दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<एखाद्या आइडीचे सर्व लेखन वाचायचे असेल तर ती सोय माबोने आणि नंतर मिपानेही काढून टाकली आहे. >>
गंमत अशी की सोय नव्हती म्हणुन मी मायबोली सदस्य झालो. अन्यथा झालो असतो की नाही सांगता येत नाही.

हा प्रश्न कोणाला पडला असेल की नाही माहीत नाही, पण मला नेहमी वाटतं ,, जास्तीच्या उरलेल्या पोळ्या अशा नुसत्या खाल्ल्या भाजी लावून तर नको वाटतात, म्हणजे तशा संपत नाहीत,पण तेवढ्याच पोळ्या छान कुस्करून फोडणीच्या केल्या की चटदिशी संपतात, आणि तरीही पोट पूर्ण भरल्यासारखे वाटत नाही. हे काय गौडबंगाल आहे? Lol असं कुणाला वाटलंय का? खरंच बारीक कुस्करून amount कमी होतं का?

उरलेल्या चपात्या कुस्करून फोडणी दिल्या वर चांगल्या वाटत नाहीत.
ज्वारी च्या भाकऱ्या चांगल्या लागतात.
चपात्या कडक करून छान वाटतात ..
निदान मला तरी

फोडणीच्या पोळ्या थोड्या तशाच आणि थोड्या त्यावर वाटीभर दही घालून खाल्ल्या पोट भरल्या सारखे वाटते मला तरी.

चपात्या कडक करून छान वाटतात ..
निदान मला तरी
>>>

+७८६
मी हे नेहमी करतो. मला शिळी चपाती पुन्हा गरम करून खायला बिलकुल आवडत नाही. त्यापेक्षा मी ती तव्यावर कडक खाकरा टाईप्स करून खातो. मस्त लागते. सोबत चहा घ्यायचा. घोट घोट.

तेल/तूप अधिक मीठ हे चव उत्पन्न करते. मग त्याची चटक लागते. पोट भरले का नाही ही संवेदना नष्ट करते किंवा बाजूला टाकून ( ओवरराईड) तो ताबा जिभेला देण्यात येतो. बटाटा चिप्सची पिशवी रिकामी झालेली बोटांना जाणवल्यावरच आपण थांबतो.

शिजवलेल्या भुईमूग च्या शेंगा खाताना कुठे थांबावे हे समजत नाही.
जो पर्यंत सर्व संपत नाहीत तो पर्यंत खाण्याची इच्छा होते.
हे खरे आहे ..
बटाटा chp विषयी पण तसेच घडते.
गोड आणि कडू चव असणारे पदार्थ जास्त खाण्याची इच्छा होत नाही

Lol
त्यापेक्षा मी ती तव्यावर कडक खाकरा टाईप्स करून खातो. मस्त लागते. सोबत चहा घ्यायचा. >>>> मीपण सेम.
फोपो नाही खाल्ली कधी.

आमच्याकडे फोडणीची पोळीही बनतेच. कारण ती बायकोला आवडते. मी तिच्याच प्लेटमध्ये येताजाता एक एक घास खात राहतो. ती मला तितकीच बरी वाटते. स्वतः मुद्दाम ताटात घेऊन खाल्ली नाही कधीच.

अर्थात फोपो केव्हा बनते तर जेव्हा चपाती केल्यानंतर जेवणाचा प्लानच बदलतो आणि चार पाच चपात्या एकत्र शिल्लक राहतात. पण एक दोन चपात्या शिल्लक राहिल्या तर त्या कडक करूनच खाल्या जातात. ते करायचे काम माझे असते. मुलांना या दोन्ही प्रकारात कडक चपातीच आवडत असल्याने याबाबतीत डिमांड मलाच आहे

>> तशा संपत नाहीत,पण तेवढ्याच पोळ्या छान कुस्करून फोडणीच्या केल्या की चटदिशी संपतात, आणि तरीही पोट पूर्ण भरल्यासारखे वाटत नाही. हे काय गौडबंगाल आहे?

Because चव matters Happy

>> तव्यावर कडक खाकरा टाईप्स करून खातो. मस्त लागते. सोबत चहा घ्यायचा.
+१ तव्याला थोडे (म्हणजे बरेच Proud ) तेल लावून त्यावर. एकदम बेस्ट.

पातळ भाजी मध्ये भाकरी कुस्करून खाणे आणि एक एक तुकडा भाजी मध्ये बुडवून खाणे ह्या मध्ये फरक आहे.
पोळ्या ( चपात्या ) तशा खात नाहीत पण त्यांना पण तोच नियम आहे.
भाजी पूर्ण त्या मध्ये mix होते आणि भाकरी ची चव वाढते.
जास्त भाकरी खाल्ली जाते.
तोच प्रकार असावा . फोपो .
विषयी पण.

