Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वर्तमानपत्राच्या कागदावर उभे
वर्तमानपत्राच्या कागदावर उभे राहून पायाच्या बोटानी कागद १० मिनिटे कुस्करणे>>>>हे गमतीशीर वाटले तरी फिजिओ च्या डॉक्टरांनी सांगितलेला उपाय आहे
टाच दुखी उपाय...
टाच दुखी उपाय... वर्तमानपत्राच्या कागदावर उभे राहून पायाच्या बोटानी कागद १० मिनिटे कुस्करणे>>> एकावेळी वर्तमानपत्राचे एकच पान पायाखाली घेऊन ते कुस्करावे की अनेक पाने?? अनेक असल्यास किती?
कागदावर vs कागदांवर.... फरक
कागदावर vs कागदांवर.... फरक कळत नसेल तर तसाही वर्तमानपत्र विकत घेण्याचा फायदा नाही. कुस्करणे विसरून जा.
चांगला डॉक्टरांनी सांगितलेला, फायदा झालेला उपाय सांगितला तरी फार्स करून खुसपट काढणे या वृत्तीचा निषेध.
चांगला व्यायाम आहे हा.
चांगला व्यायाम आहे हा. गुडघेदुखी, घोटेदुखी साठीही सांगतात.
Towel curls चे व्हिडिओ बघा यू ट्यूबवर.
वर्तमानपत्र अथवा टॉवेल ठेवण्याचा उद्देश आहे की नक्की कसा व्यायाम करायचा हे कळावे.
एकदा ते कळले की खाली काहीही ठेवायची गरज नाही.
खुर्चीत बसुनही करता येतो (पण टाच/पाउल वर उचलाचे नाही, फक्त बोटांनी वर्तमानपत्र आत ओढुन चुरगळायचे. सगळ्या बोटांनी. ओढताना पावलांचा मधला भाग वक्राकार होऊन थोडा वर येतो आपोआप, मग बोट सरळ करायची आणि परत ओढायची. दोन्ही पावलांचा एकाचवेळी व्यायाम करायचा.)
सोपा वाटत असला तरी दहा मिनिटे काय तीन मिनिटांच्यावर करणे बऱ्याच जणांना जमत नाही.
जमेल तेवढा वेळ करून हळुहळु वेळ वाढवत न्यायची.
पावलातल्या स्नायूंचा व्यायाम होतो. तसेच दहा मिनिटां
पर्यंत केल्यास गुडघ्यापासून खाली हाडाच्या दोन्ही बाजूंच्या पुढल्या स्नायुंचा सूक्ष्म व्यायाम होतो.
पावलांचे व पायातले हे स्नायु कमजोर असतील तर उभे असताना, चालताना टाचेवर जास्त भार येतो तसेच गुडघ्यावरही जास्त दाब येतो.
टाच, घोटा, गुडघेदुखीची इतर कारणेही असतील तेवढे डॉक कडुन तपासून घ्यावे.
पुणेकरांनो,
पुणेकरांनो,
१. पुण्यात कोणत्या भागात छान दहीहंडी बघायला मिळेल? गावात का? साधारण कधी? सकाळी की संध्याकाळी? पुण्यातील दहीहंडी कधी, कधी बघावी याबाबत कुणी मार्गदर्शन करेल का?
२. कोथरूडमध्ये गणेशमूर्ती रंगवायचे कारखाने/कारखाना कुठे आहे?
Punekarp आणि मानव,
Punekarp आणि मानव, माहितीबद्दल धन्यवाद.
करून बघितला. कागद न घेता जुना कपडा घेतला. कागदाचा आवाज टाळण्यासाठी.
आमच्या फॅमिली गेट टुगेदर साठी
आमच्या फॅमिली गेट टुगेदर साठी मला एक खेळ घ्यायचा आहे . जास्त करून ५ ० -६ ० च्या आसपासचेच लोक आहेत . काही गाण्यांचे गेम्स सुचवू शकाल का ? पूर्वी कधीतरी इथे वाचले होते. हिंदी / मराठी गाण्याचे गूगल ट्रान्सलेशन इंग्रजीत करायचे व ते मूळ गाणे ओळखायला लावायचे असा गेम आहे. कोणी त्याबद्दल माहिती देऊ शकेल का ?
किंवा अजून काही इंटरेस्टिंग गेम्स आहेत का माबो वर ?
प्रत्येकाला एक कोरी चिठ्ठी
प्रत्येकाला एक कोरी चिठ्ठी द्यायची, आणि आपल्याबद्दलची एक गोष्ट लिहायला सांगायची जी इतरांना माहीत नसेल.
मग सगळ्या चिठ्ठ्या दुमडून एकत्र करायच्या आणि एकेकाने एक एक उघडून मजकूर मोठ्याने वाचून ती व्यक्ती कोण ते ओळखायचं.
एक Bollywood tabola मिळतो .
एक Bollywood tabola मिळतो .
