गेल्या 25 वर्षांमध्ये पुण्याचा विस्तार अतिशय झपाट्याने झाला आहे आणि तो अजूनही होतच आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरांमध्ये येऊ लागलेल्या छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे शहराचा आकार वाढत राहिला आहे. वाढत्या शहरीकरणाचा ताण पुण्यातील उपलब्ध शहरी सार्वजनिक वाहतुकीवर वाढत गेला. हा वाढता ताण ती वाहतूक व्यवस्था पूर्ण करू शकलेली नाही. आजही मागणी आणि सेवेचा पुरवठा यात बरीच तफावत आढळत आहे. मागणी पूर्ण करण्यास सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे रस्त्यावरच्या खासगी वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. त्यातच अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणखीनच मंदावत आहे.
मध्यंतरी पुण्यात बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था सुरू करण्यात आली; पण तिच्या नियोजनातील गोंधळामुळे तीसुद्धा यशस्वी होऊ शकली नाही. आता तर पुण्यातील वाहनांची संख्या पुण्याच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त झालेली आहे. वाढत्या शहरीकरणाला सक्षम सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाची जोड देण्याच्या हेतूने 2009-10 पासून पुण्यात मेट्रो सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला. त्यामध्ये मेट्रो कशी असावी, उन्नत की भूमिगत, गेज काय असावा, रस्ताच्या बाजूने असावी की मधून, डबे कसे असावेत इ. इ. मुद्द्यांवरून सतत फक्त चर्चेतच राहिलेल्या पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर डिसेंबर 2016 मध्ये सुरुवात झाली. मेट्रोची उभारणी हे तसे अवाढव्य काम आहे. पण तरीही 2019 पर्यंत म्हणजे तीनच वर्षांमध्ये पहिल्या दोन मार्गांचे काम पूर्ण करण्याचे अवघड लक्ष्य ठेवले गेले होते. ती कालमर्यादा पाळणे शक्य नाही हे माझ्याही मनाला पटत होतेच. आज पुण्यातील मेट्रो मार्गांची उभारणी पूर्ण होण्याला अजून बराच काळ लागणार असल्याचे सध्या दिसत आहे. कारण गरवारे महाविद्यालयानंतर पुढे नदीपात्रात गेलेल्या मार्गावर अजून दुसऱ्या टप्प्यातीलच काम सुरू आहे. परिणामी डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महानगरपालिका येथील स्थानकांचे कामही प्रथमावस्थेतच आहे. त्यापुढे सत्र न्यायालयाजवळ होत असलेल्या जंक्शनचे कामही बरेच बाकी आहे. तीच अवस्था मंडई, स्वारगेटच्या बाजूलाही दिसते.
शहरांतर्गत चालणारी रेल्वे वाहतूक ‘मेट्रो रेल्वे’ म्हणून ओळखली जाते. ही सेवा जमिनीखाली, जमिनीवर किंवा उन्नत (elevated) अशा कोणत्याही प्रकारे उपलब्ध करून देता येते. ही सेवा सुरक्षित, इंधनाची बचत करणारी, प्रदूषणमुक्त, वेगवान आणि आरामदायक मानली जाते. मेट्रो भूमिगत असेल, तर रस्त्यावरील जागा व्यापली जात नाही, शिवाय उन्नत असेल, तर ती रस्त्यावरील केवळ 2 मीटर रुंद जागा व्यापते. लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक प्रवासाचा कालावधी 50 ते 70 टक्क्यांनी कमी करते. तसेच एका प्रवाशाची एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्यासाठी लोहमार्गावरील वाहतुकीला रस्ता वाहतुकीच्या तुलनेत एक-पंचमांश कमी इंधन लागते. ज्या ठिकाणी पीएचपीडीटी (म्हणजे Peak Hour Peak Direction Traffic) निर्देशांक 20,000 ते 45,000 आहे, तेथे मेट्रोसारखी लोहमार्ग आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर ठरते. कारण मेट्रोद्वारे दर 90 सेकंदाला एक याप्रमाणे सेवा उपलब्ध करून देता येते. रस्त्यावरील वाहतूक 8,000 पेक्षा कमी पीएचपीडीटीला उपयुक्त ठरते. पुण्यातील मेट्रोच्या पहिल्या दोन्ही मार्गांचा पीएचपीडीटी निर्देशांक 2031 पर्यंत 10,000 ते 20,000 दरम्यान राहण्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
