दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्ट्रावा एक महिना वापरलं पण आता सबस्क्रिप्शन घ्या म्हणताएत म्हणून बंद केलं.<<
स्ट्राव्हा फ्रि आहे (बेसिक फिचर्स ) आणि बेस्ट सुद्धा आहे इतर अ‍ॅप च्या तुलनेत
मी तिन - चार वर्षांपासुन वापरतोय

अनु थँक्स.. पाहते...
स्ट्रावा आवडलं होतं पण मालफंक्शन करायला लागलंय माझ्याकडं..
आज पन्नास मिनटं साडेचार किमी चालून अडिचच दाखवलं..
कालपरवा पण असंच झालं..

मी पेडोमीटर वापरते.सोपे वाटते.म्हणून कैक वर्षे तेच ठेवलेय.

मृणाली, सलग 50-६० मिनिटे चालू नये. असं डॉक्टर म्हणतात.आमच्या बिल्डिंगमधील पण एक डॉक्टरीण हेच म्हणाली.

अॅप पेक्षा फिटनेस बॅंड चांगले.
मी सध्या boat wave चा वापरतोय. यात drinking water reminder, sedentary alert लावता येतात.

आधीचा जो कोणता होता त्याचे strap तुटायचे.

प्रतेक व्यक्ती चे शरीर वेगळे आहे त्या मुळे कोणी किती चालावे किंवा काय आहार घ्यावा हा नियम प्रतेक व्यक्ती साठी वेगळा असतो

मला ही स्ट्रावा आवडते. किंवा (गूगल) फिट. दोन्ही फुकट आहेत, आणि अजुनतरी मोजण्यात गोंधळ झालेला आठवत नाही.
गोंधळ अ‍ॅप पेक्षा हार्डवेअर डिव्हाईसचा ही प्रॉब्लेम असू शकतो.

Pedometer ची फ्री आवृत्ती मी वापरली आहे .
चुकीचे रिझल्ट देते.
किती तरी वेळा ते ॲप इंस्टॉल करून delete केले आहे.
Paid आवृत्ती विषयी माहीत नाही

मी strava आणि गुगल फिट वापरतो.
जी फुकट फीचर्स आहेत इतकेच.
Strava जर प्रॉब्लेम करत असेल तर ते update करावे लागते version.
फार कवचित ढगाळ वातावरण असेल तर चुकतं अंतर मोजायला अन्यथा नाही.
व्यायाम सुरवात करण्याच्या आधी gps सिग्नल नीट पकडला का बघून ( तो gps सर्कल डॉट छोटा हवा ) मग सुरवात करायची.

जो दुसर्‍यावरी विसावला त्याचा कार्यभाग बुडाला
आपले स्वतःचे सॅटेलाइटस असतील तर स्वतःची विश्वासार्ह जीपीएस यंत्रणा वापरून अचूक रिझल्ट्स मिळवता येतात.

अ‍ॅड मधे दिसणारे पोट कमी करणारे पट्टे लोक वापरतात का? आणि त्यांनी जेन्युईनली पोट कमी होते का?

आपले स्वतःचे सॅटेलाइटस असतील तर स्वतःची विश्वासार्ह जीपीएस यंत्रणा वापरून अचूक रिझल्ट्स मिळवता येतात.>> बरोबर मी एक घेतला आहे व तो कायम मला ट्रॅक करत असतो. स्टार लिंक मध्ये बारा घेतले तर एक फ्री असे डील होते मध्यात तर तो फ्री मला मिळाला. मी किती तास सोफ्यावर झोपून गेम खेळते ते तो कळवत राहतो. मग मी माझ्या घरगुती यंत्रमानवाला उठा बश्या काढायला लावते.

अमा Lol

जर स्मार्ट वॉच आवडत नसेल/काही ठिकाणी चालत नसेल तर पेसर ऍप वापरा.चांगलं आहे.
गुगल फिट मी वापरायचे पण ते कधीकधी अपडेटेड असून पण येड्या सारखं वागतं.
पेडोमीटर मीही अनेक वेळा install करून नंतर काढून टाकलं आहे.त्याची माझी पत्रिका जमत नाही.

