खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त फोटो !
रु! तुझ्याकडे आल्यावर तु आइच माहेरपण कर की, तिच्या आवडीच करुन खाउ घाल..

धन्यवाद प्राजक्ता,
आईने स्वतःच केलेले तिला वेळच्या वेळी ताजे गरम खाऊ घालणे इतके केले तरी ते खूप वाटते. नाहीतर ती सर्वांच्या शेवटी उरलेसुरले शिळेपाकं खायची संधी शोधत असते.. नाईंटीज किड्स आणि त्यांच्या टिपिकल आया Happy

तसे सध्या नात घालतेय खाऊ.. त्यात जास्त आनंद मिळतोय तिला Happy

अरे हे मी लिहल कारण माझी आइ पण अशिच सतत दुसर्‍याच्या खाण्ञाची काळजी आणी स्वतः मात्र शेवटी छोटिशी ताटली घेवुन जेवणार, मग माझ्याकडे आल्यावर निवात जरा नातिने खुबिने तिला काय आवडत ते काढुन घेतल तेव्हा कळल की तिला ब्रेड-बटर , इडलि -डोसे वैगरे खुप आवडत मग काय पानेरा ते लोकल बेकरी मस्त व्हरायटि ब्रेड आणले, काही घरिही बेक केल..
आया आपल्या आवडी निवडी आधी जपतात मग नातवाच्या आवडी जपतात पण त्याच्या आवडी कधी कळु देत नाहित.

हो, +786
तिच्या आवडी निवडी माहीत आहेत मला. नाश्ता आणि जेवणाच्याच नाहीत तर चहा सोबतचे खाणे आणि आईसक्रीम वगैरे. त्यामुळे मेनू ठरवताना आणि घरात वरच्या खाउचा स्टॉक भरताना ते ध्यानात ठेवूनच करतो. आणि हेच जेव्हा मी घरी जातो तेव्हा ती करते. काय खाऊ आणि काय नको असे होऊन जाते. दिवसभर तेच प्लान चालू असतात. मनासारखे खाणे पिणे मिळणे हे माहेरपणातले सर्वात मोठे सुख.

मस्त! काही भाज्या भाकरी सोबत खाण्यात जास्त मजा येते... ही एक त्यातली..
मला वांगे बिलकुल आवडत नसले तरी त्यातले बटाटे आणि ग्रेव्ही फार आवडते. थोडक्यात वांगे फ्लेवर आवडतो.

आईग्गं... खेकडे... आमच्या कडे कुर्ली म्हणतात. कुर्ल्या आणि तिसऱ्यांचे कालवण विक पॉइंट आहे माझा. दोन्ही प्रकार साफ करणे जमत नाही त्यामुळे बनवून होत नाही. माहेरी गेल्यावरच खायला मिळतं

@ रमड, मुंबई.. नेमके कुठून ते वडिलांना विचारावे लागेल. ते हुडकून आणतात. अजून तिथलेच फोटो शेअर करतो Happy

चिन्मयी, आमच्याकडे सुद्धा कुर्ली म्हणतात. आता आईचा हाताचा जरा प्रॉब्लेम झाल्याने फार खटपट असलेले प्रकार घरी करणे टाळतो.

आणि येस, सोबत तिसऱ्या सुद्धा आणल्या होत्या. त्या आईच्या आवडीच्या.
ज्यु ऋ ने सुद्धा आईसोबत त्यांची टेस्ट बघितली आणि त्याला इतक्या आवडल्या की त्याने आईच्या दुप्पट खाल्या Happy

IMG-20230910-WA0011.jpg
.
IMG-20230910-WA0010.jpg

@ऋन्मेष जेवायलाच येते तुझ्याकडे लेकीसकट.

मी तिसऱ्या आणल्यात आज. खरं तर खेकडेच हवे होते पण आधी सांगितलं नाही आमच्या कोळणीला मग संपले.

हो या.. आणि तिसऱ्या घेऊनच या Happy
आई सध्या माझ्यासोबत आहे. वडील अलिबाग पिकनिक करून आज इथे येताहेत. सोबत तिथून अलिबागहून आणलेला नवा स्टॉक घेऊन येत आहेत Happy

>>>>>>>>>.दोघे मिळुन तिसऱ्याला टॉर्चर करताहेत तर...
अरे आवरा!!! Lol Lol
मानव टोटल स्ट्रेस्बस्टर आहेत Happy

IMG_20250102_204958.jpg
ख्रिसमस केक यावेळी 31st ला केला. YFL ची multiple times tried and tasted receipe.
Black jack अगोदरचं होतं तेच वापरलं ताजं बनवायला वेळ नव्हता. थोडं कमी पडलं.त्यामुळे रंग आणि खरपूस चव थोडे फिके वाटली. पण तरीही भन्नाट. जास्त केक न खाणार्यांनी पण परत परत मागून खाल्ला.
शेवटचे 3-4 तुकडे उरले त्यांचा हा फोटो.

छान दिसतोय
मी पेस्नट्री न खाणारा. पण मला हा केक फार आवडतो. पण यावेळी घरचा विकतचा सारेच राहिले.

ऋतुराज, वीकेंडला विचारून सांगतो.

हा लेकीने केलेला अजून एक पदार्थ.
Potato sticks - चवीला जबरदस्त होते. पूर्ण फडशा पडेपर्यंत हात आणि तोंड थांबले नाहीत.
सध्या फॉर्मला आहे. युट्यूब बघून आपल्याला स्वताहून काय करता येईल याची चाचपणी चालू राहते..

IMG-20241227-WA0035.jpg
.
IMG-20241227-WA0034.jpg

अर्रे ऋन्मेष मासळ्यांचे फ्राय, सार, खेकड्याचे फोटो टाकून काय छळ मांडला आहेस खरोखर Sad
साज चा रावस पण जब्बर दिसतोय.
काल मी पण मोमो खाल्लेत विथ चटणी तोंपासू झालेवते.

वाह.. पाणी सुटले
लहानपणी घरी हे आणि असले सारे प्रकार फार व्हायचे.
शाळेत चपाती भाजी सोबत मोरंबा तर रोजचा ठरलेला असायचाच. आणि तो फार फेमस सुद्धा होता मित्रांमध्ये..

Pages