मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पा, म्हणजे आता तुम्हाला 'टॅक्स फ्री' मन्चुरिअन हवे आहे तर. आहेरमाहेर नको. 'करभरण नोहे केळीपाने मन्चुयज्ञ' Proud

हे राम ! इथे सगळे करदाते जमा झालेत.
हा करबुडव्या निघाला मायबोली सो
,
,
,
,
,
,
,
,
डवत नाही म्हणून झोपायला.

आपली नेहमीची करंगळीच्या जाडीची जिलबी जास्त छान लागते. कधी ती मध्यभागी मऊ असते. ते वर्तुळाकार भजं मठ्ठ्यात बुडवलं की कसली भारी चव येते.. कल्पनेनंही तोंडाला पाणी सुटतंय. >>> टोटली! मग जिलबी आणि मठ्ठा दोन्ही पोटात गेल्यावर फक्त त्यातली कोथिंबिर शिल्लक राहते जिभेवर. तीही मस्त लागते Happy टोटल नॉस्टॅल्जिया. लहानपणी अशा वेळेस जिलबीतील पाक आधी शोषून घेऊन मग स्ट्रॉ सारखा त्यातून मठ्ठा प्यायचा केलेला प्रयत्न आठवतो.

अजुन पण कॅटेगरी नक्की असणार या #$%^ एनआरआय लोकांच्या. >>> Lol अमित, एनाराय हे स्वार्थी असल्याने स्वार्थी व संतमहात्मे असे दोनच ग्रूप धरावेत यापुढे.

जिलेबी + मठ्ठा हे कॉम्बिनेशन का असते?
>>>>

मागे फेसबूकवर एका ग्रूपवर पाहिलेले. की बरेच जणांसाठी हा प्रकार नवीनच होता. मला ईतके आश्चर्य वाटले. लहानपणापासून मी मठ्ठा वा ताक जिलेबी खात लहानाचा मोठा झालोय. अगदी आजही ऑफिसला लंचला रोजच ताक असते. स्वीट बदलत राहते. जेव्हा जिलेबी किंवा बुंदी असते तेव्हा मी आधी ती ताकात टाकतो. आणि सर्व जेवण झाल्यावर मग ती छान मुरलेली आंबटगोड डिश खातो.

जिलेबी मठ्ठा एकत्र खातात हे माहिती आहे. पण कारण काय हे माहिती नव्हतं.
बुंदी रायता (रताळं) पंजाब हरयाणात खूप खाल्लंय. त्याला शाही रायता म्हणतात. ( उन्हाळ्यात मस्त डिश आहे ही. थंडावा येतो आतून).
बूंदी - कढी घरी बनायची. आता बरेच दिवस नाही बनलेली.

लहानाचा मोठा झालोय. अगदी आजही ऑफिसला लंचला रोजच ताक असते.

Rasgulla, गुलाब जामुन, पेढे,बर्भी, चॉकलेट ,कॅडबरी पण ताका मध्ये बुडवून खात असशील ना

दर दोन महिन्यांनी ते किमान एक मराठी लग्न तरी अटेंड करणार.>>>>> एवढी लग्न व्हायला तर हवीत. Proud

अजून एक मराठी लग्नातला प्रकार आठवला. नवरा नवरी पंक्तीत वाढायला यायचे. लहान असताना जाम क्रेझ वाटायची आपल्या पंक्तीला जणू कोणी सेलेब्रिटी येत आहेत Happy

दही जिलेबी, बुंदी etc ok.
पण ऋनमेष.
सर्व गोड पदार्थ दह्यात टाकून खातो असे तो लिहितो ते पण रोज हे जरा अती च होते.
अशी कोणती च गोष्ट जगात नाही ती त्यांनी केली नाही.
उद्या कोणी इथे लिहाले की आफ्रिकेच्या जंगलात मी टेन्ट लावून आठ दिवस राहिलो होतो.
लगेच ऋनमेष पण कोणत्या तरी जंगलात तो कसा पंधरा दिवस राहिला होता ह्या वर तो लिहिलं.
अजब रसायन आहे

हेमंत पुन्हा वाचा पोस्ट्. कॉपी पेस्ट करतो. फक्त जिलेबी बुंदी ताकात टाकतो.
.....

ऑफिसला लंचला रोजच ताक असते. स्वीट बदलत राहते. जेव्हा जिलेबी किंवा बुंदी असते तेव्हा मी आधी ती ताकात टाकतो

..

एकदा बालुशाही ताकात ट्राय केलेली. नाही आवडली. ईटस ओके. पुन्हा केले नाही. पण प्रयोग केल्याशिवाय कळणार कसे. कोणीतरी पावात वडा टाकला म्हणून वडापावचा जन्म झाला ना. रामायण महाभारतापासून नाहीये तो पदार्थ..

चला शुभरात्री !

