मराठी भाषेत अनेक बोलीभाषा अंतर्भूत झाल्या आहेत. अनेक रंगांनी नटलेली गोधडीच जणू! त्यामुळे मराठीमध्ये कितीतरी गोष्टींना, शब्दांना "आमच्या भागात हे असं म्हणतात" असं म्हणून झटक्यात प्रतिशब्द सांगता येतात. गोधडीलाच कुठे कोणी 'वाकळ' म्हणेल, कोणी 'लेपटं' म्हणेल, कोणी आणखी काही म्हणेल. कधीकधी हे शब्द अर्थाला अगदी सारखे नसतीलही, पण एकाच शब्दाच्या किंवा अर्थाच्या अनेक छटा, आणि त्याचबरोबर आपल्या मराठीच्या अंगची समृद्धी ते आपल्याला दाखवून जातात. ह्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ह्या उपक्रमात आपल्याला असे प्रतिशब्द किंवा सारख्या अर्थाचे शब्द देण्याचा खेळ खेळायचा आहे. आपण फोटोंचा झब्बू मायबोलीवर अनेक वेळा खेळतो, तसाच हा शब्दांचा झब्बू! संयोजक आपल्याला शब्द देतील, तो मिळाला, की त्याला अजून कायकाय म्हणता येईल, ते लिहा. त्या शब्दाचा अर्थ, मूळ शब्दाशी असलेलं नातं, अर्थछटेतील फरक, त्या अनुषंगाने काही माहिती असेल, तर ते सगळं लिहिलंत तर सोन्याहून पिवळं! गंमतीशीर किंवा माहितीपूर्ण वाक्यात शब्दप्रयोग केलात, तर अजून मजा येईल.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच शब्द टाकावा, जेणेकरून सार्यांनाच खेळात मजा येईल.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - गोधडी
झब्बू १- घोंगडी,
झब्बू २ - कांबळं,
झब्बू ३ - वाकळ,
झब्बू ४ - लपेटं,
...
इत्यादी.
उदाहरण : संयोजकांनी दिलेला शब्द - चप्पल
झब्बू १- वहाण,
झब्बू २ - पादत्राणे,
झब्बू ३ - जोडे,
झब्बू ४ - खडावा,
...
इत्यादी.
--------------------------------------------------------------
या उपक्रमा-अंतर्गत दिनांक २५ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात (भारतीय वेळेप्रमाणे) रोज सकाळी १ आणि संध्याकाळी १ नवीन शब्द देण्यात येईल. झब्बू हा चालू शब्दावरूनच दिला (म्हणजे कालच्या/परवाच्या शब्दावरून नको) तर खेळ व्यवस्थित चालू राहण्यास मदत होईल.
--------------------------------------------------------------
दिनांक २५ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - माठ
आलेले झब्बू - घडा, मडकं, रांजण, गाडगं, सुरई, कुंजा, गरिबांचा फ्रीज, घट, डेरा, मटका, सुगड, बुडकुले, खुजा, कुंभ, बोळकं.
अपेक्षेपेक्षा वेगळ्या अर्थाने आलेले झब्बू - ढ, मठ्ठ, ठोंब्या, बुद्धु, बिनडोक.
आजचा दुसरा शब्द आहे - साडी
आलेले झब्बू - लुगडं, पातळ, उभे लावणं, धाबळी, जुनेरं, चीर, चिरडी, नेसू, धडुतं, आलवण.
साडीचे प्रकार - इरकल, पट्टू, वझाई नारू, कांजीवरम, पैठणी, शालू, पुणेरी, नारायणी, पटोला, संबळपुरी, टाण्ट, मुग्गा, चंद्रकळा, अष्टपुत्री.
--------------------------------------------------------------
दिनांक २६ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - शेत
आलेले झब्बू - शिवार, वावर, फड, वाफा, रान, मळा, काळी आई, वाडी, शेतजमीन, बाग, खाचर, पीक, शेतभूमी, क्षेत्र, बगिचा, परस, आगर, कृषिक्षेत्र, हरितगृह, शेताड, कुरण, भुई, ताटवा, कुळागर.
संबंधित शब्द - वरकड, कोरडवाहू, जिरायती, मीठागर, बागायती, भातशेती, मत्स्यशेती, मोत्याची शेती, हायड्रोपोनिक.