सध्या पुण्यात मेट्रोचा 12 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तरीही या मार्गांवरील स्थानकांचं काम अजूनही अपूर्णच असलेलं दिसत आहे. पुण्यात एकूण 3 मेट्रो मार्ग उभारले जात असून त्यांची लांबी 54.58 किलोमीटर असणार आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन ते स्वारगेट (परपल लाईन, लांबी 16.59 किलोमीटर) अशी असून ती खडकीतील रेज हिलपर्यंत उन्नत (elevated) आणि त्यानंतर स्वारगेटपर्यंत भूमिगत असणार आहे. या मार्गावरील फुगेवाडीपर्यंतचा मार्ग 6 मार्चपासून खुला झालेला आहे. दुसरा मार्ग कोथरुडमधील वनाज ते रामवाडी (ॲक्वा लाईन, 14.66 किलोमीटर) असा असणार असून तो पूर्णपणे उन्नत असणार आहे. त्यापैकी वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तिसरा मार्गही पूर्णपणे उन्नत असणार असून त्याची लांबी 23.33 किलोमीटर असणार आहे. तो मार्ग हिंजेवाडीतील राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरू होऊन बालेवाडी मार्गे शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयापर्यंत जाणार आहे. हे तिन्ही मार्ग सत्र न्यायालयाजवळ एकत्र येणार आहेत.
भारतात मेट्रो रेल्वे सेवेचा विकास आणि विस्तार अतिशय संथ गतीने झाला आहे. त्यासाठी पुढील मुद्दे कारणीभूत ठरलेले आहेत.
• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्ट धोरणाचा अभाव
• आवश्यक स्रोतांची कमतरता
• देशातील कायदेशीर व्यवस्था
• मेट्रोसंबंधीच्या तज्ज्ञांची कमतरता
• कार्यक्षम संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव
मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी देशातील अकार्यक्षम संस्थात्मक व्यवस्था हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. मेट्रो रुळांवर आधारित व्यवस्था असली तरी सध्या तिच्या उभारणीसाठी कोणतेही एक मंत्रालय किंवा केंद्रीय संस्था जबाबदार नव्हती. त्यामुळे हे प्रकल्प मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होईपर्यंतच बऱ्याच अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. पण मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याची देशात वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन 2017 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या नव्या मेट्रो रेल्वे धोरणामध्ये देशातील मेट्रो रेल्वे विकासाची जबाबदारी केंद्र सरकारच्या आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोमुळे झालेले फायदे
• शहरातील रस्त्यांवरील सुमारे 3,90,000 दैनिक वाहने कमी झाली.
• शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहराच्या जवळपासची ठिकाणे यांच्यातील प्रवास जलद झाला.
• शहरांतर्गत वाहतुकीतील प्रवासाचा कालावधी 32 मिनिटांनी कमी झाला.
• इंधनाच्या वापरात वार्षिक सुमारे पावणेतीन लाख टनांनी घट झाली.
• दिल्लीच्या हवेतील प्रदुषकांचे वार्षिक प्रमाण पावणेसहा लाख टनांनी घटले.
• दिल्लीतील रस्त्यांवरील गंभीर अपघातांचे प्रमाण वर्षाला 125 ने कमी झाले.
• एकूण रस्ते अपघातांची वार्षिक संख्या 937 ने कमी झाली.
दिल्ली मेट्रो रेल्वे प्रकल्पाची व्यावहारितकता आणि यश लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2009 मध्ये 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या अन्य प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्याला मान्यता दिली. दिल्लीमध्ये मेट्रो सेवा सुरू झाल्यावर तिच्या खात्रीशीर आणि वेगवान सेवेमुळे रस्ता वाहतुकीवर अवलंबून असलेले प्रवासी मेट्रोकडे वळलेले आहेत.
सध्या मेट्रो सेवा उपलब्ध असलेली शहरे
• कोलकाता, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई, जयपूर, नम्मा मेट्रो (बेंगळुरू), तीव्र गती मेट्रो (गुरुग्राम), अहमदाबाद, हैदराबाद, कानपूर, कोची, लखनौ, नोएडा. यातील सर्वच मेट्रो रेल्वे प्रकल्पांची सेवा थोड्या-अधिक प्रमाणात सुरू झालेली आहे. त्याचवेळी त्यांचे विस्तारीकरणही सुरू आहे.
