पुण्यात मेट्रो धावू लागली!

Submitted by पराग१२२६३ on 19 March, 2022 - 11:53

गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.

मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.

शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.

सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.

भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव

मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.

दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.

सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html

पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसते भोकाड पसरत बसलात. >>> माफ करा. आपल्या भाषा वैभवापुढे दिपून गेलो. आपल्या सारख्या विद्वानांशी चर्चा करण्याची पात्रता नाही.

उ बो तुमचे म्हणणे बरोबर पण आपण कुठलाही नवीन बदल सहज स्विकारत नाही. थोडा वेळ जाऊ द्या. या मेट्रो लाईन्स वर पण तुफान गर्दी होइल.बाकी माबो वर काही लोक कायम Negative आणि anti development लिहीतात त्याकडे दुर्लक्ष करायचे.

नवीन सुरु झालेले रुट चांगले चालले आहेत असे ऐकिवात आहे..... पण मेट्रो थेट आयटीपार्कात येत नाही तोपर्यंत आमच्यासारख्यांना रोजचे तासाभराचे ड्रायव्हिंग टळणार नाही!!
पुण्याच्या परिघावरुन एक रुट फिरवला तर जास्त फायद्याचे होईल असे वाटतेय Happy

1. जास्त गर्दी, जास्त ट्रॅफिक आणि जिथे पर्यायी pmpml पुरत नाहीत त्या रूट ला मेट्रो(स्वारगेट हिंजवडी/चिखली हिंजवडी/खराडी हिंजवडी/पुणे स्टेशन हिंजवडी)
2. यातल्या शिवाजीनगर हिंजवडी रूट ची सुरुवात होऊन थोडका बदल होईलच.बाकी रुट्स बजेटनुसार येतील का पाहू.

जयपूर ला आम्हाला जयपूर स्टेशनवर सामान घेऊन उतरून जयपूर एअरपोर्ट वर जायचे होते.कागदोपत्री मध्ये 1 मेट्रो बदलून पोहचता येणार होते.पण उतरल्या स्टेशनवर ठिकाणापासून मेट्रो स्टेशन 1 किलोमीटर चालत होते. चौकशी केली तर कोणीही उत्साह दाखवला नाही.त्याच्या आधीचं एक स्टेशन होतं तिथे उतरून जयपूर विमानतळ गाठायला टॅक्सी रिक्षा भाडं कमी लागतं असं एक मुलगा गाडीत परत परत सांगत होता, पण आमच्या मेट्रो भक्तीने आम्ही जयपूरलाच उतरलो होतो. शेवटी 350 रु ची रिक्षा करून एअरपोर्ट ला गेलो.

उपयोग थोडा होऊदे, मला नको होऊदे, कोणालातरी होऊदे, हळूहळू बदल होऊदे. पण बदल गरजेचा.'पुणे मेट्रो ना, तिथे फिरायला आणि सेल्फी काढायला जातात लोक' हे चित्र कायम नको.

(शिवाजीनगर, बाणेर, वाकड अश्या ज्या ठिकाणून मेट्रो जातेय ते बरेच आर्थिक सबळ एरिया आहेत.शिवाजीनगर ला जे 'राहतात' त्यांचा घरटी 1 माणूस अमेरिकेत असेल.किंवा ते कोणत्या सरकारी कर्मचारी वसाहतीत राहत असतील.बाणेर वाकड वाले 'जिने चढण्या पेक्षा क्रेटा/सेलटोस/सिटी काढून भुर्रर्रकन जातो' म्हणणार.ज्यांना गाडी/दुचाकी काढून भुर्रर्रकन जाणे हा पर्याय शारीरिक आर्थिक दृष्ट्या शक्य नाही, आणि तरीही खूपदा बाहेर जावेच लागते अश्या लोकांना मेट्रो चा फायदा व्हावा.)

मी अनु बरोबर. हेच मागच्या पानात कुठे तरी म्हटले आहे.

काही लोक विरोधात असताना सरकारच्या प्रत्येक कामाकडे संशयाने पाहतात. देशद्रोही म्हणतात. त्यांचे आवडते सरकार आले कि मग त्यांनी केलेल्या कामाला विरोध सहन होत नाही. मग मुद्दा नसला की ते विकास विरोधी म्हणतात.