(वरील शब्दबाहुल्यावरून आपल्या शेतीप्रधान प्रदेशातील भाषिक समृद्धीची आणि वैविध्याची कल्पना येते, हे जाता जाता नमूद करायला हरकत नाही).
आजचा दुसरा शब्द आहे - सांडशी
आलेले झब्बू - चिमटा, पक्कड, गावी, इंगळी (सोनारी धंद्यातील एका ठराविक चिमट्यासाठी शब्द), सांडस.
संबंधित शब्द - सांडणे (द्व्यर्थी)
--------------------------------------------------------------
दिनांक २७ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - पलंग
आलेले झब्बू - खाट, मंचक, बाज, दिवाण, चारपाई, खाटलं, बेड, गादी, वळकटी, बिस्तर, बाजलं, माचा, पर्यंक, तल्प, बिछाना, पथारी, घडवंची, अंथरूण, शय्या, आईची मांडी (छोट्या बाळासाठी), पाळणा.
संबंधित शब्द - पलंगपोस.
आजचा दुसरा शब्द आहे - बडबड्या (बडबडी व्यक्ती)
--------------------------------------------------------------
दिनांक २८ फेब्रुवारी -
आजचा पहिला शब्द आहे - आमटी
आजचा दुसरा शब्द आहे - पळी
--------------------------------------------------------------
दिनांक १ मार्च -
आजचा पहिला शब्द आहे - काठी
आजचा दुसरा शब्द आहे - श्रीमंत (व्यक्ती)
तर मंडळी, 'श्रीमंत' ह्या शब्दासाठी साधारण समान अर्थाच्या, तुमच्याकडे किंवा कुठेही वापरल्या जाणाऱ्या मराठी शब्दांचा झब्बू सुरू होऊ द्या!
घडा(?)
घडा(?)
१. मडके/ रांजण
१. मडके/ रांजण
२. पालेभाजी या अर्थाने पांढरा व तांबडा माठ
गाडगं
गाडगं
ढ
ढ
आमच्या साताऱ्याकडे "माठ"च
आमच्या साताऱ्याकडे "माठ"च म्हणताता!!
गोल गरगरीत वरती झाकण असलेला काळा किंवा तांबड्या रंगाचा माठ पण त्यालाच एका कडेला सुरईसारखे तोंड असेल तर काहितरी वेगळे म्हणतात बहुतेक.... आठवून सांगतो
आमच्याकडे ज्याला काही येत
आमच्याकडे ज्याला काही येत नाही किंवा कळत नाही त्याला "माठ" म्हणतात..
मीसुरई
मी
सुरई
आणि
कुंजा
असे दोन शब्द ऐकले आहेत, 'साधारण समान' क्याटेगिरीत मोडावेत
घडा, मडके, रांजण, गाडगं, सुरई
घडा, मडके, रांजण, गाडगं, सुरई, कुंजा हे सर्व छानच! माठ शब्दाचे पालेभाजी वा मूर्ख हे अर्थ संयोजक मंडळाच्याही ध्यानी नव्हते. ते उचलणाऱ्या चाणाक्ष मायबोलीकरांचंही कौतुक! झब्बूमध्ये आलेले शब्द नंतर धाग्यातही टाकले जातील.
स्वरूप व इतर सारे, येऊ द्या अजून झब्बू!
गरिबांचा फ्रीज
गरिबांचा फ्रीज
जरा अवांतर:
जरा अवांतर:
माठ बघितला की "वाळा" हमखास आठवतो!!
एका दोरीला बांधून माठात सोडलेला वाळा पाण्याला एक मस्त वेगळीच चव देतो!
घडा ( मातीचा ) पापाचा नाही..
घडा ( मातीचा ) पापाचा नाही..
पालथ्या घड्यावर पाणी…पण
पालथ्या घड्यावर पाणी…पण पालथ्या माठावर …??
