Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जबरदस्त फोटो !
जबरदस्त फोटो !
रु! तुझ्याकडे आल्यावर तु आइच माहेरपण कर की, तिच्या आवडीच करुन खाउ घाल..
धन्यवाद प्राजक्ता,
धन्यवाद प्राजक्ता,
आईने स्वतःच केलेले तिला वेळच्या वेळी ताजे गरम खाऊ घालणे इतके केले तरी ते खूप वाटते. नाहीतर ती सर्वांच्या शेवटी उरलेसुरले शिळेपाकं खायची संधी शोधत असते.. नाईंटीज किड्स आणि त्यांच्या टिपिकल आया
तसे सध्या नात घालतेय खाऊ.. त्यात जास्त आनंद मिळतोय तिला
अरे हे मी लिहल कारण माझी आइ
अरे हे मी लिहल कारण माझी आइ पण अशिच सतत दुसर्याच्या खाण्ञाची काळजी आणी स्वतः मात्र शेवटी छोटिशी ताटली घेवुन जेवणार, मग माझ्याकडे आल्यावर निवात जरा नातिने खुबिने तिला काय आवडत ते काढुन घेतल तेव्हा कळल की तिला ब्रेड-बटर , इडलि -डोसे वैगरे खुप आवडत मग काय पानेरा ते लोकल बेकरी मस्त व्हरायटि ब्रेड आणले, काही घरिही बेक केल..
आया आपल्या आवडी निवडी आधी जपतात मग नातवाच्या आवडी जपतात पण त्याच्या आवडी कधी कळु देत नाहित.
हो, तिच्या आवडी निवडी माहीत
हो, +786
तिच्या आवडी निवडी माहीत आहेत मला. नाश्ता आणि जेवणाच्याच नाहीत तर चहा सोबतचे खाणे आणि आईसक्रीम वगैरे. त्यामुळे मेनू ठरवताना आणि घरात वरच्या खाउचा स्टॉक भरताना ते ध्यानात ठेवूनच करतो. आणि हेच जेव्हा मी घरी जातो तेव्हा ती करते. काय खाऊ आणि काय नको असे होऊन जाते. दिवसभर तेच प्लान चालू असतात. मनासारखे खाणे पिणे मिळणे हे माहेरपणातले सर्वात मोठे सुख.
भरीत, भाकआनि, ठेचा
भरीत, भाकरी, ठेचा आणि लसूण चटणी
छान आहे बेत.
छान आहे बेत.
काही भाज्या भाकरी सोबत
मस्त! काही भाज्या भाकरी सोबत खाण्यात जास्त मजा येते... ही एक त्यातली..
मला वांगे बिलकुल आवडत नसले तरी त्यातले बटाटे आणि ग्रेव्ही फार आवडते. थोडक्यात वांगे फ्लेवर आवडतो.
१ तास चालून आले आहे कडकडुन
१ तास चालून आले आहे कडकडुन भूकेली
आत्ता मेयो+मस्टर्ड+स्मोकड सालमन सँडविच केलय. अहाहा! स्वर्ग.
स्वर्गात कॅमेरा अलाऊड नाहीये
स्वर्गात कॅमेरा अलाऊड नाहीये का
घरचा नाहीये.. पण छान असतो.
घरचा नाहीये.. पण छान असतो. वरचेवर इथून आणतो
>>>>>>>>स्वर्गात कॅमेरा अलाऊड
>>>>>>>>स्वर्गात कॅमेरा अलाऊड नाहीये का Happy
खाऊन मग लिहीले
चिंबोरीचं कालवण? आहाहा! कुठून
चिंबोरीचं कालवण? आहाहा! कुठून आणलं?
आईग्गं... खेकडे... आमच्या कडे
आईग्गं... खेकडे... आमच्या कडे कुर्ली म्हणतात. कुर्ल्या आणि तिसऱ्यांचे कालवण विक पॉइंट आहे माझा. दोन्ही प्रकार साफ करणे जमत नाही त्यामुळे बनवून होत नाही. माहेरी गेल्यावरच खायला मिळतं
@ रमड, मुंबई.. नेमके कुठून ते
@ रमड, मुंबई.. नेमके कुठून ते वडिलांना विचारावे लागेल. ते हुडकून आणतात. अजून तिथलेच फोटो शेअर करतो
चिन्मयी, आमच्याकडे सुद्धा कुर्ली म्हणतात. आता आईचा हाताचा जरा प्रॉब्लेम झाल्याने फार खटपट असलेले प्रकार घरी करणे टाळतो.
