दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंग पर्यंत पोचणे जितके कठीण असते तितके कठीण.
मेंदू पर्यंत अमीबा पोचणे तेवढे कठीण आहे.
पण अशक्य नाही .कोणत्या ही मार्गे पोचू शकतो,पण सहज नाही खूप संघर्ष करून

मानवदादा,
'सरळ' मेंदूतच पोचतो अमिबा, वाकड्यात शिरत नाही. आपल्याला काही काळजी नाही Lol

सर्रास आमिबा मेंदू पर्यंत पोचत नाही दुर्मिळ घटना असतात .हे सांगायचे आहे.
मानवी शरीरात antibody असतात.
पाण्यातून च प्रवेश करतो असे नाही हवेतून पणं प्रवेश करतो.
काय काय काळजी घेणार आणि कशी

आता संघर्षमय जीवन असलेला अमिबा वाट्याला आला तर?
'सरळ' मेंदूतच पोचतो अमिबा, वाकड्यात शिरत नाही. >> Lol

गूगल नी लोकांना वेड केले आहे
गहू खावू नका glutin असते.
पिवळा बलक खावू नका colostrol वाढते.
गूगल चे ऐकत बसले सर्व पदार्थ आहारातून बाद होतील
फक्त अनेक वेळा प्रक्रिया केलेले इंडस्ट्रिअल ,किंवा handmade खाद्य प्रॉडक्ट शरीरास
हानिकारक अस्तात हेच मला तरी सत्य वाटत

मी एक खुप वर्षापुर्वी (२५-३० वर्षामागे) मुव्ही पाहिलेला. slapstic comedy . युद्धावर होता. उदा द्यायचे झाले तर आपल्या एअरप्लेन चित्रपटासारखे. कुणाला माहित आहे का ?
मला स्टोरी वगैरे काही आठवत नाही. सैनिक मरतात. पण परत उठून लढतात. वगैरे.२० मिनिट बघितलेला. अजुन का आठवत आहे याच कारण मला नाव आठवत नाही म्हणुन इरिटेट , ऑब्सेस्ड झाले आहे .. Lol

पोलन अ‍ॅलर्जी अत्यंत नॉर्मल आणि कमी त्रासाची आहे.>> नाही रे. इथे डॅलस मधई रॅगवीडची अ‍ॅलर्जी प्रचंड त्रासदायक आहे. (लाईफ थ्रेटनिंग नाही पण इरिटेटींग आहे. रजा काढून घरी बसविणारी आहे. ) नॉर्थ इस्ट मध्ये वगैरे पण रॅगवीडची अ‍ॅलर्जी होते. पण त्याचा त्रास साधारण ३-४ वीक्स होतो. इथे तो कंटिन्युस चार महिने. माझ्या मुलासारखे ही अ‍ॅलर्जी असणारे लोक आजारी पडतात. नोझ ब्लीडींग तर इतके होते माझ्या मुलाला कि संपुर्ण सिंक लाल दिसते.
मला ताजी फुल आणलेली घरात खुप आवडतात. मुलगा त्या फुलांच्या जवळपास सुद्धा जायला घाबरतो.
कधी कधी नाकाची छोटी सर्जरी करावी लागते.
नक्कीच फुड अ‍ॅलर्जी बरोबर कंपेअर नाही होणार पण पोलन अ‍ॅलर्जी मिझरेबल आहे.

पोलन अ‍ॅलर्जी मिझरेबल आहे >> +1 मलाही अतिशय त्रास होतो, नोझ ब्लीड पण होते. यावर्षीच्या भारतवारीत जलनेती शिकून घेण्याचा विचार करत होते. इथली चर्चा उपयुक्त वाटते आहे.

नवरात्रात नऊ दिवसात नऊ रंग पद्धत महाराष्ट्र टाइम्सने सर्वप्रथम त्यांच्या एका उपक्रमा निमित्ताने सुरू केली हे तर माहितीच आहे. पण आता हे रंग कोण ठरवतात?

गुड क्वेश्चन... देयर इज नो वन पट्टीक्यूलर डिसिजन मेकर. इट इज अ कंन्व्हेन्शन..
रंग सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, बुधवारी निळा, गुरूवारी पिवळा, शुक्रवारी हिरवा, शनिवारी करडा, आणि रविवारी केशरी अशा क्रमाने ठरलेले आहेत. घट समजा सोमवारी बसले तर पांढर्‍याने सुरूवात करायची, शनिवारी बसले तर करड्याने. दोन वार जे अधिक येतात त्यासाठी गुलाबी आणि जांभळा/मोरपिशी इ.
होप धिस हेल्प्स...
(म्हणजे खरं तर उत्तर मला शोधावं लागलं म्हणून गुड क्वेश्चन म्हणावे लागले. धड कुणी माहिती दिली नाही म्हणून प्रघात्/कंव्हेन्शनच्या नावे बिल फाडलं...आणि अर्धवट उत्तराने मदत होणार नसतेच तरी आशावादी रहायचं... इति झूम एटीकेट)

मला असं वाटलं की हे रंग नवग्रहांच्या त्या त्या दिवशी च्या रंगानुसार आले आहेत.(आणि पब्लिक ला रंगांचे कपडे घालायची हौस करता यावी म्हणून.)
मग नंतर एका आठवड्यात ग्रहांचे सगळे रंग झाले की दुसऱ्या आठवड्यात अजून नवे कपडे घालायला मिळावे म्हणून आपोआप मंगळवारी लाल ऐवजी गुलाबी नंतर एखादा बुधवार रिपीट झाला तर जांभळा वगैरे जुगाड होतो.

अनु बरोबर. त्या त्या ग्रहाचे रंग त्या त्या दिवशी असं मलाही वाटतं.

शनिवार, शनिचा रंग काळा पण काळा रंग आपल्याकडे फारसा शुभ मानत नसल्याने (संक्रांत सोडल्यास) किंवा काही ठिकाणी देवीला काळा रंग चालत नाही असा समज असल्याने करडा दिला असावा.

>> Mark Zuckerberg
Lol

Barcelona, mi_anu, अन्जू
छान माहिती. धन्यवाद.

माश्यांना घरात घेऊ नका. घरातून आत - बाहेर जाताना दार पटकन बंद करून घेत चला. दारात Welcome मॅट ठेवू नका Proud
सगळ्या खिडक्यांना जाळ्या बसवून घ्या.
इतकं करूनही माश्या घरात आल्याच तर त्यांच्यावर स्ट्राँग अल्कोहोलयुक्त स्प्रे मारा. रबिंग अल्कोहोल पण चालतं.

नाही रमड, आम्ही केले तर बंद करे पर्यंत अजून चार आल्या. लेक म्हणे 'ती तर गेलीच नाही, आता तिच्या मैत्रिणींना घेऊन आली.' Lol
बॅटनी मारल्या शेवटी!

Pages