Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सरस्वतीपूजन अगदी सुरेख आहे.
सरस्वतीपूजन अगदी सुरेख आहे. मोत्याची सरस्वती तर सुंदरच आहे पण ताटातले ते मोराचे आच्छादन पण मस्त आहे (कसलं आहे ते समजलं नाही) हिरव्या साडीवर ते लाल फूल पण खूप उठून दिसतंय.
पण आत प्रसादाचे मात्र अगदी भातुकलीसारखे थोडे थोडे पदार्थ वाढलेले असतात >>> संकेतानुसार नैवेद्य दाखवणार्या व्यक्तीने ताटात वाढलेले सगळे संपवायचे असते. अनेकवेळा नैवेद्य घरातले लहान मूल दाखवते. मग त्याला संपवायला (किंवा त्याच्याकडून / तिच्याकडून संपवून घ्यायला
) सोपे जावे म्हणून सगळे पदार्थ थोडे थोडे वाढले जातात. नैवेद्य दाखवणारा खादाड असेल आणि त्याला विशिष्ट पदार्थांवर ताव मारायचा असेल तर तो नैवेद्याच्या ताटात सगळे पदार्थ थोडे थोडे वाढून घेतो मग त्याला हव्या त्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारता येतो 
ताटातले ते मोराचे आच्छादन पण
ताटातले ते मोराचे आच्छादन पण मस्त आहे (कसलं आहे ते समजलं नाही) >>> पुजा थाली वरचे डीजाईन आहे मिनाकारी का काहीतरी म्हणतात.
धन्यवाद
आज होम मेड बॉम्बे सँडविच -
आज होम मेड बॉम्बे सँडविच - with spicy green chutney.
हे बाँबे ( ) सँडवीच म्हणजे
हे बाँबे (
) सँडवीच म्हणजे नक्की काय असतं ? खुद्द मुंबईत तरी असल्या नावाचा पदार्थ कधी बघितल्याचे आठवत नाही. इतर शहरात मात्र हमखास असतो हा पदार्थ.
मी सांगली वालचंदला होतो.
मी सांगली वालचंदला होतो. तेव्हा तिथे एक वडापावची गाडी होती. त्यावर लिहिले असायचे. मुंबईचा वडापाव
एकदाच खाल्ला. पुन्हा कधी गेलो नाही
मी पण थायलंड ला १ हॉटेलात
मी पण थायलंड ला १ हॉटेलात सिंगापूर नूडल्स खाल्ल्या
काही नाही नॉरमल नूडल्स होत्या भाज्या घालून.
सिंगापूर मधल्या सपक असतात उलट..नावात खरंच काही नसतं
… खुद्द मुंबईत तरी असल्या
… खुद्द मुंबईत तरी असल्या नावाचा पदार्थ कधी बघितल्याचे आठवत नाही. इतर शहरात मात्र हमखास असतो …
रस्तोरस्ती गल्लोगल्ली असतो हो मुंबईत आणि उपनगरातही. रस्त्यावरच्या शेकडो स्टॉलपासून ते ताज होटलच्या छापिल मेन्यूपर्यंत ! चक्क विलिंग्ड्न क्लब ते महालक्ष्मी रेसकोर्सच्या गॉलप्स पर्यंत. मागच्याच महिन्यात फोर्ट भागात खाल्ला. फार आवडीचा पदार्थ.
आणि हो, त्याला “बॉम्बे सँडविच” असेच नाव आहे, त्याचे अजून “मुंबई सँडविच” झाले नाहीय. आंदोलनाला वाव आहे इथे मिलॉर्ड.
बाकी पदार्थांची नावे अमुक का हे कोडे आहेच. व्हेज पटियाला आणि लाहोरी कबाब, सिंगापुर फ्राईड राईस भारतात सर्वत्र आहे.
Veg कोल्हापुरी
Veg कोल्हापुरी
माधव, कैलास पर्बत ला बाँबे
माधव, कैलास पर्बत ला बाँबे ग्रील सँडवीच नावाचा आयटम फेमस आहे, आम्ही नेहमी मागवतो.
राईट, कैलास पर्बत आणि AC त
राईट, कैलास पर्बत आणि AC त बसून खायचे असले तर चर्चगेटचे रेलिश. स्वच्छ, टापटीप. दक्षिण मुंबईत आणि पार्ले सांताक्रूज भागात मोठ्या कॉलेजेसला लागून असलेले, रोडसाइडवाले जास्त चविष्ट