मी पाहिला नाहेये पण एक कलिग म्हणाले तिच्या घरच्या अशाच मोठ्या कार्यक्रमाला ते खेळले होते .
अमितव तुमची गेम इंटरेस्टिंग
अमितव तुमची गेम इंटरेस्टिंग वाटतेय . करीन
स्वस्ति धन्यवाद. गुगलून बघते .
आपल्याबद्दलची एक गोष्ट
आपल्याबद्दलची एक गोष्ट लिहायला सांगायची जी इतरांना माहीत नसेल >> यात दोन वेगळ्या टीम्स करु शकता. एका टीममधल्यांनी दुसर्या टीमपैकी कोण तुरुंगात जाऊन आले, कोण शाळेतून सस्पेंड झालेले, कोणी गर्लफ्रेंण्ड च्या भावांकडुन मार खालेल्ला वगैरे ओळखायचे
टीम्स करतान दोन्ही टीम मधे सगळ्या जनरेशनचे लोक असतील असे पहा. फार धमाल येते.
(No subject)
मी एका पॉडकास्ट मध्ये हे ऐकले
मी एका पॉडकास्ट मध्ये हे ऐकले . अनलॉग पनीर आणि डिजिटल पनीर. खरोखरीच असे काही असते का आणि ते कसे ओळखायचे?
अनलॉग पनीर आणि डिजिटल पनीर. >
अनलॉग पनीर आणि डिजिटल पनीर. >>
कुठे ऐकलंत? आम्हाला पण अशी पॉडकास्ट सुचवा. 
आता ती लिंक गेली पण मी खरच
आता ती लिंक गेली पण मी खरच सांगतो आहे. लिंक मिळाली तर देतो.
अविश्वास नाही दाखवत आहे हो.
अविश्वास नाही दाखवत आहे हो. पनीरला डिजिटाईझ कसं केलं हा प्रश्न आहे. पनीर भुर्जी म्हणजे अॅनलॉग आणि पनीरचे क्युबॉईड म्हणजे डिजिटल केलं का असं आपलं मी मनातल्या मनात विचार करुन मनातच हसुन घेतलं.
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/life-style/food-news/analogue-paneer...
वाचो.
हे अॅनलॉगस (analogous )
हे अॅनलॉगस (analogous ) असणार आणि यांनी अनलॉग छापलं असणार असं मनात आलं.
भारतात अॅनलॉगचं स्पेलिंग हल्ली ब्रिटिश analogue करतात का अमेरिकन analog?
analog/ analogue/ analogous
अमितव
अमितव
तुम्ही म्हणता ते शक्य आहे, वार्ताहार digital engineer असणार!
पंतप्रधान विमा योजना /
पंतप्रधान विमा योजना / आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत कोणी रजिस्टर केल आहे का ? माझ्या मदतनीस सखीला करायचे आहे रजिस्टर. तिच्याकडे विमा नाही. या योजनेअंतर्गत फायदा झाला तर बरेच होईल
कोणी केले असेल तर कृपया कसे रजिस्टर करायचे आणि कसा लाभ घ्यायचा असे सांगा म्हणजे तिच रजिस्टर करता येईल मला
(No subject)
मिठाईसाठी वापरला जाणारा
मिठाईसाठी वापरला जाणारा चांदीचा वर्ख पुण्यात/कोथरूडमध्ये कुठे मिळेल, कुणी सांगू शकेल का?
तसेच, अलिबाग येथे हिवाळ्यात पोपटीसाठी छान (सुंदर लोकेशन आणि शक्यतो शाकाहारी) ठिकाण कुणाला माहीत आहे का?
एव्हिकॅडो उपसला चालेल काय?
ॲव्हिकॅडो उपासाला चालेल काय?
नाशपाती उपवासाला चालते.
नाशपाती उपवासाला चालते.
पण उशाशी पोटी नाशपाती खावी का हे सांगता येत नाही
रानभुली, ॲव्हिकॅडो म्हणजे
रानभुली, ॲव्हिकॅडो म्हणजे नाशपती नाही!
इतर फळे चालतात तर मग
इतर फळे चालतात तर मग ॲव्हकॅडोन काय घोडं मारलंनित?
>>>>मारलंनित? Wink
>>>>मारलंनित? Wink

तसे नाही हर्पा!
तसे नाही हर्पा!
फळं म्हणजे, आता टोमॅटो, वांगी, भेंडी हीदेखील फळेच आहेत, पण उपासाला नाही चालत!
तसे ॲव्हिकॅडो हेही आपण सॅलड अथवा भाजीसारखेच खातो ना म्हणून विचारले !!
(म्हणजे गोड असणारे फळ हा निकष आहे का, उपासाला चालण्यासाठी?)
Hmm. मुद्दा बरोबर आहे.
Hmm. मुद्दा बरोबर आहे.
ॲव्हकॅडो हे भारतीय फळ नाही
ॲव्हकॅडो हे भारतीय फळ नाही त्यामुळे उपवासाला चालणार नाही बहुधा, अर्थात तज्ञ सांगतीलच.
Pages