Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिच्या मैत्रिणींना घेऊन आली >
तिच्या मैत्रिणींना घेऊन आली >>>
(No subject)
Bat म्हणजे इथे मिळते तशी रॅकेट का. रॅकेट उपयोगी असावी बहुतेक.
हो तीच अन्जुताई, हात भरून आले
हो तीच अन्जुताई, हात भरून आले माझे माश्या मारून, रॅकेटची बॅटरी बदलावी लागली, चुरचुर आवाजाने डोळे चमकू लागले , 'आमच्या लहानपणीच्या माश्या 'ढ' असायच्या, पूर्वीसारख्या माश्या राहिल्या नाहीत , ईवॉल्व झाल्यात' असेही सांगितले मुलांना .... तीस मारखाँ वगैरे जोक्स केले, एवढे प्रकरण ताणले गेले की बॅटची तुलना अर्जुनाच्या गाण्डीव धनुष्यापर्यंत गेली . पुष्कळ छळ झाला.
अमेरीकेतही असतात का माश्या?
अमेरीकेतही असतात का माश्या? आपल्यासारख्याच का वेगळ्या? त्यांचा कसला त्रास?
आमच्या लहानपणी मुंबईतल्या घरात असायच्या माश्या. स्पेशली पावसाळ्यात. पण ईतक्या ढिम्म असायच्या की त्यांच्यावर हाताचा तळवा टाकावा आणि मुठीत घ्याव्यात. स्पेशली सुकत घातलेल्या परकराच्या नाडीला माश्यांचा एक झुबका लटकलेला असायचा. तो तर अख्खा मुठीत यायचा. मग कोणाच्यातरी तोंडासमोर नेऊन उघडायची ती मूठ. अगदी भांबावून गेला पाहिजे तो.. मज्जा यायची. त्रास कधी वाटला नाही माश्यांचा.
ईथे मात्र शेवटची माशी कधी पाहिली आठवत नाही. आज ईथली चर्चा वाचून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या
ईथे मात्र शेवटची माशी कधी
ईथे मात्र शेवटची माशी कधी पाहिली आठवत नाही >> अरेरे! पर्यावरणाचा र्हास म्हणतात तो हाच.
स्पेशली सुकत घातलेल्या
स्पेशली सुकत घातलेल्या परकराच्या नाडीला माश्यांचा एक झुबका लटकलेला असायचा. तो तर अख्खा मुठीत यायचा >>> तुला बहुतेक चिलटं आठवतायत ऋन्मेष.
अगं नको ना बये ... "तुम्हाला
अगं नको ना बये ... "तुम्हाला कुठले किटक आठवतात?" धागा यायचा

माश्यांच्या समूळ उच्चाटनासाठी "गुड देखा मख्खी जैसा फिट हो गया" ह्या कवनात संत अनुष्कादेवी जे ज्ञान देऊन गेल्यात ते लक्षात ठेवावे. गूळ, फळे इ जो काही मधुर अन्नपदार्थ आहे तो व्यवस्थित झाकून किंवा फ्रिजमध्ये इ तजवीज करावी...
ऋ,
ऋ,
आपल्याकडच्या आणि ह्या सारख्याच असाव्यात, मन लावून बघितल्या नाहीत. (महेश बाबू थोडीच आहे)
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या>>>माश्यांचा कसला नॉस्टॅल्जिया
लोना, सगळंसगळं केलं होतं पण एकेक मारायचीच वेळ आली होती.
च्रप्स, इथे अनुचा धागा आहे बहुतेक.
zevo fly trap मिळतो .. तो आणा
zevo fly trap मिळतो .. तो आणा आणि लावा
गेल्या काही आठवडाभरात आठ माश्या आणि ऐंशी चिलटं पकडली आहेत.



उन्हाळ्यात दार उघडं टाकलं की
उन्हाळ्यात दार उघडं टाकलं की आल्याच. एकेक करून मारणे या शिवाय काही उपाय नाही. तो कॉस्को चा निळा दिवा आणलेला तो अगदीच बकवास आहे. हा वरचा नाही ट्राय केलाय.
इथे एवढ्या माशा येत नाहीत पण
इथे एवढ्या माशा येत नाहीत पण एखादी माशीही त्रासदायक वाटते पण काळ्या हीटने जाते किंवा मरते.
इथेही दोन चारच असतात पण फार
इथेही दोन चारच असतात पण फार डोकं उठवतात.
इथे म्हणजे मायबोलीवर का?
इथे म्हणजे मायबोलीवर का?
(No subject)
"तुम्हाला कुठले किटक आठवतात?"
"तुम्हाला कुठले किटक आठवतात?" धागा यायचा>>>
त्यापेक्षा सर, 'माश्यांचे न मारता संगोपन' धागा येऊ द्या.
माझा अनुभव आहे की माश्यांना टाईम आऊट दिल्यास त्या वैतागून परत येत नाहीत.
गेल्या काही आठवडाभरात आठ
गेल्या काही आठवडाभरात आठ माश्या आणि ऐंशी चिलटं पकडली आहेत.>> वाह! मोजणी पण होते का त्यात
अस्वच्छता हे माशा येण्याचं
अस्वच्छता हे माशा येण्याचं मुळ कारण आहे घर आणि परिसर स्वच्छ असेल तर माशा येत नाहीत
फक्त घर स्वच्छ असून फायदा नाही परिसर पण स्वच्छ हवा
>> अमेरीकेतही असतात का माश्या
>> अमेरीकेतही असतात का माश्या?
हाच प्रश्न मलासुद्धा पडला होता. अमेरिकेत कोणत्या भागात तेथील वातावरणानुसार असावे हे.
लहानपणी घरमाशा असायच्या त्या फक्त आषाढात असायच्या का हे आता आठवत नाही. पण इथे पुण्यात आषाढातच दिसतात. बाकी काळात पूर्ण गायब.
एका कपात व्हीनिगर मध्ये काही थेंब डिशवॉशर लिक्वीड टाकून ठेवल्यास व्हिनिगरला आकर्षित झालेल्या माशा डिशवॉशर लिक्वीडमुळे थेट तळाशी जातात. काही प्रमाणात हा उपाय प्रभावी आहे.
माशा परवडल्या पण ढेकूण हा
माशा परवडल्या पण ढेकूण हा खूप महाभयंकर कीटक आहे .आणि चिवट पण खूप आहे ..सर्व उपाय योजना,औषध ह्या ना बिलकुल दाद देत नाही
नवरात्रीचे नऊ ऊ रंग कसे ठरले
नवरात्रीचे नऊ रंग कसे ठरले यावर सोनू या़च्या लेखात व त्यावरच्या प्रतिसादांत 'माहिती' (!) आहे. घणाघाती चर्चाही आहेच.
त्या गंमतीचमतीला तिसऱ्या चिकटवून मजा आणखी वाढणार असेल ना आणखी काही होणार असेल तर होवो.
मटावाल्यांनाच तुम्ही हे रंग कसे ठरवले असं विचारता येईल.
zevo fly trap >>> हा उपयुक्त
zevo fly trap >>> हा उपयुक्त वाटतो आहे. पण यात अडकलेला ऐवज साफ कसा करायचा?
तुम्हाला कुठले किटक आठवतात?" धागा यायचा >>>
घरात येणारे की बाहेरचे? अंगणातले की जंगलातले वगैरे सब-टॉपिक्स पण आहेत त्यात 
<<आंबा साली सह खावा का >>>
<<आंबा साली सह खावा का >>>
>>जरुर खावा..

