Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12
रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पूर्वी साडी नेसल्यावर हौस
मी पूर्वी साडी नेसल्यावर हौस म्हणून साधे (हाय हील्स नाहीत) सँडल वापरत असे. आता गेली २-३ वर्षं झाली, जे रोजचे बूट असतात तेच घालते साडी नेसले तरी. टाचदुखी सुरू झाल्यावर बूट जरा चांगल्या दर्जाचे आणले आणि आता तेच/ तशाच प्रकारचे वापरते. कोण काय म्हणतंय गेलं उडत, माझे पाय किती दुखतात ते मलाच माहिती.
बाकी आयुष्यात कधीच हाय हील्स न घातल्यामुळे सवयही नाहीच. कोकणात अनिवार्य म्हणून पावसाळी सँड्ल्स असायचे ४ महिने. पावसात चप्पल वाहून जायची शक्यता अधिक म्हणून सँडल्सची सवय झाली आणि मग इतर ऋतूंत पण साधे पण आरामदायी सँड्ल्स (कारण गाडीवरून जाताना मी चपला कधीच वापरू शकले नाही.)
बूट शाळेत असताना क्वचित कॅनवासचे, मग परेडसाठी मिळाले होते ते शाळेकडूनच होते. बाकी जे आवडेल आणि त्रासदायक नसेल ते.
^^^स्पोर्ट्स शु सर्वात अराम
^^^स्पोर्ट्स शु सर्वात अराम दायक असतात ^^
मी तर स्केचर्स स्लिप इन स्पोर्ट्स shoes ची पंखी आहे. दिवसभर पायात असतील तरी कम्फर्ट कमी होत नाही.
कितीही चालले तरी पायावर ताण येत नाही. त्या shoes च्या वापरानंतर कम्फर्ट म्हणजे काय हे कळले.
मी तर स्केचर्स स्लिप इन
मी तर स्केचर्स स्लिप इन स्पोर्ट्स shoes ची पंखी आहे. दिवसभर पायात असतील तरी कम्फर्ट कमी होत नाही.
कितीही चालले तरी पायावर ताण येत नाही. त्या shoes च्या वापरानंतर कम्फर्ट म्हणजे काय हे कळले.>>> मी पण.. अगदी अगदी..
मुलं सोबत असतील, चालायचे असेल तेव्हा फक्त shoes...
..
कधी कधी style मारायची हुक्की येते आणि चालायचं काम नसेल हे माहिती आहे तेव्हा हील्स वापरते.
It feels good
Good shoes take you to good places
.
.
मंदिरात जाताना मात्र basic जुन्या चपला
चोरीला गेल्या तरी गम नाही
डॉक्टर शॉल सारखे अतिशय
डॉक्टर शॉल सारखे अतिशय आरामदायक सँडल्स आहेत >>> मी बरेचदा वापरते हे. पण बोअर दिसतात हे खरे आहे.
लॅटिनो डान्स शिकत/करत असाल तर तिथे मात्र हिल्स (निदान किटन्स तरी) हव्याच. तिथे फ्लॅट/प्लॅटफॉर्म शूज वापरलेत तर स्टेप्स हमखास चुकतात.
हाय हील्स हा तर एक अख्ख्या
हाय हील्स हा तर एक अख्ख्या लेखाचा विषय आहे. त्याची उत्पत्ती कशी झाली आणि ते कुणी कसे वापरू नयेत इ इ
त्यावर एकदा परत कधीतरी. >>
शक्य असेल तर लवकरच एखादा लेख लिहा. वाचायला आवडेल. _/\_
Pages