावून निघुन जातात
आणि खरी मदत करणारे,हितचिंतक घामाघूम होवून हे सर्व बघत अस्तात
त्यांचा कोणी सत्कार करत नाहीत.

आम्हा एनाराय लोकांना तिकिटाची काय ती सोय करून दी बाबा.
>>>>>

स्वदेस बघा आणि परत या कायमचे Happy
मी आतापर्यंत परदेशी राहणाऱ्या माझ्या तीन मित्रांचे मतपरीवर्तन करून त्यांना तिथे सेटल होऊ न देता परत यायला भाग पाडलेय. अजून दोघांचे मतपरीवर्तन करणे चालू आहे. यावर वेगळा धागा काढतो कधीतरी. पण आज ती लोकं आनंदाने मराठी लग्नात हजेरी लावत आहेत. एकंदरीत खुश आहेत माझ्यावर..

बगदाद, बसरा, काबूल कंदाहार, युक्रेन वरून परतण्यासाठी कुणाची मनधरणी करावी लागते हे नवीन समजले.

NRI
माझी व्याख्या
ही जी लोक असतात .
१) भारतात करोडो रुपयाची चोरी करून पसार होणारे.
२) भारता बाहेर च राहणारे नोकरदार पण भारतात येण्याची बिलकुल इच्छा नसते आणि भारता विषयी बिलकुल प्रेम नसते.
फक्त तिकडून कधी हाकलून दिले तर जाणार कुठे ?
म्हणून भारताचे नागरिकत्व पण जिवंत ठेवतात ते
ह्या दोन्ही लोकांना भारताशी काही देणे घेणे नसते .
फक्त स्वार्थ स्वार्थ साधण्यासाठी हे NRI असतात

मराठी लग्नांमधे मुख्य पंगत बसायच्या आधी बाळांसाठी वरणभात दिला जायचा हे फार भारी वाटायचं मला. दुडुदुडू पुढे पुढे पळणारी गोड गोड बाळं आणि एका हातात ताटली धरून एका हातानं लग्नी साडी सांभाळत त्याच्यामागे पळणा-या त्यांच्या आया दिसायच्या.

हल्ली जिलबी फार ठेवत नाहीत. असलीच तर रबडी-जिलेबी असं परप्रांतीय नाव धारण करून येते. तिथे ती डाॅलर जिलबी असते. आपली नेहमीची करंगळीच्या जाडीची जिलबी जास्त छान लागते. कधी ती मध्यभागी मऊ असते. ते वर्तुळाकार भजं मठ्ठ्यात बुडवलं की कसली भारी चव येते.. कल्पनेनंही तोंडाला पाणी सुटतंय.

Rofl अगदी बरोब्बर हेमंत. ह्याच्च्च्च्च्च्च्च दोन कॅटॅगरीज आहेत. मी नं. १ मधली आहे Wink

परत या कायमचे>> येणार च आहोत. Happy

Mattha म्हणजे दही ..म्हणजे विरुद्ध आहार..
गोड आणि आंबट हे कॉम्बिनेशन अयोग्य .
जिलेबी बनवताना दही वापरतात पण मर्यादित.
अयोग्य आहार आहे तो

काही लोकांचा इश्यु हा असतो की अन्य लोकांच्या चॉइस द्दल हिणकस मत मक्त व्यक्त केल्याबद्दल त्यांना चैनच पडत नाही. तुम्ही पोसताय का त्यांना, तुम्हाला लाएबिलिटी होतायत का ते - मग आपलं तोंड बंद ठेवा & माइंड युअर ओन बिझनेस. 'माइंडिंग वन्स ओन बिझनेस' खरच अवघड आहे खरे.

सामो शब्दा शब्दाला अनुमोदन..... आणि कोणीही भाव देत नाहीय फिर भी बाज नही आते.... कौन है ये लोग, कहा से आते है.....
या सारख्या लोकांना अजून माईल्ड वाक्य म्हणजे ," डबक्यातुन बाहेर या"

aashu29 Lol नोकरदार आता तुम्ही. विसरू नका! Wink
अजुन पण कॅटेगरी नक्की असणार या #$%^ एनआरआय लोकांच्या. त्यांना असलेल्या माजा बद्दल पण लिहा ना थोडंसं. आणि जातील तिकडे एनआरआयपणा करण्याबद्दलचे किस्से पण लिहा. मजा येते वाचायला.

मी तर रोजच्या रोज कामानिमित्त परदेशी जातो पण कधीही पुणेकर नागरिकत्वाच्या जोडीला एन आर आय स्टेटस घेतले नाही याचा मला फंक्शन फंक्शन अभिमान आहे.

Lol अरे .....

बरीच जणं NRI नाहीत, परदेशी नागरिक आहेत. त्यामुळे रोजचं 'गोलमेज परिषद' होते इथे. Proud 'पठाणाच्या लग्नाला यायचं हं' असा एकच धागा काढला असता तरी चाललं असतं. चर्चेने सगळे प्रश्न सुटतात यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे.

चर्चेने सगळे प्रश्न सुटतात यावर माझा पूर्ण विश्वास बसला आहे. >> चर्चेचे नियम पुण्याच्या ट्रॅफिक मधे असतात तसे असावेत फक्त.

Pages