ग्रिल खायचे तर बॉम्बे मसाला. Potatos, High Spice, butter and served super hot ! Big slurp !
रच्याकने तुमच्या सिंगापुरचा कैलास पर्बत वाला “सिंधी कोकी” मुंबईच्या आउटलेटपेक्षाही जास्त चांगली देतो. लिटिल इंडिया भागातला.
सिंधी कोकी>>> ट्राय नाही केला
सिंधी कोकी>>> ट्राय नाही केला , पुढील वेळी तो ही चाखून पाहू.
चाट & व्हेज किमा एकदम तोंपासू.
पुण्यात तुळशीबागेत ए वन
पुण्यात तुळशीबागेत ए वन सॅन्डविच वाला होता( अजुनही असेलच ), त्याच्याकडे कॉलेज डेज मधे खायचे मी..गॅस वर उलट पालट करायच साध सॅन्डविच मेकरमधल सॅन्डविच आणी केचप व भरपुर अमुल चिझ किसलेले नॉन ग्रिल असे दोन प्रकार होते...२००० साली ५-१० रुपयात पोटभरिला मस्त ऑप्शन होता...
बॉम्बे सॅन्डविच भारिच लागत...मुबैकर नातेवाइकानी खावु घातलय.
आज जरा बाहेर जेवण केले
आज जरा बाहेर जेवण केले फ्रायडे स्पेशल. पिंक वाईन ट्राय केली (हाफ डे होता घाबरू नका
)
ती मुळीच चढत नाही.
स्पिनाच इन व्हाईट सॉस ऑन रोस्टेड साल्मन वगैरे.
वा वा, Friday special.
वा वा, Friday special.
स्पिनाच इन व्हाईट सॉस + corn + चिली फ्लेक्स हे सँडविच स्टफिंग म्हणूनही झकास लागते. Grill करायचे.
पिंक वाईन ? रोझ वाईन माहिती आहे, दोन्ही एकच का ?
वांग्याचे भरीत जोशिंबीर भाकरी
वांग्याचे भरीत
जोशिंबीर (जोश्यांच्या style ने कोशिंबीर )
भाकरी
मस्तय. पण एवढेसेच भरीत का
मस्तय. पण एवढेसेच भरीत का वाढलंस स्वतःला?
पिंक वाईन ? रोझ वाईन माहिती आहे, दोन्ही एकच का ?>> कल्पना नाही, मला तर फक्त रेड & व्हाईट च माहित होत्या यापूर्वी.
Winefolly वर चेकवले. तुमची
Winefolly वर चेकवले. तुमची पिंक वाईन Rose wine च असावी. फ्रूटी- सायट्रस होती ना ?
पिंक सॉस पास्ता पण खूप लोकप्रिय आहे सध्या.
Bruschetta, home made - with
Bruschetta, home made - with olive oil and love ❤️
No cheese.
सोबत जिभेवर taste striptease करणारी एखादी Sparkling wine असती तर …. असे मनात आले. पण जौद्या …
अनिंद्य, एकदम tempting आहे
अनिंद्य, एकदम tempting आहे
तुमचा टेबल आता ओळखीचा झालाय
कातिल फोटो, अनिंद्य!
कातिल फोटो, अनिंद्य!
तुमचा टेबल आता ओळखीचा झालाय….
तुमचा टेबल आता ओळखीचा झालाय….
My happy place
@ rmd ,
Thanks
पिंक वाईन Rose wine च असावी.
पिंक वाईन Rose wine च असावी. फ्रूटी- सायट्रस होती ना ? हो बरोबर
आधी गणपतीत, आता दिवाळीत या
आधी गणपतीत, आता दिवाळीत या खाऊगल्लीत शुकशुकाटच आहे. बोअर होण्यासारखा विषय नाही खाण्याचा, मग काय कारण ?
फेस्टिवल माहौल बनाओ फ्रेंड लोग.
हा आजचा :

कश्याची तयारी ते समजलं असेलच
अनिंद्य, तयार चिवड्याचाही
अनिंद्य, तयार चिवड्याचाही टाका की फोटो!

फराळाला या
फराळाला या
मस्त फराळ ...!
मस्त फराळ ...!
मिठाया विकतच्या आहेत...
मिठाया विकतच्या आहेत...
आणि बाकी सारे सासूबाईंचे प्रेम आहे
या फराळाला…
या फराळाला…

वाह कलरफुल
वाह कलरफुल
भारी! माझेमन, फराळ सुंदर आहे.
भारी! माझेमन, फराळ सुंदर आहे.
Pages