गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.
शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.
भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव
मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.
दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.
सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html
पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA
म्हणजे, शिवाजीनगर किंवा गावात
म्हणजे, शिवाजीनगर किंवा गावात जायची वेळ येत नाही जास्त, फार तर औंध बाणेर किंवा हिंजवडी इतकंच होतं असं म्हणायचं होतं.
मुकाई चौक भक्ती शक्ती, अरे वा.एकदा वापरून पाहायला पाहिजे.
दिवसभर पार्किंग 100 ला.
दिवसभर पार्किंग 100 ला.
https://punemirror.com/pune/civic/pune-metro-introduces-parking-faciliti...
महाराष्ट्रातील मेट्रोमध्ये
महाराष्ट्रातील मेट्रोमध्ये (मुंबई असो वा पुणे) मेट्रोला वीजपुरवठा करण्यासाठी overhead wire ऐवजी third rail चा वापर का होत नाही??? कर्णावतीच्या (अहमदाबाद) मेट्रो मध्ये overhead wire नाही तर third rail system आहे, त्यामुळे एकदम clean look मिळतो. ओवरहेड वायर मुळे सगळा लूक खराब होतो
मेट्रो मार्ग उन्नत किंवा
मेट्रो मार्ग उन्नत किंवा भुयारी असल्याने खरं तर थर्ड रेल ठेवायला काही हरकत नव्हती. सेंट्रल रेल्वे सारखे रूळ ओलांडणारे पब्लिक नसणार तिथे त्यामुळे कोणाला शॉक लागायचा प्रश्न नव्ह्ता. जास्त खर्चिक देखील असते तरी ते एकदाच करावे लागले अस्ते. आता ओव्हर्हेड केलय तर थर्ड रेल करायची शक्यता कमीच आहे.
जास्त खर्चिक देखील असते तरी
जास्त खर्चिक देखील असते तरी ते एकदाच करावे लागले अस्ते. >>> +१
सेंट्रल रेल्वे सारखे रूळ ओलांडणारे पब्लिक नसणार तिथे त्यामुळे कोणाला शॉक लागायचा प्रश्न नव्ह्ता.>>>
उलट मी तर म्हणेन, 'रूळ ओलांडू नका, पूल अथवा भुयारी मार्गाचा वापर करा' ही सूचना निरनिराळ्या माध्यमांतून वारंवार देऊनही जर कोणी जाणीवपूर्वक नियम मोडत असेल तर अशी नियमतोडी लोकं जिवंत राहून तरी काय फायदा? उलट ते देशाची प्रतिमा खराबच करणार!
आणि तसही third rail मध्ये विद्युतपुरवठा करणाऱ्या तिसऱ्या रुळावर protective cover असते, तो केवळ खालच्या बाजूने उघडा असतो जिथून त्याला विद्युतपुरवठा घेणारा मेट्रोचा पार्ट चिकटलेला असतो.
जाणीवपूर्वक नियम मोडत असेल तर
जाणीवपूर्वक नियम मोडत असेल तर अशी नियमतोडी लोकं जिवंत राहून तरी काय फायदा? उलट ते देशाची प्रतिमा खराबच करणार! >>> प्रत्येक आयुष्य किंमती आहे. देश, देशाची प्रतिमा या काल्पनिक गोष्टी आहेत. त्या मान्यता आहेत. नियम माणसासाठी असतात. किरकोळ कारणावरून नियम मोडला म्हणून जीव घेणे / गेला तरी चालेल या विचाराचे समर्थन करता येत नाही. नियम पाळायला लावण्यासाठी जनजागृती, शिक्षण यांचा प्रसार हा उपाय आहे. दंड हा उपाय आहे. तीव्रतेप्रमाणे शिक्षा हा उपाय आहे.
पण रूळ ओलांडताना जीव जाणे याचे समर्थन म्हणजे तालिबानी कायदेच की.
रूळ ओलांडताना नुसता माणसाचा
रूळ ओलांडताना नुसता माणसाचा जीव जात नाही, मोटरमन ला प्रचंड मानसिक त्रास आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस मधून जावे लागते.
https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/chennai/in...