मराठी लग्नाचा धागा NRI वर कसा घसरला?
मी परत "येणाराय येणाराय" असे म्हणत कधीही न येणाऱ्यास NRI असे म्हणतात असे ऐकले आहे बुवा!!

बॅचलर्स पार्टी आणि Spinster पार्टी.
<<
स्पिन्स्टर म्हणजे प्रौढ कुमारिका. बॅचलरेट असा शब्द आहे.

बरं.

अचानक भयानक रिकामा वेळ मिळाल्याने धागा पूर्ण वाचला.

बहुतेक वर्णने शहरी मराठी ब्राह्मण/उच्चज्ञाती वर्गातील लग्नांची आहेत.

देशावरल्या गावाकडील बहुजन समाजाची लग्नं अजूनही बर्‍यापैकी चाकोरी टिकवून आहेत.

टीपीकल मराठी म्हणावं असं लग्न नक्की कोणतं?

मुलाकडचे वर्‍हाड येऊन गावाबाहेरच्या मारूतीच्या देवळात टेकते. त्यांना 'रिसिव्ह' करायला नवरीचा भाऊ (सुक्या म्हणतात त्याला. वरघोड्याच्या वेळी करवला घ्यायला जातो तेच.) जातो. तिथे ब्रह्मचारी मारूतीची परवानगी घेण्याची पूजा करून नवरा मुलगा संसार सागरात पोहायला तयार होऊन घोड्यावर बसून वाजत गाजत गावाला दाखवत मांडवात आणला जातो. वगैरे वर्णने दिसली नाहीत.

सीमान्त पूजन हे त्याचेच व्हेरिएशन आहे. आलेल्या पाहुण्यांची एकमेकांशी ओळख करून देणे. मानापानाच्या वस्त्रांची देवाणघेवाण होणे, हे बेसिक.

लग्न ठरलं, की कुळाचार, हळद कांडणे, मांडव आणणे पासून अनेक विधी जाती जातीनुसार वेगळे आहेत. लग्नाचे मुहूर्तही जातीनुसार वेगळे लागतात. भल्या सकाळी लागणारी लग्ने ब्राह्मणांत (ब्रह्ममूहूर्तावर) लागतात, अन उतरंडीनुसार वेळ संध्याकाळपर्यंत जाते. गोरजमुहूर्त बहुजन मराठ्यांचा अन अजून पुढे रात्रीचे मूहूर्त इतरेजनांसाठी असतात. लग्नं लावणार्‍या भडजीची ती टाईमम्यानेजमेंट म्हणावी लागेल. सगळीच लग्नं एकाच वेळी लावून कसं चालेल? शिवाय लग्नसराई वर्षभर नसतेच. Wink

आजकाल बेसिकली सोशल मेडियावर फोटो शोभून दिसतील असे कपडे बदलत विधी करवून घ्यायची हौस लग्न करणार्‍या पोरांना, आपल्या 'वरकमाई'चे ओंगळ प्रदर्शन करता येईल असे विधी करायची हौस वधुपित्याला, व वधुपित्याला मॅक्झिम्म कापता येईल असे उद्योग करण्याची हौस वरपक्षाला असल्याचे बर्‍याच ठिकाणी दिसते. अन मग ते पाहून गरीबाघरी पण ऋण काढून सण केला जातो.

काळाचा महिमा आहे.

क्लासिक मराठी लग्नात विधी करायचेच झाले तर ते देव देवक बसवण्यापासून सुरू होऊन, रुखवत, शेवया गव्हले करण्यापासून, मांडवपरतणी, लग्नानंतरचा सत्यनारायण, सासरी आल्यानंतरच्या चुळा भरून केलेल्या आंघोळी पर्यंत ८-१० दिवस चालू शकतात.

पण १२वे तेरावे, शुद्धश्राद्ध करत १४व्या दिवसापर्यंत अंत्यविधी पुरवणार्‍या लोकांत तिसर्‍या दिवशी सगळं आवरून कामधंदे ब - हाल करणार्‍या नव्या प्रथा सुरू झाल्या तसं लग्नही बदललेलं आहे.

बदलणार आहे.

बेसिकली पब्लिक अनाऊन्समेंट अँड अ‍ॅक्नॉलेज्मेंट ऑफ मॅट्रीमोनी इतकाच अर्थ आहे. त्याचा इव्हेंट करताना त्यात काय टिकवायचे अन काय सोडायचे हे पब्लिकच्या टेस्टनुसार आपोआपच ठरत जाते.

लग्नात पनीर नको, इतकं एकमत इथे झालं तरी पुरे आहे Rofl

ता.क.

