Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चहा पितच नसाल तर साल काढून
चहा पितच नसाल तर साल काढून खावेत >>> किंवा आधी चहा प्यायला सुरुवात करावी. मग हळूच चहा बंद करून बदाम सुरू करावेत.
बाई दवे,
बदाम खाल्याने जी अक्कल येते ती सालीतून येते का आतल्या गरातून?
मानव
मानव
Import, exports ह्याचा संबंध आर्थिक क्षेत्राशी आहे आरोग्य शी नाही.
DNA ,Rana, chromosome.
DNA ,Rna, chromosome. ह्यांना विसरू नका
अरबी लोक पूर्ण बकरा freeze मध्ये ठेवून दोन दिवसात संपवतात.
आपण करायला गेलो तर हगवण लागेल..
यूपी,बिहारी राई तेल खातात किती ही पोष्टिक असू ध्या आपण त्या प्रमाणात खायला सुरुवात केली तर .
शरीर आक्रोश करेल.
चहा पितच नसाल तर साल काढून
चहा पितच नसाल तर साल काढून खावेत >>>
आणि कोणी पाहुणे आले घरी की तीच साल उकळून द्यावी. आज चहा पावडर संपली, घ्या. सालंकृत चहा
<<<बाई दवे,
<<<बाई दवे,
बदाम खाल्याने जी अक्कल येते ती सालीतून येते का आतल्या गरातून?>>>
या दवे बाईंना का दर वेळेस वेठीला धरता ?
हे "बाय द वे" असे लिहिण्यात काय त्रास आहे ?
यूपी,बिहारी राई तेल खातात
यूपी,बिहारी राई तेल खातात किती ही पोष्टिक असू ध्या आपण त्या प्रमाणात खायला सुरुवात केली तर .
शरीर आक्रोश करेल.>> हे बाकी बरोबर आहे. मला परवा मोहरीच्या तेलात बनवलेले कंट्री चिक न व रस्सा बाईने आणून दिला. त्या वासा नेच मला कसे तरी व्हायला लागले. त्यात ते लोक्स फुल लसूण गड्डे पण टाकतात. पण तो तेलाचा वास काही जाता जाईना.
सालंकृत चहा हे भारी आहे!
सालंकृत चहा हे भारी आहे!
मुळात बदाम आणि अक्रोड भिजवून
मुळात बदाम आणि अक्रोड भिजवून खाण्याचे काय विशेष फायदे आहेत?
यूपी,बिहारी राई तेल खातात >>
यूपी,बिहारी राई तेल खातात >>> त्यांच्या अंगाला आणि घरालाही एक विशिष्ट वास येतो त्याने. आमच्या बिल्डींगमध्ये एक भैय्या कुटुंब होते. तशी बरीच कुटुंबे होती. पण त्यांचा पोरगा आमच्यात खेळायला असायचा. त्याच्या अंगाला आणि घराला तो वास यायचा. त्यामुळे त्याला नावच राई का तेल पडले होते. अबे राई के तेल ईधर आ अश्या प्रकारे हाक मारली जायची.. त्याला सवय झालेली. पण बाकीचे भैय्या फार चिडायचे यावर..
हे खूप वाईट आहे. आपल्या
हे खूप वाईट आहे. आपल्या सगळ्यांच्याच घामाला आपल्या खाण्यानुसार आणि विशिष्ट प्रकृतीनुसार वास येत असणार. फक्त आपल्या सवयीचे वास असले तर त्यात वावगे वाटत नाही, किंबहुना ते वास जाणवतही नाहीत. इतर वास आले तर लगेच नाक मुरडतो.
<<आपल्या सगळ्यांच्याच घामाला
<<आपल्या सगळ्यांच्याच घामाला आपल्या खाण्यानुसार आणि विशिष्ट प्रकृतीनुसार वास येत असणार.>> बरोबर.
परदेशात गेल्यावर हे लगेच जाणवते खास करून गर्दीच्या ठिकाणी, लिफ्ट मध्ये वगैरे. आपल्याला त्यांचा आणि त्यांना आपला वास नकोसा वाटतो.
मग तिथे राहून तिथलेच खाल्ले की आठवड्या भरात त्यांना आपला वास येत नाही आणि त्यांच्या वासाची आपल्याला सवय झाली असते.
