दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणी टिपून घेणारा आणि पुरेसा मोठा टॉवेल हवा.
असा टॉवेल खरपूस वाळल्या नंतर अंग पुसण्याचे समाधान वेगळेच.

टर्किश च्या नावाखाली अनेकदा पाणी न टिपणारे गुळगुळीत कापड असते. फार वैताग येतो मग. ते जरा बघूनच घ्यावे लागते.
(बायदवे ओरिजिनली टर्किश टॉवेल म्हणजे तुर्कस्तान मधील कापसाच्या सुतापासून बनवलेला)

पूर्वी टर्किशच आवडायचा.आता तो भय्यास्टाईल टॉवेल बरा वाटतो.तोही हँडलूम्चा असावा की पाणी मस्त टिपले जाते.पंचा फक्त केसांसाठी वापरला जातो.
टर्किश च्या नावाखाली अनेकदा पाणी न टिपणारे गुळगुळीत कापड असते.>>>>> +१.

संस्कृतात ज्ञ हे मुळाक्षर नसून जोडाक्षर आहे. ते ज् + ञ (हा 'त्र' नाही, च छ ज झ ञ मधला 'ञ') ह्या अक्षरांना जोडून बनले आहे. कदाचित त्याचा उच्चारही पूर्वी तसाच असावा. नंतरच्या काळात वेगवेगळ्या बोलींत वेगवेगळा उच्चार केला गेला, जसे द् + न् + य (मराठीत), ग् + य (हिंदीत), ग् + न (काही दाक्षिणात्य भाषांत). परंतु ज्ञा धातूपासून होणारी रूपे पाहिली (ज्ञा - जानाति - जाणतो/ते) म्हणजे तो मुळात ज् + ञ आहे हे स्पष्ट होते (ञ चा न होतो - सानुनासिक वर्णसंबंध). हा विषय किरकोळ नसल्यामुळे इथे चर्चिल्याबद्दल चर्चिल आणि माबोकरांची क्षमा मागतो.

किरकोळ प्रश्नाचे उत्तर - जर ज्ञ टंकताना द् + न् + य करून ज्ञ होत नसेल तर ज् + ञ टंकून बघा. काही देवनागरी लिपींच्या कळपाटात तशी रचना आहे.

ओरिजिनली टर्किश टॉवेल म्हणजे तुर्कस्तान मधील कापसाच्या सुतापासून बनवलेला >> हो, खरं म्हणजे तोही सुती पंचाच असायला हवा. आपण ज्या गुबगुबीत टॉवेलला टर्किश टावेल म्हणतो, ते तसं का म्हणतो माहीत नाही.

Gy ज्ञ
Google indic hinglish typing

हपा ज्ञ बद्दल छान माहिती.

टर्किश टॉवेल:
खरं तर सुती पंचा टरकन टरकवता येतो, तसा तो जाड टॉवेल जो तुर्कस्तानी म्हणून खपतो तो टरकवता येत नाही.
टरकवता येणारा म्हणून किंवा तुर्कस्तानी कापसाचा आहे म्हणून, पातळ सुती पंचालाच टर्किश टॉवेल म्हणायला हवे खरे तर.

मला पडलेला प्रश्न - नुकतीच रविवार पेठेत गेले होते...काही tshirts घ्यायचे होते..दुकानदार म्हणाला tshirt आमच्या समोरच्या दुकानात आहेत...सो त्याच्यासोबत तिथे गेलो..समोरच्या गल्लीतच दुकान थोड आतमध्ये होत..छान दोन मजली..
मी विचार करत होते..ह्या दुकानात बिझनेस होत असेल का?? बाहेर रोडवर कपड्यांची इतकी दुकान आहेत की आतमध्ये कोण येत असेल? बर tshirts स्वस्तही न्हवते...Dukanasathi एवढी investment केली असणार..प्रॉफिट काय?

मला पडलेला प्रश्न: गाडी ओव्हरटेक करून पुढे गेल्यावर, बऱ्याचदा ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरकडे का बघतात? (ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे का?)

आपण ओव्हर टेक करत आहोत म्हणून तो ड्रायव्हर चिडत तर नाहीये ना /(आहे ना); आता चिडून तो मागे लागून आपल्याला परत ओव्हरटेक करण्याची चढाओढ तर लावणार नाही ना / (लावेल ना) यासाठी. काही जणांना दुसऱ्या ड्रायव्हरला डिवचणे त्यांच्या सोबत ओव्हरटेकिंगची चढाओढ लावणे आवडते त्यांच्यासाठी कंसातले लागू.

