दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण उडत उडत नसतील करत ना. त्यांना पकडता येईल असं काही असलं की तिथे पकडुन बसतात आणि कार्यभाग उरकतात. खाचा असतील तर त्या भरून, भिंत रफ असेल तर ती , सगळं काही एकदम गुळगुळीत करून घ्यायचं.

ह्म्म्म्म....मानवदादा, पॉईंट आहे. वटवाघळं एखादी बिजली की चंगी वायरसे लटकणार असतील तर ती वायर काढायला हवी.

पाटली आईची आहे आणि तिने एक मला आणि एक वहिनीला दिली. आईचा हात लहान आणि मऊ आहे. माझा पंजा मोठा आणि कडक आहे. पाटली जात नाही माझ्या हातात. वहिनीची पण हीच स्थिती आहे.
पाटली जाड आहे त्यामुळे मोठी करायला जास्त जोर लावला जातो आणि त्याने चिरते पाटली असे त्या कारागिराने सांगितले.
वितळवायची नाहीय मला.. भावना गुंतल्यात ग अनु..

हम्म
कठीण आहे मग.खरं तर वितळवून पण मूळ भावना आपल्या पाशी आहेत त्यामुळे हरकत नसावी
(आई नुकतीच गेली. बाबा 10 वर्षांपूर्वी गेलेत.बाबांच्या लग्नाच्या अंगठीवर तिचं नाव होतं.आणि ती जरा पुरुषी थाटाची होती.ती वितळवून ऑफिस युज चे छोटे कानातले केले.असं करताना थोडं स्वार्थी वाटतं.पण किमान वापर होतो वस्तूचा.)

कारागिराने सांगितलेले बरोबर वाटतेय. सोन्याची टेन्साइल स्ट्रेंग्थ जास्त नाही. जेवढे कॅरट जास्त तेवढी कमी आणि जेवढ्या जाड तेवढ्या लांबवायला कठीण.
स्क्रू बसवून (म्हणजे कट देऊन, फिल करून स्क्रू वगैरे) याच्या भानगडीत न पडणे बरे. त्यात शेवटी मोडून नव्या करण्याचीच पाळी येईल.
आतल्या बाजूने मशिनिंग करून आणि मग लांबवून मोठ्या करणे हा तांत्रिकी उपाय प्रत्यक्ष्यात व्यवहार्य नसावा. (बरेच सोने वाया जाऊ शकते)

तरी कुणी योग्य उपाय सुचवत असेल तर बघा.

अन्यथा भावना गुंतलेल्या असल्याने हे दोन पर्याय:
१. समजा आईला त्या आपल्या हातात घातलेल्या पहाच्याच असत्या आणि आपल्या हातात तर जात नाहीत, तर तिने काय केले असते? न घालण्या पेक्षा मोडून नव्या करून घातलेल्या आवडले असते की नाही हे तुम्हीच सांगू शकता. हो उत्तर असेल तर तसा विचार करा.
२. तशाच ठेवून पुढल्या पिढीला पास ऑन करणे. कदाचित मुलगी/सून यांच्या हातात येऊन जाईल. नसेल तर ते पुढे ठरवतील काय करायचे.

वटवाघूळ जिथे बसतं तिथे संध्याकाळी 'हिट' मारून ठेवा. त्या वासाने ते येत नाही. असं सलग काही दिवस केलं की ते यायचं बंद होईल. (आम्हाला सेम प्रॉब्लेम होता. हिटने सुटला)

Submitted by वावे on 8 October, 2022 - 11:35
व्हॉट ॲन आयडिया मॅडम जी!

२. तशाच ठेवून पुढल्या पिढीला पास ऑन करणे. कदाचित मुलगी/सून यांच्या हातात येऊन जाईल. नसेल तर ते पुढे ठरवतील काय कराय.......
पाटली मोडायचे मन होत नव्हते तेव्हा हाच मार्गच सुचवणार होते.अनायसे मानव यांनी सुचवला आहेच.

