दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. हे त्याने ड्रायव्हर शेजारी बसून स्टिअरिंग व्हीलचा ताबा घेण्यासारखे आहे.

माझ्याकडे च्या हा विभक्ती प्रत्यय कायम घ्या असा बदलतो आणि सुटा होतो.

>> गुगल इंडिक की बोर्ड काढून Gboard आणण्याचे प्रयोजन काय हे माहीत आहे का कुणाला?

अधिकृतरित्या कुठेच गुगलने काही सांगितलेले नाही. गुगल इंडिकला भविष्यातल्या एन्हांसमेंट साठी मर्यादा येत असतील किंवा तत्सम काही कारण असेल. पण त्यांना Gboard प्रोमोट करायचे असेल इतकेच आपण म्हणू शकतो. Just a business decision. (याचा अर्थ Gboard हे येणाऱ्या काळात गुगल इंडिक पेक्षा खूप चांगले होऊ शकते असे त्यांना वाटते). याचप्रकारे त्यांनी गुगल मराठी इनपुटचे विंडोज व्हर्शन सुद्धा अचानक बंद केले.

ऍपला मर्यादा असतील म्हणून बदलला ठीक .
Gboard मध्ये गुगल इंडिकचा तयार झालेला डेटाबेस घेता आला नसता का असा सुरवातीपासून पडलेला प्रश्न आहे. डेटाबेसच योग्य नसेल (जसे की एवढे चुकीचे शब्द की तो दुरुस्त करत बसण्यापेक्षा नवा तयार करणे इष्ट) तर गोष्ट वेगळी.

मानव ++++१११ अगदी अगदी झालं.
ऑटो करेक्शन चा एवढा वैताग येतो. अनु म्हणते तसं अर्थाचा अनर्थ होतो.किती लक्ष ठेवणार टाईप करताना. (पूर्वी निरू लिहीताना त्याचं निरुपयोगी असं व्हायचं. Lol आता निरू नी आयडीच बदलला )

लिहिण्याच्या
करून पहिलं.
प्रथम 'लिहिण्याची' शब्द सुचवला गेला. त्याला बॅकस्पेस करून दुरुस्त केला. काहीही अडचण नाही. मग पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा खूप पर्याय आले.

मी देवनागरीतून सात वर्षे गूगल इंडिक वापरून लिहित आहे. त्यामुळे गूगल इंडिक मला ,माझ्या भाषेला ओळखून आहे. काल इप्सित हा शब्द नेवीगेशन मेनूमध्ये " गूगल इंडिक राइटिंग पॅड खूण - इप्सित " असं आलं. म्हणजे Gboard हा माझ्या इंडिक हिस्ट्रीचा उपयोग करून घेत असावा.

>> Gboard मध्ये गुगल इंडिकचा तयार झालेला डेटाबेस घेता आला नसता का
हो हा प्रश्न टेक्निकल जे आहेत त्यांना पडणे स्वभाविक आहे. पण त्याचे उत्तर कळले मुश्कील आहे. इंडिकचा लर्निंग ट्री तसाच वापरता येत नसेल, अप्रोच बदलला असेल. किंवा तसेच काही कारण असेल. मला नाही वाटत कि त्यांनी फक्त ऍप बदललेय (त्या केस मध्ये तुम्ही म्हणता तसे backend तेच राहिले असते). पण त्यांनी (त्यांना माहित असलेल्या कारणास्तव) पूर्ण प्रोडक्ट् बदलले आहे.

बाकी गोष्टी नंतर अपग्रेड म्हणून दाखवणार असतील, सॉफ्टवेअर मध्ये माहीत असलेले काही किरकोळ दोष तसेच ठेवून ते नंतरच्या रिलिजेस मध्ये बरे करतात तसे.

हे सर्वच प्रकाशित लेखांना लागू आहे. जसं की उदाहरण म्हणून - एका वर्तमानपत्रात लेख छापून आला की दुसरीकडे येत नाही. मग फक्त एका पत्राचे वाचकच तो लेख वाचतात.
डिजिटल मराठी माध्यमांत एके काळी सात संकेतस्थळं होती (आता साडेतीन उरली आहेत. )आणि वाचक सर्व ठिकाणी फिरून ती वाचत होती हे काही आइडींच्या प्रतिक्रियेमध्ये दिसून येई. पण असे चौफेर वाचन करणारे वाचक फारच कमी असतील. मग लेखकाला एकच लेख दोन तीन स्थळांवर कॉपी -पेस्ट करण्याशिवाय मार्ग नसतो. आत एकाच वेळी करत नाही कारण प्रतिक्रियांना उत्तर देण्यास सवड मिळाली.
बाकीचे सर्वच लेखक असे का करत नाहीत याचे कारण बहुतेक त्यांचे वाचक आणि मित्र आणि हितचिंतक अमुक एक स्थळावरच आहेत असं त्यांना वाटतं असं म्हणू शकतो.

मनोगत हे अर्ध संस्थळ आहे. तिथे लेख आणि प्रतिसाद प्रकाशित करण्याचा अधिकार मंडळाकडे आहे. स्वप्रकाशन नाही.