सध्या सेवा सुरू न झालेले, पण उभारणी सुरू असलेले प्रकल्प
• नवी मुंबई, भोज (भोपाळ), इंदूर, पाटणा, आग्रा, सुरत, ठाणे.
मान्यता मिळालेले, पण काम सुरू होण्याच्या स्थितीत असलेले प्रकल्प
• ठाणे, विशाखापट्टणम
लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_17.html
पुणे मेट्रोतून मी केलेल्या पहिल्या प्रवासाचा व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://www.youtube.com/watch?v=JvTZICUysoA
वोक, ग्रीन इकॉनॉमी वगैरे
वोक, ग्रीन इकॉनॉमी वगैरे विचारांनी भारावलेल्या व त्याबद्दलची वस्तुस्थिती पूर्ण माहिती नसलेल्या नवतरूण व नवतरूणींचा अॅरोगन्स एकदम क्यूट असतो. या क्लिप मधल्या लोकांसारखा.
कुठून कुठे जाता हा प्रश्न आधी विचारत जा असे सुचवले >>
रंरा - सर्व्हे करणार्यांना आणखी प्रश्न सुचवणे ही अस्सल पुणेरी क्वालिटी आहे
सध्याचे मेट्रो रूट जरा
सध्याचे मेट्रो रूट जरा निरुपयोगी किंवा सेल्फी मार्गांवर आहेत.त्यातल्या त्यात तो मनपा ला पिंपरी मधून जाणारा बराच उपयोगी वाटतो.शिवाजीनगर हा बहुतांश जनतेला ऑफिस ला जायचा स्टॉप ओव्हर नाही.
ऑफिस वाले पण सोडून देऊ, विद्यार्थ्यांना ताथवडे किंवा परंदवाडी च्या इंदिरा इन्स्टिट्यूटस कॉलेजेस ना जायला उपयोगी पडेल असे काही बनावे.11 वी 12 वी ला असलेले 18 पूर्ण नसतात, त्यांना दुचाकी पण चालवायची नसते.किंवा इतक्या बिझी धोकादायक हायवे ला दुचाकी पण रिसकी.कार घरात सगळ्यांकडे इतक्या नसतात, प्रत्येकाला एक द्यावी अश्या.
अगदी सगळयांना दारात मेट्रो द्या असं म्हणत नाही.पण जे मूळ प्रॉब्लेम वाले रूट आहेत ज्यावर भरपूर येजा होते, बसेस फ्रिक्वेन्सी गर्दीला पुरत नाही, कात्रज हिंजवडी, पुणे स्टेशन हिंजवडी, हिंजवडी ते मनपा,हिंजवडी ते म्हामुरडी या रुट्स साठी मेट्रो किंवा pmpml कश्यात तरी सुधारणा व्हावी.
फारएण्ड
फारएण्ड
मागे एकदा बस डे झाला होता.त्या वेळी ही याच चौकात अडवले होते. थोडे अलिकडे पलिकडे असेल. त्या संस्थेचे नाव लक्षात नाही. त्या संस्थेचे रेडीयम पेंट असलेले जाकीट प्रत्येकाने घातलेले होते. आमच्या भागात बशी नसल्याने मी त्या वेळी सर्व्हेला नकार दिला होता. आता ही अशाच संस्थेचे सर्वेक्षण होते. जनजागृती अभियान होते बहुतेक.
गदी सगळयांना दारात मेट्रो
गदी सगळयांना दारात मेट्रो द्या असं म्हणत नाही.पण जे मूळ प्रॉब्लेम वाले रूट आहेत ज्यावर भरपूर येजा होते, बसेस फ्रिक्वेन्सी गर्दीला पुरत नाही, कात्रज हिंजवडी, पुणे स्टेशन हिंजवडी, हिंजवडी ते मनपा,हिंजवडी ते म्हामुरडी या रुट्स साठी मेट्रो किंवा pmpml कश्यात तरी सुधारणा व्हावी.>> हा कस्टमर फीड बॅक मेट्रो प्लानिन्ग संस्थेला का देत नाही. त्यांना ही इन्फ्रा प्लानिन्ग मध्ये तुमच्या व्हॅलुड इनपुट ची मदत होईल. हिंजवडीला जं क्षन बनवून मार्ग रेडिएटिन्ग सारखे फिरवता येतील. बस व मेट्रो एक मेकांना पूरक मार्ग बनविता येतील. पुणे शहराच्या वाढत्या गरजांच्या प्लानिन्ग साठी तुम ची मते व्हॅलुएबल आहेत.