प्रत्येक आयुष्य किंमती आहे.>>
प्रत्येक आयुष्य किंमती आहे.>> हे ज्याचे त्याला कळायला हवे.
नियम पाळायला लावण्यासाठी जनजागृती, शिक्षण यांचा प्रसार हा उपाय आहे. >>> किती काळ??? काही समयमर्यादा असायला हव्यात की नकोत???
रूळ ओलांडताना नुसता माणसाचा जीव जात नाही, मोटरमन ला प्रचंड मानसिक त्रास आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस मधून जावे लागते.>>> हे मात्र बरोबर, शिवाय त्या ट्रेनमधील हजारो लोकांचा वेळ म्हणजेच एका मूर्ख, बेजबाबदार, नियमतोड्यामुळे हजारो मानवी तास वाया जातात! (कारण तो मृतदेह उचलल्याशिवाय ट्रेन पुढे नेत नाहीत.)
प्रत्येक आयुष्य किंमती आहे वरुन....
समजा एक रेल्वे फाटक आहे, जे ट्रेन जाणार म्हणून बंद आहे. फाटकाच्या दोन्ही बाजूला थांबलेल्या गाड्यांमध्ये एखादी अग्निशमन दलाची गाडी सायरन वाजवत उभी आहे. दूर कुठेतरी एखादी आग वा तत्सम दुर्घटना घडली आहे, तिथे तिला मदतीला जायचे आहे. पलीकडच्या वाजूला रुग्णवाहिका फाटक उघडण्याची वाट पाहत आहे, जिच्यात त्याच किंवा अन्य दुर्घटनेतील गंभीर जखमी व्यक्ती आहे, जिला golden hour मध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचवायचे आहे. आणि अशा परिस्थितीत एक अतिशहाणा, over confident व्यक्ती फाटक बंद असतांना देखील रूळ ओलांडायचा प्रयत्न करतो तेही कानात इअरफोन लावून (असतात असे महाभाग एकेक!) आणि नेमक्या त्याच वेळी वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनने त्याला पाहून इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवायचा प्रयत्न केला मात्र धडक बसून तो रूळ ओलांडणारा गंभीर जखमी झाला / जागेवर मेला.
आता तुम्ही जर त्या ठिकाणी रेल्वेशी संबंधित मोठे अधिकारी असाल तर काय निर्णय द्याल? जवळच्या स्टेशनवरुन हमालांनी येऊन त्या रूळ ओलांडणाऱ्याचा मृतदेह उचलेपर्यंत ही ट्रेन अशीच थांबवून ठेवायची (म्हणजे पर्यायाने फाटक तितका वेळ उघडणार नाही) की भले अजून त्याच्या मृतदेहाच्या चिंधड्या झाल्या तरी चालेल पण ट्रेन पुढे काढून फाटक उघडू द्यायचे???
समजा पासूनचा संपूर्ण
समजा पासूनचा संपूर्ण परिच्छेद वाचला नाही. एखाद्याचा जीव जाणे समर्थनीय आहे ही विचारसरणी अयोग्य आहे असे मला वाटते. जे लिहीले आहे ते स्वच्छ शब्दात लिहीलेले आहे. यावर आपल्याशी अधिक वितंडा घालायची इच्छा नाही.
प्रवासी संख्या कमी होत
प्रवासी संख्या कमी होत आहे
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/parking-fee-on-metr...
यावर आपल्याशी अधिक वितंडा
यावर आपल्याशी अधिक वितंडा घालायची इच्छा नाही.>>> मलाही या विषयावर जास्त चर्चा करायची नाही, कारण धागा भरकटेल.
आता पुन्हा मेट्रोवर येऊ.
