खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

इथले सगळे पदार्थ भारी दिसतायत. अनरसे सुंदर झालेत पण माझा पास .. नाही आवडत जरा ही. चकली चिवडा पण मस्तच.
अप्पे पण छान दिसतायत.
भरत थालीपीठ छान दिसतंय आणि टोस्टर मध्ये करण्याची आयडिया भारीच.

… सँडविच मेकरमध्ये केलेले थालिपीठ…

आयडियाची कल्पना फार्फार आवडली आहे.

ही ट्रिक उतप्पा, साबुदाणा वड्याचे मटेरियल वापरून करून बघणेत येईल !!!

इ-थालिपीठाची कल्पना आवडली. पण ते जास्त जाड नाही का होत (ठराविक जाडी असल्याशिवाय टोस्टर त्याला टोस्ट करू शकणार नाही ना) ?

आज देवदिवाळी.

परतीचा पाऊस असतो तसा परतीचा फराळ Happy

भाजणीच्या चकल्या. होम मेड बाय एक्सपर्टस्.
b04550d6-cf6c-47c7-be1c-90afbe8a0414.jpeg

चकल्यांचा फोटो छळ आहे.

माधव, माझा टोस्टर रिकामा असतानाही लॉक करता येतो. त्यामुळे ते थालिपीठ फार जाड करावं लागत नाही. तसंही मी अर्धा कप भाजणीचंच केलं होतं. फक्त मार्क्सही फक्त खालच्या बाजूला आलेत. दोन्ही बाजूंनी नीट शिजलं होतं.

चकल्या मस्त
कुरकुरीतपणा फोटोत जाणवतोय.

छान आयडिया भरत. ते लॉक केलेत की तसेच भाजले? लॉक केले नाही तरी चालावे बहुदा.
चकली छान.
उत्तरेत आज असते देव दिवाळी, आपल्याकडे मार्गशीर्ष प्रतिपदेला. डिसेंबर मध्ये येईल कधीतरी.

कातिल दिसतायत चकल्या !
यावेळेस मला केप्रची भाजणी कुठेही मिळाली नाही, सगळचे जवळची दुकान" वो बेडेकर का चकली आया है मॅडम "सान्गत बसले त्यामुळे घरिच भाजणी करुन मिक्सर वर दळुन चकल्या केल्या...अपेक्षेपेक्षा बर्‍याच चान्गल्या झाल्या.
IMG_4671.jpeg

चकल्यांची स्तुती योग्य कानांपर्यंत पोहचवण्यात आली आहे Happy

@ प्राजक्ता, सर्व सॉल्टी पदार्थ मला द्या, गोड इतरांना Happy

अनिंद्य, चकल्या भारी. प्राजक्ता, फराळाचे ताट सुरेख. भरत, थालीपीठ-वॉफल आवडले. Happy

माझे नेहमीचे थालीपीठ -
IMG-20241116-WA0001.jpg
उपासाचे थालीपीठ आणि दाण्याची चटणी -
IMG-20241026-WA0002(1).jpg
सावर डो ब्रेड सॅन्डविच, सावर क्रीम आणि ग्वाकामोले, बटाट्याच्या वेजेस -
IMG-20241116-WA0002.jpg
कांदे पोहे -
IMG-20241116-WA0004.jpg
पनीर -मटार पुलाव -
IMG-20241113-WA0001(2).jpg

मस्त पदार्थ आहेत एकेक. थालिपीठ दोन्ही भारी दिसत आहेत. पहिल फक्त ज्वारीचे आहे का? पोह्यात जिरे म्हणून पास.

लंपन, आपकी पारखी नजर Happy मी सगळ्यातच जिरे- मोहरी दोन्ही घालते. पहिले थालीपीठ भाजणीचे आहे, भारतातून मागवली होती यावेळी. त्यात ज्वारीचे पीठ असतेच.

धन्यवाद सर्वांना. Happy

Happy नांदेडचा घरगुती बिझनेस आहे जाई. ब्रॅण्ड नाही. माझा भाऊ- वहिनी सगळे व्यवस्थित मागवून पॅक करून बॅग भरून पाठवून देतात. मला काहीही बघावे लागत नाही, उलट बॅगांचे वजन वाढते पिठांनी म्हणून मी 'नको-नको' म्हणत असते. Happy

ते थालिपीठ फोटोतून ओरडून सांगतंय - मी खमंग आहे.
लंपन , मी पोह्यांच्या फोडणीत बडीशोपसुद्धा घालतो

पोह्यात जिरे म्हणून पास. >>> मला पण नाही आवडत. हल्ली सर्रास फोडणीत मोहरी आणि जीरं दोन्ही घालतात. मला बेसिक्स शिकवताना आईने तेलाच्या फोडणीत मोहरी आणि तुपाच्या फोडणीत जीरे असं शिकवलं होतं. पुढे एका लेखात तसं का करायचं ते वाचलं होतं (आता कारण विसरलो)

बरोबर आहे, माधव.
बहुधा, तुपाची फोडणी, उपासाच्या पदार्थांची, म्हणून जिरे.
आणि जिरे मोहरी एकत्र घातल्याने, दोन्हीच्या स्वादांची सरमिसळ होऊन ते चांगले लागत नाही...!

चांगले...... ॲज इन... ऑथेंटीक!!

Pages