मी मट्रो येण्याच्या आधी प्रा
मी मट्रो येण्याच्या आधी प्रा विकास मठकरी यांना इनपुट दिले होते. सकाळ ने बस डेच्या वेळी प्रचंड डेटा गोळा केला होता.
मुळात मेट्रो चालू करताना भव्य काम चालू केल्याचा देखावा महत्वाचा होता. सोय होणे हे सेकंडरी आहे. मेट्रो धावू लागली आहे हे दिसणे महत्वाचे. पुढच्या फेजेस कदाचित होणार नाहीत असे मला चौकशी करताना समजले. १९८५ सालापासून जो अंतर्गत रिंग रूट होता तो झालाच नाही. त्यानंतर त्याला पॅरलल पण मोठा रिंग रोड १९९९ पासून गाजतोय तो अद्याप झालेला नाही. आता तर खेड शिवापूर पासून रिंग रोडचे नियोजन आहे.
जो मूळचा रिंग रोड होता (छोटे वर्तुळ) तिथे आता फुलराणी पेक्षा किंचित ऐसपैस लाईट रेल येणार आहे. तिला जागाही कमी लागणार आहे. हा प्रस्ताव १९८५ चा होता.
या गतीने मेट्रोचे उर्वरीत रूट कधी येतील ?
अनु तुमच्या पोस्ट वाचुन मी १२
अनु तुमच्या पोस्ट वाचुन मी १२ वर्षांपूर्वी नक्की पुण्यातच रहायचो ना प्रश्न पडण्याइतकं पुणं बदललेल आहे.
पोटतिडकीने लिहित आहात अर्थात. प्लॅनिंग वाल्यांना कळवा. कमितकमी वाचकांच्या पत्रव्यवहारात तरी लिहा.
>>सर्व्हे करणार्यांना आणखी प्रश्न सुचवणे ही अस्सल पुणेरी क्वालिटी आहे>>
रंगीत राघू, हिंजवडी ते शिवाजी
रंगीत राघू, हिंजवडी ते शिवाजी नगर हे काम जोरात चालू आहे. पीसीएमसी ते निगडी ह्याला परवानगी मिळाली आहे. दिवाणी न्यायालय ते स्वारगेट ह्याची कालच चाचणी झाली. नक्की कोणत्या पुढच्या फेसेस येणार नाहीत? Katrj ते हिंजवडी मार्ग मात्र पाहिजे तेच नाशिक फाटा ते चाकण. हळू हळू पुणे मेट्रो आपले जाळे पसरेल.
आजच दिवाणी न्यायालय ते पुणे स्टेशन मला उभे राहून प्रवास करावा लागला, म्हणजेच भरपूर लोक प्रवास करत आहेत. प्लॅनिंग एव्हढे ही काही खराब नाही. पण सुधारणेला वाव आहे.
हो खरंच, इनपुटस द्यायला हवेत.
हो खरंच, इनपुटस द्यायला हवेत.

आमच्या लोकल नगर सेवकांना 324 नंबर ची फ्रिक्वेन्सी वाढवा सांगितलं होतं ते मतं मागायला आले तेव्हा, पण आगारात बसेस जास्त नाहीत म्हणाले
आता मेट्रोवाले 'इतके लांबचे रस्ते बनवायला निधी नाही' म्हणतील.
अमितव, विधान कळले नाही, 5 मार्कांचे संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या.
मला १२-१५ वर्षांपूर्वी हे भाग
मला १२-१५ वर्षांपूर्वी हे भाग इतके वाढलेले/ गजबजलेले आठवतच नाहीत. आता तिकडे इतकी गर्दी असेल तर पुर्वीचं पुणं... इत्यादि इत्यादि.
बाकी प्लॅनिंग करताना भविष्यात कुठे किती बांधकाम होणार/ आपण परवानग्या देणार तशी मेट्रो सुविधा दिली पाहिजे.
आपण काही सांगुन राजकारणी ऐकतील ही अपेक्षा जर फोल निघाली (नको निघो) तर पुणेकर वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहितात म्हणून म्हटलं तिकडे तरी लिहुन पुणेरीपण सिद्ध करा.
राचां, आजचे प्रतिसाद पुन्हा
राचां, आजचे प्रतिसाद पुन्हा वाचा.
शि. नगर हिंजवडी काम बंद आहे असे मी म्हटलेले दाखवा. असा समज करून घेऊन प्रतिसाद दिल्याने तुमचाही बहुमूल्य वेळ वाया जात असेल.
