मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या

Submitted by संयोजक-मभादि on 25 February, 2022 - 01:50

आपल्या लतादीदी.

त्यांची गाणी कानावर पडलीच नाहीत असा कोणी शोधूनही सापडणार नाही. त्यांच्या चाहत्यांची तर गोष्टच न्यारी! ते येता जाता गाणी ऐकतात, गुणगुणतात, अगदी संग्रही ठेवतात.

तर मग चला, यंदाच्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकरांच्या गाण्यांच्या भेंड्या खेळूया. ह्या गानसम्राज्ञीला आपल्याकडून ही गीत-आदरांजली.
--------------------------------------------------------------
खेळाचे नियम-

१. गाणी/भजन/अभंग मराठी असावीत आणि लता मंगेशकरांनी गायलेली असावीत

२. झब्बू देणाऱ्या/री ने मुखड्याच्या पूर्ण ओळी लिहाव्यात.

३. भेंड्या २ प्रकारे खेळू शकता :
अ- पारंपरिक पद्धतीने, म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचे गाणे

ब- मुखड्यातील कुठल्याही शब्दापासून पुढील गाणे लिहा
उदा-
'असा बेभान हा वारा, कुठे ही नाव नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ,कशी येऊ'

यातील 'कशी' ह्या शब्दाचा उल्लेख करून पुढील झब्बू

' बाळा होऊ कशी उतराई
तुझ्यामुळे मी झाले आई'

अर्थात तो शब्द,मुखड्यातच असावा.

वरीलपैकी कुठल्याही एका पद्धतीने पुढचं गाणं दिलंत तरी चालेल

४. एकाचवेळी एकाहून अधिक जणांकडून गाणी आल्यास पाहिजे ते गाणे पकडून पुढे खेळ चालू ठेवता येईल.

५. शब्दाची पुनरावृत्ती झाली तर चालेल, परंतु गाणं वेगळं असावं.

मग रंगू देत गाण्याची मैफल.

सुरुवात करायला, वरचे 'बाळा होऊ कशी उतराई' हे गीत घेऊ शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगरा
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं

वादलवारं सुटल ग, वार्‍यानं तुफान उठलं ग
भिरभिर वार्‍यात, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं
वादलवारं सुटलं ग

मी
मी रात टाकली
मी कात टाकली
मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली

बाई
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं
बाई जडली आताss दोन जिवांची प्रीती गं
बाई गं, बाई गं

जीव
किती जिवाला राखायचं राखलं
राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं

ही

हा महाल कसला, रानझाडी ही दाट
अंधार रातीचा कुठं दिसंना वाट
कुणा द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी
सख्या रे घायाळ मी हरिणी

मला
दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरिणी दे गडे भीती तुझी

अन्जू, वरती पाहता हे गाणे भरत यांनी आधीच लिहून झालंय.

झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला
नभ निळे रात निळी कान्हाही निळा

सुख येता माझ्या दारी
सुखासवे तो उदया येईल
सुखासवे तो उदया येईल दिन सोन्याचा संसारी

Pages