म्हणूनच त्याला सह'वास' म्हणत
म्हणूनच त्याला सह'वास' म्हणत असतील. म्हणजे वासा सहित ज्यांच्या सोबत राहू शकतो.
बरोबर. त्यामुळे एकांत'वास'
बरोबर. त्यामुळे एकांत'वास' मिळण्याची फक्त एकच जागा खास. ती म्हणजे संडास.
ह्या वर खरच एक प्रश्न आहे..
ह्या वर खरच एक प्रश्न आहे.. काही लोकं कसे काय तासंतास तीथे बसू शकतात?
What is this behaviour,
What is this behaviour, Harchand!!
सालंकृत भारी आहे!
सालंकृत भारी आहे!
काही लोकं कसे काय तासंतास
काही लोकं कसे काय तासंतास तीथे बसू शकतात? >>>> प्रायव्हसी मिळते. नवीन कल्पना सुचतात. स्वतःशीच संवाद साधला जातो. दिवसातून किमान दोनदा जातो. दोन्ही वेळा किमान अर्धा तास ते कमाल एक तास. ऑफिसला जातो तेव्हा तिथेही दोनदा जातो. तिथेही दोन्ही वेळा अर्धा अर्धा तास टायमर लाऊन बसतो. हा टायमर म्हणजे अर्ध्या तासाने पायाला मुंग्या येतात. ऑफिसात शूज असल्याने या लवकर येतात. घरी तसले टेंशन नसते.
बाकी ऑफिसात जायचे अजून एक कारण म्हणजे ऑफिसात तीच एक जागा आहे जिथे कोणी कामाचा विषय काढत नाही, आपण ऑफिसकामाच्या वातावरणापासून दूर जातो. अन्यथा कँटीनमध्ये चहा प्यायला गेले तरी समोर कलीग्ज दिसत राहतात, कामाचे विषय आठवत राहतात. याऊपर एक फायदा म्हणजे डेस्कवर बसा वा कमोडवर, पगार चालू राहतो
तरी आता बरेय, कमोड झालेत, हातात मोबाईल आलेत. त्यामुळे रिकामटेकडे लोकं तासनतास निवांत बसतात. पण मी लहानपणी ईंडीयन स्टाईलमध्येही अर्धा ते पाऊण तास रेग्युलर आत असायचो. त्यावेळी मोबाईल नसायचा, त्यामुळे पाण्याशी आणि भिंतीवरच्या मुंग्यांशी खेळत असतानाच सोबत छान आत्मचिंतनही व्हायचे. एक्झामच्या दिवशीही यात खंड पडायचा नाही. म्हणून आत नोटस घेऊन जायचो. माझे सारे फॉर्म्युले तिथेच पाठ व्हायचे. मिसिंग दोज डेज..
हे खूप वाईट आहे. आपल्या
हे खूप वाईट आहे. आपल्या सगळ्यांच्याच घामाला आपल्या खाण्यानुसार आणि विशिष्ट प्रकृतीनुसार वास येत असणार. फक्त आपल्या सवयीचे वास असले तर त्यात वावगे वाटत नाही, किंबहुना ते वास जाणवतही नाहीत. इतर वास आले तर लगेच नाक मुरडतो.
>>>>>>>>
नाकं नाही मुरडायची पोरं. फक्त चिडवायची. बाकी खायचा, प्यायचा, खेळायचा, झोपायचा तो आमच्यातच..
आणि चिडवायचे म्हणाल तर तेव्हा चाळीमध्ये कुठल्याही गोष्टीवरून चिडवल जायचे. जाडी वरना, कडकेपणा वरना, खूप काळ्या वा खूप गोर्या रंगावरना, लंगड्यालाही खुशाल लंगड्या सेव्हन म्हटले जायचे, कान्यालाही ३६ चिडवले जायचे, अंगावर वाढलेल्या केसांवरून चिडवले जायचे, लोकांना त्यांच्या आजारावरूनही चिडवले जायचे, कुठचे आजार ते विचारू नका. ज्या मुलांमध्ये असे काही व्यंग मिळणार नाही त्यांना बापावरून हाक मारली जायची. सो कॉलड जातीयवाचक नावांवरूनही चिडवले जायचे.... चिडवायचे ईतके प्रकार होते की ईथले आजचे नैतिकतेचे निकष लावता फुल्ल राडा होईल
नवरा जास्त वेळ बाथरूम मध्ये
नवरा जास्त वेळ बाथरूम मध्ये जातोय ?? मोबाईल हिस्टरी चेक करा- उत्तर मिळेल
अंड्या चे half fry बनवलेले आम्लेट खाणे शरीरास योग्य की अयोग्य
->>> imo अयोग्य... संपूर्ण कूक झाले नाही तर बॅक्टेरिया मरत नाहीत...