अशा लोकांशी अजाणतेपणी सुरुवातीला वाद प्रतिवाद होतात. एकदा अजेंडा कळला कि इग्नोर करायला बरं पडते.

चिंचवड / भोसरी या ठिकाणी अनेक कंपन्यातून काम केले आहे. त्या वेळी या कंपन्यांना येण्या जाण्याची सोय करून द्यावी लागे. आम्हाला बसेस होत्या. आरामात जाणे येणे व्हायचे. दहा रूपये महिना इतके नाममात्र चार्जेस होते. वरच्या पोस्टवर जाऊन सुद्धा कधीच कारने यावे असे वाटले नव्हते. कामगारांसोबतच बसने येणे जाणे असायचे.

नंतर कामगार कायद्यात बदल झाले. बऱ्याच कंपन्यांनी बस सेवा बंद केली. व्हीआरएस आणली. त्याच वेळी हिंजवडी आयटी पार्क सुरू होत होते. त्यांनी सरळ खासगी कॅब्ज शी करार केले आणि सॅलरीतून कट केले. त्यामुळे इंडिका कार्सची लाईन लागते.

मुद्दा नियोजनाचा आहे. कशालाही विकास म्हणण्याचा नाही.

हिंजवडी ते निगडी ते भोसरी ते चाकण MIDC ते तळेगाव
आणि निगडी ते भोसरी ते एअरपोर्ट असाही एक रूट पायजेल पण आमचं कोण ऐकत नाही
पिंपरी ते निगडी extn लेटेस्ट DPR मध्येही नाहीये.
रिंग रोड जो होणार आहे त्यालाही एक।मेट्रो line हवीय

रघु आताही MIDC मध्ये बर्याच कंपन्या बस सर्व्हिस अत्यल्प दरात देतात म्हणून MIDC टिकून आहे.
PMPML ला काय झेपत नाहीये.
काही कंपन्यांनी बस सर्व्हिस चे at actual चार्जेस सॅलरी मधून कट करणे सुरू केले आहे. तरीही बरेच लोक सोय आहे आणि ट्रॅफिक मध्ये कार चालवणे कंटाळवाणे म्हणूनही ही सोय वापरतात.

Exactly,
टॅक्स भरून दमलो पण एकही सुविधा नाही. या खर्चाची, कर्जाची वसुली कर भरायला लावून करणार आहेत.

वनाझ - रुबी लाईन ला मेट्रो ला चांगला प्रतिसाद आहे. कोथरूड ते मनपा बस सेवेला चांगला पर्याय आहे

पिंपरी ते स्वारगेट लाईन सुरु झाल्यावर तिथेही गर्दी वाढेल. सध्या लोक शिवाजीनगर ला उतरून स्वारगेट - कात्रज साठी पारंपारीक बसमार्ग वापरत आहेत पण मेट्रो ची स्वारगेट लाईन चालू झाली की हे लोक्स थेट स्वारगेट ला उतरून पुढील प्रवास करतील. स्वारगेट-हडपसर / स्वारगेट कात्रज या बससेवा चांगल्या वारंवारतेच्या आहेतच. तसेच स्वारगेट ते सिंहगड रोड सध्या गर्दिचा भाग आहे पण उड्डाण्पुल झाल्यावर तिथले लोकही या मार्गाचा वापर करू शकतील.