अमित, हो पुणं खूप विस्तारलं
अमित, हो पुणं खूप विस्तारलं आहे.रावेत पुनवळे बाजू, बालेवाडी ची ऑर्किड हॉटेल मागची बाजू, शिवणे, हडपसर कडे मांजरी बाजू, उंदरी बाजू(या दोन्ही एकमेकांच्या जवळ नाहीत बरं), मोशी, चिखली इथे बऱ्याच नव्या सोसायटी झाल्या आहेत.शाळा आहेत.
इन्फ्रा बरेच ओके आहे अजून खूप जास्त आडव्या तिडव्या वस्ती किंवा गजबज चालू न झाल्याने.pcmc एरिया ने उद्याने पण चांगली बनवली आहेत.
जगताप डेअरी/नाशिक फाटा ते चाकण आला तर बेस्ट.खूप जण चाकण च्या प्लान्टस मध्ये ये जा करतात.
>> कात्रज हिंजवडी, पुणे
>> कात्रज हिंजवडी, पुणे स्टेशन हिंजवडी, हिंजवडी ते मनपा,हिंजवडी ते म्हामुरडी या रुट्स साठी मेट्रो किंवा pmpml कश्यात तरी सुधारणा व्हावी.
+१११ आणि यातल्या कोणत्याची मार्गावर मेट्रोची सुरवात झालेली नाही. किंवा अद्यापही तिथे मेट्रो धावत नाही. मला नाही वाटत कि प्लानिंग अभावी हे झाले असेल. कारण कात्रज, स्वारगेट, हिंजवडी, स्टेशन, विमानतळ हि पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. "इथे नाही पब्लिक ट्रान्सपोर्ट तर मग कुठे?" असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा डेटा त्यांच्याकडे अर्थातच असेल.
पण इंग्लंड, फ्रांस, सिंगापोर किंवा अन्य जिथे जिथे मेट्रो आहे तिथला पॅटर्न पाहता, शहरांचे वर्तुळाकार झोन बनवलेले दिसतात. आणि मग त्या वर्तुळांच्या केंद्रापासून पासून परीघापर्यंत विविध दिशांनी आधी. आणि मग प्रगती होईल तसतसे त्या प्रत्येक वर्तुळाच्या परिघावरून. असा काहीसा पॅटर्न दिसतो.
त्यानुसार यांनी सिव्हील कोर्ट हा मध्यबिंदू निवडलेला दिसतोय. इथे खाली ऑगस्ट २०२३ मध्ये इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध झालेला आराखडा दिसत आहे. सगळीकडून बाहेरून गाड्या कोर्टात येणार (मेट्रो मध्ये तक्रार नाय पायजेल. नायतर थेट कोर्टात
)

म्हणून कोर्ट आधी पूर्ण झाले. म्हणजे वरच्यापैकी एक स्वारगेट सोडले तर बाकी सगळी ठिकाणं उशिरा डेवलप होणार असा अर्थ.
हिंजवडी ते भोसरी व्हाया निगडी
हिंजवडी ते भोसरी व्हाया निगडी
आणि भोसरी ते चाकण असाही मेट्रो मार्ग हवा
निगडी ते वाघोली व्हाया एअर पोर्ट असाही मार्ग हवाय
राघू,तुम्ही पुढच्या फेज येणार
राघू,तुम्ही पुढच्या फेज येणार नाहीत अशी माहिती तुम्हाला चौकशीत मिळाली म्हणून तुम्हाला विचारलं होत की नक्की कोणत्या न येणाऱ्या लाईन्स आहेत. हिंजवडी ते शिवाजी नगर ह्याचे काम मी कालच बघितले म्हणून टाकलय. तुम्ही काम बंद आहे आस म्हणत आहत आस मी म्हणत नाही.
पुन्हा प्रतिसाद वाचा हेच
पुन्हा प्रतिसाद वाचा हेच सांगेन.
पुढच्या फेजेस कदाचित होणार
पुढच्या फेजेस कदाचित होणार नाहीत असे मला चौकशी करताना समजले
ह्याच उत्तर परत प्रतिसाद वाचा हेच असेल तर तुमचाही बहुमूल्य वेळ वाचवा.
हो. तेच उत्तर आहे. प्रश्न
हो. तेच उत्तर आहे. प्रश्न कायम असेल तर उत्तर तेच असेल.
