खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

मी तुपाच्या फोडणीत मोहरी घालत नाही, पण तेलाच्या फोडणीसाठी असा काही नियम असतो हेच माहीत नाही किंवा बाहेर राहून सगळे विसरून गेले आहे. तुपाची फोडणी सहसा कोशिंबीरी आणि कढी यासाठी लागते. तुमच्या सगळ्यांच्या पोस्टी मात्र इंट्रेस्टींग वाटल्या. पुढच्या वेळी जिरे न घालता करून बघेन.‌ Happy

भरत, इथे जिरे बेकायदेशीर निघाले तुम्ही बडिशेप कसली घालताय ? Happy Proud
थालिपीठात ओवा, तीळ, तिखट, भरपूर कांदा , कोथिंबीर आहे. ओवा हवाच.

मी आईचं अजिबात न ऐकता भाज्यांना मोहरी, जिरे आणि वर मेथीदाणेही घालायचो.
आता ओगले आजींना विचारलं तर त्या तेलाची फोडणी - तेल , मोहरी, हिंग व हळद असं म्हणून कंसात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या, जिरे, , मेथी, ओवा, कढीलिंव त्या त्या पदा र्थाच्या कृतीत दिल्याप्रमाणे घालावे
आणि तुपची फोडणी - तूप व जिरे. -- असं म्हणाल्या.

कोशिंबिरी आणि कढीला तुपाची फोडणी हे मात्र आईचं ऐकायचो आणि लक्षात आहे. तेव्हा अस्मिता, इथे तुमचं आमचं सेम आहे.

IMG20241117141445.jpg
हे मिनि उत्तप्पम. इडली राइस + बार्ली + उडीद डाळ + चमचाभर मेथी. रात्री भिजवून सकाळी वाटले. दुपारी केले. तोवर पीठ आले नव्हते. तरीही छान झाले.
सँडविच टोस्टर आणि मिनि उत्तप्पा पॅन हे दोन्ही जयपानचे आहेत आणि मला भेट मिळाले आहेत, त्यामुळे जास्तच आवडतात.

++उपम्याच्या फोडणीत उडदाची डाळही. पदार्थानुरूप फोडणीचे घटक थोडेफार इकडेतिकडे होतात हे ओगले आजींच्या कृतीवरून कळले.

तेव्हा अस्मिता, इथे तुमचं आमचं सेम आहे.>>> Happy

उत्तपम सुरेख आणि हेल्दी दिसताहेत. विमानप्रवासात कधी कधी नाश्त्याला मिळतात ते असेच एकसारखे व छोटे छोटे दिसतात.

मी पण एखाद्या उपकरणाच्या मागे लागले की त्याचा जीवच घेते. सॅन्डविच मेकर, टोस्टर, वॉफल मेकर.... Happy

उत्तप्पम मस्तच, सोबत कसली चटणी केली?

अस्मिता, सगळ्या डिशेस तोंपासू..इतक्या तोंपासू कि काल पोहे केले आणि थालीपीठानं तर इतकी इन्सिपायर झाले कि खावसं वाटू लागलं पण माझ्या कडे भाजणी नाही.. कधी बनवली आणली नाही.. म्हणून हे माझं जरासं सेम दिसणारं वर्जन

Screenshot_20241119_111415_Gallery.jpg
ओट्स+रवा+बेसन चीला

ओट्स+रवा+बेसन चीला

छान आहे हे. वरचेवर करतो घरी. सोबत दही किंवा कोणतीही चटणी.

काहीच नसले तर हॉट चिली टमेटो सॉस.

मिनि उत्तप्पम छान भाजले आहेत. टेक्श्चर मस्त आले असणार.

त्यात बार्ली कुठल्या फॉर्ममधे टाकली ?

@ पोहे

पोहे करतांना बडीशेप कधीतरी टाकतो, इंदौरी स्वाद आणण्यासाठी, very rarely. वरून तिखट शेव, कोथिंबीर, लिंबू वगैरे. जिरे, लाल तिखट नाही वापरत मात्र.

मुणाली छानच दिसतोय चिला
भाजणी नसेल तर ज्वारिच्या पिठाची पण होतात थालिपिठ.. १ वाटी ज्वारिच पिठ-अर्धी वाटी कणीक-अर्धी वाटी बेसन एकत्र करुन 'मन्द आचेवर कोरडच थोड भाजुन घ्यायच..मग नेहमि सारख कान्दा,कोथिबिर्,तिखट मिठ आणी जरास तेलाच मोहन घालुन थालिपिठ करायची छान होतात.
अर्थात भाजणीची जास्त खमन्ग लागतात.