आचार्य, अनु..मेट्रो मलापण तशी सोयीची नाही. मला १२ ते १५ मिनिट दुचाकी वर ड्राईव्ह करून जावे लागते. आता तर पार्किंगची सोय पण नाहीये. पण ठीक आहे, मला रोड प्रवासाचा खूपच कंटाळा आला आहे. लोकल फेऱ्या वाढणार नाहीत हे माहीत आहे. तेंव्हा मेट्रो पर्याय बरा. घरापासून मेट्रो मिळेल असे होणार नाही पुण्याची रचना बघता. पण हिराबागेत राहणाऱ्या माणसाला जर पिंप्रिला जायचं असेल तर तो पुलाच्या वाडीपाशी गाडी लावून मेट्रोने जाऊ शकतो. अगदी पिं सौ मधल्या माणसाला विमाननगरला जायचं झालं तर तो नाशिक फाट्यापाशी दुचाकी लावून मेट्रोने जाऊ शकतो (कोकणे चौक ते स्टेशन सकाळी फारतर दहा मिनिट लागतात). माझा एक मित्र फिनोलेक्सला आहे कामाला, राहतो नवशा मारुती पाशी. सकाळी लवकर निघतो आणि साडेपाचला सुट्टी. डेक्कन स्टेशन ते घर सकाळच्या वेळेत दहा मिनिट आणि संध्याकाळी पंधरा मिनिट. पण मेट्रोनेच जात आहे. समजा magaraptta मध्ये एखादा माणूस कामाला आहे, आणि राहायला चिंचवडला आहे, तर तो कल्याणीनगरला उतरून जाऊ शकतो (अजून २ महिन्यांनी). चिंचवड ते मगरपट्टा भयाण बस प्रवासापेक्षा हे बरे ना. मीच आधीच्या पानांवर लिहिले आहे की पुण्यात अशी वाकडी वाट करून प्रवास करणे अंगवळणी नाही, कारण इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधीच बरी सुद्धा नव्हती. त्यामुळे लोक स्वतःच्या वाहनावर अवलंबून आहेत इतकी वर्ष.. आता काहीतरी नवीन आले आहे साधन, वापरून बघूया..

हो लंपन, आमच्या फॅमिली मेम्बरांनी कासारवाडी ला दुचाकी लावून हा मेट्रो प्रवास केला 15 ऑगस्ट ला.
जर एका टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्याला जायची वाहनांची फ्रिक्वेन्सी चांगली असेल तर टप्पे करायलाही लोक तयार असतील.

Once the Metro train services become operational, we will launch our feeder routes for the convenience of the thousands of commuters who will travel on the Versova-Ghatkopar route every day," a BEST official said.
"There will be a huge rush of office-goers who will get down from Metro trains and take buses and autorickshaws/share taxis for the commercial hubs/corporate offices in Andheri East. We will cater to this population,'' an official said.
The BEST could also incur losses on its long-routes from Ghatkopar to Andheri station. "In future, when the Metro services begin, commuters will prefer travelling by the high-speed trains from Ghatkopar West to Andheri East station. So our bus services along this corridor may witness a drop in number of passengers. But we will compensate this by diverting buses on the feeder routes,'' the official stated.

A Mumbai Metro One Pvt Ltd spokesperson told TOI :We are closely working with MMRDA and BEST in strategic strategic capacity to ease passenger/traffic dispersal along .metro corridor and will encourage more feeder routes
ही बातमी जुनी आहे. पण आताही मुंबईत ज्या नव्या मेट्रो लाइन्स सुरू झाल्या त्याला जोडून बेस्ट बसेसही सुरू केल्या गेल्या/ आधीच्या बसेसचे मार्ग बदलले गेले.

चिडकू,
पुणे एअरपोर्ट नक्की कोणता हे ठरलं की मग पुढे होईल कदाचित.
आताचा लोहगाव चा एअरपोर्ट हा एअरफोर्सचा आहे.
तात्पुरती सोय म्हणून सुरू झालेला आहे.
नवीन आधी खेड राजगुरूनगर जवळ होणार होता.
आता पुरंदर जवळ कुठेतरी होणार आहे अशी बातमी आणि त्याच्या संदर्भात सर्व कामे सुरू आहेत.
तिथे झाला तर तो वेगळाच रूट होइल.

कात्रज मध्ये राहणाऱ्या व्यक्ती ला पुण्याच्या दुसऱ्या टोकाला जायचे असेल तर त्याला पुणे शहरातून जाण्या शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.
एक तर पुण्यातील रस्ते लांब रुंद नाहीत .
.. पहिले तर सातारा,बंगलोर कडून मुंबई ला जाणारी वाहने पण पुणे सिटी मधूनच जात.
ट्रॅफिक होण्याचे हे पण एक महत्वाचे कारण आहे.
कात्रज बायपास झाला पण तो पण खूप जाम असतो कारण रस्त्या लगत वाढलेली वस्ती आणि सर्व्हिस रोड चा अभाव .
मुंबई मध्ये वाहतूक थोडीफार सुरळीत असाण्या मागे.
ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेवे ह्याचे मोठे योगदान आहे.
सीएसटी वरून ठाणे हा प्रवास तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेस way वरून खूप कमी वेळात करू शकता
जोडी ला फ्री way आहेच.
असे नियोजन पुण्यात नाही.
सिग्नल विरहित रस्ते , जागो जागी उड्डाण पुल.
खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी करतात

आजच्या लोकसत्तेतून
देशातील बहुतांश मेट्रो मार्ग आजही तोटय़ात आहेत. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ साधू न शकलेल्या मेट्रोच्या सद्य:स्थितीचा हा वेध.

विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यासाठी वेळेत पोहोचावे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यासमवेतचे कार्यकर्ते वनाज स्थानकावरून मेट्रोने महापालिका भवन येथे पोहोचले. त्यानंतर दुचाकीवरून दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ पोहोचले. तेथून ते पायी टिळक पुतळ्याजवळ आले. मिरवणूक सुरू झाल्यावर विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकावर ते पायी गेले आणि तेथून परत मेट्रोने कोथरूडला रवाना झाले.
https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pct23b16324-txt-p...

मेट्रो प्रवासाचे बघता बघता सहा महिने पूर्ण झाले, अगदी नेटाने पूर्ण केले Proud कार अजिबात नाही वापरली ऑफिस करता या सहा महिन्यात. दुचाकी महिन्यातून तीन चार वेळा वापरली असेल, तेवढीच. आता सवय झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. जानेवारीत मेट्रोची फ्रिकवेंसी अजून वाढली आहे, त्यामुळे आता स्टेशन वर फार क्वचित थांबावे लागते. लोक पण गर्दी करत आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. अजून महिन्या / दोन महिन्यात हे दोन्ही मार्ग पूर्ण सुरू करण्यात येणार आहेत. तेंव्हा अजून गर्दी होईल. पार्किंग हा मुद्दा तेंव्हा कळीचा होणार आहे. सकाळी पार्किंग अजिबात मिळत नाही , ह्यावर काहीतरी उपाय काढावा आता. आता मेट्रो कार्ड, तिकीट ई. बऱ्यापैकी सुरळीत झाले आहे. रोज नवखे प्रवासी असतातच, त्यांना observe करण्यात मस्त वेळ जातो विशेषतः आजी आजोबा.. आत आले की आधी एकदम डोळे विस्फारून मेट्रो बघतात , मग जरा संकोचाने अंग चोरुन बसतात , मोठ्या खिडकीतून दिसेल तसे, मान वळवून वळवून पुण बघतात, डोळ्यातले भाव एकदम ' किती छान, आरामदायी आणि भारी आहे ' असे असतात.. मज्जा येते एकदम. ह्या आजी आजोबांना, आपल्या आई वडिलांना आणि अगदी आपल्याला पण असा प्रवास आपल्या देशात करता आला ही गोष्ट नक्कीच सुखावणारी आहे Happy लाँग लिव्ह पुणे मेट्रो..

मी अजून पुणे मेट्रोत नाही बसलो पण चिरंजीव मात्र मित्रांसोबत बऱ्याचदा बसून आलाय.

नदी खालून:
लंडन मेट्रो थेम्स नदीखाली शेकडो फुटावरून जायची तेंव्हा भलतेच थ्रिल वाटायचे. दोनच दिवसांपूर्वी पुणे मेट्रो नदीखालून पहिल्यांदा धावली अशी बातमी वाचली तेंव्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गावर काम सुरू आहे. त्यापैकी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्ग नदीखालून जातो. त्याची यशस्वी चाचणी झाली त्याची ही बातमी:
https://youtu.be/xxbvUny6htA?si=RaK2WabnVEr7hQEU

डिसेंम्बर आणि जानेवारीच्या पुणे भेटीमध्ये आवर्जून मेट्रोने प्रवास केला.

अतिशय सुखद अनुभव होता. शनिवार असल्याने फारशी गर्दी नव्हती. स्थानकावर आणि मेट्रोच्या आत स्वछता वाखाणण्याजोगी होती. मेट्रो वेळेवर येत होती. सर्वत्र मार्गदर्शन करण्यास मेट्रोचे कर्मचारी उपलब्ध आणि उत्सुक होते. अगदी विकसित देशातील मेट्रो मध्ये बसल्यासारखे वाटले.

माझ्या मुलीने मात्र दरवाजे खूपच हळू बंद होतात आणि मेट्रोचा स्पीड खूप कमी आहे असे मत नोंदवले.

