मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न म्हणजे इव्हेंट नाही.
<<<
बरं.

शब्दार्थ :
event
/ɪˈvɛnt/
noun: event; plural noun: events

a thing that happens or takes place, especially one of importance.

a planned public or social occasion.

आज भलताच रिकामा वेळ आहे मला. Happy

तरीही बाकीचे डिसेक्शन सोडून देऊ.

तरि त्यातल्या त्यात :

अंबानीच्या पोरांचं पायावर उभं रहाणं सोडलं तरी धीरूभाई कुणाच्या कमाईवर वर आले? त्यांच्या तीर्थरूपांनी ठेवले होते का? की श्रीमंताघरी लग्न केले? पैसा येणे फक्त कुटुंबसंस्थेवर अवलंबून असते का?

असो. परिप्रेक्ष्य वाढवले तर बरे.

नक्कीच असतें
तुम्ही सरासरी बघा
अपवाद बघू नका
अंबानी chya मुलांना लाखभर पण कोणी पगार देणार नाही ह्या वर बोला .
पण.
वारसाहक्क नीच ते सरळ md chya पदावर जावू शकतात
नाही तर उभ्या आयुष्यात ते कधीच शक्य होणार नाही.

लग्न ह्या विधीचा हेतू च आहे.
संतान पैदा करणे.वंश वाढवणे.

<<

लग्न या विधीचा हेतू संतान पैदा करणे/वंश वाढवणे हा नाही.

त्यासाठीची क्रिया/क्रिडा वेगळी असते.

"लग्न" संपत्तीचा औरस व अधिकृत वारस कोण? हे सिद्ध करण्यासाठी आहे. वेल्थ मॅनेजमेंट अँड डिस्ट्रीब्युशन. वि.का. राजवाडे यांचे विवेचन याबाबतीत उद्बोधक आहे.

जसे लग्न, तशीच संपत्तीच्या वाटेहिस्श्यवरूनच मुळात सतीची प्रथा तयार झाली होती व पैसेवाल्या वर्गाकडून जोपासली गेली होती. याचेही विवेचन आहे, पण त्यासाठी संदर्भ ग्रंथांचे वाचन आवश्यक आहे.

संदर्भाशिवायची स्वयंभू मते व उपदेश आजकाल सहसा व्हॉट्सॅपवर मुबलक असतात. पण ते एक असो.

अंबानी chya मुलांना लाखभर पण कोणी पगार देणार नाही ह्या वर बोला
<<
त्या मुलांची नावे जरा गूगल न करता कुणी सांगेल का मला?
नक्की कोणता अंबानी?
मोठा की छोटा?

त्या मुलांची कुवत, लायकी, पगार कमवायची क्षमता यावरचा सखोल अब्यास व फर्स्टहँड नॉलेज, भविष्याचे त्रिकालज्ञान, वश असलेली कर्णपिशाच्चे, यांना कोपरापासून नमस्कार.

एन्जॉय.

मान्य आहे तुमचे मत पूर्ण चुकीचे नाही.
पण लग्न हा विधी गंभीर आहे.
लग्न बरीबर जबाबदारी हे सूत्र आहे.
मग ती जबाबदारी नवरा बायको मधील प्रेमाची असेल.
एकमेकांचा आदर करण्याची असेल.
कुटुंब सांभाळण्याची असेल .
हे तर तुम्ही नाकारत नाही ना .की लग्न म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्यास हक्काचा पार्टनर आणि फक्त उथळ मौज मजा.
अशी तुमची धारणा आहे

कस्ली जबाबदारी?

बापाने पोरीलास्वतःच्या पायावर उभे न करता तिला आयुष्यभर पोसेल म्हणून एकरकमी हुंडा देऊन विकत घेतलेल्या नवरा अन त्याच्या कुटुंबियांचा रुबाब मन व शरीर मारून सहन करणार्‍या, वेळ पडली तर डोक्यावर रॉकेल ओतून घेणार्‍या पोरीच्या कुचंबणेची?

आजकाल पोरांपेक्षा जास्त कमवतात पोरी, अन माज करणार्‍या नवर्‍यांना लाथ मारून घटस्फोट घेतात. जे नव्या समाजव्यवस्थेत एकदम पर्फेक्ट आहे.

