काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.
निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?
वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?
एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.
शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?
म्हणून तर आम्ही सांगत आहे .
म्हणून तर आम्ही सांगत आहे .
दुसऱ्याचे मागे पळू नका >> चोरपावलांनी जातात भौतेक
म्हणून तर आम्ही सांगत आहे .
म्हणून तर आम्ही सांगत आहे .
दुसऱ्याचे मागे पळू नका >> चोरपावलांनी जातात भौतेक
आचार्य गुरुजी नी एक च पोस्ट
आचार्य गुरुजी नी एक च पोस्ट दोनदा
केली
आचार्य गुरुजी नी एक च पोस्ट
.
आचार्य गुरुजी नी एक च पोस्ट
.
पोस्ट दोनदा केली >>
प्रकाटाआ.
अनुकरण हा विषय फक्त विवाह
अनुकरण हा विषय फक्त विवाह सोहळ्या पर्यंत च मर्यादित नाही.
लोकांनी स्वतःचा आहार बदलला ,
माझ्या पाहण्यात शेकडो आहेत देशात करोडो असतील.
Fakt अनुकरण करायचे ही मानसिकता.
पेहराव बदलला.
मुंबई मध्ये राहत असल्या मुळे सर्व लोक बघायला मिळतात त्यांचे मी नीट निरीक्षण करतो.
युरोपियन स्त्रिया कमी कपडे भारतात तरी वापरत नाहीत पण कोण वापरणारी असेल अगदी मिडी स्कर्ट.
तरी तिच्या चेहऱ्यावरचे भाव नॉर्मल असतात.
चालणे नॉर्मल असते.
आणि अनुकरण म्हणून आपल्या करतात त्यांचे चालणे आणि भाव सर्व बदलेले असते.
लगेच फरक कळतो.
हे original आणि हे अनुकरण.
सार्वजनिक ठिकाणी मुके घेणे, मिठ्या मारणे हा नवीन प्रकार भारतात चालू झाला आहे.
एकांतात बिंग फुटेल म्हणून सार्वजनिक ठिकाणी हे प्रकार होतात.
हा मूळ उध्येश असतो.
पण मॉडर्न पणा आड लपली तर लपली कमजोरी.
हा हेतू मनात ठेवून भारतीय ते अनुकरण करत असतात.
आणि लोक व्यक्ती स्वतंत्र म्हणून त्याचे समर्थन करत असतात..
अनुकरण करण्या मागे हेतू वेगळा असतो आणि रिॲलिटी वेगळी असते.
ह्या साठी ही उदाहरणे
लग्न सोहळा अनुकरण.
लग्न सोहळा अनुकरण.
फॅशन अनुकरण
आहार अनुकरण
पेहराव अनुकरण
भाषा अनुकरण
Etc Etc
भारतीय लोक डोळे झाकून अनुकरण करतात..त्याचा मूळ हेतू असतो स्वतःची
कमजोरी झाकणे किंवा नाकारणे.
पाश्चिमात्य लोकांनी फक्त कपडे बदलले नाहीत तर विचार पण बदलेले आहेत.
आपण फक्त च कपडे बदलतो.
हे सर्व बाबतीत लागू
लग्न सोहळा अनुकरण.
लग्न सोहळा अनुकरण.
फॅशन अनुकरण
आहार अनुकरण
पेहराव अनुकरण
भाषा अनुकरण
Etc Etc
भारतीय लोक डोळे झाकून अनुकरण करतात..त्याचा मूळ हेतू असतो स्वतःची
कमजोरी झाकणे किंवा नाकारणे.
पाश्चिमात्य लोकांनी फक्त कपडे बदलले नाहीत तर विचार पण बदलेले आहेत.
आपण फक्त च कपडे बदलतो.
हे सर्व बाबतीत लागू
युरोपियन स्त्रिया कमी कपडे
युरोपियन स्त्रिया कमी कपडे भारतात तरी वापरत नाहीत पण कोण वापरणारी असेल अगदी मिडी स्कर्ट.
तरी तिच्या चेहऱ्यावरचे भाव नॉर्मल असतात. >> जबरदस्त निरीक्षण आहे सर तुमचे
सार्वजनिक ठिकाणी मुके घेणे, मिठ्या मारणे हा नवीन प्रकार भारतात चालू झाला आहे.
एकांतात बिंग फुटेल म्हणून सार्वजनिक ठिकाणी हे प्रकार होतात.>> आता कसा 'लाईन'वर आणला विषय सरांनी
मी कमजोर आहे गरीब आहे हे
मी कमजोर आहे गरीब आहे हे माहीत पडू नये लपून राहावे म्हणून मोठ्या व्याजाने कर्ज घेवून लग्न झोकात लावून देणारे महाभाग कमी नाहीत.
मी काकू बाई ठरू नये .
अडाणी ठरू नये म्हणून.
अतिशय चीप असणाऱ्या .गोष्टी पण मॉडर्न आहेत असे लोक समजतात.
म्हणून
फक्त अनुकरण करणे हाच हेतू ठेवून
ते करणारे नवरा नवरी कमी नाहीत.
बंदी मुठ्ठी सवा लाख की
बंदी मुठ्ठी सवा लाख की
खुली तो प्यारे खाक की
या सरांनी त्या सरांना दान
या सरांनी त्या सरांना दान द्यावे
आणि या पोस्टींतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये केली माबोकरांनी
पहिल्या सरांस दुजाने लपेटुनी घ्यावे
या सरांनी त्या सरांना दान द्यावे
वाचकाच्या डोळा मोतीबुंद व्हावे
सोडता सुगंध सर्वत्र भारलेला
माबोकरांचा खेळ संपवून जावे
(No subject)
सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन
.
सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन
हा लेख एका फेसबूक पेजवर वायरल झाला आहे. चार तासात ४००+ लाईक्स आणि शेकडो कमेंट. फुल्ल राडा
.
सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन
सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन
हा लेख एका फेसबूक पेजवर वायरल झाला आहे. चार तासात ४००+ लाईक्स आणि शेकडो कमेंट. फुल्ल राडा Happy>>> बिंग मालवणी वर ना ?...71 कंमेंट्सच आहेत हा ...पण होतील शेकडो सुद्धा ....:<) ..हलके घ्या .
बरं.
बरं.
ते ट्रॅडिशन वगैरे करताना हिरवा शालू अन हिरवा चुडा सोडून भगवा कधीपासून करायचाय त्याचे व्हॉट्सॅप फॉर्वर्ड नाही आले का 'अधिकृत प्रवक्त्यां'कडून?
इथे भगवा हिरवा हा काही प्रश्न
इथे भगवा हिरवा हा काही प्रश्न नाही.
मराठी लोक सोडून बाकी सर्व आप आपले रीतिरिवाज कधीच सोडत नाहीत.
मग ते कोणत्या ही धर्माचे असू द्यात.
मराठी च स्वतःचे सोडून दुसऱ्यांच्या पाठी पळत असतात.
कणाहीन समाज
इथे भगवा हिरवा हा काही प्रश्न
इथे भगवा हिरवा हा काही प्रश्न नाही.
मराठी लोक सोडून बाकी सर्व आप आपले रीतिरिवाज कधीच सोडत नाहीत.
मग ते कोणत्या ही धर्माचे असू द्यात.
मराठी च स्वतःचे सोडून दुसऱ्यांच्या पाठी पळत असतात.
कणाहीन समाज
Pages