गुगल फिट मी वापरायचे पण ते कधीकधी अपडेटेड असून पण येड्या सारखं वागतं.>>>>>> सेम पिंच
पेडोमीटर दोनदा इन्स्टॉल, अन इन्स्टॉल केलं..जमलं नाही काहीतरी..
पेसर नाही वापरलं अजून.. बघते वापरून.

Pedometer सुरवातीला खूप व्यवस्थित चालत होते.
नंतर काय त्यांनी मला खूष करायचे ठरवले.
7 ते 7.5 मिनिट पर किलोमीटर माझा चालण्याचा वेग दाखवू लागले.
माझ्या कडून वर्ल्ड रेकॉर्ड तर तर मोडले जाणार नाही ना ही भीती वाटायला लागली .
असे काही दिवस गेले मग परत pedometer ल काही तरी हुक्की आली.
25 min per kilometre असा वेग दाखवायला लागले .
आता तर जास्त च भीती वाटायला लागली.
कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त वेळा एक किलोमीटर अंतर चालत पार करण्याचे दोन्ही वर्ल्ड रेकॉर्ड माझ्याच नाव वर होणार काय .
असे वाटू लागले.
मग सरळ delete केले.

Smart watch कोणते चांगले?
हार्ट रेट, oxygen मोजले आणि किती चाललो वै नीट मोजले तरी बास. Calling चे option खूप गरजच नाही माझ्यासाठी. स्क्रीन चांगली हवी फक्त.

Smart watch कोणते चांगले?<< बजेट नुसार ते अवलंबुन आहे.
३००० पासुन पुढे, माझ्या कडे एम आय होते पण त्याचा बेल्ट तुटला, आता बोट चे हातात घालतो पण त्याचा वापर केला जात नाहीये.
मित्र म्हणतात गार्मिन चे चांगले आहेत पण माझ्या बजेट पेक्षा खुप जास्त जातात १८००० च्या पुढे

Smart watch कोणते चांगले?
Fitbit पण चांगले आहे. ६ वर्ष झाले चार्ज २ वापरत आहे. बेल्ट २ वेळा बदलला . झोप , चालणे ,व्यायाम आणि हार्ट बिट सगळे व्यवस्थित दाखवते. यात ऑक्सिजन नाही दाखवत.
फक्त रिक्षा , सिटी बस / लाल परी मध्ये प्रवास मध्ये प्रवास केल्यास सायकलिंग केले म्हणुन व्यायामात अ‍ॅड करते.

आमच्या जॉगिंग वॉकिंग ट्रॅकची लांबी किती मीटर आहे ते एकदा मोजले. नंतर राऊंडस लक्षात ठेवतो फक्त. कधी कधी पावलं मोजून पुढे राऊंडस मोजले आणि एकूण पावलांचे टार्गेट पूर्ण झाले तरी होते. पेडोमीटर पावलांवरून अंतर पण काढते. किंवा उलट. नंतर मोबाईल बाळगावा लागत नाही. एकदा अंदाज येऊ लागला कि नवीन ठिकाणी सुद्धा किती किमी चाललो याचा अंदाज येऊ लागतो. अ‍ॅप्स वर अवलंबून राहणं कमी करावं लागतं पण.

रघु आचार्य.
तुमच्या ह्या मता शी पूर्ण सहमत

फोनमधली available RAM कमी झाली की जीपीएस डेटा प्रोसेस होत नसावी. मग app विचित्र चालतात किंवा बंद पडतात. Cashe क्लीअर करावी. समजा एकाच फोनमध्ये तीन apps एकाचवेळी चालवायचा प्रयत्न केला तर दोन बंद होतात. पण हेच दुसऱ्या एखाद्या फोनात तिन्ही चालू राहू शकतात. हे खरंच पाहिलं आहे.