परंतु एकंदरीत छान अनुभव होता.

दोन महिने पुण्यात होतो तेव्हा शक्य असेल तेव्हा मेट्रो ने प्रवास केला . डिसेंबर पर्यन्त सरासरी १५ मिनिटात गाडी यायची , जानेवारी पासुन ७.५ मिनिटे आहे. गर्दी वाढल्यास ५ मिनिटात एक करु शकतात. मेट्रो प्रवासाने वेळेची खुप बचत होते. कधी एकदा तिसरी मेट्रो लाईन चालु होते त्याची वाट बघतोय.
मेट्रोचे डबे भारतात बनले आहेत तरी देखिल डब्या ची गुणवत्ता, चांगले सस्पेंशन असल्याने स्मुथ राईड आहे. भारताला मेट्रो डबे निर्यात करायला संधी आहे. कदाचित करतही असतिल.
तिकिट वॉट्सअ‍ॅप वर घेउ शकतो. त्या साठी वेगळे मशिन आहे आणि तिथे लाईन नसते. फक्त याच मशिन वर क्रेडिट कार्ड ने पेमेंट होते. एकाच फोन वर एका पेक्षा जास्त तिकिटे घेउ शकतात. क्रेडिट कार्ड टॅप करुन जायची सोय आजुन झाली नाही. ती झाली तर आजुन वेळ वाचेल. लंडन, सिडनी आणि सिंगापुर मध्ये क्रेडिट कार्ड टॅप करायची सोय आहे.
मेट्रो प्लॅटफॉर्म वरुन निघताना हॉर्न का वाजवतात ते कळले नाही. Happy

मी पण जनरल फिरून आलो या वेळेस. एकदा डेक्कनवरून कोथरूडला यायला रिक्षा शोधावी का विचार करताना अचानक मेट्रो आठवली व उलटा चालत जाउन मेट्रोने आलो Happy दुसर्‍या वेळेस पुन्हा एकदा गेलो. एकदम चांगला अनुभव. जिन्याने जायला बरेच वर आहे पण लिफ्ट आहे (आणि चालू होती) त्यामुळे म्हातारे ई ना काही प्रॉब्लेम नाही.

तेथे ऐकले त्यावरून ज्यांचे रूट्स मेट्रोच्या लाइन्सच्या जवळ आहेत त्यांना प्रचंड फायदा झाला आहे. कोथरूडहून वाडिया कॉलेज जाणे वगैरे फार सोपे झाले आहे.

मध्यंतरी सिमला ऑफीस चौकात अडवून कार किती दिवस चालवता ? रोज का चालवता ? असा सर्व्हे चालू होता. सर्व्हे करणारी मुलं /मुली फारतर वीस बावीसची असतील. पण उद्धट होती. सरकारने तुमच्यासाठीच मेट्रो चालू केली आहे तरी तुम्ही रस्त्यावर कार आणून वाहतुकीत भर का घालता असा प्रश्न एका मुलीने विचारला. मी तिला प्रश्नावली मागितली. तिने दिली नाही.
मग मी तिला प्रश्नांमधे भर सुचवली. कुठून कुठे जाता हा प्रश्न आधी विचारत जा असे सुचवले. दुसरा एक आला आणि म्हणाला "त्याने काय फरक पडतो ?"
मी त्याला माझा रूट सांगितला. रोजचे अंतर सांगितले. घरून निघताना वाट वाकडी करून दुसर्‍या रस्त्याला का जायचे ? आणि उतरल्यावर पुन्हा रस्ता बदलून भलत्याच बाजूला दोन बसेस बदलून जायचे. या रूटवर कुठेही बसायला जागा होत नाही. बस पाठीमागूनच भरून येतात. तासभर जास्तीचा लागतो.
तर तो म्हणाला तुमच्या घरापासून टू व्हीलरने या. गाडी पार्क करा.
"आणि उतरल्यावर ? मेट्रोच्या रूटवर माझे ठिकाण नाही. दोन बस बदलून जावे लागेल. त्याचे काय ?"
" तिथे एक टू व्हीलर ठेवायची"
हे असे लोक सोशल मीडीयात पण मेट्रो आली तरी खासगी गाड्या चालवणार्‍यांना गुन्हेगार समजून भाषणे ठोकत असतात. तेव्हांपासून मेट्रोमुळे किमान काही भागातले ट्रॅफिक कमी होईल असा पॉझिटिव्ह विचार कमी झाला.