तुम्ही कामकाज करत असाल तर तुमचा वेळ बहुमूल्य असेल.
अतुल, स्वयंचलित असल्या तर मग
अतुल, स्वयंचलित असल्या तर मग एकदम फ्युचरिस्टिकच होतील.
अमेरिकेत/ कॅनडात दर दोन/ तीन डब्यांमागे एक ड्रायव्हर (अटेंडंट) असे बघितले आहेत. एअरपोर्टवर प्लॅटफॉर्मवरला पण दार असतं, त्यामुळे तिकडे तसा अपघाताचा प्रश्न कमी असेल. तसेच शहरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ते करत असावे. नक्की माहित नाही.
मुंबईच्या मेट्रोत ड्रायव्हर असतो असं आठवतं.
अनु, पुणे स्टेशन ते हिंजवडी
अनु, पुणे स्टेशन ते हिंजवडी मेट्रो होणार आहे की दोन वर्षात. हिंजवडी- स्वारगेट पण होणार आहे तेंव्हाच. कात्रज आणि निगडी का केली नाही हे त्यांनाच माहीत. लोकांनी प्लॅन आला तेंव्हा पण खूप आरडाओरडा केला होता पण नाही झाले. आमच्या इथे तर लोकांनी अगदी मानवी साखळी सुद्धा केली होती pcmc ते निगडी मेट्रो हवी म्हणून काम सुरू होण्याआधी पण नाही केले ह्यांनी, आता उपरती झाली आणि ata करत आहेत, तसेच कात्रज पण होईल नक्कीच. मामुर्डी, गहुंजे ह्या गावांची रस्त्यांची बजेट अताशी पास होत आहेत. इतक्यात मेट्रो कशी धावेल तिथे? किवळे ते औंध (ह्यात रावेत, पूनावळे, ताथवडे कव्हर होतात) हा पुण्यातला उत्तम बी अर टी मार्ग आहे, कदाचित असाच अपेक्षित असावा जेंव्हा brt cha घोळ घातला तेंव्हा. बस frequency पण वीस मिनिटांनी आहे ( पुण्यात ही खूपच झाली). हा पूर्ण प्रवास अतिशय वेगवान प्रवास आहे. कुठेही इतर वाहने मध्ये येत नाहीत. एकदा अनुभव म्हणून तरी नक्की प्रवास करा. यू सर्कल ते मुकाई चौक असा प्रवास करून बघा. मेट्रो यावीच, पण सध्या तरी अगदीच बिकट परिस्थिती आहे असे नाही. बसेस अजून वाढवल्या तर सध्या इथे मेट्रो नाही लागणार. पुण्यात उंद्री ते पुणे स्टेशन बस नाहीये अजून..हे अगदी खरे आहे. ऑफिस रिसेप्शन सकाळी सहा/ साडे सहाला घर सोडते आणि इथे बंड गार्डन रोडला आठ -साडे आठला येते उंड्री हून तीन बस बदलून. रोज लंच टाईम ला पी एम टी ऑफिस ला फोन करून एकतरी बस सोडा म्हणून विनंती करते. ही अशी परिस्थिती आहे सार्वजनिक वाहतुकीची पुण्यात. अशा वेळी लगेच मेट्रो कशी सुरु होईल इकडे?वनाज ते नरहे / कात्रज आणि भोसरी ते वाकड फाटा आणि पुणे स्टेशन ते मांजरी / हडपसर अशी मेट्रो बऱ्याच लोकांची सोय करेल. आता पींची पबलिक पण आम्हाला हिंजवडी मेट्रोचा शून्य उपयोग आहे म्हणून ओरडत आहे. भोसरी- वाकड ब्रीज (हा सध्याच्या मेट्रोला आहे थांबा) मेट्रो आली तर सोय होईल. पण हे सगळेच चालू मेट्रोला कसा प्रतिसाद मिळतो त्यावर अवलंबून राहील.
चांगली माहिती लंपन
चांगली माहिती लंपन
मुकाई चौक किवळे ते मनपा brt रूट ने प्रवास केलेला आहे काही वेळा.तो रूट बराच बिन अडथळा आहे चांगला.