मी १६ फेब्रु. २०२४ रोजी १०:३१ ला लिहिलेल्या प्रतिसादात third rail system चा उल्लेख केला आहे, १२:३४ च्या प्रतिसादात third rail वर protective cover असते, तो फक्त खालून उघडा असतो, हे लिहिले आहे. या protective cover मुळे कोणालाही शॉक लागण्याची शक्यता जवळपास शून्य होते. यावर तरी चर्चा (वितंडा) घालाल की नाही??? कारण overhead wire एखाद वेळेस तुटू शकते (जशा western / central railway च्या तुटतात) आणि मग सगळी सेवा कोलमडून जाते, तसा third rail हा तुटू शकत नाही, कारण तो जाडजूड रूळ असतो. ओवरहेड वायरपेक्षा third rail निश्चितच reliable असेल.
पुन्हा उजळणी.
पुन्हा उजळणी.
किवळे च्या मुकाई चौकापासून किवळेच्या विविध भागात कनेक्टिव्हिटी नाही. एक बस फिरते. तिची फ्रिक्वेन्सी अर्धा तास आहे. प्रत्यक्षात ती एक तास ते कधीही येते. भक्ती शक्ती चौकात जाणारी एक बस आहे. पावसाळात तिच्या फेर्या अचानक बंद होतात. मुकाई चौकापासूनची ही अंतरे १.५ किमी आणि जास्त आहेत. काही भागात अजूनही बांधकामे चालू आहेत. क्वचित रिक्षा येते. मीटरवर येत नाहीत. काय वाट्टेल ते भाडं सांगतात.
मेट्रोचा वापर करायचा झाल्यास किवळे, पुनावळे, रावेत भागातून रिक्षाने किवळे बस टर्मिनस. तिथून पिंपरी पर्यंत बस. पिंपरीपासून कोर्ट मेट्रोने. कोर्ट ते नळस्टॉप मेट्रो. मेट्रो पासून आंबेगाव ते कात्रज हा पट्टा, नर्हे, धायरी, वडगाव बुद्रुक, माणिकबाग, खडकवासला या भागात जायला थेट बस नाही. हा भाग बायपासने छान कनेक्ट झालेला आहे. मेट्रोने एव्हढी सर्कस करण्यात वेळेची बचत तर नाहीच होत. उलट बापयास ने आल्यास निम्म्या वेळात मनुष्य पोहोचतो. त्यामुळे कंत्राटी बसेसचे प्रमाण जास्त आहे.
वारजे ला जायला बस आहे. उभ्याने जावं लागतं.
अशा परिस्थितीत मेट्रोने सोय झाली असे कुणीही म्हणताना आढळलं कि संकटाचे हे पहाड डोळ्यासमोर येतात. ज्यांची सोय झाली आहे ते खरोखर भाग्यवान आहेत. ज्यांची सोय झालेली नाही अशा पापी लोकां नी मेट्रो फुलराणी ची राईड झालेली आहे. आता कुणी मेट्रोचा वापर करत नाही.
देशभरातून एकामागोमाग एक मेट्रो फेल होत असल्याचे रिपोर्ट्स येत आहेत. जयपूर मेट्रो केस स्टडी म्हणून घेतलेली आहे.
नागपूर मेट्रो सुद्धा आता तोट्याकडे वाटचाल करतेय. मुंबईत सात रूट असल्याने तीच एक सोयीची आहे. पण आजही लोकलनेच लोक जा ये करत असतात.
देशभरातून एकामागोमाग एक
देशभरातून एकामागोमाग एक मेट्रो फेल होत असल्याचे रिपोर्ट्स येत आहेत. जयपूर मेट्रो केस स्टडी म्हणून घेतलेली आहे.
नागपूर मेट्रो सुद्धा आता तोट्याकडे वाटचाल करतेय.>>> मला वाटते, ज्या शहरात आधीपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची बोंब होती तिथल्या लोकांना इतक्या वर्षात स्वतःची वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरण्याची सवय झालेली आहे. ही वर्षानुवर्षांची सवय मोडायला काही वर्षे जातील, त्यामुळे इतक्यात निष्कर्ष काढण्यात अर्थ नाही.
