दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकल मध ही भारी आयडिआ आहे! बघितली पाहिजे करुन.
कॅनडात परत आल्यावर त्रास कमी झाला आहे असं वाटतंय. पँडेमिक, मास्क का रेडवुड पोलन इकडे नाही काय कल्पना नाही. पण बे-एरिआत पोलनच्या दिवसांत ते पोलन पडून पडून हिरवा-पिवळा गालीचा झालेला असे आम्ही रहायचो तिथे. मग सटासट शिंका!
क्लॅरटीन नॉन ड्राउझी असतं ना? ती गोळी ट्राय केली तर त्याचा मला ढिम्म उपयोग झाला नाही. ड्राऊझी वालीचा उपयोग होतो पण वेड्यासारखी झोप येते.

पोलन ऍलर्जी साठी काय उपाय? रोज रोज औषध खाणे बरोबर वाटत नाही... डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहतेय...>>
अलर्जी शॉट, नाकातला स्प्रे(प्रिस्क्रिप्शन), ओटीसी नेझल रिन्स . कन्जेशन ला sudafed, Robitussin बरे आहे. कोल्ड मेडिसिन असले तरी.
डॅलस मध्ये असाल आणि हाय पोलन रेट असेल तर गप घरात बसणे. Sad
तसच ओटीसी मेडीसिन घेत असाल तर नेमके कुठले वर्क होते ते बघा. मला अ‍ॅलीग्रा थोडेफार उपयोगी पडते. क्लॅरिटीन नाही.

क्विक ड्राय टॉवेल वापरा लोक्स
खेळाडू वापरतात ते दकेथलॉन स्टोर ला मिळतात एकदम लाइटवेत, अतिशय छोटी गुंडाळी होते, आणि पटकन वाळतात ही
मी आधी प्रवासात वापरायला म्हणून घेतले होते पण त्याचा गुण पाहता रेग्युलर वापरात पण तेच
आणि केसांना गुंडाळायला पण छान आहेत

मला पण पोलन अलर्जी होती. कशाचाच गुण येत नव्हता. वासावलेह म्हणून आयुर्वेदिक दुकानात मिळतं. च्यवनप्राश सारखं लागते. रात्री झोपताना अर्धा चमचा हळू हळू घसा शेकत संपवायचा. त्यावर पाणी प्यायचे नाही. साधारण पंधरा दिवसांत पूर्ण बरी झाले. त्यानंतर कधीच त्रास झाला नाही. एकदा ट्राय करून बघा.

पोलन ऍलर्जी हॉरिबल असते...
नट ऍलर्जी - नट्स अव्हॉइड करा खाताना...
शेल्फीश ऍलर्जी- क्रॅब वगैरे अव्हॉइड करा..
पोलन ऍलर्जी- श्वास घेणे तर अव्हॉइड करू शकत नाही...

च्रप्स - मी सहसा पोलन अ‍ॅलर्जी लोकांना स्प्रिंग मधे पाहिली आहे. ते काही दिवस्/आठवडे रोज घ्यायचे औषध मिळते. तेवढ्यापुरते रोज घ्यावे लागते - विशेषतः ज्या दिवसांत बाहेर जास्त असणार आहात. पोलन हवेतून गेले की नंतर बंद केले तरी चालते. पाऊस पडला की पोलन सगळे वाहून जाते किंवा खाली सेटल होते. तेव्हाही फारसे लागत नाही.

आमच्या भागात मे च्या सुमारास कधीकधी सगळीकडे हिरवा थर जमतो.

@च्रप्स नाही हो.
पोलन अ‍ॅलर्जीने तुम्हाला कधी एपिपेन घ्यावं लागलं आहे का? अत्यंत रेअरली पोलनने अ‍ॅनाफिलेक्सिस रिअ‍ॅक्ट होतं. पोलन अ‍ॅलर्जी अत्यंत नॉर्मल आणि कमी त्रासाची आहे.

नाही एपिपेन लेव्हल नाहीय... पण खूप त्रासदायक आहे...
फारएंड - फॉल ऍलर्जी... रगविड ... हे पोलन चारशे माईल्स वाहू शकतात हवेबरोबर...

पोलन्स साठी स्टोअर ब्रँड अ‍ॅलर्जी मेडिसीन (झरटॅक / क्लॅरीटीनचा भाऊ) आणि ओटीसी नेझल स्प्रे वर्क होतं माझ्या बाबतीत.

ह्याचीच alergy आहे हे माहीत पडायला वेळ लागत असेल ना.
कसे सहज माहीत पडेल.
हवेत अनेक घटक असतात त्या मध्ये नक्की पराग कणांची च allergy आहे हे कसे ओळखले जाते.
एक शंका.

Happy Happy

विनोद बाजूला ठेवून ( jokes apart ) सोलून खावेत असे ऐकून आणि वाचून आहे.

बदाम साल काढून खावेत सांगणारे त्यात टॅनिन असते ज्यामुळे पचन क्रियेत अडथळा येतो असे म्हणताना दिसतात.
तर साल खावी म्हणणारे त्यात पॉलीफिनॉलस् असतात ते फार उपयुक्त आहे असे म्हणताना दिसतात.
१०० ग्रॅम्स बदाम मध्ये ८० मीलिग्रॅम टॅनिन आहे असे गुगल बाबा सांगतात, म्हणजे साधारण एक कप चहात असतात तेवढे.
मग टॅनिन ची काळजी असेल तर एक कप चहा कमी पिऊन १०० ग्रॅम बदाम साली सकट खाता येईल, पॉलीफिनॉलस् चे जे काही फायदे ते मिळतील आणि टॅनिन रोजच्या एवढंच पोटात गेल्याने जास्तीचा तोटा होणार नाही.

चहा पितच नसाल तर साल काढून खावेत.

------
हा सल्ला नव्हे, स्फुट (का काय म्हणता येईल?) ते आहे.

आहार बाबतीत मी हेचं मत व्यक्त करत आहे .
पारंपरिक आहार प्रतेक भोगलिक जागेचा वेगळा आहे.
आणि तो अगदी योग्य आहे.
पारंपरिक आहार आणि त्या आहाराची भौगोलिक स्थिती वेगळी असेल तर .
प्रतेक व्यक्ती चे शरीर वेगळे आहे .कोणाला काय पचेल हे सांगता येत नाही
बदाम शरीरास चांगले आहेत म्हणजे जगातील सर्व लोकांना नाही तो नियम लागू होत.
जिथे बदाम पिकतात आणि हजारो वर्ष जे बदाम खातात त्यांनाच लागू होतो.
बाकी प्रतेक व्यक्ती चे शरीर वेगळी प्रतिक्रिया देवू शकते

म्हणूनच आंबे निर्यात करू नयेत. तिकडच्या लोकांच्या आरोग्याला चांगले नसणार ते. आपल्याकडेच विकावे फक्त, म्हणजे स्वस्तात मिळतील.

Almonds also harbor antinutrients, which can impair the digestion and absorption of certain nutrients, such as calcium, iron, zinc, and magnesium
https://www.healthline.com/nutrition/soaking-almonds
बदामसुद्धा पोषक घटकांच्या पचनात आणि पोषणित अडथळे आणतात?

Pages