मुख्यत्वे मगरपट्रटा, खराडी,
मुख्यत्वे मगरपट्रटा, खराडी, हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड एमआयडीसी अशा भागात शहरातून रोज नोकरीसाठी जाणाऱ्या नोकरदारांना डोळ्यासमोर ठेवूनच मेट्रो प्लॅनिंग व्हायला हवं होतं. पण पहिली मेट्रो वनाझ पासून सुरू करून सुरवातीलाच फोकस कसा हललेला आहे, हे सिद्ध झालंय. बाकी नवनवीन रुट कालांतराने सुरू होतीलही पण तोपर्यंत रोज तासन् तास ट्रॅफिक मध्ये अडकणाऱ्या मंडळींचे हाल आहेतच.
मेट्रो प्लॅटफॉर्म वरुन
मेट्रो प्लॅटफॉर्म वरुन निघताना हॉर्न का वाजवतात ते कळले नाही.## दरवाजे बंद होतात ना, ते सूचित करण्याकरता असेल. अर्थात दरवाजे बंद होताना अलार्म वाजतोच म्हणा
दरवाजे बंद होण्याआधी वाजवतात
दरवाजे बंद होण्याआधी वाजवतात की नंतर?
दरवाजे बंद होण्याआधी वाजवतात
दरवाजे बंद होण्याआधी वाजवतात की नंतर? >> चालु करयच्या आधी चालक वाजवतो . पिंपरी ते सिविल कोर्ट मेट्रो लाईन वर.
पुणे स्टेशन ते हिंजवडी मेट्रो चालु झाल्यास pcmc मधील लोकाना पिंपरी ते सिविल कोर्ट आणि तेथुन हिंजवडी मेट्रोने गेल्यास वेळ वाचेल. पावसाळयात तर नक्कीच .
मुकाई चौक ते कात्रज अशी बस
मुकाई चौक ते कात्रज अशी बस सुद्धा आहे पण तासातासाने. दुपारी फिक्वेन्सी आणखी कमी आहे.
तुमच्या पुण्यात लोक चर्चाच
तुमच्या पुण्यात लोक चर्चाच खूप करतात, असं गडकरी म्हणले होते, ते तसं बरोबरच आहे. पुण्याला पुढारी जरा प्रमाणाबाहेरच आहेत याबद्दल चर्चा मात्र कुणी करत नाही. अख्खा माराष्ट्र पुण्याच्या लोकांनी काय उद्योग केले, पुण्याच्या पुढार्यांनी कसकशी बंडे केली, आणि पुण्याची हवा आता कशी वाईट आहे- हे सारं बघत टीव्हीसमोर सरसावून बसलेला असतो.
२००८ पासून मेट्रोची चर्चा आहे. आता एक्झिक्युट झालेला प्लॅन खरंतर त्यावेळचा आहे, असं म्हणायला पाहिजे. १५ वर्षांत पुणं हसू येईल इतकं मॅडागत वाढलं. आता आणखी २-३ महापालिका येऊन घातल्यात म्हणे. दोष कुणाला देणार? एक काळ असा होता की गल्लीछाप पुढारी सुद्धा 'दारात मेट्रो आणीन' असं आश्वासन देत होता. आताही खडकवासला ते हडपसर, कात्रज ते हिंजवडी, वाघोली ते चांदणी चौक, नाशिक फाटा ते चाकण असे अनेक डीपी प्रपोज्ड आहेत.
पिंपरी ते निगडी हे एक्स्टेंशन तसं सरळच आहे, पण तरी वेळ लागला. स्वारगेट ते कात्रज सरळ आहे असं कुणी म्हणत असेल तर आमच्या पुढार्यांना विचारा. या ५-६ किमीच्या सरळसोट रस्त्यात मेट्रोत नक्की कोणती स्टेशनं कोणत्या मार्गाने घ्यायची यावर चर्चा तब्बल काही वर्षं, प्ल्स कोविडची २ वर्षं चालू होती, आताशी त्याला मान्यता मिळालीय. पण त्यानंतरही मधलं एक- म्हणजे बालाजीनगर की धनकवडी नावाचं स्तेशन झालंच पायजे म्हणून एकांनी बाह्या सरसावल्यात. आता बोला. पण तरीही या महिन्यात बहुतेक साहेबांच्या हस्ते भूमीपूजनही होईल. त्याचवेळेला पिंपरी-निगडीचं, नवीन एअरपोर्ट टर्मिनलचं, रुबी-रामवाडी मेट्रोचंही होईल असं वाटतंय.