मुंबईत सात रूट असल्याने तीच एक सोयीची आहे. .>>> मुंबईत सात रूट वगैरे हे नियोजित आहेत, प्रत्यक्षात लाईन १ (निळी मार्गिका) (वर्सोवा - घाटकोपर), लाईन २ए (पिवळी मार्गिका) (अंधेरी प. - दहिसर पू.) आणि लाईन ७ (लाल मार्गिका) (दहिसर पू. - अंधेरी पू. गुंदवली) याच लाईन्स सुरु आहेत, पैकी लाईन १ चा (महाराष्ट्रातील पहिली मेट्रो!) येत्या ०८ जून २०२४ रोजी दहावा वर्धापनदिन आहे !
...पण आजही लोकलनेच लोक जा ये करत असतात>>> कदाचित तिकीटदर हाही एक मुद्दा असेल त्यामुळे अगदी हातावर पोट असणारे कष्टकरी लोकलनेच जाणार तसेच उत्तर मुंबई वि. मध्य / दक्षिण मुंबई असा विचार करता सद्यस्थितीत तरी अंधेरीच्या पुढे मेट्रोची सेवा नाही. त्यामुळे वसई-विरार वरुन किंवा अगदी बोरीवली - कांदिवलीमधून एखाद्याला BKC / Lower Parel / Nariman Point भागात जायचे असेल तर तो लोकलचाच विचार करेल. वसई - विरार वाले तर सोडूनच द्या, अगदी बोरिवलीला राहणाऱ्याच्या अगदी घरासमोर जरी मेट्रो असेल तरी तिने अंधेरीपर्यंत या आणि मग तिथून पुन्हा अंधेरी रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेने पुढे जा, असला द्राविडीप्राणायाम करण्यापेक्षा तो घराजवळचे रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेनेच येईल. जेव्हा लाईन ३ (कुलाबा - सिप्झ, संपूर्ण भुयारी) सुरु होईल तेव्हाच काही अंशी लोकल्सवरचा भार कमी होईल, अशी आशा आहे. शिवाय रेल्वेचा पास हा day basis वर असतो, म्हणजे तितके दिवस कितीही फेऱ्या मारा, पण मेट्रोचा पास हा trip based असतो.
त्यात मेट्रो प्रचंड स्लो
त्यात मेट्रो प्रचंड स्लो कारभार वाटतो. बोरिवली -अंधेरी फास्टला जितका वेळ लागतो त्याच्या तिप्पट एक वेळ मेट्रोला लागत असेल.
जयपूर मेट्रोचा कोणालाही उपयोग
जयपूर मेट्रोचा कोणालाही उपयोग नाही. ती का बांधली या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही.
२ तासासाठी १५/३५ रु पार्किंग
२ तासासाठी १५/३५ रु पार्किंग ! मॉलचे पार्किंग रेट्स लावलेत वाटतं. नक्की कोण हे ठरवतं ? त्यामागे काय विचार असतो ? २ तासात जाणे येणे शक्यच नाही त्यामुळे ह्या रेट्सच्याही दुप्पट पार्किंग चार्जेस द्यावे लागणार. रस्त्यांसाठी पे न पार्कचे जे रेट्स आहेत ५/१० ते ठेवले असते तर बरे झाले असते.
महाराष्ट्रातील मेट्रोमध्ये
महाराष्ट्रातील मेट्रोमध्ये (मुंबई असो वा पुणे) मेट्रोला वीजपुरवठा करण्यासाठी overhead wire ऐवजी third rail चा वापर का होत नाही??~~~ हिंजवडी मेट्रोला आहे
मुकाई चौक ते भक्ती शक्ती चौक रस्ता सूरु झाला आहे
नागपुर ला मेट्रो मध्ये
नागपुर ला मेट्रो मध्ये सायकल नेता येते , पुणे मेट्रो ला तशी सोय आहे का ???