येस अनींद्य..आम्हीही करतो इंदोरी पोहे.
मोहोरी, धणे जाडसर कुटून, बडीशेप, हिंगाची फोडणी, साखर थोडी सढळ हाताने, डायरेक्ट कढईत न वाफवाता चाळणीत ठेवून खाली उकळत्या पाण्याची वाफ द्यायची,
वरून जिरावण, कांदा, शेव, लिंबू

मृत्युंजय कादंबरीत पहिल्यांदा अपूप शब्द वाचला होता.>>+१११ बऱ्याच आधीच्या पानावर असेल चर्चा पण तरी लिहिते अनारसे एकदम मस्त आहेत.

अत्ता बाकीचे पदार्थ बघितले :आ वासलेली: "बाहुली" म्हणू का? Wink सगळे जण भारी कॉम्प्लेक्स देतात बाबा इथे. अप्पम कशात केले? थालीपीठ,चिला सॅण्डविच सगळंच मस्त.

मंजुताई अनारसे झक्कास.
साबापण छान करायच्या पण वयोमानानुसार बंद केले त्यांनी.

ही माझी कालची एग बिर्याणी
IMG_7808.jpegIMG_7809.jpeg

काल अनायसे आलेली सुट्टी.

दुपार सत्कारणी लावली. एक्सपर्टस् कडून बेकिंग क्लास घेतला. नवीन मावे वापरण्याच्या टिप्स + ओट्स ड्राइफ्रूट्स कुकीज़.

f7750c4d-8d29-42b4-a9c0-50d347a27760.jpeg
Not bad for first timer Happy आवडीनुसार जरा जास्त बेक केल्या खमंगपणासाठी.

आता अभ्यासू विद्यार्थी होऊन शिकणार, नियमित बेकिंग करणार !!!

छान पदार्थ सर्व
अगदी तोंपा सू
Screenshot_20241120_191426_Gallery.jpg
कालची सुटी आणि आम्ही पुन्हा chocolates बनवले.
ह्यावेळो white चॉकोलेट सुद्धा try केले. जमले.

आहा! अनारसे!

मायक्रोवेव्हमध्ये बेक करायच्या कुकीज माझ्याही टु डु लिस्ट मध्ये आहेत. माझ्या ओटीजी ओव्हनने राम म्हटल्यावर कुकीज केल्या नाहीत.

मिनी उत्तपम साठी बार्लीचे दाणे - बार्ली पर्ल म्हणतात का ?, ते वापरले . दुसरा कोणता फॉर्म? मला बार्ली वॉटर माहीत आहे.

रुचितातली एक डाळींची चटणी करून ठेवली आहे. ती दह्यात कालवून उत्तप्पम सोबत.

चॉकलेट्स गोड दिसताहेत. गोड म्हणजे आपण लहान मुलांना गोड म्हणतो, तशी.

किल्ली, चॉकलेट्स कशी बनवता तुम्ही ?

मंजूताई, अनरसे कातील दिसताहेत. परफेक्ट रंग.

माझेमन, बिर्याणी मस्त.

मजूताईंचे अनारसे, माझेमनची बिर्याणी, अनिंद्यच्या कुकीज, आणि किल्लीची चॉकलेट्स ... अप्रतिम दिसताहेत सगळे पदार्थ. भूक लागली Proud

अस्मिता काय छं मांडला आहेस तू इथे Sad कशा कशा ला म्हणुन तोंपासू म्हणू?
अंडा बिर्यानी मस्त. अनारसे मला आवडत नाही सो पास. शेव, चकली यम्म्म्म्म्म!

भरत तुम्ही काय जबरा आयडिया दिलीत हो. जे पदार्थ आप्पे पात्रात बनवताना पोटातून (पदार्थाच्या) किंचीत कचवट राहतात & डोसे फॉर्म मधे पलटता येत नाहीत, अशा गोष्टी आता सॅडवीच मेकरात करणेत येतील Happy हर्षवायू झालेली बाहुली! खूप थँक्यु!

Papeta par eda (eggs over potatoes) पारसी पपेटा पर ईडा….

3BE2CE69-FF86-4C59-B2F2-32F3A80BD79F.jpeg

Pages