मेट्रो फीडर सेवेचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मेट्रोतनं उतरून कमीतकमी बोंबलत गंतव्य स्थानापत्तूर कसं जाता येईल, त्याची व्यवस्था. आता हे असलं काही अस्तं, हेच लोकांना माहिती नव्हतं. खूप लोक वाढले म्हणून असं झालं. आज बातमी आहे, की नाना फडणवीसांनी या फीडर सेवेसाठी 'स्कायबस' प्लॅन केली आहे. होईल सारं नीट. प्रवासी संख्या आणि रस्त्यांवरच्या वाहतुकीचा अभ्यास करूनच त्यांनी अमुक मार्ग आधी सुरू केलेत. उरलेले हळुहळु होतील. पॉझिटिव राहण्याशिवाय इतर काही पर्याय असेल तर मला सांगा.
सध्या लोक विचारताहेत की इतक्या लाख रुपयांची मेट्रो आणून रस्ते बघताय का? जैसे थे, आय मीन बंपर टू बंपर.
तर असं आहे, की वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? मेट्रो असो वा नसो, आपापल्या वाट्याचं ट्रॅफिक उदाहरणार्थ कमी वा जास्त करता येत नस्तं. ते आपल्या नजिकच्या किंवा दूरच्या भविष्यात आपोआपच वाढून ठेवलेलं असतं. तुम्हाला ट्रॅफिकजॅममध्ये चिंतन करता येतं. त्यामुळे ट्रॅफिकने आपल्याला जखडून बांधून घालावं अशी कशाला भिती बाळगायची. आपण स्वतःहूनच तिच्या खुंट्याशी गाय बनून जवळ जाऊन उभं राहायचं.
Submitted by साजिरा on 10
Submitted by साजिरा on 10 February, 2024 - 00:47 >>> सध्या लोक विचारताहेत की इतक्या लाख रुपयांची मेट्रो आणून रस्ते बघताय का? जैसे थे, आय मीन बंपर टू बंपर.
https://marathi.abplive.com/news/pune/pune-news-pune-metro-news-pune-tra...
जर खरोखरच उत्कर्ष साधायचा
जर खरोखरच उत्कर्ष साधायचा असेल तर आयोजकांनी मेट्रो रिस्पॉन्स कडे न बघता पुढच्या सर्व फेज प्लॅन कराव्या, ते असं करत असतीलच. जेव्हा मोठ्या अंतराला मेट्रो चे जाळे तयार होईल तेव्हा जनतेकडून वापर नक्की होणार. आता मला पिंपरी ते भोसरी किंवा कासारवाडी शिवाजीनगर किंवा डेक्कन ते पौड फाटा कोणत्याही रूट च्या मध्ये उपयोगी पडत नाही, नाहीतर मीही (ड्रायव्हिंग चा कंटाळा असल्याने) वापर केलाच असता.
अनु, परवा एकदम लक्षात आले
अनु, परवा एकदम लक्षात आले नाही.. किवळे - भक्ती शक्ती रोड होत आहे ना पाच / सहा किमी आहे (प्राधिकरण मधल्या मूक बधिर शाळेच्या पुढे)... सात आठ वर्षे झाली, अजून पूर्ण नाही झाला, पण होणार आहे म्हणे थोड्याच दिवसात. एकदम भारी आहे हा मार्ग प्रशस्त पण आहे. अगदी दहा मिनिटाच्या आत भक्ती शक्तीला / नियोजित मेट्रो स्टेशनला पोचता येईल हा रोड झाला की किवळेहून. म्हणजे किवळे/ मामुर्डी पबलीक पण वापरू शकेल मेट्रो. आधीच भक्ती शक्ती आणली अस्ती मेट्रो तर किती फायदा झाला असता. असो अक्कल आली हे ही नसे थोडके.
मला पिंपरी ते भोसरी किंवा
मला पिंपरी ते भोसरी किंवा कासारवाडी शिवाजीनगर किंवा डेक्कन ते पौड फाटा कोणत्याही रूट च्या मध्ये उपयोगी पडत नाही, नाहीतर मीही (ड्रायव्हिंग चा कंटाळा असल्याने) वापर केलाच असता >> हे समजले नाही. पिं सौ मधून भोसरी किंवा कासारवाडी मेट्रो स्टेशन दहा मिनिट अंतरावर आहे. डेक्कन ला किंवा शिवाजीनगर किंवा गावात किंवा कोथरूड किंवा अगदी विमाननगर जायचं असेल तर आहे की सोयीस्कर मेट्रो. हलली पीं सौ जनता असते मेट्रोला आणि भोसरीला किंवा कासारवाडी ला उतरते.
Pages