दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, थोडे वेळखाऊ आहे प्रकरण. फक्त ते स्वतःचे व्याकरण न लावता सर्व सूत्रे लेखकाच्या हातात देतं हीच काय ती जमेची बाजू.

धन्यवाद हर्पा.
सगळं शिकत बसावं लागणार असं दिसतंय, मला सरळ मराठीतून टाईप करून मराठीत उमटावे व मनाने काही भर घालू नये , असे साधे 'डम्ब प्रूफ' हवे होते. मी सगळे लेख व प्रतिसाद सुरवातीला अँड्रॉईड फोनवरून व नंतर टॅबवरून लिहिलेयेत. मला वाटलंच नव्हतं कधी सोमि वर लिहेन. ते transliterate कधी केलेच/शिकलेच नाहीये. मला तुमच्या native code bug चेही अप्रुप वाटते. Happy

मुंबई मधील प्रश्न.
कोणती ट्रेन पकडली तर ती खाली मिळेल
कोणत्या ट्रेन चे कोणत्या भागातील डब्बे हे गर्दी नी कमी असतील
कोणत्या स्थानकावर कोणत्या नंबर च्य डब्यातील प्रवासी उतरतात
हे सर्व प्रश्न आणि ह्याची उत्तर अनुभव नी शोधणे.
हे मुंबईकर लोकांचे रोज चे काम आहे

खरे प्रश्न कोणी मांडत च नाही.
स्त्रिया विचार करतात स्वयंपाक कसा टाळता येईल
मुलांना शाळेत तीपिन मध्ये biscuit, sandwich देवून त्रास कमी करता येईल का?
नाश्ता बनवायला च नको.
मुल आणि पुरुष विचार करतात
काही चांगला नाश्ता आणि जेवण घरात तयार केले जाईल का?
९० % मुल फास्ट फूड ,बाजारात मिळणारे तयार अन्न घेवून जातात
आणि पुरुष बाहेर वडा पाव,बर्गर खातात.
आवडीचे अन्न पदार्थ हे स्वप्न आणि प्रश्न कधीच मिटत नाही

हेमंत सर,
मुंबई ट्रेनबद्दल, तुमच्या प्रश्नाचे उत्तर इथे आहे.

AC दिवसात किती तासच लावला तर योग्य बिल येईल..
कोणत्या मित्र कडे लिफ्ट घेतली तर वाट खर्ची वाचेल.
स्वस्तात कोणती भाजी मिळते.
.
आज सुट्टी घेण्याचा विचार आहे काय थाप पचेल.
आई वडिलांना कॉल करावा की नको.
केला तर पैसे मागतील.
आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या विरुद्ध जे आहेत त्यांना कसा शाह द्यावा.
सर्व जण गावी जावे का?
बायकोला कसे पटवावे.
असेच प्रश्न रोज चे असतात.
पण इथे सर्व अंबानी चे बाप आहेत त्यांना हे प्रश्न पडत असतात पण मांडायला लाज वाटते.
उद्या सकाळी किती km चालले पाहिजे.
शास्त्र काय सांगते

उद्या ५०० स्टेप वाढविता yetil का.
हे रोज चे प्रश्न आहेत.

मी indic keyboard prime (मराठी अक्षरांतरण) वापरतो.

असा स्टॅंडर्ड की बोर्ड दिसतो. त्यामुळे काही वेगळी सवय करून घ्यावी लागली नाही.

मी पोस्ट अशी व्हॉटसपवर लिहितो आणि मायबोलीवर कॉपीपेस्ट करतो.

व्हॉटसपवर लिहायचा फायदा हा की ईथे सेव्ह करता येते. पुन्हा वाचून एडीट करता येते. मायबोलीवर टाईप करतानाचे बग त्रास देत नाहीत.

व्हॉटसपवर लिहायला एक रफ ग्रूप बनवला आहे.
बायकोचा नंबर ॲड करून दोघांचाच एक व्हॉटसप ग्रूप बनवायचा आणि मग तिला ग्रूपमधून काढून टाकायचे. झाला आपला पर्सनल रफ ग्रूप तयार.