आणि येस, सोबत तिसऱ्या सुद्धा आणल्या होत्या. त्या आईच्या आवडीच्या.
ज्यु ऋ ने सुद्धा आईसोबत त्यांची टेस्ट बघितली आणि त्याला इतक्या आवडल्या की त्याने आईच्या दुप्पट खाल्या
.
@ऋन्मेष जेवायलाच येते
@ऋन्मेष जेवायलाच येते तुझ्याकडे लेकीसकट.
मी तिसऱ्या आणल्यात आज. खरं तर खेकडेच हवे होते पण आधी सांगितलं नाही आमच्या कोळणीला मग संपले.
हो या.. आणि तिसऱ्या घेऊनच या
हो या.. आणि तिसऱ्या घेऊनच या

आई सध्या माझ्यासोबत आहे. वडील अलिबाग पिकनिक करून आज इथे येताहेत. सोबत तिथून अलिबागहून आणलेला नवा स्टॉक घेऊन येत आहेत
टॉर्चर करा!! कुफेहेपा
टॉर्चर करा!! कुफेहेपा
दोघे मिळुन तिसऱ्याला टॉर्चर
दोघे मिळुन तिसऱ्याला टॉर्चर करताहेत तर...
दोघे मिळुन तिसऱ्याला टॉर्चर
दोघे मिळुन तिसऱ्याला टॉर्चर करताहेत तर... हा हा हा
>>>>>>>>>.दोघे मिळुन
>>>>>>>>>.दोघे मिळुन तिसऱ्याला टॉर्चर करताहेत तर...


अरे आवरा!!!
मानव टोटल स्ट्रेस्बस्टर आहेत
खेकडे जबरी दिसतायेत.
खेकडे जबरी दिसतायेत.
अगदी तोंपासू
कुठून आणलेत?
ख्रिसमस केक यावेळी 31st ला
ख्रिसमस केक यावेळी 31st ला केला. YFL ची multiple times tried and tasted receipe.
Black jack अगोदरचं होतं तेच वापरलं ताजं बनवायला वेळ नव्हता. थोडं कमी पडलं.त्यामुळे रंग आणि खरपूस चव थोडे फिके वाटली. पण तरीही भन्नाट. जास्त केक न खाणार्यांनी पण परत परत मागून खाल्ला.
शेवटचे 3-4 तुकडे उरले त्यांचा हा फोटो.
छान दिसतोय
छान दिसतोय
मी पेस्नट्री न खाणारा. पण मला हा केक फार आवडतो. पण यावेळी घरचा विकतचा सारेच राहिले.
ऋतुराज, वीकेंडला विचारून सांगतो.
केक फारच मस्त दिसतोय.
केक फारच मस्त दिसतोय.
हा लेकीने केलेला अजून एक
हा लेकीने केलेला अजून एक पदार्थ.
Potato sticks - चवीला जबरदस्त होते. पूर्ण फडशा पडेपर्यंत हात आणि तोंड थांबले नाहीत.
सध्या फॉर्मला आहे. युट्यूब बघून आपल्याला स्वताहून काय करता येईल याची चाचपणी चालू राहते..
.
वॉव. खरोखरच तोंपासु दिसतायत.
वॉव. खरोखरच तोंपासु दिसतायत.
Potato sticks agadi तोंपासु
Potato sticks agadi तोंपासु आहेत
उचलून खावेत असे.
अर्रे ऋन्मेष मासळ्यांचे फ्राय
अर्रे ऋन्मेष मासळ्यांचे फ्राय, सार, खेकड्याचे फोटो टाकून काय छळ मांडला आहेस खरोखर
साज चा रावस पण जब्बर दिसतोय.
काल मी पण मोमो खाल्लेत विथ चटणी तोंपासू झालेवते.
आवळा छुंदा मिशन सक्सेसफुल
आवळा छुंदा मिशन सक्सेसफुल
वाह.. पाणी सुटले
वाह.. पाणी सुटले
लहानपणी घरी हे आणि असले सारे प्रकार फार व्हायचे.
शाळेत चपाती भाजी सोबत मोरंबा तर रोजचा ठरलेला असायचाच. आणि तो फार फेमस सुद्धा होता मित्रांमध्ये..
Pages