च्रप्स छोट्या शत्रूंवर तुटून
च्रप्स छोट्या शत्रूंवर तुटून पडलेत. अमिबा, बॅक्टेरिया, पोलन
अंड्यातील सेमोलिनाची काळजी
अंड्यातील सेमोलिनाची काळजी असेल आणि पोच्ड एग आवडत असेल तर पाश्चराईज्ड एग्स चांगला ऑप्शन आहे.
इम्यूनिती वाढवा च्रप्स.
इम्यूनिती वाढवा च्रप्स.
(आता ती कशी वाढवायची हे मला नका विचारू. इथे प्रश्न विचारू शकता.)
इम्म्युनिटी ठीक आहे.. पण
इम्म्युनिटी ठीक आहे.. पण कोणतेही खायचे पदार्थ शिजवून खाल्लेले उत्तम...
नेती चा अमिबा पॉईंट सिरीयस आहे... पोटात अमिबा मरूही शकतो पण नाकात तुम्ही पाणी टाकता ते मेंदूपर्यंत जाऊन सगळे संपू शकते..
बॅक्टेरिया ला सायन्स कडे उपाय आहे अँटी बायोटिक्स... व्हायरस ला सायन्स कडे उपाय नाही पण आपले शरीर फाईट करून व्हायरस मारते... मात्र अमिबा ला इलाज नाही सायन्स कडे आणि शरीराकडेही... प्रत्येक जलनेती करणाऱ्याला माझा हाच फुकट सल्ला असेल कि प्लिज नेती करू नका...
हो जलनेती मध्ये अन्य रिस्क
हो जलनेती मध्ये अन्य रिस्क सुध्दा आहेत. उदाहरण पाहिले आहे. फार जबाबदारी ने करावे जर कोणास करायचेच असेल तर.
च्रप्स जलनेती राहू द्या हो.
च्रप्स जलनेती राहू द्या हो.
पण ब्रेन अफेक्टिंग अमिबा क्लोरिनेशन ट्रीटमेंट ने मरतो. तलाव, नदी, विहीर, स्वच्छ न ठेवलेले स्विमिंग पूल यातून होण्याची शक्यता जास्त. चांगल्या स्विमिंग पूल मध्ये जा स्विमिंगला आणि बाथ टब डीस इनफेक्ट करून घ्या रेग्युलरली.
जास्त केसेस तिथून झाल्या आहेत.
आंबा साली सहित खावा का >>>
आंबा साली सहित खावा का >>> आवडत असेल तर खायला हरकत नाही. काहीजण सालासह खाताना बघितलं आहे.
कैरी खातोना आपण सालासकट, त्यामुळे साले नडणारी नसावीत.
नाकातून सरळ मेंदूत अमिबा कसा
नाकातून सरळ मेंदूत अमिबा कसा पोचतो.
शरीर बनवताना ईश्वराची खूप मोठी चूक झालेली आहे वाटत
अमीबाच्या दृष्टिकोनातून बघाल
अमीबाच्या दृष्टिकोनातून बघाल तर तो म्हणत असेल फार छान सोय केली ईश्वराने.
गूगल सांगते….
गूगल सांगते….
The amoeba enters your body through your nose via contaminated water, mud or dust, and travels to your brain through the nerves that transmit your sense of smell.
Nerves मध्ये प्रवेश केल्या
Nerves मध्ये प्रवेश केल्या बरोबर शरीराची प्रतिकार यंत्रणा तुटून पडेल. आणि अगदी सहज nerves मध्ये कोणाला प्रवेश मिळेल हे कठीण
Pages