Fast track आणि टायटन आहेत , maxima देखील उतरलय ह्या मार्केट मध्ये.
पण अजून तितके तयारीत वाटत नाहीयेत.
त्यांचे review फार चांगले दिसत नाहीत.
गार्मिन fitbit चांगले पण बजेट जास्त.
Amazefit चे काही दिसत आहेत चांगले.
बजेट 5 हजारच्या पुढे.
मी 2 हजार च्या रेंज मध्ये पहात होतो.
पण त्यात compromise जास्त दिसतंय.
आता 3 ते साडेतीन मध्ये बघेन.
स सा, तुझ्याकडे कोणतं आहे?
आचार्य, ठी म्हणताय ते ही बराबर आहे.
Fit आणि strava आहेच की अंतर मोजायला.
हार्ट रेट माहीत होण्यासाठी म्हणून हवंय.

फिटबिट ने एकदा प्रचंड ट्राफिक मध्ये दुचाकी चालवल्यावर माझे 140 मजले चढले म्हणून नोंद केली होती.मला हे फुकाचे उपकार नको असल्याने मी निर्दयपणे डिलीट केले Happy
पण बाकी चांगलं आहे फिटबीट.
एम आय बँड आणि एम आय वॉचेस चा लोकांचा अनुभव चांगला आहे.
एक 5000 रु ची स्मार्ट अंगठी आली आहे बाजारात.पण अर्थातच बऱ्याच लोकांनी घेतल्या शिवाय, रिव्ह्यू कळल्या शिवाय ,किंमत थोडी उतरल्या शिवाय घेणार नाही.

अज्ञानात सुख आहे असे म्हणतात.
Heart beat,blood pressure जर ही स्मार्ट घड्याळ live दाखवायला लागली प्रतेक मिनिट ची.
तर ते विकत विनाकारण टेंशन ओढवून घेणे आहे.
Bp, heart beat वाढणार आणि नंतर कमी होणार.

सर्वात बेस्ट.
त्रास वाटत आहे,दम लागत आहे असे वाटले की walking, जॉगिंग बंद करून एका जागेवर थांबायचे.
पण स्मार्ट वॉच मधील आकडे बघून .
HB,B P.
चे माणूस काही न घडताच गपगार व्हायचा

मुळात मोजयचेच का?
हा खरा प्रश्न आहे.
मी खूप वेळा अनुभव घेतला आहे मोजले की टार्गेट जवळ येण्या अगोदर च शरीर थकले आहे असे वाटते.
आणि मोजलेच नाही तर खूप जास्त व्यायाम होतो.
मोजमाप स्वतः केले की मानसिक परिणाम होतो.
मानवी शरीराची सर्वात मोठी शक्ती ही मानसिक च असते.
मोजमाप करावे पण स्वतः नाही दुसऱ्याने .
मानसिक कारणाने .
अनेक त्रास होतात .
ते फक्त फक्त भास असतात.
Bp वाढतोय, heart बीट वाढत आहे ह्याचा विचार करूनच ते अजून जास्त वाढतात
असा अनुभव खूप लोकांनी घेतला असेल.

जिम मधील मित्र मैत्रिणी चे व्हिडिओ बघत च असतो सकाळी मी जॉगिंग la जातो तेव्हा एका ५५, पार व्यक्ती दिसतो .
उगाचच जीव तोडून चालणे , व्यायामाची काही उपकरणं रस्तावर आमच्या कडे आहेत.
तिथे अनैसर्गिक वेगाने कसरत करणे ते चेहऱ्यावर दिसते..हे मी बघतो.
हा काही जास्त दिवस healthy राहणार नाही ह्याची मला १००% खात्री आहे
माणसाच्या बाह्य हालचाली वर स्वतःचे नियंत्रण असते
पण शरीरातील अवयव वर माणसाचे काहीच नियंत्रण नसते.
तुमच्या मन मानी लं अंतर्गत अवयव adjust
करून घेतात
पण त्यांची पण काही मर्यादा असते.
ती पार केली की .
त्यांचा नाईलाज होतो.

Pages