वटवाघूळ ना हुआ ये तो कोल्होबा हुई गवा। (आठवा म्हातारी ,बोरीचं झाड, बोरं खाऊन शी करून जाणारा कोल्हा आणि गरम तवा कोल्ह्याला चटका द्यायला ) अंधार आहे का जिथे वाघळं येताहेत? वावेचा उपाय नामी वाटतोय. ‌

धनुडी Lol
हो अंधार आहे..लाईट काढून टाकलाय दारातला कारण आधी एक मोठ्ठं मधमाशाचं पोळं होतं जवळच..लाईट चालू असला कि शंभर दोनशे मधमाशा या लाईटजवळ बसायच्या..

वटवाघूळ हे पक्षी जमातीत येत नाही म्हणे. सस्तन आहे. कुत्री मांजरीवाला कुठला धागा सर्व सस्तन प्राण्यांना समाविष्ट करून आणखी व्यापक करता येईल काय? - एक किरकोळ प्रश्न.

उडू शकणाऱ्या (तरंगू शकणाऱ्या नव्हे) सस्तन प्राण्यांत वटवाघूळ हा एकमेव प्राणी आहे. वेगळा धागा काढून त्यांचा मान ठेवावा असे मी सुचवतो.

Gboard आल्यापासून लेखनाच्या चूका भयंकर वाढल्या आहेत. त्यातही टंकायला एवढा वेळ लागतो की अनेकदा टंकून पोस्ट पडे पर्यंत वर दुसरी पोस्ट येऊन बराच वेळ निघून गेला असतो आणि वरच्या पोस्ट मध्येही आपण मांडला तोच मुद्दा असतो किंवा त्यातील मुद्दा न विचारात घेता आपली पोस्ट पडली असते. ती संपादित करावी लागते किंवा वेळ नसल्यास ते राहून जाते.

तर (अँड्राईड) फोन वरून टंकण्या साठी दुसरा पर्याय कोणता? (वामा रहाणे, दोन तीन शब्दांचीच प्रतिक्रिया देणे या व्यतिरिक्त.)

मानवदादा +१
वैताग आहे. मधेच स्पेसेस येतात, ऱ्हस्वदीर्घ चुकतं. त्रोटक लिहून जावं लागतं. प्रत्येक शब्द बदलत बसावं लागतं. मला हे अपडेट मग दी मको होते
अगदी नको.*

वटवाघूळ कोणाच्या गच्चीत येत नाहीत.
कबुतर सोडली तर बाकी पक्षी असले उद्योग करत नाहीत
वटवाघूळ हा प्राणी पण असा वागत नाही.

मानव आणि अस्मिता,

गूगल प्ले स्टोर वरून 'indic keyboard' डालो आणि इंस्टॉल करा. त्यात ग म भ न सारखीच अक्षरागणिक transliterate करायची सुविधा आहे. नुकताच शंतनू यांनी पाषाणभेद यांच्या एका ब्लॉगचा दुवा दिला होता त्यात हे सापडलं. त्याबद्दल मी त्यांना दुवा देतो. Happy

गुगल इंडीक किबोर्ड म्हणताय का?
तो आता नवीन अँड्रॉइड वर चालत नाही, साधारण सहा महिन्यांपासुन तो काढून जिबोर्ड आणला गुगलने.
गुगल इंडिक कुठून शोधून जरी इंस्टॉल करतो म्हटल तर नविन अँड्रॉइड व्हर्जन त्याला नाकारतो.

माझ्या सुद्धा नवीन फोनवर बहुतेक जिबोर्डच असणार मग. पण त्यात मराठीसाठी फार टाईप करावे लागते. आधीचा फोन होता त्यावर, "त वरून ताकभात ओळखणे" म्हणतात तसे, अगदी थोडे टाईप केले कि इप्सित शब्द पटकन दिसायचा. इथे मात्र फार झटावे लागत आहे.

डाउनलोड करून वापरायला सुरुवात केली आहे.
काही जी बोर्ड पेक्षा सोपे तर काही वेळखाउ असे सद्ध्या वाटत आहे. (उदा: अकारान्त शब्द शेवटी हलन्त रहातात, शेवटी a टंकावा लागतो, ट वर अनुस्वार द्यायचा असेल TaM टंकावे लागते वगैरे. ) पण निदान हवे ते उमटवता येतेय. सवय झाली की टंकायचा वेग वाढेल असे वाटते.

Pages