माझे प्रतिसाद आणि सारेच छोटेमोठे धागे मी ईथेच विणले आहेत Happy

IMG_20221009_230429.jpg

गाडी भर ऑप्शन आहेत .मराठी मध्ये कसे लिहावे .कोणता की बोर्ड वापरावा हा काय प्रश्न आहे.
Google cha की बोर्ड ह्या व्यतिरिक्त एक पण ऑप्शन नाही.
गाडी भर ऑप्शन मध्ये फक्त गूगल आहे आणि कोणी नाही

अस्मिता, मराठी वर्णमाला वापरूनच टंकन करायचं असेल तर IIT Bombay मधील प्राध्यापकांनी काही संशोधन करून (म्हणजे मराठीत कुठलं अक्षर जास्त वापरलं जातं, ते कीबोर्डवर कुठे ठेवल्यास कमी त्रास होईल वगैरे ) एक कळपाट विकसित केला आहे. नाव आत्ता आठवत नाही. पण तो नेहमीचा सवयीचा qwerty कळपाट नसल्यामुळे मला शिकायला जरा कष्ट पडतील असे वाटले त्यामुळे मी कधी वापरला नाही. पण जे वापरतात, त्यांच्याकडून ऐकून आहे की तो सर्वात शास्त्रशुद्ध देवनागरी (मराठी भाषेच्या अक्षर-वारंवारिता लक्षात घेऊन केलेला) कळपाट आहे.

मी थेट मराठी देवनागरी Google indic कीबोर्ड वापरत होतो. इंग्रजी कीबोर्डमध्ये टॉगल स्विच वापरून मराठी देवनागरी बदलता येतो. आनंद मिळतो. इंग्रजी अक्षरे कुटून मराठी उमटवणे मला आवडत नाही.
पण या Google indic की बोर्डमध्ये ॲ, कॅ, खॅ, गॅ, ,चॅ, टॅ, तॅ, पॅ, यॅ, रॅ , लॅ, वॅ, क्षॅ, ज्ञॅ . . . . इत्यादी लिहिता येत नव्हते. गूगल प्ले स्टाॅरवर
Gboard आल्यापासून ही सर्व अक्षरे लिहिता येतात देवनागरी कळफलकाने.

हे ॲन्ड्राॅइड मोबाईलवरील ॲप्समुळे शक्य आहे. इतर माध्यमे म्हणजे कंप्युटर किंवा आइफोन आइओएसचे माहिती नाही.

ऋ, करून बघितलेय ते, विशेष फरक वाटला नाही.
हर्पा , 'बहुदुधी- आखूड शिंगी' कळपाट वाटतोय.
Srd , अगदी.
आभार सर्वांचे.

मुम्बईला बलार्ड पियरला रहावे आणि कल्याणला डे शिफ्ट नोकरी करावी.
किंवा मीरा रोडला राहुन नरिमन पॉइंटला नाइट शिफ्ट नोकरी करावी.

मुंबईतल्या विविध भागात मिळून तुमची छोटी मोठी किमान तीन घरे असणे अत्यावश्यक. लहानपणीच हे आजोबांनी माझ्या वडिलांच्या मनावर बिंबवलेले. त्यामुळे ट्रेनच्या गर्दीचा वा बसरिक्षाच्या रांगेचा, वा रस्त्यावरच्या ट्राफिकचा त्रास मला आजवरच्या आयुष्यात झाला नाही.

अखेर गुगल इंडिक कीबोर्ड ची जुन्या फोनवरील APK नव्या फोनवर घेऊन तिथे ती इंस्टॉल करण्यात यश आले. नवीन फोन वर अँड्रॉइड ११ आहे.
खूप स्मूथ टायपिंग होत आहे आता:

हीच APK माझ्या गुगल ड्राईव्ह वर अपलोड केलीये. लिंक:
https://drive.google.com/file/d/1lPwjRp5m_D-CSkV0ESwUuuwUjaVXw-Nz/view?u...

ज्यांना गुगल इंडिक कीबोर्ड ट्राय करायचा आहे ते करू शकता.
(गुगलची मूळ एपिके मीच डालो आणि अलो केली आहे. त्यामुळे malicious वगैरे असण्यची शक्यता नाहीच. नवीन फोन वर ट्राय न टेस्ट सुद्धा केलीये. पण तरीही बारीक अक्षरात "आपापल्या जबादारीवर इंस्टाल करणे" असा वैधानिक इशारा लिहून ठेवतो Proud )

नोट्स:
१. नवीन फोन वर इंस्टाल करताना APK डालो करून त्यावर क्लिक केल्यावर "Allow this source to install from" असा काहीसा मेसेज येईल तिथे येस म्हणावे लागेल.
२. नवीन फोन वर सेटिंग मध्ये Languages & Inputs मध्ये "Managet on-sceen keyboads" मध्ये GBoard आणि "Google Indic Keyboard" दोन्ही ऑन ठेवावे लागतात (GBoard टर्न ऑफ करून पाहिले. कोणताच कीबोर्ड दिसत नाही. पण तुम्ही ट्राय करू शकता)

अरे वा!! ग्रेटच काम केले अतुल. खूप धन्यवाद.
इन्स्टॉल केला, त्यावरूनच लिहितोय.
मी Gboard ऑफ केला तरी व्यवस्थीत चालतोय.