नागपुर ला मेट्रो मध्ये सायकल
नागपुर ला मेट्रो मध्ये सायकल नेता येते , पुणे मेट्रो ला तशी सोय आहे का ???>>>
पुण्याचे माहीत नाही, पण मुंबईच्या मेट्रो लाईन २ए (पिवळी मार्गिका - अंधेरी प. ते दहिसर पू. ) आणि लाईन ७ (लाल मार्गिका - अंधेरी पू. ते दहिसर पू.) यांच्यामध्ये सायकल नेता येते, अतिरिक्त तिकीटाशिवाय! मेट्रोच्या डब्यात सायकल उभी पार्क करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे stand आहेत, ज्यामुळे जागा कमी लागते. लाईन १ (निळी मार्गिका - वर्सोवा ते घाटकोपर) मध्ये मात्र परवानगी नाही.
आज कॉण्ट्रॅक्टची बस येणार
आज कॉण्ट्रॅक्टची बस येणार नसल्याने बर्याच विद्यार्थ्यांनी सुटी घेतली. मुलीची परीक्षा असल्याने सकाळी तिला सोडलं. नंतर सगळे लेक्चर्स झाल्यावर संध्याकाळी सहाची बस रद्द झाली. सातची बस आली नाही. ती निगडी ला गेली. तिथे बसचं टायमिंग गंडल्याचं समजलं. आत्ता घरी पोहोचलीय. आत्ता पुन्हा आणायला गेलो असतो तर बरं झालं असतं.
बससेवेवर विसंबून राहता येत नाही.
फारच गोंधळ. एकंदर दुचाकीविना
फारच गोंधळ. एकंदर दुचाकीविना पर्याय नाही.आमच्या इथली समोरची एक मुलगी कासारवाडी पासून मेट्रो ने शिवाजीनगर आणि तिथून कोथरूड mit ला जायची.पण मध्ये मेट्रो बिघाड वाले बरेच गोंधळ झाले, मग आता दुचाकी शिकून पिंपळे सौदागर ते कोथरूड रोज किंवा लेक्चर्स असतील त्या दिवशी जाते.पण दमायला होतं फार म्हणे.
(No subject)
https://www.loksatta.com/pune
https://www.loksatta.com/pune/there-is-no-metro-to-pune-airport-mahametr...
वनाज ते शिवाजी नगर स्टेशन ला
वनाज ते शिवाजी नगर स्टेशन ला डायरेक्ट जाता येतं का जसं पुणे स्टेशनला जाता येतं आतल्या आत
वनाज ते शिवाजी नगर स्टेशन ला
वनाज ते शिवाजी नगर स्टेशन ला डायरेक्ट जाता येतं का जसं पुणे स्टेशनला जाता येतं आतल्या आत~~~ सिव्हिल कोर्ट स्टेशन ला मेट्रो चेंज करून जावे लागेल
धन्यवाद सुन्या!
धन्यवाद सुन्या!
(No subject)
आत्मनिर्भर होणार पण मेट्रोतूनच जाणार





मस्त.हे सगळं सोपेपणी करता आलं
मस्त.हे सगळं सोपेपणी करता आलं तर उत्तमच.
एकाला दोघे असले कि जमतं.
एकाला दोघे असले कि जमतं. कॉन्फिडन्स नसल्याने सुरूवातीला इलेक्ट्रिक बाईक वापरली. जोडीदाराने साधी सायकल आणली होती.
बंडगार्डनचं जॉगर्स पार्क गेलं मेट्रो स्टेशन मधे. त्या पार्क मधे सुंदर झाडं होती. काही शिल्लक आहेत. त्याचे फोटो घेतले.
तोपर्यंत जोडीदाराने सायकलचे आणि मेट्रो स्टेशनचे घेतले. बरंच झालं. इथे पोस्टायला कामाला आले.
अगदी माझ्यासारखीच सायकल घेऊन अजून एक जण एकटेच दिसले नळस्टॉपला. याला कमिटमेंट म्हणतात.