इथे लग्न-समारंभातील मराठी लोकांच्या विशिष्ट परंपरा लोप पावत आहेत काय याबद्दल गप्पा सुरू आहेत. उगा अंबानीचे अडाणी ट्यांजंट मारू नका

एनाराय अंबानी, लग्नाच्या जबाबदार्‍या वगैरे वर वेगळा धागा काढा पाहू.

हा अध्याय झाला कि इथेच शेअर बाजार आणि लग्न असा पुढचा अध्याय चालू करायचा आहे. लक्षात असू द्यावे.
अंबानी = एक लाख रूपये पगार = रिलायन्स = शेअर बाजार = संपत्ती = जगातला पहिल्या दहात श्रीमंत = लग्न = लग्नातली पत
या क्रमाने येऊ द्या.

तुम्ही आज जे काही आहात.
दोन वर्ष तर माणसाची पोर नीट चालत पण नाहीत .अन्न शोधणे तर खूप दूर.
तुम्ही स्वतःच्या हिमत्ती वर अन्न मिळवले आहे का?
तुम्ही स्वतः kg मध्ये प्रवेश घेतला आहे का?
लाखभर donation भरुन
वयाच्या वीस वर्षा पर्यंत स्वतःचे अन्न विकत घेण्याची किंवा बनवण्याची तुमची कुवत होती का?
नोकरी लागायच्या अगोदर कोणाच्या घरात राहत होता.
त्या घरातील सोयी सुविधा तुम्ही वापरल्या नाहीत का.
स्वतःची घर घेण्याची कुवत तुमच्यात कधी आली ?आणि ती कुवत येण्यासाठी करोडो रुपये कोणी खर्च केले.
तुम्ही kg पासून स्वतचं ,स्वतःच्या मेहनती वर आज जे आहात तिथे पोचला असाल तर च aargunent करा .
नाही तर तो हक्क तुम्हाला नाहीं

तेच बोलतोय मी .
लग्न हा एक पवित्र विधी आहे.
लग्न झाले की जबाबदारी येते.
लग्नं म्हणजे मौज मजा नाही.
काही धांगडधिंगा करू नका
विधी म्हणूनच त्याच्या कडे बघा.
हेच तर सांगत आहे.

देवा!

खरंच कठीण आहे.

हे पात्रं माबोवर इतक्या अनिर्बंध पणे पिंका टाकत फिरताना कुणी टोकत का नाहिये, हे आत्ता समजलं मला.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

अलीबाबा .
तुमच्या कडे एका पण प्रश्नांचे उत्तर नाही .
माणसाचे मुल हे पृथ्वी वरचे सर्वात जास्त दुसऱ्यावर अवलंबून राहणारे मुल आहे.
त्याला आधार नाही मिळाला तर ते पाच वर्ष पण जगू शकणार नाही
बाकी प्रगती सोडूनच ध्या.
कुटुंब व्यवस्था आहे म्हणूनच आज. माणूस प्रगत दिसत आहे.
संरक्षण,रक्षण,भविष्य, सर्व काही मानवी मुलांचे आज ठीक आहे .
त्याचे कारण फक्त कुटुंब व्यवस्था.

हे सर क्रमांक 2 आहे
कधी कधी ओरिजिनल सरानाही भारी पडतात >> ओरीजनल सरांची बोलतीच बंद केलीये त्यांनी. कोणताही विषय कुठेही नेऊ शकण्याची दैवी देणगी आहे त्यांच्याकडे आणि व्यासंग म्हणाल तर रॉकेट कसे उडवावे पासून मेथीची भाजी कशी निवडावी पर्यंत सगळेच विषय. धमाल सुरु आहे माबोवर.

रामनगर यांच्या " रामनगरी " ह्या आत्मचरित्रात ' परसाकडे ' जाणे ह्या विवाहोत्तर विधीचा उल्लेख आहे.

हे पात्रं माबोवर इतक्या अनिर्बंध पणे पिंका टाकत फिरताना कुणी टोकत का नाहिये, हे आत्ता समजलं मला.>>> Lol माबो अभ्यास कमी पडतोय. असो देर आये दुरूस्त आये!