हां. नव्या प्रथांपैकी काय नको त्यात माझ्यामते मुख्य प्रकार म्हणजे

१. डीजे.
२. कार्यालयात भयंकर आवाजात लागलेली गाणी. शेजारी बसलेल्या माणसाचं बोलणं अजीबात ऐकू येऊ नये असा आवाज असतो. सांगून ऐकत नाहीत. आवाज कमी करून आलं तरि दोन मिन्टात कुणीतरी स्पीकरवाल्याचा पोर्‍या येऊन आवाज भीषण लेव्हलला नेऊन ठेवतो.
३. दीडशहाणे फोटोग्राफर्स. लाखात पैसे घेऊन तयार केलेला युस्लेस आयटम.

.लग्न च जुळत नाही म्हणून आज जिल्हा अधिकारी कार्यालय वर तरुणांनी मोर्चा काढला होता.

एकटे राहणे काही अवघड आहे असे वाटत नाही.
मुली वयाच्या ३५ शी पर्यंत लग्न न करता एकट्या राहतात ..तर ह्या मुलांना काय त्रास आहे.
मस्त एक मुल दत्तक घ्या.खूप पैसे कमवा.
अफाट संपत्ती जमा करा.
लग्न असेच होवून जाईल

>>>>>>>>लग्नात पनीर नको, इतकं एकमत इथे झालं तरी पुरे आहे
हाहाहा
>>>>>>>भीषण लेव्हलला नेऊन ठेवतो.
हाहाहा. पुण्याच्या गुप्ते क्लासमधल्या मॅडम असा भीषण शबअसाबर्‍याच ठिकाणी वापरत. तेव्हाही हसू येत असे. त्या मॅडममुळेच गणीताची गोडी लागली. हे अवांतर.
>>>>बहुतेक वर्णने शहरी मराठी ब्राह्मण/उच्चज्ञाती वर्गातील लग्नांची आहेत.
होय. मी एकदा मैत्रीणीच्या नात्यातील लग्न म्हसवडला अटेंड केले होते. आता आठवत नाही पण मजा आलेली होती. गावजेवणही छान होते.

Hemant 33

तुमचे कौतुक वाटते.

इतके निर्बुद्ध प्रश्न तुमच्या डोक्यात येतातच कसे काय हो?

वर्षानुवर्षे डेव्हलप झालेले लग्न नावाच्या प्रकारातले ऑप्शनल "विधी व रेस्पिरेटरी व्हायरल डिसीज ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स, यांची तुलना हास्यास्पदच्या पलिकडे आहे, हे तुमच्या लक्शात येत नाही का?

प्लस, टॅन्जट मारणे.

मधेच एनाराय. मधेच करोना.

कठीण आहे.

चुकून तिथे msg गेला.तो covid धाग्यावरचा होता.
React होताना थोडा संयम आणि ,विचार, करायला शिका.
अती घाई संकटात नेई .(फजिती पण करते अती घाई)
हे वाक्य सर्व प्रकारच्या प्रसंगात लागू आहे

React होताना थोडा संयम आणि ,विचार, करायला शिका.
<<
तुमचा अ‍ॅक्ट करतानाचा विचार पाहिला Rofl

विचित्र सल्ले देताना विचार करा जरा.

हा विषय इथेच थांबू ध्या.
मुळ विषयावर येवू.
मानापमान मध्ये सर्व भरकटत जाते.
तर विषयावर येवू या
लग्न

लग्न म्हणजे इव्हेंट नाही.
लग्न झाले की जबाबदारी पण येते.
लग्न ह्या विधीचा हेतू च आहे.
संतान पैदा करणे.वंश वाढवणे.
नवीन पिढी आणि जुनी पिढी जी शारीरिक बाबतीत कमजोर होत आहे पण त्यांनी च करोडो रुपये गुंतवलेले असतात मुलांना नोकरी लागे पर्यंत वाढवण्यासाठी
आणि सर्व स्थावर मालमत्ता ते निर्माण करतात .
ती सर्व पुढच्या पिढी कडे ते सोपावतात.
अंबानी ची मुलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा ठेवली तर त्यांना लाख रुपये पण कोणी पगार देणार नाही पण कुटुंब व्यवस्था आहे म्हणून ते वारस आहेत .
पाठच्या पिढीचे योगदान आणि पुढच्या पिढीची सुरक्षित आयुष्य.
ही पद्धत म्हणजे कुटुंब व्यवस्था.
लग्न हा खूप महत्वाचा विधी आहे.
धांगडधिंगा करण्या सारखा तो उथळ विधी नाही.
नाचा पासून सर्व प्रकार पार्ट्या वैगेरे, pre-wedding वैगेरे ,करून लग्न झालेली दोन वर्षात घटस्फोट पर्यंत आलेली जोडपी असंख्य आहे .
मी पण बघितली आहेत.
साधे अगदी हार घालून लग्न केले आणि लग्न ह्या विधी चे महत्व समजले तर .
तो अगदी यशस्वी लग्न विधी आहे

Pages