Google Indic Keyboard" apk टाकून तिथे ॲ, कॅ, खॅ, गॅ, ,चॅ, टॅ, तॅ, पॅ, यॅ, रॅ , लॅ, वॅ, क्षॅ, ज्ञॅ . टंकता येतात का?
एका फोनवर (Android 11 /12) Gboard preinstall आहे आणि छान चालतो. मग गुगल इंडिक कीबोर्ड 'ची गरज का भासतेय?

Apk टाकताना security off करावी लागते. तसे करून मी कोणतीच apps टाकत नाही.

ऑफ करून मग इन्स्टॉल करून परत ऑन करायची.

ॲ नाही आणता येत. बाकीचे कॅप, चॅट, गॅप, मॅप, पॅक, लॅप असे लिहून मग शेवटले अक्षर उडवून वापरावे लागतात.

एका फोनवर (Android 11 /12) Gboard preinstall आहे आणि छान चालतो. मग गुगल इंडिक कीबोर्ड 'ची गरज का भासतेय?>>>
+१ हाच प्रश्न मलाही पडलाय. Gboard संभाव्य शब्द सुचवत नाही ही एक अडचण आहे.

धन्यवाद मानव Happy

>> एका फोनवर (Android 11 /12) Gboard preinstall आहे आणि छान चालतो. मग गुगल इंडिक कीबोर्ड 'ची गरज का भासतेय?

नवीन व्हर्शन मध्ये Gboard preinstall आहे. पण हवा तो शब्द येण्यासाठी GBoard मध्ये अक्षरे फार काळजीपूर्वक टाईप करावी लागतात. गुगल इंडिक कीबोर्ड मात्र तुलनेने कमी टाईप करून इप्सित शब्द लगेच ओळखते. शब्दांचे बरेच पर्यायसुद्धा देते. कदाचित GBoard हे गुगल इंडिक इतके अजून ट्रेन झाले नसावे असे वाटते (ही ॲप्स मशीन लर्निंग वर चालतात).

>> ॲ, कॅ, खॅ, गॅ, ,चॅ, टॅ, तॅ, पॅ, यॅ, रॅ , लॅ, वॅ, क्षॅ, ज्ञॅ . टंकता येतात का?
संबंधित शब्द येतो. याबाबत दोन्ही फार भिन्न नाहीत असे वाटते. किंवा एखादे अक्षर/शब्द जर Gboard मध्ये करता येत असेल असे वाटले तर तेवढ्यापुरते Gboard ला स्वीच करता येते पट्कन.

गुगल इंडिक कीबोर्ड मात्र तुलनेने कमी टाईप करून इप्सित शब्द लगेच ओळखते
Settings मध्ये जाऊन 'auto fill service' onकरून पाहिले का? शिवाय वापर वाढला की इप्सित शब्द येतो. तसा विचार केला तर Gboard हा अपग्रेड असेल तर जुन्या चांगल्या सोयी काढणार नाही. हे Gboardमधून टंकताना शब्द सुचवले जात आहेत. वरती /खाली एक नेविगेशन बाण आहे तो वापरून प्रिसेट विजेटस( स्माईली, भाषांतर, सेटिंग्ज) बाजूला सारून पाहा.

१) ओडिओ इनपुट माईक वापरणे - चांगल्या प्रकारे काम करतो पण आजुबाजुला त्रासदायक ठरतो. प्रवासात/रात्री!
२) पुढे येत्या काळात ए.आइ. विकसित होईल आणि डोक्यावर घातलेली सेन्सर टोपी आपल्या मनातले ओळखून कीबोर्डावर बोट लावताच वाक्ये टंकून टाकेल. पण याचा गैरफायदा/ गैरवापर गुन्हेगार लोक करून घेतील आणि जबरीने पासवर्ड मिळवतील. ब्लॅकमेलिंगचा नवा प्रयोग.