दुसरे असे की दुसऱ्या गाडीतली व्यक्तीही बघते आपल्याला कोण ओव्हरटेक करून जात आहे. ती स्त्री असेल तर बहुतेकांना ते सहन होत नाही. परत तिला ओव्हरटेक करण्याची चुरस लागते.

परत तिला ओव्हरटेक करण्याची चुरस लागते.

आणि हया नादात आपण कुठे चाललो आहोत ते विसरतात आणि यम सदनाच्या दिशेने प्रवास चालू करतात

आजचा प्रश्न : टर्किश टावेल वापरावा की सुती पंचा?
>>>
पंचा शक्यतो खादीचा. केस पुसायला मात्र टर्किश टॉवेल. दोन्ही खडखडीत सुकलेले पाहिजेत.

तो टॉवेल लवकर सुकत नाही हीच तरी मोठी समस्या आहे.सर्वांच्या घराला काही गॅलरी नसतात जिथे सूर्य प्रकाश चार पाच तास असतो.
टर्किश टॉवेल हा घरात सुकणारा कपडा नव्हं

Bombay dying (living?) यांचे टावेल छान असत. त्याची कवर्स सीटला लावली तर फार बरं वाटतं. घरच्या कोचावर उत्तमच.

जाहिराती चा जमाना आहे काय प्रसिद्ध आहे ह्या वर जावू नका.
साधे कांदे पोहे पण लोकांना नीट बनवता येत नाहीत
स्वतः टेस्ट करा आणि स्वतःच ठरवा

आजचा प्रश्न- पोलन ऍलर्जी साठी काय उपाय? रोज रोज औषध खाणे बरोबर वाटत नाही... डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहतेय...

पोलनचं एस्टिमेट बघुन ज्यादिवशी वातावरणात वार्‍याने/ मोसम असल्याने पोलन जास्त असतील तेव्हा गप घरात बसणे.
कुठल्या पोलनचा त्रास होतो माहित असेल तर त्या झाडांचे पोलन असताना बाहेर न जाणे, मास्क लावणे, हात लावून त्रास होत असेल तर चालायला/ धावायला जाताना उगाच गवत झाडं झुडपं हुंगत न बसणे. गवत कापताना त्रास होत असेल तर ते न कापणे. झोप न येणारी अ‍ॅलर्जीची औषधे लागू पडत असतील तर ती घेणे. काहीच होत नसेल तर बेनेड्रिल घेणे आणि पडी टाकणे. मस्त झोप येते ती एन्जॉय करणे. ती गोळी घेऊन लांब गाडी मात्र चालवू नका. फार झोप येते.
पूर्वी हापिसला जाताना ह्या दिवसांत सूSSसू केलं की इन्फेक्शन नाही अ‍ॅलर्जी आहे सांगत बसावं लागे. ते हल्ली करावं लागत नाही. Proud

आजचा प्रश्न- पोलन ऍलर्जी साठी काय उपाय? रोज रोज औषध खाणे बरोबर वाटत नाही... डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहतेय...>>>>>
@च्रप्स
लोकल अनपाश्चराईज्ड मध खा. लोकलच असू द्या कारण मधमाश्यांना लोकल पॉलन मिळालेले असते व तुम्हालाही लोकल पॉलनपासूनच कवच हवे आहे. अनपाश्चराईज्ड पदार्थात बॅक्टेरिया असतात. आम्हाला झाला नाही त्रास पण प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. फार्मर्स मार्केट किंवा जवळच्या ग्रोसरीत सहज मिळेल. हा उपाय मला डॉक्टरने सांगितला आहे. क्लॅरटेन क्लिअरने ड्राऊझी वाटते, त्यामुळे ड्रायव्हिॆग नको वाटते.

कुठलीही 24 hour, non-drowsy antihistamine (e.g. generic Loratadine) गोळी घ्या. non-drowsy मुळे झोप येत नाही. दिवसातून एकच गोळी घ्यावी लागेल. The key is that you need to take it BEFORE allergies kick in. नाक वाहणे सुरू झाले याचा अर्थ allergy already झाली आहे आणि शरीराचा प्रतिकार सुरू झाला आहे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या औषध घ्यावे.

Pages