मराठी भाषा गौरव दिवस २०२२: घोषणा (उपक्रम २५ फेब्रुवारी ते २ मार्च)

Submitted by संयोजक-मभादि on 19 February, 2022 - 11:37

नमस्कार मंडळी!

आपल्या कवी आणि साहित्यिकांच्या दिमाखदार कृतींनी बहरलेल्या मायबोली मराठीच्या मायेपोटी आपण कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा करतो. ह्या वर्षी ह्या सोहळ्यासाठी नव्या दमाने पुन्हा सज्ज होऊया! आपल्या मायबोलीचा हा उत्सव यंदा २५ फेब्रुवारी ते १ मार्च ह्या काळात विविध उपक्रमांसह उत्साहाने साजरा करूया! ( लेख आणि अभिवाचनासाठी मुदत २ मार्चपर्यंत वाढवली आहे).

IMG-20220219-WA0006.jpg

मराठी मनाच्या गाभार्‍यात ज्यांच्या गाण्याचा सुगंध सदैव दरवळत असतो, अश्या पंडित भीमसेन जोशी, शांताबाई शेळके, वसंत बापट ह्यांची जन्मशताब्दी ह्या वर्षी आहे किंवा नुकतीच संपली आहे. त्याचबरोबर आपणा सर्वांच्या आवडत्या गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांनाही श्रद्धांजली वाहण्याची इच्छा आहे. हे सर्व पूर्वघोषित आणि ऐनवेळेच्या उपक्रमांमधून योजण्याचा संयोजक मंडळाचा मानस आहे. शब्द आणि त्यांचे अर्थ ह्यांच्या भावसाधनेतूनच ह्या कलाकारांची कला आपणापर्यंत पोहोचते. ह्या शब्दरूपी आणि अर्थरूपी अलंकारांचाही उत्सव आपल्या उपक्रमांमधून साजरा होणार आहे. आपल्याला हे सर्व शब्दांचे धन लहानपणी कुणीतरी मुक्तहस्ते देऊ केलेले असते. त्यांच्यामुळेच आपण थोडेतरी मिरवू शकतो. अश्या ह्या शिक्षकांचे किंवा व्यक्तींचे आपण ऋणी असतो. अश्या व्यक्तींच्या आठवणींना लेखातून उतरवण्याची मजाही आपण मराठी भाषा दिनाच्या उपक्रमात ह्या वर्षी घेणार आहोत. इतिहासाचा हा धांडोळा घेत असताना मराठीच्या भावी पिढीलाही आपण विसरून चालणार नाही. त्या बच्चेकंपनीसाठी आपण अक्षरे आणि चित्रकला ह्यांचा अनोखा मेळ घेऊन आलो आहोत.

मराठी भाषा दिन २०२२च्या पूर्वघोषित उपक्रमांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढील दुव्यांवर टिचकी मारा.

(१) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - सरस्वतीची चिरंजीव मुले
https://www.maayboli.com/node/81118

(२) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई
https://www.maayboli.com/node/81119

(३) मराठी भाषा दिवस २०२२ - बालचित्रकारांसाठी उपक्रम - अक्षरचित्रे
https://www.maayboli.com/node/81120

(४) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
https://www.maayboli.com/node/81146

ह्याशिवाय आधी म्हटल्याप्रमाणे ऐनवेळचे उपक्रम आणि खेळ आम्ही त्या त्या दिवशी घेऊन येणारच आहोत. त्यांचे दुवे खालीलप्रमाणे:

(५) मराठी भाषा दिवस २०२२ - खेळ: भाषेचे अलंकार
२५ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अनुप्रास' - https://www.maayboli.com/node/81163
२६ फेब्रुवारी - आजचे अलंकार 'उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक' - https://www.maayboli.com/node/81173
२७ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'यमक' - https://www.maayboli.com/node/81181
२८ फेब्रुवारी - आजचा अलंकार 'अतिशयोक्ती' - https://www.maayboli.com/node/81190
१ मार्च - आजचा अलंकार 'श्लेष' - https://www.maayboli.com/node/81199

(६) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - शब्दांचा झब्बू
https://www.maayboli.com/node/81164

(७) मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या
https://www.maayboli.com/node/81168

तर मंडळी! उचला आपापले लेखण्या-कुंचले, आणि होऊ द्या मायमराठीचा जल्लोष!

ता. क. : विशेष सूचना
सोहळ्यादरम्यान आलेल्या सूचनेनुसार २७ फेब्रुवारी हा 'मराठी भाषा दिवस' नसून 'मराठी भाषा गौरव दिन' असल्याचे लक्षात आले. ते लक्षात आणून दिल्याबद्दल चीकू यांचे आभार. तूर्तास हा सोहळा समाप्तीच्या जवळ येऊन ठेपल्याने सर्वच धाग्यांचे आणि ग्रुपचे नामकरण बदलणे किचकट आहे. तरीही ही अनवधानाने राहून गेलेली चूक मान्य करून एक प्रातिनिधिक बदल म्हणून मूळ घोषणेचे शीर्षक बदलून त्यात 'मराठी भाषा गौरव दिवस' हे शब्द वापरत आहोत.

मायबोलीवर आणि अन्यत्रही अनेक ठिकाणी गेली अनेक वर्षे २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला गेला. परंतु खाली दिलेले संदर्भ चीकू यांच्या मतास पुष्टी देतात. त्यामुळे पुढील वर्षापासून हा दिवस मायबोलीवर 'मराठी भाषा गौरव दिन' या नावाने साजरा व्हावा अशी विनंतीवजा सूचना आम्ही करत आहोत.