+१ तव्याला थोडे (म्हणजे बरेच Proud ) तेल लावून त्यावर. एकदम बेस्ट.
>>>
मी चपातीलाच थोडे तूप लावतो कडक करताना. हल्लीच सुरू केलेय हे. तो तुपाचा वास / फ्लेवर हल्ली फार आवडू लागलाय मला.

तसे मी नॉर्मल चहा चपाती लव्हर सुद्धा आहेच. फक्त त्यात तव्यावरची गरमागरम चपाती थेट ताटात हवी. आपण चहा आणि तूपाची वाटी किंवा अमुल बटर घेऊन तयारीत बसावे. ताटात चपाती आली रे आली की त्यावर तूप वा बटर फासावे. गरमागरम चपातीवर ते वेगाने वितळून पसरते. मग तसेच चटक्यांची पर्वा न करता त्या चपातीचा एक तुकडा तोडावा आणि त्याचा द्रोण बनवून, चहात बुडवून, गटकमटक स्वाहा Happy

पुण्यात (शक्यतो बालेवाडी/बाणेर च्या जवळ) दिवाळीच्या किल्यांवर ठेवण्यासाठीचे मावळे आणि शिवाजी महाराज कुठे मिळतील? दिवाळी होऊन महिना उलटून गेला आहे तरी थोडा स्टॉक शिल्लक असेल अशी आशा आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाऊन घ्यायचा विचार आहे. नेमका पत्ता किंवा नाव फोन नंबर वगैरे मिळाले तर उत्तम होईल. थोडं लांब असेल तरी चालेल.

प्रत्येक मायबोलीकरास आत्मचरीत्रं लिहीणे सक्तीचे केल्यास त्याचे परिणाम काय होतील हा प्रश्न इथे विचारला तर चालेल का ?

<<<दिवाळीच्या किल्यांवर ठेवण्यासाठीचे मावळे आणि शिवाजी महाराज कुठे मिळतील? >>>
तुमच्या जवळपास रोपांची नर्सरी असेल तर तिथे विचारा. ते लोक पणत्या, मातीची भांडी इ. विकतात. एकदा मावळे पण दिसले होते. तिथे मिळेल असे वाटतेय.

शिक्षकांना गिफ्ट कार्ड भेट म्हणुन द्यायचंय. नाताळ साठी. गिफ्ट कार्ड नुसतं चांगलं दिसणार नाही म्हणुन त्यासोबत अजून काय काय द्यावं लागणार. ते सगळं नको होतं म्हणुनच गिफ्ट कार्ड देणार होते. आता काय कसं द्यायचं बरोबर म्हणजे छान दिसेल त्याची शोधाशोध.

गिफ्ट कार्ड चालेल की नुसतं. बरोबर हॅपी हॉलिडेज ग्रीटिंग द्या. परसानालाईज करायला रिकाम्या ग्रीटिंगात हाताने लिहा मजकूर. कॉफी शॉप इ. कार्ड म्हणताय ना?
( भारतात असेल तर काही माहीत नाही. आम्रविकेत तरी चालतं)

पुण्यात (शक्यतो बालेवाडी/बाणेर च्या जवळ) दिवाळीच्या किल्यांवर ठेवण्यासाठीचे मावळे आणि शिवाजी महाराज कुठे मिळतील? दिवाळी होऊन महिना उलटून गेला आहे तरी थोडा स्टॉक शिल्लक असेल अशी आशा आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाऊन घ्यायचा विचार आहे. नेमका पत्ता किंवा नाव फोन नंबर वगैरे मिळाले तर उत्तम होईल. थोडं लांब असेल तरी चालेल. >>> कुंभार वाडा

@ अजबराव ...पाषाण सुस् रोड वर साई चौकाच्या इथे एक नर्सरी आहे...त्याच्याकडे बहुतेक असतात..किंवा त्याच्याकडे नसतील तर तो atleast माहिती देईल कुठे मिळेल...

एक चांगलं फुकटवालं चालताना किमी, टाईम वगैरे मोजणारं एप सांगेल का कुणी??
गुगल फिट वापरून झालं..थोडे दिवस नीट चाललं नंतर नीट माहिती देईना मग वापरणं बंद केला..
स्ट्रावा एक महिना वापरलं पण आता सबस्क्रिप्शन घ्या म्हणताएत म्हणून बंद केलं.

पेसर चांगलं वाटलं मला त्यासाठी.असा आयकॉन आहे.
मुख्य म्हणजे जे वापरू त्याने येरझाऱ्या घालणे पण नीट पावले म्हणून मोजले पाहिजे(फक्त gps लोकेशन डिफ्रान्स नव्हे).त्या दृष्टीने पेसर चांगले आहे.

Screenshot_2022-12-08-16-46-50-295_com.miui_.home_.jpg

Pages