मुलाकडचे वर्‍हाड येऊन गावाबाहेरच्या मारूतीच्या देवळात टेकते. त्यांना 'रिसिव्ह' करायला नवरीचा भाऊ (सुक्या म्हणतात त्याला. वरघोड्याच्या वेळी करवला घ्यायला जातो तेच.) जातो. तिथे ब्रह्मचारी मारूतीची परवानगी घेण्याची पूजा करून नवरा मुलगा संसार सागरात पोहायला तयार होऊन घोड्यावर बसून वाजत गाजत गावाला दाखवत मांडवात आणला जातो. वगैरे वर्णने दिसली नाहीत. >>>>

असे लहानपणी चणेर (अलिबागच्या पुढे ) आत्याच्या गावी , आत्ये भावाच्या लग्नात पाहिले होते।

माणसाचे मुल हे पृथ्वी वरचे सर्वात जास्त दुसऱ्यावर अवलंबून राहणारे मुल आहे.
त्याला आधार नाही मिळाला तर ते पाच वर्ष पण जगू शकणार नाही
बाकी प्रगती सोडूनच ध्या. >>>>>ते मग माकडापासून मानवाची उत्क्रांती वैग्रे झाली असे म्हणतात त्यात मानवाचे मुलं पाच वर्षानंतर जगले नसते तर आता एवढी लोकसंख्या वाढली आहे, ती नेमकी कशी बरे ?????

लग्नात मरा ठीपण हवे असेल तर त्याची सुरुवात खूप आधीपासून करावी लागेल.
लहान मुलांना किमान वाढदिवसाला आणि सणावारी पारंपरिक मराठी पोशाख घालावेत. मुलींना परकर पोलकं. मुलग्यांना सदरा बंडी टोपी . धोतर. अगदीच नाइलाज असेल तर सुरुवार. वाढदिवसाला औक्षण करावं. सगळ्या मोठ्यांच्या पाया पडायला लावावं. जोडीला केकही कापावा हवं तर. पण औक्षण , नमस्कार हवेच. असंच प्रत्येक सणाला. . नवे कपडे केल्यावर सुद्धा. आणि हे मुलांसोबत आईवडिलांनीही करावं. म्हणजे मुलांच्या लग्नात शिवलेल्या साड्या घालाव्या लागणार नाहीत. दुर्दैवाने वस्त्रसंस्कृती जपायची जबाबदारी सुद्धा फक्त स्त्रियांवरच आली आहे. पण मुलांना किमान टोपी किंवा जे काही आपल्या परंपरेत असतं त्याची सवय लावावी.
वाढदिवसाला व सणावारी तरी पदार्थही मराठीच असावेत.
लग्नात मराठी पंगत हवी असेल तर रोज पाटावर बसून जेवायची सवय लावावी. डायनिंग टेबल किंवा टीव्हीसमोर नव्हे.

शुद्ध मराठीपण जपायचे असेल तर बाराबंदी, जातीनुसार पगडी,/मुंडासे,/ पागोटे, /रुमाल वगैरे डोक्यावर ठेवावेत. करकरीत वाहाणा घालाव्यात. स्त्रियांनी व आणखी काही जणांनी अनवाणी चालावे. यादव कालीन अथवा शिवकालीन चालीरीती पाळाव्यात. महिलांनी सती व्हावे. असे आचार घराघरांतून पाळले गेले की पुढील पिढ्या पक्क्या मराठी बनतील. मग लग्नेही पूर्वीच्या ( परंपरांनुसार) पद्धतीने होतील. ती अनेक पुरुषांची संख्येने एकापेक्षा अधिक होतील.....

Lol अग्निवीर आणि हिरा posts make sense !
मराठीपणा हरवला म्हणजे आमच्यावेळचे पुणे टाइप आहेत सगळ्या पोस्ट्स Wink

मराठीपणा हरवला म्हणजे आमच्यावेळचे पुणे टाइप आहेत सगळ्या पोस्ट्स >>> हो एक्झॅक्टली तसेच लिहीले होते की मी. एक कॅव्हिअ‍ॅटही दिला होता आगामी समंजस पोस्ट्स करता Happy

Pages