>>'माश्यांचे न मारता संगोपन'
फिश्टँक
>>ट्र्किश वि. पंचा
हा प्रकार वापरा https://www.ikea.com/us/en/p/salviken-bath-sheet-light-green-20512542/
डबल मजा और कम(?) दाम
तुला बहुतेक चिलटं आठवतायत
तुला बहुतेक चिलटं आठवतायत ऋन्मेष.
>>>
नाही हो. माश्याच. पावसाळ्यात त्या फार सुस्तावलेल्या असतात. चाळीत प्रत्येकाच्या घरासमोरून जाणारा कॉमन पॅसेज असायचा तिथे वर दोरी बांधून लोकं आपले कपडे सुकत घालायचे. त्यातल्या लटकलेल्या नाड्यांवर टोकाशीच त्या झुपका करून बसलेल्या असायच्या. मुठ मारली की सर्व मुठीत. एक जिवंत बाँब तयार व्हायचा मुठीत
माश्यांचा कसला नॉस्टॅल्जिया Lol

>>>
हो पण ॲक्चुअली
आईचे धपाटे सुद्धा खाल्लेत मी त्या माश्यांमुळे.
तेव्हा आमच्याकडे एक जाळीसारखे झाकण होते. ते गरम दुधावर ठेवायला वापरायचो. यामागचे सायन्स विचारू नका.
तर मी ते झाकण त्या सुस्तावलेल्या माश्यांवर टाकायचो आणि त्यांना जाळीत पकडायचो.. कसल्या त्या घाणेरड्या माश्या, कुठे कुठे घाणीवर बसून आलेल्या, त्यावर मी दूधाची जाळी टाकणे, हे धपाटे खायचे कामच होते तेव्हा आमच्याकडे
माश्यांचे न मारता संगोपन'
माश्यांचे न मारता संगोपन'
फिश्टँक Happy
>>>
हे भारी आहे
माशी जेंव्हा एखाद्या
माशी जेंव्हा एखाद्या पदार्थावर बसते तेंव्हा त्यावर ती उलटी करते.. त्यातील ऍसिड्स मुळे तो पदार्थ विघटन होऊ लागतो मग माशी ते खाते... सो इट्स यकी ...
हातात घालायची सोन्याची पाटली
हातात घालायची सोन्याची पाटली जरा मोठी करायची आहे. सोनाराकडे नेली तर म्हणाले की बांगडी मोठी करता येते पण पाटली नाही करता येत.
कोणाला माहित/ अनुभव आहे का पाटली मोठी करण्याचा ?
स्क्रू ने जोडून होते का
स्क्रू ने जोडून होते का विचारा. मोत्याचे तोडे घालत तसे. त्याने मोठी होणार नाही बहुतेक पण हातात घालताना सोपं जाईल.
आमच्या दारात वटवाघळं फार घाण
आमच्या दारात वटवाघळं फार घाण करून जाताएत..संध्याकाळ नंतर कधीही दारात येतात..दार उघडायला पण भिती वाटते..दारात नाही यावे म्हणून काय करावे?
स्थलांतर करणार्या पक्ष्यांना
स्थलांतर करणार्या पक्ष्यांना खायला देऊ नये, फार आवभगत करू नये अशा मताची मी आहे. पण मग माझ्यावरच पक्ष्यामागचा आत्मा दुर्लक्षित केल्याचा आळ येतो. ब्रेड लागला तर आवाज द्या, तोवर या प्रश्नावर माझा पास...
पाटली कोणाची आहे त्यावर उपाय
पाटली कोणाची आहे त्यावर उपाय काय अवलंबून आहे. इतर कुणाची असेल तर पाटली मोठी करण्यापेक्षा त्या रोड होतील ह्याकडे लक्ष द्यावे
. आपलीच पाटली असेल तर सेकंड ओपिनीयन जरूर घ्या. का मोठी करता येत नाही याचे कारण तर कळायला हवे.
Pages