मेट्रो प्रवासाचे बघता बघता एक
मेट्रो प्रवासाचे बघता बघता एक वर्ष झाले पण. अगदी नियमित वापरली मेट्रो ह्या वर्षात, दुचाकी किंवा चारचाकी फार म्हणजे फार क्वचित वापरली. एवढे सातत्य इतर कुठलेच सार्वजनिक वाहतूक साधन वापरताना दाखवले नव्हते. अत्यंत आरामदायी प्रवास, एक नंबर frequency त्यामूळे हे उत्तम वाहतुकीचे साधन आहे प्रवासाचे. मेट्रो आणि स्टेशन परिसर स्वच्छ आहेत. स्टाफ पण विनम्र आणि चांगला आहे. एक दोन वाईट अनुभव वगळता चांगलाच अनुभव आहे स्टाफचा, आणि वाईट अनुभव पण केवळ टिकिट स्टाफचा आहे. सिव्हील कोर्टला एक बर्गर दुकान पण मेट्रो स्टेशनच्या आत चालू झाले मागच्याच महिन्यात. काही गोष्टी खटकणाऱ्या त्यात प्रामुख्याने पार्किंग ची सोय नसणे ही आहे. रिटर्न टिकिट अचानक बंद केले. बरीच स्टेशन गळायला लागली आहेत दुसऱ्याच पावसात (सफाई करतात लगेच, पण..).लिफ्ट जर बंद पडली तर दोन दोन दिवस रिपेअर करायला लावतात. खासकरून जर पिंची स्टेशन लिफ्ट बंद पडली आणि जिना चढायला लागला तर काही खैर नाही. आणि रिक्षा वाले पूर्ण एन्ट्री पॉइंट ब्लॉक करतात, त्यांना माज प्रचंड, जवळ चे भाडे घेणार नाहीत पण गर्दी मात्र करतात स्टेशन बाहेर. ह्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा.
बाकी मोबाईल आणि इअर बड धारी पब्लिक अत्यंत बेशिस्त वागते. कानात ते मशीन असल्याने मागचा काय बोलत आहे ते ह्यांना अजिबात ऐकू येत नाही, एस्कलेटर वर, मेट्रो फलाटावर अनावस्था प्रसंग येऊ शकतो. लिफ्ट वापरताना पण ह्यांचे पूर्ण लक्ष फोन मध्येच, अगदी यंत्रवत हालचाली करतात. पुन्हा दारात उभे राहतात (मुली ह्यात अजिबात मागे नाहीत), शिवाजी नगर, सिव्हील कोर्ट अशा गर्दीच्या स्टेशनला दरवाजा पाशी उभे राहून रस्ता अडवतात. याउलट जे पहिल्यांदा प्रवास करत आहेत किंवा गावाकडून आलेले पब्लिक अगदी शिस्त बाळगून प्रवास करते. पब्लिक कचरा पण भरपूर करते. न्युज पेपर घेतात आणि मेट्रो मध्ये तसाच फेकून देतात, पाणी बाटल्या तशाच सीट वर/ खाली ठेवून उतरतात. बाहेर पडताना तिकिट स्कॅन करून झाले की लगेच खाली फेकून देतात. सकाळी मेट्रो सुरू झाली की डबा उघडुन खादाडी सुरू (ह्यात बायका अग्रेसर), खादाडीला बंदी आहे तरीही. अजून भिंती मात्र रंगलेल्या नाहीत कारण सगळा मुद्दे माल पकडला जातो स्कॅनिंग मध्ये. अजून एक बावळट प्रकार म्हणजे काही लोक समोरून प्रवासी येत आहेत असे दिसले की बंद होणारे दरवाजे चक्क सॅक आणि डबा पिशवी ने अडवतात.
एकंदरीत मेट्रो छान अनुभव आहे. प्रवास नक्कीच सुकर झालाय, ह्या अशा पावसात तर प्रकर्षाने जाणवत आहे. गर्दी पीक hour मध्ये असते बक्कळ. आता स्वारगेट पर्यंत लाईन सुरू होईल ह्या महिन्यात, मग अजून खूपच गर्दी वाढेल..लाँग लिव्ह पुणे मेट्रो.
Pages