Gboard स्वतः वापरून पाहिलात का?.
कित्येक शब्द तो देत नाही आणि आपण ते लिहायचा प्रयत्न केला तरी लिहू देत नाही.
समजा मला "लिहिण्याच्या" असा शब्द लिहायचा आहे.
Gboard त्यासाठी लिहिण्याचा असाच शब्द देतो.
तो निवडून मी जर शेवटला चा काढून पुढे च्या असे टाकावे असे ठरवले तर:
१. त्यातील चा बॅक स्पेस देऊन काढला की लिहिण्या असे राहू देणार नाही (इथे लिहिण्याच्या उदाहरणामध्ये कदाचित लिहिण्या राहू देत असेलही, हे एक फक्त उदाहरण आहे, असे कित्येक शब्दा बाबतीत होते की एखादा शब्द निवडून श्ववरले अक्षर बदलावे म्हटले ली मूळ शब्दच तो बदलून टाकतो.)
२. जर लिहिण्या असे राहु दिले तर त्या पुढे च्या ची भर घालायला गेले की परत तो संपूर्ण शब्द गृहीत धरून त्याचे लिहिण्याचा असेच करेल.
३. लिहिण्या असे ठेवून एक स्पेस देऊन पुढे च्या असे लिहून मग ती स्पेस काढून टाकावी असा विचार केल्यास पुढे chya(a) टाईप केले तो च्यायला इत्यादी शब्द घेईल, पण फक्त च्या घेणारच नाही. मग च्यायला घेऊन त्याचे आधी च्या करा मग स्पेस काढा असे करावे.
एवढे सगळे होई पर्यंत तिकडे चहा तयार होऊन आपल्या समोर 'च्या" असे म्हणुन ठेवल्या जातो आणि "जाऊ दे हे लिहिणे च्यायला!" म्हणत आपण फोन बाजूला ठेवून च्या पिऊ लागतो.

>> वापर वाढला की इप्सित शब्द येतो. तसा विचार केला तर Gboard हा अपग्रेड असेल तर जुन्या चांगल्या सोयी काढणार नाही.

प्रॉडक्ट लाईन बदलतात कंपन्या तेंव्हा या गोष्टी होतात. नवीन घरात रहायला गेल्यावर सुरवातीला थोड्याफार गैरसोयी होतात तो प्रकार. अशा वेळी जुन्या प्रॉडक्ट मधून टेकअवे घेतले जाते पण मर्यादा येतात. इथे त्यांनी हेतुपुरस्सर Google Indic काढून टाकलंय जेणेकरून लोक GBoard च वापरतील व कालांतराने ते mature/trained होईल.

जिबोर्ड मध्ये एखादा शब्द एकदा येतो.
पुढे तोच शब्द लिहायचा असेल की मात्र येत नाही. आधी जे टाईप केले तेव्हा तो शब्द आला अगदी तेच टाईप करून सुद्धा.
त्याच्या आधी जो शब्द होता तो परत लिहुन त्यापुढे हा शब्द टाईप करुन सुद्धा पाहिले. पण एकदा लॉटरी लागली की परत त्याच पोस्ट मध्ये दुसरी लॉटरी नाही लागु देत.

मुळात गुगल इंडिक की बोर्ड काढून Gboard आणण्याचे प्रयोजन काय हे माहीत आहे का कुणाला? गुगल इंडिक मध्ये चुकीच्या शब्दांचा खूप डेटा बेस तयार झाला होता का, की तो काढून टाकून नवीन डेटा तयार करणे गरजेचे होते?
की केवळ "गुगलने किया होगा तो कुछ सोच समझकेही किया होगा" असे समजायचे?

इंडिक फार वात्रटपणा करतो.आपण शब्द टाईप केला की सजेशन म्हणून 3 किंवा 4 शब्द येतात.त्यातला आपण आवर्जून निवडला नाही तर आपल्याला पहिला शब्द मान्य आहेच म्हणून तो पुढे जातो पहिला शब्द घेऊन.यातून साडी नेसणे ऐवजी साडी नसणे, आणि ऐवजी अंडी,हो ऐवजी हँ,ईशा ऐवजी राहा असे मोठे अनर्थ होतात.नंतर नंतर अश्या काही चुका महत्वाच्या मेसेजेस मध्ये होऊन गेल्यावर माणूस निराशावादी बनून गुगल चुकीचाच शब्द सुचवेल म्हणून मख्खपणे बॅक दाबून शब्द निवडूनच पुढे जातो.
मी हे सजेशन ऑफ करता येतं का तेही पाहिलंय सेटिंग मध्ये जाऊन.पण फार फायदा झाला नाही.

Pages