माठ म्हणलं की खालील आठवतं
माठ-मातीचा
माठ-कुंभारवाडा
माठ-उन्हाळ्याची सुरूवात
थंडगार पाणी, मोगर्याची फुले,वाळा
मटका ( हिंदी मराठी सरमिसळ
मटका ( हिंदी मराठी सरमिसळ बोलल्या जाणार्या प्रांतात)
घट ( कविता / गाण्यात / वादनात )
डेरा ( ताकाचा )
आकारमानात फरक आहे पण मातीचे गोल भांडे या अर्थी --
सुगड
बुडकुले
खुजा -लांब व निमुळत्या
खुजा -लांब व निमुळत्या मानेचें पाणी ठेवण्याचें मातीचें भांडें
स्वरूप म्हणतात ते भांडं आमच्याकडे होतं. आई त्याला खुजा म्हणायची. फुटबॉलच्या आकाराचे. वर पाणी आत ओतायला जागा, एका बाजूने पाणी ओतून घ्यायला लहानसा पोकळ दंडगोल, विरुद्ध बाजूला पकडायला एक वर्तुळाकार हॅंडल,
हलू नये म्हणून रिंग शेप्ड बुड
गाडगं मातीचं ( गाडगे मडके असे
गाडगं मातीचं ( गाडगे मडके असे एक शब्द आहे )
सगळे शब्द मस्तच! सुगड,
सगळे शब्द मस्तच! सुगड, बुडकुले ह्यांच्या वापराविषयी लिहिलं तरी चालेल. खुजाविषयी छानच माहिती मिळाली.
माठ
माठ
झब्बू १- ढ,
झब्बू २ - मठ्ठ,
झब्बू ३ - ठोंब्या,
झब्बू ४ - बुद्धु,
हर्पेन
हर्पेन
>>स्वरूप म्हणतात ते भांडं
>>स्वरूप म्हणतात ते भांडं आमच्याकडे होतं. आई त्याला खुजा म्हणायची.
खुप प्रयत्न करुनही त्याला काय म्हणायचे ते आठवत नाहिये.... म्हणजे खुजा म्हणतही असतील पण आमच्याकडे काहितरी वेगळे म्हणायचे बहुतेक!!
आणि आमच्याकडे जो होता त्याला असे सिंहाच्या आकाराचे तोंड होते!
अजुनएक संस्कृतप्रचुर समानार्थी शब्द "कुंभ"
हो. बरोबर सिंहाच्या आकाराचे
हो. बरोबर सिंहाच्या आकाराचे तोंड.
खुजा आमच्याकडेही होतो.
खुजा आमच्याकडेही होतो.
माझ्या लहानपणी सुगडं संक्रातीच्या पुजेसाठी असायची. हरबर्याचे धाटे, गाजराचे तुकडे , उसाचे करवे, बोरं वगैरे त्यात घालून आई पुजा करत असे. पूर्वीच्या काळी ही छोटी माठासारख्या आकाराची भांडी नंतर आपण ग्लास वापरतो तसे पाणी प्यायला वापरत असावीत का?
आमच्याकडेही होता खुजा (माहेरी
आमच्याकडेही होता खुजा (माहेरी).
माठ झब्बू ५ - बिनडोक
माठ
झब्बू ५ - बिनडोक
मडकं (गूगल मला मादक लिहायला
मडकं (गूगल मला मादक लिहायला सांगतोय! ए आय च्या ना टां) म्हटलं की मुक्ताबाईची मडकं कच्च आहे का पक्कं ही गोष्ट आठवते.
मातीचे छोटे भांडे या अर्थाने
मातीचे छोटे भांडे या अर्थाने ,
बोळके वा बोळकं. संक्रांतीला थोडीशी मोठी मातीची भंडी सुगड व लहान असलेले बोळके !
सर्वांचे झब्बू छानच! आता
सर्वांचे झब्बू छानच! आता दुसरा शब्द 'साडी' दिला आहे. त्यासाठी झब्बू येऊ द्यात.
लुगडं
लुगडं
साडी-पातळ
साडी-पातळ
नऊवारी/पाचवारी साडी
साडीचे अनेक प्रकार
साडीचा वेगळा अर्थ माहित नाही.
पातळ
पातळ
साडी -
साडी -
लुगडं
इरकल
पट्टू
वझाई नारू
कांजीवरम
पैठणी
शालू
पुणेरी
नारायणी
पटोला
कशिदा (साडीवर)
बांधणी (गुजराती)
कसाऊ (केरळ)
बोमकै (बिना चोळीची वेगळ्या पद्धतीने नेसण्याची साडि)
संबळपुरी
टाण्ट
मुग्गा
Pages