किवळे,पुनावळे, हडपसर, सिंहगड रोड, नर्हे, आंबेगाव, कात्रज, सहकारनगर आळंदी रस्ता, भोसरी या भागातल्या लोकांना याच भागात रोजची जा ये करण्यासाठी मेट्रोने जा म्हणणे हास्यास्पद नाही का ? वाट वाकडी करून मेट्रो स्टेशन गाठा, गाडी लावा, जिथ पर्यंत दुसरे स्टेशन आहे तिथपर्यंत जा आणि तिथून पुन्हा वाट वाकडी करा. एव्हढे साधे व्यवहारज्ञान या मंडळींकडे नाही का ?

रघू, हेच बोलायचं होतं.आधीच pmpml चांगल्या वाहत्या असलेल्याच मार्गावर परत मेट्रो आणून लिमिटेड लोकांना खुश करण्यात काय पॉईंट?आणि परदेशातलया सारखे 2 किंवा 3 मेट्रो बदलून इथून तिथे जावे तर इतक्या जणांचे मेट्रो स्टेशन ला पार्किंग करण्याची व्यवस्था चांगली हवी.
कात्रज-हिंजवडी किंवा पुणे स्टेशन-हिंजवडी असे मेट्रो रूट का नाहीत?शिवाजीनगर-हिंजवडी रूट ने नक्की कोणाचा फायदा होणार?जिथे ऑफिसेस मोठ्या प्रमाणावर आहेत अश्या एरियाना पॉईंट टू पॉईंट कनेक्शन करणाऱ्या थेट मेट्रो कधी बनतील?भोसरी/कात्रज/आळंदी हिंजवडी बस ची अक्षरशः तासनतास वाट पाहणाऱ्या लोकांची सोय कधी होणार? असे प्रश्न-डोक्यात येतात.पण 5 वर्षात मेट्रो चं जाळं बनून 2 मेट्रो बदलून या ससर्व ठिकाणी जाता येईल असं सांगून मला घरचे गप्प बसवतात.खरंच असंच होवो.

अमितव, मला वाटतंय ड्रायवर नसावा या ट्रेन्सना. लंडन मेट्रो ड्रायव्हर वाली होती (अजुनही आहे का माहिती नाही), सिंगापूर वाली मात्र बिना ड्रायव्हरची होती. पुणे तशीच असावी.
---

अजून दोन तीन लायनी चालू झाल्या नाहीत तोवर नागरिकांनी मेट्रोतूनच जावे असा सर्वे?

पिंपरी पासून निगडी मेट्रोला तीन वर्षे लागतील. समजा किवळ्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजला सहकारनगर,कात्रज, आंबेगाव इथून जायचे आहे. कसे जायचे ? पिंपरीला पार्किंग नाही. स्वारगेटला मेट्रो आली तरी तिथपर्यंत पोहोचणे सोपे नाही. स्वारगेट सर्वाधिक गजबजलेला भाग आहे. इथे पार्किंगची सुविधाच नाही. उद्या मेट्रोसाठी पार्किंगची व्यवस्था केली तरी अपुरी पडणार आहे.

हिंजवडी मेट्रोला अजून दोन वर्षे लागतील. ती पुढे निगडी पर्यंत नेणार आहेत. त्याला सात ते आठ वर्षे लागतील.
सिंहगड रस्ता ते हडपसर आणि हडपसर ते वाघोली अशी मेट्रो प्रपोज्ड आहे. त्याला पंधरा वर्षे लागणार असे समजले. ते ही पुढे पैसे शिल्लक राहिले तर.

कात्रज ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग बायपास मार्गाशी संलग्न का नाही ?
कात्रजवरून स्वारगेटला जायचे. तिथून पिंपरी. किंवा शिवाजीनगर हिंजवडी चालू झाली आहे असे गृहीत धरले तरी हा द्राविडी प्राणायाम कशाला ?

बायपासला रोज सकाळी ट्रॅफिक जाम लागतो. कात्रज हिंजवडी रूट असता तर या रस्त्यावरचा ताण कमी झाला असता. या रस्त्यावर धडकी बससुविधाही नाही. कार्सची लाईन लागते.

Pages