संदर्भ -
https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/...
https://www.esakal.com/citizen-journalism/sadanad-kadam-writes-about-mar...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न करतो. एक लेख खूप दिवसांपासून पूर्ण करायचा प्रयत्न करत होतो. पण मुहूर्त लागला नाही. थेट ध्वनीमुद्रित करून पाठवला तर स्विकारला ना? लिखित स्वरूपात नंतर पोस्ट करीन.

अभिवाचनाचा प्रचहंड फायदा झाला/होतो आहे. स्वतःमध्ये काय सुधारणा करायची ते कळलेले आहे. आवाजात, खूप स्पाईक्स आणि ओसिलेशन (लंबकी हेलकावे) आहेत, आणि ते मॉड्युलेट करण्याचा एक तो मार्ग म्हणजे 'मेडिटेशन' आहे.
स्वतःबद्दल एक नवी माहीती कळली. Happy

संयोजक महोदय.
मी ध्वनीमुद्रण केले आहे. त्यासोबत दोन ओळी गाताना एका कराओके ट्रॅकची मदत घेतलेली आहे. कदाचित अकरा मिनिटांचे होईल एकूण. ईंमेल मधून पाठवण्यासाठी फाईल साईझचे बंधन आहे का ? वर दिलेले चित्र कसे बनवायचे आहे ? कि तुमच्याकडे टेम्लेट आहे ? ध्वनीमुद्रण पण एमपी ४ मधे पाठवायचे कि एमपी ३ पण चालेल ?
कृपया कळवावे. जरा घाईतच केले आहे. तांत्रिक दोष दुरूस्त करायला वेळ नाही. उत्तराच्या प्रतिक्षेत.

शांत माणूस, कराओके प्रताधिकारमुक्त आहे ह्याची खात्री करा. अकरा मिनिटे चालायला हरकत नाही, पण त्याहून लांब नको. तेवढी वेळ पाळली, की फाईल साईझ आपोआपच मर्यादेत राहते. चित्र संयोजकांकडून बनवले जाईल. ध्वनीमुद्रण mp4 मध्ये असल्यास बरे.

>>>>>उत्तराच्या प्रतिक्षेत.
ओ शांमदा, किती वेळ प्रतीक्षा करायला लावणार? आमची उत्सुकता ताणली गेलेली आहे. चला पाठवा बिगीबिगी. पाहीलं नाहीत का एक ध्वनीमुद्रण १८ मिनिटाचे आहे. संयोजक खूप फ्लेक्झिबल आहेत. त्याबद्दल पुनश्च धन्यवाद.

कामात होतो. आत्ता करतोय पूर्ण. केव्हढी लगबग झाली. Lol
इनशॉट मधे बनवली फाईल. मोबाईल मधे ती सेव्ह झाली. पाठवायच्या वेळी सापडेचना. Lol त्यात बराच वेळ गेला.
केली एकदाची सेन्ड फाईल तुमच्या ईमेल आयडीला. बघा बरं मिळालीये का ? २४ एमबी साईझ झाली आहे.
(कराओके फ्रीवेअर आहे. कुणीही वापर करू शकते त्याचा. परवानगीची आवश्यकता नाही. एक छोटा तुकडाच घेतला आहे).

बर्‍याचशा बाबी राहून गेलेल्या आहेत. काही चुकाही झाल्या आहेत. दुरूस्त करायला वेळ नाही. पुढच्या वेळेसाठी (जर असा उपक्रम पुन्हा राबवला गेला तर आणि आयडी राहिला तर Lol ) छानपैकी वाद्यांचे तुकडे ध्वनीमुद्रित करून पार्श्वसंगीतासाठी वापर करता येईल. इको कमी करायचा होता. त्यामुळे वाक्यांचे शेवट दबले गेलेत. देखेंगे ! Happy

शान्त माणूस, तुमची इमेल मिळाली आहे. परंतु लेख/कथा आधी प्रकाशित होणे आवश्यक आहे. आपण आपली कथा प्रकाशित करण्यासाठी अजून १-२ दिवस घेतले तरी हरकत नाही. ती कथा प्रकाशित झाल्यावर अभिवाचन ध्वनिमुद्रण प्रकाशित करू.

ओह ! सध्या खूप गडबडीत आहे. कथा लिहायला वेळ लागेल. आपण घेतलेल्या मेहनतीबद्दल मनःपूर्वक आभार.
( मला लेख लिहायला खूप वेळ लागतो, अपूर्ण राहतात. हा लेख थेट अभिवाचन करतो असे इथेच कळवलेले होते. बघूयात आता कसे काय जमवता येईल ते. एक दोन दिवसात अवघड वाटते).

स्वाती, तुझे खूप आभार. पण आज आपला संपर्क झाल्यावर दिवस अचानक भयंकर धावपळीचा गेला व आता फार दमले आणि मुदतही संपत आली त्यामुळे ही कथा पुढील अभिवाचन उपक्रमात राखून ठेवते.
संयोजक, माझ्या कथेचं काही करता आलं का शेवटी?

संयोजक-मभादि

अभिवाचनासाठी दिलेल्या प्रवेशिकेसाठी हा लेख पूर्ण करून प्रकाशित केला आहे.
https://www.maayboli.com/node/81224
( या निमित्ताने झाला पूर्ण )

मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाल्याची घोषणा आता आम्ही करत आहोत. ज्यांनी पाठवलेली अभिवाचने अजून प्रकाशित होणे बाकी आहे, ती हळूहळू तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यावर प्रकाशित होतीलच. Happy

चांगले उपक्रम, नियोजन व सहकार्य यांच्यामुळे म. भा. गौ. दिवस छान साजरा झाला. संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि आभार.

पोस्टपार्टम सारखं, पोस्ट मभादि थकवा येणार आहे. कारण खूप उत्सवी वातावरण होतं. एकदम शांतता होइल आता!!

Pages