असू ध्या हो.
त्यांच्या लेखावर मिपा आणि माबो वर एकसारख्या प्रतिक्रिया येत नाहीत ..
खूप फरक असतो वाचकांच्या विचारात.

दुर्दैव आहे पण मराठी संकेत स्थळ ठराविक विचाराने प्रेरित असतात आणि त्या विचार विरुद्ध कोणी वेगळा विचार मांडला की तो आयडी ब्लॉक करून विचार दाबले जातात.
किंवा काही आयडी च्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत त्यांना admin संरक्षण देते.त्यांची हुल्लड बाजी चालू असते.
त्या मुळे mr कुमार हे दोन्ही संकेत स्थळावर लिहतात .
त्या मधून लोकांची खरी मत समजतात.
मायबोली हे स्थळ सर्व विचारांचे स्वागत करते.
हा अनुभव आहे.

mr कुमार हे दोन्ही संकेत स्थळावर लिहतात .
त्या मधून लोकांची खरी मत समजतात.
. . . .

वैद्यकीय माहिती लेख. अधिकाधिक लोकांपर्यंत जाणे हा उद्देश.

मी सुद्धा जेव्हा तुमचा अभिषेक आयडीने कथा लेख लिहायचो तेव्हा मायबोली आणि मिसळपाव दोन्हीकडे प्रकाशित करायचो. आणि किडे सारे ऑर्कुटवर करायचो.

नंतर ऑर्कुट बंद झाल्यावर ऋन्मेष आयडी मार्केटमध्ये आणला तेव्हा चर्चेचे धागे काढू लागल्याने दोन्हीत आवडीचे असे मायबोलीवरच वावरू लागलो.

मध्यंतरी एका मोठ्या ब्रेकनंतर मी भन्नाट भास्कर आयडीने परत आलो होतो तेव्हा त्या आयडीने चेंज म्हणून मिसळपावचेही सदस्यत्व घेतले होते. त्यातून एक कथा (तू मने गमे छे) दोन्ही संकेतस्थळावर प्रकाशित केली. दोन्हीकडे चांगला प्रतिसाद मिळाला.

मग त्यानंतर मी भन्नाट भास्कर हाच ऋन्मेष आहे हे उघड केले. आणि ईथली ऋन्मेषची (आणि हिटलर हसला) ही कथा तिथे नेऊन चिपकवली. तसे त्यांनाही कळले ऋन्मेष ऋन्मेष म्हणतात तो हाच. मग काय, माझा भन्नाट भास्कर आयडी त्यांनी घाईगडबडीत ब्लॉक केला Happy

पण माझा तुमचा अभिषेक हा आयडी अजूनही तिथे आहे. तो तसाच ठेवण्यामागे काय लॉजिक आहे समजत नाही. कदाचित तो वापरतच नाही म्हणून असावे. तरी एकदा ऋन्मेषची आणखी एखादी कथा तिथे तुमचा अभिषेक या आयडीतून कॉपीपेस्ट केली तर तो आयडीही ब्लॉक करतील का हे बघायला हवे.

असो, प्रत्येक संकेतस्थळाची एक आपलीच तर्हा असते. हर जगह अपने लिये नही होती असे समजावे. आणि सगळीकडे ॲडजस्ट होण्याच्या नादात आपण आपली तर्हा कधी सोडू नये Happy

गुगल ट्रांसलेटर "Icing" असे दाखवतोय पण सोन्याशी संबंधित असल्याने झळाळी हा शब्द जास्त योग्य वाटतोय Happy

सुहागा

इथे त्याचे उपयोग बघा. सोन्यावर चकाकी आणायला वापरतात म्हणून त्या चकाकीलाही सुहागाच म्हणत असावेत.

सुहाग म्हणजे भाग्य,.
अशी गिफ्ट जी अमूल्य आहे.
स्त्री पती साठी अमूल्य असतो असा एक समज
सुहाग रात म्हणजे.
अमूल्य रात ज्या रात्री तुम्ही अमूल्य असा अनुभव घेता.

हे कुठे विचारावं ते कळलं नाही म्हणून इथे विचारतेय.
माझ्याकडे माझा मराठीतील जन्मदाखला आहे.
पण आता बायलिंग्वल (मराठी व इंग्रजी दोन्हीत) असलेले डिजीटल/इलेक्ट्रॉनिक बर्थ सर्टीफिकेटही मिळते असे ऐकले आहे. ते कसे मिळवता येईल? मी अमेरिकेत आहे. इथून करता येण्यासारखी काही प्रोसेस आहे का?

https://www.maayboli.com/user/इथे त्या युजरचा आय डी नंबर/created

आय डी नंबर त्या आय डी च्या "हे पान पहाण्यास परवानगी नाही" वाल्या पानावर जाउन url मधुन मिळवायचा.

मुख्य मुद्दा असा की सभासद नसलेल्या वाचकांना एखाद्या आइडीचे सर्व लेखन वाचायचे असेल तर ती सोय माबोने आणि नंतर मिपानेही काढून टाकली आहे. पूर्वी होती. यूजर नंबर वापरून त्या आइडीस संपर्क करता येऊ नये हा उद्देश होता तो तेव्हाही होता. पण लेखनाचे पान तरी उघडत होते.

Pages